पिंपळाच्या झाडाची माहिती Peepal Tree Information in Marathi

Peepal Tree Information in Marathi पिंपळ झाडाची माहिती Pimpalache Jhad भारतभर आढळणारा, जास्तीत जास्त मंदिरांच्या आवारात आढळणारा सगळ्यांना परिचित असलेला घनदाट सावली देणारा वृक्ष पिंपळ – pipal tree. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते. म्हणून याला ‘अक्षय वृक्ष’ असे म्हणतात. या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धाना ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे या वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ म्हटले जाते. पिंपळ हे झाड सर्वांगाने उपयुक्त असे आहे. आणि हा वृक्ष २४ तास ऑक्सिजन मिळवून देतो. पिंपळाची पाने, साल, फुले, बिया या सगळ्यांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात ज्याचा आरोग्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे पिंपळाला खूप महत्त्व आहे.

peepal tree information in marathi
peepal tree information in marathi

पिंपळाच्या झाडाची माहिती – Peepal Tree Information in Marathi

नावपिंपळ – Peepal Tree in Marathi
वैज्ञानिक नावFicus Religiosa
उंची१० ते १५ मीटर
आयुष्यदीर्घायुष्य (सुमारे ९०० ते १५००)

पिंपळ हा मुळचा भारत, बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन या देशात आढळतो. ‘Moraceas’ म्हणजे ‘वट’ कुलातील पिंपळ हा भारतीय उपखंडातील वृक्ष असून भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर जेथे जागा मिळेल तेथे वाढतो त्यामुळे हा वृक्ष मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. याचे शास्त्रीय नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे.

पिंपळाची उंची १० ते १५ मीटर पर्यंत वाढते. याचे खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. याची पाने लांब देठाची, हृदयाकार असतात. हि पाने कोवळी असताना तपकिरी- तांबूस आणि नंतर हिरव्या रंगाची होतात. याला गर्द पाने असून ती वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात.

याची फुले हिरव्या रंगाची, अतिशय लहान घागरीसारख्या आकाराच्या गडुसारखी दिसतात. याचे पुष्पाशय पानांचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये तीन पाकळ्यांची नरपुष्पे व पाच पाकळ्यांची मादिपुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची फळे अतिशय लहान असतात.

पक्ष्यांच्या विष्टेतून पिंपळाचे बी कुठेही पडले तरी ते सहज रुजते आणि अनपेक्षित ठिकाणी उगवतात. आणि याचे मूळ खूप खोलवर पसरते. पिंपळाला दीर्घायुष्य असते.

पिंपळाच्या झाडाचे महत्त्व / पिंपळ पूजा 

पुराणामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व दिले जाते. भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाचे झाड म्हणजे त्यांचे स्वतःचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे. यामुळे असे मानले जाते कि, पिंपळाची पूजा केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. पिंपळाच्या झाडाची नियमित पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते आणि सुख, ऐश्वर्य प्राप्त होते.

पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी ?

 • भारतीय संस्कृतीमध्ये अनेक धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे मानले जाते कि, या झाडामध्ये भगवान विष्णूंचे वास्तव्य आहे. असे म्हणतात कि, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्र्य येत नाही.
 • पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
 • पिंपळ पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. पूजेच्या सुरुवातीला झाडाला गायीचे दुध, तीळ आणि चंदन मिश्रित पाणी अर्पण करावे.नंतर धूप दाखवून खालील मंत्र जप करावा

मूलतो ब्रम्हरूपाय मध्यतो विष्णूरूपिणे | अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः ||           

आयुः प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्वसंपदम | देही देव महावृक्ष त्वामहं शरणं गतः ||

भगवान शिव यांचा अवतार मानल्या जाणाऱ्या ऋषी पिप्लादाचा जन्म पिंपळाच्या झाडाखाली झाला होता आणि त्याने पिंपळाची पाने खाऊनच ध्यान केले. त्यामुळे हिंदू धर्मग्रंथानुसार, शनिवारी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवल्याने शनीच्या साडेसाती, प्रभाव आणि इतर परिणामांकडून मुक्तता मिळते. म्हणून शनिवारी जे लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करतात त्यांना ऋषी पिप्लादांचा आशीर्वाद मिळतो आणि शनिदेव त्याला त्रास देत नाहीत.

रविवार सोडून इतर दिवशी दररोज पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसा म्हंटले तर हनुमानाची कृपा कायम राहते असे म्हणतात.

पिंपळाच्या पानांची माहिती

पिंपळाच्या पानांचे अनेक फायदे आहेत. या पानांचा त्वचेसाठी फायदा होतो.

