पद्मासन माहिती मराठी Padmasana Information in Marathi

padmasana information in marathi पद्मासन माहिती मराठी, आपल्या आजच्या दगदगीच्या आणि गडबडीच्या आयुष्यामध्ये व्यायाम हा एक महत्वाचा भाग बनला आहे कारण व्यायाम आणि योगासनामुळे आपले शरीर खूप सदृढ राहते त्यामुळे रोज योगासन करणे खूप गरजेचे आहे. योगासनामध्ये खूप असे प्रकार केले जातात आणि प्रत्येक प्रकारचा काहीतरी एक वेगळा फायदा होतो. योग ही निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान आहे. ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.

योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो. योग ही एक जुनी कला आहे ज्यामध्ये शरीर मनाशी जोडलेले असते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे ज्याद्वारे शरीरातील सर्व घटक ध्यान आणि विश्रांतीच्या मदतीने मनाशी जोडले जातात. योगाची नियमितता आत्म-जागरूकता निर्माण करते आणि एखाद्याला शिस्तबद्ध बनवते. हे नकारात्मक विचार टाळण्यास आणि नकारात्मकतेचे घटक समाप्त करण्यास मदत करते.

योगासनाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत जसे कि प्राणायाम, अन्लोम विन्लोम, चक्रासन, धनुरासन, सवासन, पद्मासन आणि आज आपण या लेखामध्ये पद्मासन या असणाविषयी माहिती घेणार आहोत. पद्मासन हा एक योगासनाचा भाग आहे आणि जर आपण पद्मासन रोज केले तर आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. पद्मासन हा शब्द दोन भिन्न शब्दांच्यापासून बनलेला आहे पद्म आणि आसन.

पद्म म्हणजे कमाल आणि आसन म्हणजे बसने. आपण ज्यावेळी प्राणायाम, अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, ध्यान करताना पद्मासन मध्ये बसून करतो त्यामुळे पद्मासन मध्ये बसण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच जर आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर आपण थोड्या वेळासाठी पद्मासनामध्ये बसू शकतो त्यामुळे आपल्याला शांतात वाटू शकते.

padmasana information in marathi
padmasana information in marathi

पद्मासन माहिती मराठी – Padmasana Information in Marathi

पद्मासन म्हणजे काय ?

पद्मासन हे दोन शब्दांनी बनलेले आहे ते म्हणजे पद्म आणि आसन. पद्म या शब्दाचा अर्थ कमाल असा होतो आणि आसन म्हणजे बसने. पद्मासन हि एक बसण्याची प्रक्रिया आहे जी आपण , अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, ध्यान करताना वापरू शकतो.

पदामासानाचा इतिहास आणि माहिती – information about padmasana in marathi

पद्मासन हे सर्वात प्राचीन असणापैकी एक आहे आणि हे हठ योगाच्या आधीपासून अस्थित्वात असल्याचे मानले जाते. हे आस परम्पारीकपणे ध्यान अभ्यासामध्ये वापरले जाते कारण ते शरीराला शारीरिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी मदत करते पद्मासन हे सरळ मणक्याला चालना देत असल्याने या आसनामुळे श्वास मंद आणि खोल होऊ शकतो आणि प्राण मुक्तपणे वाहू शकतो आणि मन ध्यानस्त अवस्थेत प्रवेश करू शकते.

हिंदू धर्म, बौध्द, जैन आणि तंत्र यासारख्या इतर धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरामध्ये पद्मासन हे आसन देखील मोठ्या प्रमाणावर ध्यान मुद्रा म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर शिव, गौतम बुध्द आणि तीर्थकारांच्यासारखे तपस्वी आणि देवतांच्या चीत्रानामध्ये पद्मासन मुद्रा दिसून आली आहे.

पद्मासानाचे प्रकार – types 

भिन्न योग अभ्यासकामध्ये भिन्न क्षमता असू शकतात आणि याचा विचार करूनच पद्मासनाचा अभ्यास हा वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागले आहे. चला तर आता आपण पद्मासनाचे प्रकार पाहूयात.

अर्ध पद्मासन : अर्ध पद्मासनाला अर्ध कमाल स्थिती म्हणून देखील ओळखले जाते. दोन्ही पाय ओलांडल्याच्या स्थितीसाठी फक्त एक पाय विरुध्द मांडीवर ठेवावा लागतो. एकदा नवशिक्यांचा आत्मविश्वास वाढला कि ते पद्मासन स्थिती करू शकतात.

