रक्षाबंधन निबंध मराठी Raksha Bandhan Essay in Marathi

Raksha Bandhan Essay in Marathi – Rakshabandhan Information in Marathi रक्षाबंधन निबंध मराठी सेच रक्षाबंधन सणाची माहिती रक्षाबंधन वर निबंध भातुकलीच्या चुलीवरचा चहा आणि तव्यावरची गरमागरम पोळी म्हणजे बहीण असते. इवल्याशा बॅटने फूटभर अंतरावर मारलेल्या सिक्सरची फुशारकी म्हणजे भाऊ असतो. चेहरा पाहून काय बिनसलं आहे हे चटकन ओळखणारी ती बहीण असते. आपली गरज बाजूला ठेवून तिची आवड पूर्ण करणारा तो भाऊ असतो. भारतात गणेश उत्सव, दीपावली, होळी जेवढ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात, तेवढ्याच उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो.

essay on raksha bandhan in marathi रक्षाबंधन सणाला राखी असेही म्हणतात. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा इत्यादी. तसेच या दिवशी नारळ भात करण्याची प्रथा आहे. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा सण आहे.

रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे धागा. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजे रक्षा बंधन. रक्षाबंधन जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यांमध्ये येतो. रक्षाबंधन सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक भावनेच्या धाग्याने बांधलेले एक बंधन आहे. रक्षाबंधन हा सण भारतातच नाही तर नेपाळ आणि मोरेशिया मध्ये सुद्धा तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

raksha bandhan essay in marathi
raksha bandhan essay in marathi – rakshabandhan information in marathi

रक्षाबंधन निबंध मराठी – Raksha Bandhan Essay in Marathi

रक्षाबंधन सणाची माहिती – Rakshabandhan Information in Marathi

भाऊच्या कपाळी टिळा

ओवाळून त्यास घ्यावा

मनगटावर पवित्र धागा

राखीचा सुंदर देखावा

रक्षाबंधन दिवशी बहीण भाऊ सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे परिधान करतात आणि रक्षाबंधन ची तयारी करतात. रक्षाबंधन सणादिवशी बहिण बाजारातून सुंदर राखी घेऊन येते. घरामध्ये सुंदर पाठ मांडून पाटाभोवती रांगोळी काढतात. भावाला पाठावर बसवतात आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते. त्याला ओवाळते.

राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. टिळा लावण्याचा अर्थ असा की भावाच्या मस्तकातील सद्बुद्धी जागृत करण्यासाठी आहे. आपल्या भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो, मिळो म्हणुन प्रार्थना करते आणि भावाला मिठाई खाऊ घालते. त्यादिवशी घरांमध्ये वेगळी मिठाई मागवली जाते नवीन नवीन पदार्थ बनवणे जातात.

भाऊ बहिणीला सुंदर भेट वस्तू देतो आणि बहिणीचे दीर्घायुष्य रक्षण करु असे वचन देतो. राखी बांधण्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. समाजात आपली बहिण ताट मानाने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. रक्षाबंधन हे आपल्या जीवनामध्ये पवित्रता आणि मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.

राखीचा धागा हा नुसताच सुताचा धागा नसून भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे स्नेहाचे बंधन आहे. या एवढ्याश्या धाग्याने कितीतरी बंधने बांधली जातात.

श्रावण सरी बरसू लागल्या

आला सण हा राखीचा

साजरा करूया उत्सव

भाऊ बहिणीच्या नात्याचा

बहिण मागते भावासाठी

यश सुख आणी समृद्धी

हवे ते सर्व मिळून तुला

होऊ दिवसेदिवस तुझ्या आनंदात रुद्धी

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात येणारा सण आहे. रक्षाबंधन या सणाला आपला भाऊ जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी आपल्या बहिणीच्या दिशेने धावत येत असतो. जर भाऊ पोचू शकला नाही तर बहीण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या भावाला राखी पाठवत असते.  

