ओडिशा खाद्य पदार्थ Odisha Food Information in Marathi

odisha food information in Marathi ओडिशा खाद्य पदार्थ, भारताचे राज्य असणारे ओडिशा या राज्याला पूर्वी ओरिसा या नावाने देखील ओळखले जात होते. देशाच्या ईशान्य भागात स्थित, हे उत्तर आणि ईशान्येकडील झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यांनी, पूर्वेला बंगालच्या उपसागरासह आणि दक्षिणेस आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांनी आणि छत्तीसगढला जोडलेले आहे. हे पूर्व भारतातील सर्वात मनोरंजक राज्यांपैकी एक आहे आणि ओडिशा या राज्याची पाककृती देखील भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळी आणि अनोखी आहे आणि आज आपण या लेखामध्ये ओडिशा राज्याची पाककृती आणि अन्न आणि खाण्याच्या सवयी या विषयी माहिती घेणार आहोत.

ओडिशा राज्यामध्ये भारतातील इतर राज्यांच्यापेक्षा स्वयंपाकमध्ये वापरण्यात येणारे तेल हे तुलनेने खूप कमी वापरले जाते म्हणजेच या ठिकाणी जास्त तेलकट पदार्थ बनवले जात नाहीत तसेच या ठिकाणी बनवले जाणारे पदार्थ हे जास्त मसालेदर देखील नसतात परंतु कमी तेल घालून आणि कमी मसालेदार करून देखील या अन्न पदार्थानाची चव हि अगदी उत्तम असते. ओरिसामध्ये घेतले जाणारे मुख्य पीक तांदूळ आहे जे ओडीशाचे मुख्य अन्न आहे.

ओरिसा हे प्रामुख्याने दुधापासून तयार केलेल्या गोड पदार्थांसाठी ओळखले जाते. रसगोल्ला, रसमलाई, चेनापोडा, खिरामोहन, राजभोग, रबडी, छेनाझिल्ली, रसबली (दुधापासून बनवलेले) आणि पिठा (केक) हे काही ठराविक गोड पदार्थ आहेत.

ओरिसाचे पारंपारिक जेवण मसालेदार आहे आणि त्यात तांदूळ, भाज्या, डाळी, चटण्या आणि लोणचे यांचा समावेश आहे. महाप्रसाद, देवांचे अन्न, फक्त मंदिरांमध्ये उपलब्ध आहे आणि हे अन्न  लाकडाच्या आगीवर मातीच्या भांड्यात शिजवले जाते. वाफवलेल्या अन्नात तांदूळ, डाळ, भाज्या, करी आणि गोड पदार्थांचा समावेश आहे.

odisha food information in marathi
odisha food information in marathi

ओडिशा खाद्य पदार्थ – Odisha Food Information in Marathi

ओडिशा पाककला ( odisha food )

ओडिशा या राज्यामध्ये शतकानुशतके पसरलेली पाककला परंपरा चालत आली आहे आणि ओडिशा मधील बहुसंख्य लोक हे मांसाहारी आहेत आणि मासे हा त्यांच्या पारंपारिक पाककृतीचा अविभाज्य घटक आहे. ग्रामीण भागामध्ये रोजच्या अन्नामध्ये तांदूळ, डाळ, भाज्या, करी आणि गोड पदार्थांचा समावेश करतात तर ओडिशा मधील शहरी भागामध्ये किंचित फरक आपल्याल पहायला मिळते.

या ठिकाणी नास्त्यामध्ये रोटी, पराठा किंवा ब्रेड हे पदार्थ मेन कोर्स म्हणून दिले जातात तसेच न्हारीसाठी पोहे आणि मुडी या सारखे पदार्थ दिले जातात. उडिया मिष्टान हे वेगवेगळ्या पदार्थांच्यापासून बनवले जाते त्यामध्ये दुध, नारळ, तांदूळ, छेंना आणि गव्हाचे पीठ हे सर्वात सामान्य आहे.

तसेच ओडीशामध्ये गोड पदार्थांमध्ये रसगुल्ला, कलाकंद, रसबली या सारखे दुधापासून विविध प्रकार बनवले जातात. चेना पीठा, एंडूरी पीठा या सारखे पारंपारिक पदार्थ देखील बनवले जातात.