 • पिंपळाच्या पानांची पेस्ट करून जखमेवर लावली असता जखम बहरून निघण्यास मदत होते.
 • बऱ्याचदा हवेतील वातावरणाने अथवा प्रदुषणामुळे लालसरपणा निर्माण होत असतो. यावर पिंपळाच्या पानांची पेस्टचा वापर नियमित केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते.
 • त्वचेवर येणाऱ्या लहानमोठ्या पुराळांवर देखील पिंपळाची ताजी पाने आणि गव्हाच्या पिठात घालून पेस्ट बनवून लावल्यास पुरळ आणि त्यामुळे आलेली सूज निघून जाण्यास मदत होते.
 • त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी पिंपळाची ताजी पाने भिजवून त्याचा लेप दिल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
 • पिंपळाच्या पानातून येणारा चीक डोळ्यांना लावल्यास डोळ्यांमध्ये काही खुपत असेल तर ते लवकर बरे होण्यास मदत होते.
 • पायाच्या टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी पिंपळाच्या पानांचा रस किंवा चीक पायांना लावल्यास उपयोगी ठरतो.

पिंपळाचे झाड तोडल्यावर काय होते ?

पिंपळाच्या झाडाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय असे स्थान आहे. हिंदू संस्कृतीत ज्या वृक्षांना तोडू नये असा दंडक आहे, त्यापैकी एक पिंपळ आहे. परंतु हिंदू धर्मशास्त्रानुसार पिंपळाचे झाड घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला लावणे हानिकारक असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला असल्यास किंवा पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर पडणे अशुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या घरावर अनेक मोठी संकटे येऊ शकतात असे म्हणतात.

पिंपळाच्या झाडाचे फायदे / उपयोग

 • आयुर्वेदामध्ये असा उल्लेख आहे कि, पिंपळाची फळे सारक असून बिया शीतक असतात. दमा, मधुमेह, आमांश, पोटाचे विकार तसेच चक्कर येणे यावर हा वृक्ष गुणकारी आहे.
 • पोटदुखी : पिंपळाच्या २-५ पाने घेऊन त्यात ५० gm गुळ घालून मिश्रण बनवावे आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खाल्याने पोटदुखीवर आराम मिळतो.
 • विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पाने चावून खाल्यास विषाचा असर कमी होण्यास मदत होते.
 • पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचारोगावर उपयुक्त ठरते. तसेच याच्या प्रयोगामुळे चेहऱ्यावरील रंगांमध्ये उजळपणा अधिक प्रमाणात मिळतो.
 • अस्थमा असणाऱ्यांना पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करून हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खावावे. यामुळे अस्थमा दूर होण्यास मदत होते.
 • बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पिंपळाची फळे लाभदायी ठरतात.
 • तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असेल, सूज आली असेल तर अथवा त्रास होत असेल तर पिंपळाच्या पानाचा उपयोग होतो.
 • तापावर औषध म्हणून पिंपळाचा खूपच फायदा होतो. १०-२० पिंपळाची पाने घेऊन पाण्यात उकळून त्याचा काढा करून त्याचे सेवन केल्यास ताप उतरण्यास मदत होते.
 • रक्तशुद्धीकरणासाठी १-२ gm पिंपळाचे बियांच्या पावडरमध्ये मिसळून रोज दोन वेळा घ्यावे. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
 • डोळ्यांचे दुखणे, दातांचे दुखणे यावर पिंपळ लाभदायी ठरते. डोळ्यांच्या दुखण्यावर पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो. दात दुखत असल्यास पिंपळ आणि वटाच्या झाडाची साल पाण्यात उकळून त्याने गुळण्या केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते तसेच हिरड्यांची सूज आणि तोंडातून येणारी दुर्गंधीदेखील निघून जाते.
 • पिंपळाच्या लाकडापासून खोकी, आगपेट्या, फळ्या इ. तयार करतात. जळनासाठीही याचा वापर केला जातो.
 • पिंपळाचा उपयोग स्त्रियांच्या समस्येसाठी देखील उपयोगी ठरते. पिंपळाची फळे आणि साले दुधामध्ये घालून उकळवून त्यामध्ये साखर आणि मध मिसळून प्यायल्यास, सेक्शुअल स्टॅमिना वाढतो.   
 • नक्की वाचा: आंबा झाडाची माहिती 

पिंपळाच्या झाडाचे fact

 • पिंपळाचे झाड २४ तास ऑक्सिजन मिळवून देतो. हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो.
 • पिंपळाला भरपूर आयुष्य असते त्यामुळे याला “अक्षय वृक्ष” असे म्हणले जाते.
 • गौतम बुद्धाना पिंपळाखाली ज्ञान प्राप्त झाले त्यामुळे या वृक्षास ‘बोधिवृक्ष’ किंवा ‘ज्ञानाचा वृक्ष’ असेही म्हंटले जाते.
 • पिंपळाचे शास्त्रीय नाव ‘फायकस रिलिजिओसा’ असे आहे.
 • पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्या सावलीत अतिशय थंडावा असतो.
 • पिंपळाची पाने, साल, फुले, बियांना आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. पिंपळाच्या पानामुळे रक्त शुद्धीकरण होते.

आम्ही दिलेल्या peepal tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पिंपळाच्या झाडाची” pimpal zad अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या neem information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये peepal tree information in marathi wikipedia Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about peepal tree in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!