बहिण भावाच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की जो गोडवा, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी एका बहीण-भावाच्या नात्यात असते ना, ती बहीण बहीण किंवा भाऊ भाऊ या नात्यात नसते. आई-वडिलांच्या नंतर जर आपण कोणावर जास्त प्रेम करत असतो तर ती दुसरी कोणी नसून आपली बहीण असते.

बहिण म्हणजे आपल्या लहानपणापासून आई-वडिलांच्या नंतर आपली सर्वात जास्त काळजी घेणारी आपल्या सोबत भांडणारे एकच असते ती म्हणजे आपली बहीण.

रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणी साठी अगदी आनंदाचा आणि एक पर्वणीच असतो. बहीण आणि भावा मधील एक अतूट बंधन. या प्रेमाच्या बंधनामध्ये भाऊ आणि बहीण एक न तुटणार वचन घेतात की कितीही संकट येऊ दे कितीही वादळ येऊ देत पण आपण एकमेकासाठी खंबीरपणे उभे राहू. त्या अतूट धागामध्ये कोणताही स्वार्थ नसतो फक्त असते ते एकमेकाबद्दल प्रेम आणि आपुलकी.

रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या सणाला भाऊ आणि बहिणीमधील प्रेम वाढते आणि एकमेकांची काळजी करण्याची व रक्षण करण्याची भावना दृढ होते. रक्षाबंधन हा सण दुसऱ्या कोणत्याही धर्मात साजरा केला जात नाही. या सणामुळे रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळाली आहे.

रक्षाबंधन हा उत्सव  आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे आणि प्रत्येक भारतीय हा सण अभिमानाने आणि गर्वाने साजरा करतो. रक्षा बंधनला राखी बांधण्याची परंपरा खूप पूर्वीपासून आहे. प्रत्येक भाऊ-बहीण एकमेकाबद्दल प्रेम आणि कर्तव्याचे पालन करण्याचे वचन देतात आणि खुप सार्‍या शुभेच्छा देत रक्षाबंधन उत्सव साजरा करतात.

बहीण लग्न करून सासरी गेल्यानंतर तिला माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून रक्षाबंधन हा सण प्रसिद्ध आहे. या सणाच्या निमित्ताने म्हणजे भावाला राखी बांधण्याच्या निमित्ताने बहिण आपल्या भावासोबत घरातील इतर व्यक्तींची भेट होते. लहानापासून मोठे होईपर्यंत घडलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण या सणाला होत असते.

लग्न झाल्यानंतर बहीण कितीही दूर असली तरी सणाला बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जिथे असेल तिथून भावाकडे येते. जर काही कारणास्तव बहिणीला माहेरी येता आले नाही तर भाऊ बहिणीकडे जाऊन रक्षाबंधन साजरा करतो.जर तसे नाही झाले तर बहीण भावाला राखी पोस्टाने पाठवते.

हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा,बोरावरुन ते आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे बहिण-भाऊ परस्परांना आता ई पत्र,फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा किंवा राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात. आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात या सणाला विशेष महत्त्व आहे.

स्त्री वयाच्या कोणत्याही उंबरठ्यावर पोहोचलेली असो रक्षाबंधनाच्या या उत्सवास तिच्या मनास माहेरची आस लागलेली असते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे. भाऊ लहान असेल तर बहीण आईची जागा घेते. आईची जबाबदारी पार पाडते. भावाचा सांभाळ करते. त्याचप्रमाणे जर बहीण लहान असेल तर भाऊ वडिलांची भूमिका पार पाडतो. तिचे सर्व हट्ट पूर्ण करतो. रक्षाबंधन मनाचे बंध जोडून ठेवण्याचे काम करतो.

आम्ही दिलेल्या raksha bandhan essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “रक्षाबंधन वर निबंध तसेच रक्षाबंधन सणाची माहिती” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rakshabandhan information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि raksha bandhan nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण raksha bandhan nibandh marathi या लेखाचा वापर information about raksha bandhan in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!