बध्द पद्मासन : पद्मासन मुद्रांचे अधिक जातील आणि प्रगत स्वरूप म्हणजे हि स्थिती आहे. आणि हे पद्मासन खाली दिल्लेल्या सूचनांच्या नुसार करावे लागते.

पद्मासन कसे करावे – padmasana mahiti in marathi

पद्मासन हे एक मध्यवर्ती ते प्रगत आसन आहे ज्यासाठी गुढगे आणि नितंबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लवचिकता आवश्यक असते. अश्या प्रकारे जे सराव करणारे लोक असतात ते सराव करण्यापूर्वी त्यांनी गतीशिलता व्यायामाने शरीर उबदार केले पाहिजे. जर तुमचा वरचा गुढघा मांडी पर्यंत पोहचत नसेल तर तुम्ही खाली ब्लॅकेट किंवा ब्लॉक वापरला जावू शकतो. जे लोक हे असं नवीन शिकणारे असतात त्यांनी प्रथम अर्ध पद्मासनाचा सराव करून पद्मासन करू शकतात

  • पद्मासन करताना सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा छोटासा जमखाना अंथरून घ्या.
  • त्यानंतर तुमचे पाय लांब करा आणि तुमचा पाठीचा कणा देखील सरळ ठेवून बसून सुरुवात करा.
  • प्रथम तुमचा उजवा गुढघा वाकव आणि पाय डाव्या मांडीच्या दिशेने आणण्यासाठी खालच्या उजव्या पायाला पाळणा द्या आणि तुमचा उजवा पाय डाव्या सरळ असणाऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा.
  • आता तुमचा डावा पाय उजव्या मांडीच्या दिशेने दिशेने आणा आणि तो पाय तुमच्या उजव्या मांडीवर ठेवा.
  • एकदा आपण पद्मासन स्थितीमध्ये बसल्यानंतर मुद्रा तयार करण्याच्या पर्यायासह हात गुढघ्यावर विश्रांती घेवू शकतात.

पद्मासन फायदे मराठी – padmasana benefits in marathi

पद्मासन हे ध्यान आणि प्राणायामाच्या सरावासाठी आदर्श आसन मानले जाते कारण शरीराला कमीतकमी स्नायूंच्या प्रयत्नांनी आधार दिला जातो ज्यामुळे अभ्यासकाला सहजपणे शांतता मिळू शकते. पद्मासानाचा जर आपण नियमितपणे सराव केला तर आपल्याला अनेक फायदे मिळतात ते फायदे काय आहेत ते आपण खाली पाहूया.

  • पदामासन नियमितपणे केल्यानंतर स्नायूंचा ताण कमी हिण्यास मदत होते.
  • एक स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळीचा त्रास हा खूप असतो, अश्या स्त्रियांनी नियमित पणे पद्मासन केले तर त्यांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
  • पद्मासनाच्या नियमित अभ्यासाने पचन सुधारते त्यामुळे ज्यांना पचनाच त्रास आहे त्यांनी नियमित पद्मासन केले तर त्यांचा त्रास कमी होईल.
  • यामुळे एकाग्रहता वाढण्यास देखील मदत होते.
  • पद्मासनाच्या नियमित अभ्यासाने रक्तदाब कमी होतो.
  • ओटीपोटात तसेच पुनरुत्पादक अवयावांच्यामध्ये रक्त प्रवाह वाढवते.

पद्मासन करण्याचा कालावधी – duration 

जर एखादा व्यक्ती नवीन शिकणारा असेल तर एक किंवा दोन मिनिटापेक्षा जास्त पवित्रा टिकवून ठेवणे शक्य नाही आणि हळू हळू कालावधी तीन तास किंवा त्याहून अधिक वाढवला जावू शकतो. तीन तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ पवित्रा टिकवून ठेवण्यास सक्षम असतानाच इच्छुकाला प्रभुत्व प्राप्त होते. एकदा हा टप्पा गाठला कि त्याला योगाच्या उच्च स्तरावर जाने शक्य होईल.

आम्ही दिलेल्या padmasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पद्मासन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about padmasana in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि padmasana mahiti in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!