राजगुरू यांची माहिती Rajguru Information in Marathi

Rajguru Information in Marathi – Shivaram Rajguru Information in Marathi राजगुरू यांची माहिती शहीद क्रांतिकारक राजगुरू यांच्या बद्दल आपण आजच्या लेखामध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू या तिघांची जोडी तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. परंतु, आजच्या लेखामध्ये आपण राजगुरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या विशेष योगदाना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. शहीद राजगुरू यांच्या विषयी आपण लहानपणापासून वेगवेगळ्या पुस्तका द्वारे इतिहासात माहिती वाचली असेल, परंतु या लेखामध्ये त्यांच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले एक महान क्रांतिकारक म्हणून राजगुरू यांची ओळख आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राजगुरू यांचं असणारा योगदान एका विशेष स्थानावर आहे. भारत मातेच्या या वीर पुत्राने भारताचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

Rajguru Information in Marathi
Rajguru Information in Marathi

राजगुरू यांची माहिती – Rajguru Information in Marathi

पूर्ण नाव (Name)शिवराम हरी राजगुरू
जन्म (Birthday)२४ ऑगस्ट १९०८
जन्म गाव (Birth Place)पुण्यातील खेड
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)क्रांतिकारक

जन्म

भारत मातेच्या या वीर पुत्राचा जन्म पुण्यातील खेड इथला आहे. इसवी सन १९०८ मध्ये २४ ऑगस्ट रोजी एका मराठी ब्राह्मण कुटुंबात राजगुरू यांचा जन्म झाला. शिवराम हरी राजगुरू असे त्यांचे संपूर्ण नाव आहे. राजगुरू यांचे पालन पोषण पुण्यात झालं. पुण्यामध्ये वडिलोपार्जित असा राजगुरू वाडा आहे ज्यामध्ये राजगुरू यांचा जन्म झाला. रघुनाथ या नावाने देखील त्यांना ओळखलं जायचं.

लहान वयातच ते पुणे सोडून आधी नाशिकला शिक्षणासाठी गेले आणि त्यानंतर वाराणसी येथे संस्कृत भाषेचे प्रशिक्षण घेण्यास गेले. वाराणसी येथे गेल्यावर राजगुरू यांचा परिचय चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाशी झाला. पुढे जाऊन त्यांची ओळख भगतसिंह, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांशी झाली ज्यांच्याकडून त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आणि त्यांनी इतरांनाही जागृत केलं.

राजगुरू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

लहानपणीच राजगुरू वाराणसीला शिक्षणासाठी स्थलांतरित झाले आणि त्यांचा परिचय क्रांतिकारक व्यक्तिमत्व असणारे चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाला. लहान वयातच त्यांच्या मनामध्ये क्रांतिकारक विचार पेरले गेले. काशी मध्ये गेल्यावर त्यांनी बराच वेळ कधी लोकमान्य टिळक ग्रंथालयात तर कधी महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने, वादविवाद एकन्यात जायचा. राजगुरूंच्या बाल बुद्धीवर क्रांतिकारक विचार रुजले.

राजगुरू यांच्या विचार सरणीवर चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांचा प्रभाव होता. काशीला गेल्यावर चंद्रशेखर आझाद यांनी राजगुरू यांचा हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या क्रांतीकारी संघटनेत सहभाग करून घेतला. ही संघटना इंग्रजी सरकारच्या विरोधात होती आणि इंग्रजांना आपल्या देशातून पळून लावणं, भारताला इंग्रजांच्या तावडीतून सोडवणं हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होतं.

स्वातंत्र्याच वेड राजगुरू यांच्या नसानसामध्ये वाहत होतं, ते कोणत्याही वेळी त्याग करायला तयार होते. ते वाटच बघायचे की कधी त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्याची संधी मिळते. ही संधी त्यांना या संघटनेच्या माध्यमातून मिळाली. यानंतर पार्टीतील एका फितुराचा वध करण्यासाठी राजगुरू आणि शिव वर्मा या दोघांची निवड झाली.

परंतु या दोघांकडे एकच पिस्तूल होती. अजून एक पिस्तूल आणण्यासाठी शिव वर्मा लाहोरला निघून गेले. राजगुरू यांनी आपल्याकडे असलेल्या पिस्तूल मध्ये काम निपटवून टाकले. फितूर सायंकाळी ज्या वेळेमध्ये घराबाहेर पडायचा ती वेळ नक्की करून त्याचा पाठलाग करून राजगुरू यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात पोलीस राजगुरूंच्या मागावर होते परंतु राजगुरू हुशारीने चपळाईने पोलिसांना तुरा देऊन पळून गेले.

हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी याच्या द्वारे राजगुरू यांची ओळख भगतसिंग आणि सुखदेव यांच्याशी देखील झाली. या तिघांचही एकच ध्येय होतं ते म्हणजे भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणं. त्यामुळे त्यांची मैत्री फारच घट्ट होती. राजगुरू यांचा खरा परिचय भारताला साॅर्डर्सच्या हत्येप्रकरणी झाला. हे प्रकरण तर संपूर्ण भारतालाच माहित आहे.

