कुतुब मिनार ची माहिती Qutub Minar Information in Marathi

Qutub Minar Information in Marathi कुतुब मिनार विषयी माहिती कुतुब मिनार हि एक अशी ऐतिहासिक इमारत आहे जी दिल्लीमध्ये राज्य करणाऱ्या एका हिंदू राजाचे त्याच्या दिल्लीतील शेवटच्या पराभवानंतर बांधली. कुतुब मिनार हा ७३ मीटर उंच असून हा कुतुब-उद-दीन ऐबकने इ.स ११९३ मध्ये बांधला होता. कुतुब मिनार हा जगातील सर्वात उंच मिनार आहे आणि हा ऐतिहासिक मिनार ८०० वर्षापासून चांगल्या प्रकारे टिकून आहे. या मिनाराला एकूण पाच मजले आहेत त्यामधी खालचे तीन माजले हे लाल वाळूने बांधले आहेत आणि वरील दोन माजले हे संगमरवरी दगडाने आणि वाळूने बांधले आहेत.

इ.स ११९३ पासून दिल्ली हे शहर वेगवेगळ्या राजकर्त्यांच्या आणि राजवटीमध्ये गेले आणि त्यावेळी प्रत्येक राजवटीतील राजकर्त्यांनी कुतुब मिनाराचे बांधकाम केले आणि मिनार मजबूत केले.

आज या लेखामध्ये आपण जगातील सर्वात उंच आणि भारतातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक इमारत म्हणजे कुतुब मिनार बद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेवूया कुतुब मिनार कसा आहे, त्याची उंची किती आहे, त्याचा इतिहास आणि तेथे पाहण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत.

qutub minar information in marathi
qutub minar information in marathi

कुतुब मिनार बद्दल माहिती मराठी – Qutub Minar Information in Marathi

नावकुतुब मिनार
ठिकाणमेहरौली,  दिल्ली
ओळखऐतिहासिक स्मारक
उंची७३ मीटर
स्थापनाया मिनाराचे बांधकाम हे इ.स ११९३ मध्ये सुरु झाले होते ते इ.स ११९७ मध्ये पूर्ण झाले
संस्थापककुतुब-उद-दीन ऐबकने

कुतुब मिनार हा इ.स ११९३ मध्ये बांधला आणि या मिनार मध्ये ५ वेगवेगळ्या मजल्या आहेत आणि ह्या मजल्यांना बाल्कनींचे स्वरूप दिले आहे. या मिनाराच्या पहिल्या तीन मजल्या लाल वाळूच्या दगडापासून बनलेल्या आहेत; चौथ्या आणि पाचव्या मजल्या संगमरवरी आणि वाळूच्या दगडाच्या आहेत.

टॉवरच्या पायथ्याशी क्व्वात-उल-इस्लाम मशीद आहे, जी भारतात बांधली जाणारी पहिली मशीद आहे. कुतुब मिनार या ऐतिहासिक बांधकामा बद्दल असे म्हंटले जाते कि भारतातील मुस्लीम राजवटीची सुरुवात दर्शविण्यासाठी हा विजयाचा बुरुज म्हणून उभारण्यात आला होता. आयबक ते तुघलक पर्यंत स्थापत्य शैलीचा विकास मीनारमध्ये अगदी स्पष्ट दिसून येतो.

हा मिनार ७३  मीटर उंच असणारा कुतुब मिनार तळाशी ४७ फूट आहे आणि शिखरावर ९ फूट आहे. या मिनाराचे बांधकाम हे इ.स ११९३ मध्ये सुरु झाले होते ते इ.स ११९७ मध्ये पूर्ण झाले पण आज हा कुतुब मिनार आपल्याला भग्नावस्थेत पाहायला मिळतो. या मिनाराचा खालच्या बाजूचा व्यास हा १४ मीटर इतका आहे तर वरच्या बाजूला तो कमी कमी होत २.७ मीटर आहे.

कुतुबमिनार चा इतिहास – Qutub Minar History in Marathi 

कुतुब मिनार हा ७३ मीटर उंच असून हा कुतुब-उद-दीन ऐबकने इ.स ११९३ मध्ये बांधला होता. कुतुब मिनार हा जगातील सर्वात उंच मिनार आहे आणि हा ऐतिहासिक मिनार ८०० वर्षापासून चांगल्या प्रकारे टिकून आहे. या मिनाराला एकूण पाच माजले आहेत त्यामधी खालचे तीन माजले हे लाल वाळूने बांधले आहेत आणि वरील दोन माजले हे संगमरवरी दगडाने आणि वाळूने बांधले आहेत.

दिल्लीतील प्रत्येक राजवटीतील राजकर्त्यांनी या मिनाराच्या बांधकाम प्रगतीस हातभार लावला. या मिनाराचे बांधकाम हे इ.स ११९३ मध्ये सुरु झाले होते ते इ.स ११९७ मध्ये पूर्ण झाले. पण हा मिनार त्यावेळी फक्त २ मजलीच बांधण्यात आला होता आणि त्यानंतर इ.स १२२० मध्ये शम्स-उद-दीन इल्तुतमिशने या मिनारावर आणखीन तीन माजले बांधले,

पण ते विजेच्या कडकडाटामुळे पडले आणि नुकसान झाले त्यानंतर तुघलक राजवटीमध्ये फिरोजशाह तुघलकाने याची पुनर्बांधणी केली, ज्याने टॉवरमध्ये पाचवा मजला जोडला. पण ३०० वर्षानंतर इ.स १८०३ मध्ये मिनारचे भूकंपामुळे मोठे नुकसान झाले त्यावेळी ब्रिटीश इंडियन आर्मीचे सदस्य मेजर रॉबर्ट स्मिथ यांनी इ.स १८२८ मध्ये संरचनेची दुरुस्ती केली. अश्या प्रकारे या मिनाराचे बांधकाम आणि प्रगती होत गेली.

