शहाजीराजे भोसले माहिती Shahaji Raje Information in Marathi

Shahaji Raje Information in Marathi शहाजी राजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते. शहाजीराजे भोसले यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोगलांची चाकरी केली. परंतु ते एक लष्करी नेते होते. त्या सोबतच त्यांना सरलष्कर अशी पदवी देखील मिळाली आहे. हे एक शूर आणि एकनिष्ठ लढवय्ये होते. शहाजी भोसले सतराव्या शतकातील भारताचे लष्करी नेते होते. शहाजी यांना अहमदनगर येथे राज्य करणारे त्यांचे वडील मालोजी यांच्याकडून पुणे आणि सुपे येथे राज्य करण्याचा वारसा मिळाला. आजच्या लेखामध्ये आपण शहाजीराजे भोसले यांची सविस्तर माहिती घेणार आहोत. 

shahaji raje information in marathi language
Shahaji Raje Information in Marathi

शहाजीराजे भोसले माहिती मराठी – Shahaji Raje Information in Marathi

नाव (Name)शहाजीराजे मालोजीराजे भोसले
जन्म (Birthday)१६ मार्च १५९४
वडील (Father Name)मालोजीराजे भोसले
आई (Mother Name)उमाबाई शहाजीराजे भोसले
पत्नी (Wife Name)जिजाबाई, तुकाबाई
मुले (Children Name)पहिले थोरले संभाजी दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे व्यंकोजी राजे.
मृत्यू (Death)२३ जानेवारी १६६४
आदिलशाहीने दिलेली पदवी“सरलष्कर” आणि “महाराजा” अशा पदव्या दिल्या. आणि “महाराज फर्जत शहाजी भोसले” हा किताब

शहाजी राजे जन्म:

शहाजी भोसले यांचा जन्म‌ १६ मार्च १५९४ मध्ये झाला. शहाजी भोसले सतराव्या शतकातील भारताचे लष्करी नेते होते. त्यांनी अहमदनगर सल्तनत, विजापूर सल्तनत आणि मोगलांच्या कारकीर्दीमध्ये वेगवेगळ्या वेळी सेवा केली. शहाजी भोसले हे भोसले कुळातील सदस्य होते. शहाजी यांना अहमदनगर येथे राज्य करणारे त्यांचे वडील मालोजी यांच्याकडून पुणे आणि सुपे येथे राज्य करण्याचा वारसा मिळाला.

जेव्हा दख्खन येथे मुघलांनी आक्रमण केले तेव्हा शहाजी राजे त्यांच्या सैन्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी थोड्या काळासाठी बादशहा शहाजहांची सेवा केली. आपल्या जहागिरी पासून वंचित राहील्यावर महाराजांनी १६३२ मध्ये विजापूर कडे दुर्लक्ष केले आणि पुणे आणि सुपे या राज्यांवर पुन्हा नियंत्रण मिळवले.

१६३८ मध्ये त्यांना बंगळूरचे राज्य देखील मिळाले जेव्हा विजापुरने केम्पे गौडा तिसरा राज्यावर आक्रमण केलं. बघता बघता हे विजापूरचे मुख्य सेनापती देखील बनले. दुर्दैवाने त्यांचे वडील मालोजी यांचं निजामशहाच्या बाजूने युद्धात लढताना निधन झालं आणि मग शहाजी आणि त्यांचे बंधू शरीफजी यांचं पालनपोषण त्यांचे काका म्हणजेच मालोजींचे बंधू विठोजीराजे यांनी केले.

गनिमी युद्धाच्या सुरुवातीच्या घोडदौड्याने त्यांनी भोसल्यांचे घराणे प्रतिष्ठित केलं. शहाजी भोसले हे मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते. वडील मालोजी प्रमाणेच शहाजींनी अहमदनगर सल्तनतच्या मलिक अंबरच्या सैन्यात नोकरी केली. १६०६ मध्ये जेव्हा मालोजी यांचे निधन झाले त्यावेळी शहाजीराजे अवघ्या बारा वर्षाचे होते आणि ते अंबर सैन्यात कमांडर होते. १६२५ पर्यंत शहाजी राजांनी “सरलष्कर” असे उच्चपद मिळवले.

शहाजी राजे विवाह:

शहाजी महाराजांचा पहिला विवाह लखुजी जाधव हे एक निजामशाहीतील सरदार आणि सिंदखेडचे पिढीजात देशमुख यांची कन्या जिजाबाई यांच्याशी १६०९ साली झाला. जिजाबाई यांच्या पासून महाराजांना सहा अपत्ये झाली त्यापैकी संभाजी आणि शिवाजी हे दोन दीर्घ आयुष्यी होते बाकीचे अपत्य अल्पायुषी ठरले. तसंच महाराजांना आणखी दोन बायका होत्या एक तुकाबाई आणि दुसरी नरसाबाई. तुकाबाई या मोहिते घराण्यातील होत्या. तुकाबाई यान पासून महाराजांना एकोजी राजे झाले जे पुढे तंजावर येथे राज्य करत होते.

आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला:

अहमदनगरचे निजामशहा, उत्तर मोगल साम्राज्य आणि इतर दख्खन विरुद्ध संघर्षात सहभागी होते. महाराजांनी वेळोवेळी त्यांची निष्ठा या राज्यांमध्ये बदलत राहिली. १६२४ मध्ये शहाजी महाराजांनी निजामशाहीचा मलिक अंबर याला साथ देऊन आदिलशाह विरुद्ध भातवडीच्या युद्धात विजय मिळवला. परंतु त्यामध्ये त्यांचे भाऊ शरीफजी मृत्युमुखी पडले.

परंतु शहाजी आणि त्यांचे चुलत भाऊ खेलोजी भोसले यांच्या मध्ये मतभेद झाले कारण शहाजी महाराजांच्या मते निजामशाही त्यांच्या चुलत भावाला जास्त महत्त्व देत होते. आणि ते निजामशाहीच्या या वागण्यामुळे असमाधानी होते म्हणून त्यांनी त्यांची निष्ठा आदिलशाही कडे वळवली. परंतु १६२७ मध्ये विजापूरच्या गादीवर बसलेला इब्राहीम आदिलशहा यांचे निधन झालं.

१६२८ मध्ये पुन्हा शहाजीराजे निजामशाहीस मिळाले. परंतु निजामशाही मध्ये त्यांचे सासरे लखोजी यांची हत्या झाली आणि म्हणून शहाजीराजे काही दिवस चाकण पुणे येथे जाऊन राहू लागले आणि मग ते मोगलांकडे वळले. परंतु मोगल बादशाह शाहजहान निजामशाही उद्ध्वस्त करण्यासाठी कटकारस्थान रचत होता. हे जेव्हा शहाजीराजे यांना कळालं तेव्हा ते पुन्हा जाऊन निजामशाहीत मिळाले.

पेणगिरी येथे १६३२ साली त्यांनी निजामशाहीत कुळातील एका मुलाला गादीवर बसून स्वतः स्वतंत्र सत्ता स्थापन केली. त्यासाठी त्यांनी विजापूरशी मैत्रीचा तह केला. पूर्वेकडील अहमदनगर पासून पश्चिमे पर्यंतचा उत्तर कोकण तसेच दक्षिणेतील निरेपासून उत्तरेच्या चांदवडच्या डोंगरापर्यंत प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला.

महाराजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अत्यंत प्रयत्न केले परंतु १६३६ मध्ये शहाजन बादशहाने निजामशाही वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मग शहाजीराजांनी पुन्हा निजामशाही सोडून आदिलशाही धरली आणि आदिलशहाने त्यांना “सरलष्कर” आणि “महाराजा” अशा पदव्या दिल्या. आणि “महाराज फर्जत शहाजी भोसले” हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

शहाजी राजे वंशावळ:

बाबाजीराजे भोसले यांना दोन मुलं झाली. त्यातील पहिला मुलाचं नाव मालोजीराजे भोसले आणि दुसऱ्या मुलाचं नाव विठोजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले यांच्या पासून बाबाजीराजे भोसले यांना तीन नातवंड मिळाली. पहिले थोरले संभाजी दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे व्यंकोजी राजे. शहाजीराजे भोसले यांची नातवंडं – छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज.

पतवंडे – १) संभाजी महाराज यांच्या पासून पुढे शाहू महाराज थोरले – रामराजे – शाहु महाराज दुसरे अ) प्रतापसिंह महाराज ( शाहू महाराज प्रताप सिंह यांचा मुलगा) ब)  – शहाजी महाराज तर – व्यंकोजी महाराज – रामराजे महाराज. राजाराम राजे पासून शिवाजी महाराज. व्यंकोजी पासून प्रताप सिंह – शाहू महाराज तिसरे.  २) राजाराम महाराज यांच्यापासून – दुसरे शिवाजी महाराज – संभाजी महाराज – शिवाजी महाराज तिसरे – रामराजा महाराज – शिवाजी महाराज चौथे – राजर्षी शाहू – राजाराम महाराज – शाहू महाराज १) संभाजी राजे २) मालोजीराजे. अशा पीडिया उदयास आल्या.

आदिलशाही शहाजी राजांना कोणी व कधी कैद केले:

१६३६ मध्ये महाराज आदिलशाही मध्ये सामील झाले. त्यावेळी आदिलशहाने शहाजीराजे यांच्याकडे असलेली पुणे आणि सुपे यांचे वर्चस्व तसेच ठेवल. परंतु शहाजीराजे यांना आदिलशहा मोहम्मद याने १६३७ मध्ये कर्नाटकची जहागीरदारी शहाजीराजे यांच्यावर सोपवली आणि त्यांना तिकडे पाठवून दिलं.

कर्नाटक मध्ये शहाजी राजे यांनी होस्पेट, बिदनूर, श्रीरंगपट्टण, बसवपटनम या ठिकाणांच्या पोळीगारां विरुद्ध युद्ध करून हा सगळा प्रदेश आदिलशाही वर्चस्वाखाली आणला. १६३७ ते १६४८ पर्यंत शहाजीराजांच्या या कामगिरीमुळे त्यांना बेंगळूर येथील प्रदेश देण्यात आला. इकडे पुण्यामध्ये महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यात शपथ घेतली होती.