या प्रकरणांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा सहभाग होता.‌ सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला परतला. त्यामुळे लाला लजपत राय यांनी कमिशनची वाट अडवली. त्यामुळे पोलिस अधिकारी स्कॉट आणि साॅर्डर्स यांनी लाला लजपत राय यांच्यावर लाठीमार घडवून आणला.

ज्यामध्ये लालालचपतराय मृत्युमुखी पडले आणि ही बातमी भगतसिंह यांच्या पर्यंत पोहोचताच भगतसिंह, राजगुरू सुखदेव यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यांनी लगेचच सायमन कमिशनची हत्या करण्याचा प्रस्ताव आपल्या संघटनेमध्ये मांडला आणि ही कल्पना पुढे नेण्यासाठी त्याप्रमाणे तयारी सुरू केली.

लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी साॅर्डर्स या ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली. या प्रकरणात या तिघांनाही अटक झाली. १७ फेब्रुवारी १९२८ रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याकडून साॅर्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यामध्ये तो मृत्युमुखी पडला.

या शिवाय नॅशनल बँकेची लूट म्हणा, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका या सगळ्या प्रकरणांमध्ये राजगुरू यांचा सहभाग होता. सेंट्रल असेंबली मध्ये जो बॉम्बस्फोट घडवून आणला गेला त्यामध्ये देखील राजगुरू यांचा सहभाग होता. अवगी २२-२३ वर्षाचे होते राजगुरू जेव्हा त्यांना फासावर लटकवण्यात आलं.

ज्या वेळेमध्ये त्यांचे खेळण्या-बागडण्याच्या वय होते त्या वयामध्ये ते स्वातंत्र्यासाठी लढत होते. देशाला स्वातंत्र्य कस मिळवून देता येईल या गोष्टीचा विचार करत होते. लहानपणापासून ते क्रांतिकारक वातावरणात मिसळले.

राजगुरू यांचे स्मारक

राजगुरू यांचे राष्ट्रीय स्मारक पंजाब मधील फिरोजपुर येथील हुसेनीवाला या ठिकाणी आहे. २३ मार्च या दिवशी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. राजगुरू यांचा जन्म पुण्यातील खेड इथला आहे. त्यामुळे त्यांच्या गावाचे खेड हे नाव बदलून राजगुरूनगर असं करण्यात आलं आहे.

भीमा नदीच्या काठा वरील स्थित राजगुरू वाड्यात राजगुरू यांचा जन्म झाला. ही जागा राजगुरू स्मारक म्हणून राखली जाते. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती एक स्थानिक संस्था आहे जी २००४ सालापासून या जागेवर दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्र ध्वज फडकवते.

शहीद दिवस

२३ मार्च हा दिवस संपूर्ण भारतामध्ये शहीद दिवस किंवा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या वीर पुत्रांना श्रद्धांजली वाहतो व त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आपण किती आभारी आहोत हे आपल्या कृतीतून दाखवतो. राजगुरू यांच्या सारखे वीर आपल्या भारताला लाभले या मातीत त्यांचा जन्म झाला हे आपल्या सगळ्यांच भाग्यच आहे.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. राजगुरू यांची वीर कथा अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करायचं, ब्रिटिश भारतातील जनतेवर जो अत्याचार करायचे,‌ जनतेची ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या नियमांमुळे होणारी हेळसांड.

या सगळ्या गोष्टी राजगुरूंना सहन झाल्या नाहीत आणि त्यातूनच त्यांचा देश प्रेम जाग झालं. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपलं सर्वस्व या मातीमध्ये अर्पण केलं त्यातीलच एक विशेष नाव म्हणजे शहीद राजगुरू होय.‌

मृत्यू

राजगुरू यांचा अनेक स्वातंत्र्य चळवळी मध्ये सहभाग होता. स्वातंत्र्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची हिंमत तयारी त्यांनी ठेवली. सशस्त्र व हिंसक पद्धतीचा वापर करून ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले. त्यांच्या सोबतीला भगतसिंह आणि सुखदेव यांच्या सारखे साथीदार लाभले. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यामध्ये त्यांनी साॅर्डर्स या धिकार्‍याची हत्या केली.

एकेक करून सर्व स्वातंत्र्य संघटनेतील सदस्य पकडले जाऊ लागले होते परंतु कसं करून राजगुरू नेहमी पळ काढायचे् परंतु एकदा पुण्यात असताना ते देखील ब्रिटिशांच्या तावडीत अडकले. आणि लाहोर प्रकरणात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. भगत सिंह,‌‌ राजगुरु आणि सुखदेव या वीरांना एकाच प्रकरणात अटक करून एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२३ मार्च १९३१ रोजी राजगुरू यांना त्यांच्या साथीदारांसोबत फाशीवर चढवण्यात आले. देशासाठी स्वतःच्या जिवाचा विचार न करता ते हसत हसत फासावर चढले. राजगुरू यांचं हे योगदान बहुमूल्य आहे. पंजाब मधील सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला इथे राजगुरू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आम्ही दिलेल्या rajguru information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राजगुरू यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhagat singh rajguru sukhdev information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about rajguru in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!