कुतुब मिनार या ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे 

जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. दिल्लीतील कुतुब मिनार इमारतीमध्ये सर्व इतिहास प्रेमींसाठी असंख्य आकर्षणे आहेत त्यामधील काही ठिकाणे खाली दिले आहेत.

  1. दिल्लीतील या मिनाराच्या पायथ्याशी आपल्याला क्व्वात-उल-इस्लाम मशीद पाहायला मिळते जी एक भव्य स्मारक आहे आणि हि मशीद भारतामध्ये बांधली जाणारी पहिली मशीद आहे.
  2. या ठिकाणी एक मिनाराच्या दक्षिणेकडे एक मशिदीचा घुमट दरवाजा आहे ज्याला अलाई दरवाजा दरवाजा या नावाने ओळखले जाते.
  3. या ठिकाणी अलाउद्दीन खिलजीची आणि इमाम जमीन (तुर्कस्तानी धर्मगुरू) यांच्या कबरी आहेत.
  4. दिल्लीतील सल्तनतचा जो दुसरा शासक म्हणून ओळखला जाणारा इल्तुतमिश याची बांधलेली कबर या ठिकाणी पाहायला मिळते.
  5. या ठिकाणी एक न गंजणारा स्थंभ आहे जो दुसऱ्या चंद्रगुप्ताने बांधला आहे.

कुतुब मिनार विषयी काही मनोरंजक तथ्ये – interesting facts about qutub minar 

  • अरबीमध्ये कुतुब मिनार या शब्दाचा अर्थ ध्रुव किंवा अक्ष असा होतो.
  • पश्चिम दिल्लीच्या हस्तसल गावातील मिनी कुतुब मीनार आणि दौलताबादमधील चांद मीनारची रचना हि या मिनाराच्या बांधकाम शैलीपासून प्रेरित होऊन बांधलेली आहे.
  • कुतुब मीनार हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख स्त्रोत आहे.
  • कुतुब मीनार युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहे.
  • कुतुब मिनार हा लाल वाळू आणि पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधला आहे.
  • २००६ मध्ये दिल्लीतील कुतुब मिनार या स्मारकाला ३.९ दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली होती ज्यामुळे २००६ मध्ये कुतूब मिनार हे स्मारक भारतातील सर्वात जास्त भेट दिलेले स्मारक बनले.
  • कुतुब मिनारला सर्पिली आकाराचा जिना आहे आणि या मिनाराला ३७९ पायऱ्या आहेत.
  • मोहम्मद घोरीचा राजपुतांवर विजय साजरा करण्यासाठी कुतुब मीनार बांधण्यात आला असे म्हंटले जाते.

कुतुब मिनार कोठे आहेhow to reach qutub minar 

  • जर तुम्हाला मेट्रोने जायचे असल्यास जवळचे मेट्रो स्टेशन कुतुब मिनार मेट्रो स्टेशन आहे. या ठिकाणी मेट्रोने येवून तुम्ही कुतुब मिनार पर्यंत लोकल बसने किंवा रिक्षाने जावू शकता.
  • दिल्ली या शहरामध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्या ठिकाणी सर्व भारतातील आणि भारताबाहेरील विमाने उतरतात आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुतुब मिनार पासून जवळ देखील आहे.
  • दिल्ली या शहरामध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, जुनी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन ही दिल्लीची तीन महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहेत आणि हि रेल्वे स्टेशन बहुतेक भारतातील सर्व शहरांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही जगातील कोणत्याही कोपऱ्यातून दिल्ली पर्यंत पोहचू शकता आणि तेथून कुतुब मिनार पाहण्यासाठी बसने किंवा रिक्षाने जावू शकता.
  • दिल्ली हे शहर भारतातील मुख्य शहर असल्यामुळे हे शहर भारतातील सर्व राष्ट्रीय मार्ग आणि महामार्गांना चांगले जोडलेले आहे त्यामुळे आपण ह्या शहरामध्ये कोणत्याही मुख्य शहरातून बस पकडून किंवा प्रायवेट बस पकडून दिल्ली मध्ये पोहचू शकतो. तेथून कुतुब मिनार पाहण्यासाठी तेथील लोकल बसने किंवा रिक्षाने जावू शकता.

कुतुब मिनार ची उंची किती आहे ?

कुतुब मिनार हा ७३ मीटर उंच असून हा कुतुब-उद-दीन ऐबकने इ.स ११९३ मध्ये बांधला होता.

टीप :

  • पर्यटकांच्यासाठी दिल्लीतील हे कुतुब मिनार हे सकाळी ७ ते संध्याकाळी ५ पर्यंत पाहण्यास चालू असते.
  • भारतातील पर्यटकांच्यासाठी हा मिनार पाहण्यासाठी ३० रुपये प्रवेश शूल आहे आणि विदेश पर्यटकांच्यासाठी हा मिनार पाहण्यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
  • या ठिकाणे फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी २५ रुपये शुल्क आहे.

आम्ही दिलेल्या qutub minar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कुतुब मिनारची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या qutub minar information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about qutub minar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये qutub minar in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!