त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात तयारी देखील सुरू झाली. शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकला स्वराज्याची राजधानी रायगड बांधला, सजवला आणि मोठ्या जोमाने स्वराज्य स्थापनेची तयारी चालू झाली. एकापाठोपाठ एक रायगड, पुरंदर, पन्हाळा, प्रतापगड अशी सर्व किल्ले शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी जिंकायला सुरुवात केली.

तिकडे स्वतः शहाजीराजे देखील चांगले यश प्राप्त करत होते दोघे बाप बेटे आयुष्यामध्ये यश अनुभवत होते. आदिलशहाला हे सगळं काही बघवत नव्हतं त्याच्या राज्यातील बहुतांश भाग आता शिवाजी महाराजांनी जिंकून त्याचा स्वराज्यमध्ये समावेश करून घेतला होता.‌ आदिलशहाला हे सगळं सहन होत नव्हतं त्याच वेळेमध्ये शहाजी राजे यांचे जिवलग मित्र म्हणजेच रणदुल्लाखान यांचा निधन झालं.

मग त्याचे दोन मुल मुस्तफाखान आणि अफजलखान यांनी आदिलशहाकडे शहाजीराजे, शिवाजी महाराज आणि थोरले संभाजी यांचे पराक्रम पाहून त्यांची तक्रार करण्यास सुरुवात केली‌. त्यावेळी आदिलशहाने शहाजी राजे व त्यांचे दोन पुत्र यांचा बंदोबस्त करायचं ठरवलं. शहाजीराजे व संभाजी आणि शिवाजी महाराज हे तिघं मिळून संपूर्ण विजापूर काबीज करण्याची योजना आखत आहेत अशी भीती आदिलशहाला वाटू लागली.

म्हणून आदिलशहाने एक पत्र लिहून शहाजीराजेंना त्यांच्या मुलावर म्हणजेच शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. परंतु शिवाजी महाराजांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचे पराक्रम चालूच राहिले. म्हणून आदिलशहा खूप भडकला आणि त्याने या तिघांचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं.

त्याने शहाजीराजे यांना अटक करायचं ठरवलं तसेच शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमण करायचं ठरवलं आणि संभाजी राजे यांचा पराभव करायचा ठरवलं. फत्तेखानास स्वराज्यावर चाल करून पाठवलं. हे सगळ कटकारस्थान आदिलशहा शहाजी राजे यांच्या पाठीमागे करत होता. कारण की त्याला चांगलंच माहीत होतं शहाजीराजे शूर एकनिष्ठ योद्धे आहेत.

त्यांना इतक्या सहजा सहज पकडणे शक्य नाही म्हणूनच त्याने दुसरा मार्ग वापरायचं ठरवलं. शहाजी राजे यांना कैद करण्याचं नेतृत्व मुस्तफाखान जो शहाजीराजे यांच्या जिवलग मित्राचा मुलगा होता, याच्या कडे होतं. मुस्तफा खानाला शहाजी महाराज यांचे चरित्र तसेच त्यांचा पराक्रम चांगलाच माहीत होता म्हणून महाराज त्याच्या हाती सहजासहजी येणार नाही ते त्याला चांगलंच माहीत होतं. म्हणून त्याने शहाजीराजे झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचं ठरवलं त्याच प्रकारे त्यांनी शहाजीराजे झोपेत असताना हल्ला केला.

शहाजीराजे आधी थोडे गोंधळले परंतु लगेच सावध होऊन त्यांनी लढाई सुरु केली परंतु लढाईमध्ये ते घोड्यावरून खाली पडले आणि त्याच संधीचा फायदा घेऊन‌ आदिल शहा सोबत मिळालेले मुधोळचे बाजी घोरपडे यांनी शहाजीराजे यांना कैद केलं.

शहाजीराजांच्या वडिलांचे नाव :

शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव मालोजी भोसले होते. ते सर गिरोह झाले आणि अहमदनगरचा निजामशहा त्याच्या दरबारात त्याने मालोजी यांना पुणे आणि सुपे या दोन स्वतंत्र जिल्ह्यांची जागीर दिली. मालोजी बऱ्याच दिवसांपासून संतान प्राप्ती होत नव्हती. शाह शरीफ नावाचा सुफी मुस्लिम पीर याच्या आशीर्वादाने मालोजी यांना दोन मुले झाली. त्यांच्या सन्मानार्थ मालोजी यांनी त्यांच्या दोन मुलांचे नाव शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली.

शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू कसा झाला:

शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू २३ जानेवारी १६६४ रोजी शिकार करताना घोड्यावरून पडून झाला.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, शहाजीराजे भोसले यांची प्रतिमा कशी होती. Shahaji Raje Information in Marathi त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. Shahaji Raje Bhosale Information in Marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच Shahaji Raje Bhosale in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही शहाजीराजे भोसले यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या Shahaji Raje Information in Marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!