ओडिशा मधील काही पारंपारिक पदार्थ – famous food of odishaes

  • चुंगडी मलाई : चुंगडी मलाई या पदार्थाला कोलंबी मलाई करी म्हणून देखील ओळखले जाते आणि हा एक करी प्रकारातील पदार्थ आहे आणि हा बनवण्यास खूप सोपा आहे. या करीमध्ये नारळाचे दुध वापरले जाते आणि या दुधापासून या पदार्थामध्ये मलई तयार होते. चुंगडी मलाई हि ओडिशा आणि बंगाल प्रदेशातील रेसिपी आहे.
  • रसमलाई : रसमलाई हि जरी बंगाली रेसिपी असली तरी हि रेसिपी ओडिशा राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आणि आवडीने बनवतात. रसमलाई या रेसिपीला रोश मलाई म्हणून देखील ओळखले जाते आणि हि रेसिपी जेवणानंतर दिली जाते आणि हि एक गोड रेसिपी आहे.
  • लुची : लुची हा पदार्थ देखील ओडिशा राज्यामध्ये खूप प्रसिध्द आहे आणि हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवलेला एक फ्लॅटब्रेड आहे आणि हे कोणत्याही ग्रेव्हीसोबत आपण खाऊ शकतो.
  • खिचडी : खिचडी हि एक ओडिशा मधील लोकप्रिय डिश आहे जी तांदूळ किंवा मसूर एकत्र तुपामध्ये शिजवली जाते हे ओडिशा मधील पुरी मंदिर मधील भगवान जगन्नाथ यांच्या प्रसाद म्हणून दिले जाते.
  • मचा घंटा : ओडिशा मधील बहुसंख्य लोक हे मांसाहारी आहेत आणि मासे हा त्यांच्या पारंपारिक पाककृतीचा अविभाज्य घटक आहे. मचा घंटा हा पदार्थ देखील माश्यांच्यापासून बनवला जाते आणि यामध्ये बटाटे, कांदा, लसून आणि काही मसाले देखील घातले जातात.
  • रसबली : रस्बली हि रेसिपी ओडिशामधील केंद्रपारा या जिल्ह्यामध्ये उगम पावलेली रेसिपी आहे आणि हि रेसिपी गोड प्रकारामध्ये मोडते. रसबली हा पदार्थ दुधापासून बनवला जातो आणि ओडिशा मधील भगवान जगन्नाथ मंदिरातील चप्पणा भोगाचा एक भाग म्हणून दिला जातो.
  • गुपचूप : गुपचूप म्हणजेच ज्याला आपण पाणीपुरी या नावाने ओळखतो तो ओडिशा मधील देखील एक लोकप्रिय पदार्थ आहे आणि या पदार्थाच्या परिचयाची गरज भासणार नाही कारण ह्या पदार्थाविषयी सर्वांना माहिती आहे. गुपचूप या पदार्थाला पश्चिम भारतामध्ये पाणीपुरी, बंगालमध्ये पुचका आणि उत्तरेस गोलगप्पा या नावाने ओळखले जाते.
  • दलम : दलम हि एक ओडिशा मधील पौराणिक पारंपारिक डिश आहे आणि ओडिशा खाद्यपदार्थांचे नाव निघाले कि तोंडातून दुसऱ्या किंवा तिसऱ्यावेळी येणारे नाव म्हणजे दलम. हे भाजलेली मुग डाळ, रताळी, पपई आणि भोपळा इत्यादी भरपूर भाज्यांनी शिजलेले ओदिशाची हि प्रतिष्ठित पाककृती केवळ स्थानिक लोकांच्यामध्ये नाही तर पर्यटकांच्यामध्येहि खूप लोकप्रिय आहे.
  • पखाला भाटा : पखाला भाटा हे ओडीशाचे उन्हाळी अन्न म्हणून खूप लोकप्रिय आहे आणि पखाला भाटा हे ओडीशामध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये दुपारचे जेवण म्हणून तयार केले जाते. पखाला भाटा हि रेसिपी ओडिशामधील भगवान जाग्न्नाथांच्या पवित्र मंदिरामध्ये पावली.

आम्ही दिलेल्या odisha food information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ओडिशा खाद्य पदार्थ मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Odisha food information in marathi wikipedia या Odisha food information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about odisha food in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये famous food of odisha Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!