राणीची बाग मुंबई Ranichi Baug Information in Marathi

ranichi baug information in marathi राणीची बाग मुंबई, आज आपण या लेखामध्ये राणीची बाग ज्याला राजमाता किंवा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागेविषयी माहिती घेणार आहोत. राजमाता किंवा वीर माता जिजाबाई उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये आहे आणि हे जास्तीत जास्त राणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत त्यामुळे हे एक वनस्पती उद्यान आहे. राणीची बाग हि मुंबई या शहरामध्ये ५० ते ५३ एकर परिसरामध्ये वसलेली आहे.

आणि हि बाग सर्वात जुनी बाग असून या बागेची मूळ नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स असे होते म्हणजेच या नावावरून असे समजते कि हि बाग इंग्रजांच्या काळातील बाग असावी आणि नंतर तिचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असे ठेवले असावे आणि त्याठिकाणी या बागेमध्ये राजमाता जिजाबाई भोसले आणि त्यांचे पुत्र बाळ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.

या उद्यानानाची नर्मिती १८६२ मध्ये लेडी कॅथरीन यांनी केली आणि काही झाडे या बागेमध्ये लावली आणि आता या बागेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि यामध्ये ३००० हून अधिक वृक्ष आणि ८५० पेक्षा अधिक वनस्पती आहेत तसेच या वेगवेगळ्या फुलांची झाडे आणि फळांची झाडे देखील आहेत.

या बागेमुळे मुंबई या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी मदत होते कारण या बागेमध्ये नैसर्गिक वातावरण आहे कारण या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पतींच्यासोबत छोटे मोठे प्राणी, पक्षी आणि फुलपाखरांच्यासारखे कीटक पाहायला मिळतात.

ranichi baug information in marathi
ranichi baug information in marathi

राणीची बाग मुंबई – Ranichi Baug Information in Marathi

उद्यानाचे नावराणीची बाग, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान
ठिकाणीमुंबई शहरातील भायखळा परिसर (महाराष्ट्र)
क्षेत्रफळ५० ते ५३ एकर
विविधतावेगवेगळ्या वनस्पती, वृक्ष, प्राणी आणि पक्षी
निर्मिती१८६२

राणीच्या बागेचा इतिहास – history

राणीच्या बागेची सुरुवात हि १८४२ मध्ये पश्चिम भारताच्या कृषी उद्यान संस्थेच्या स्थापणेनंतर १२ वर्षानंतर झाली होती परंतु सुरुवातीला हे मध्य मुंबईमधील पूर्वेकडील शिवडी या ठिकाणी होते पण ब्रिटिशांना ते ठिकाण स्मशानभूमीसाठी हवा होता त्यामुळे त्यांनी या बागेची सुरुवात १८६२ मध्ये भायखळ्यातील ३३ एकर परिसरामध्ये केली.

राणीच्या बागेविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • राणी ची बाग म्हणून ओळखले जाणारे हे उद्यान आणि प्रनिसंग्रहालय हे मुंबई शहरातील ‘भायखळा’ या परिसरामध्ये वसलेले आहे.
 • राणीची बाग या बागेची खासियत म्हणजे मुंबई या शहरामध्ये अनेक बागा किवा उद्याने आहेत परंतु या बागेमध्ये सापडणाऱ्या काही वनस्पती मुंबई मधील इतर बागेमध्ये किंवा उद्यानामध्ये सापडत नाहीत.
 • राणीच्या बागेमध्ये अनेक नैसर्गिक आकर्षणे पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी पहायला मिळते आणि हि बाग पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोफत आहे परंतु खाजगी शाळेतील मुलांना आणि इतरांना १५ रुपये आहे आणि जर हि बाग पाहण्यास परदेशी पर्यटक आले तर त्यांना ४०० रुपये प्रवेश फी आहे.
 • राणीच्या बागेतील मुख्य आकर्षण म्हणजे काही वेगळ्या जातीच्या वनस्पती, आकर्षक पक्षी, वाघ आणि इतर काही छोटे मोठे पक्षी.
 • या बागेला वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे आणि या ठिकाणी मोर, फ्लेमिंगो या सारखे पक्षी तसेच वाघ, बिबट्या, हरीण, जिराफ आणि हत्ती या सारखे प्राणी पाहायला मिळतात.
 • हे उद्यान पर्यटकांना पाहण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस खुले असते आणि हे उद्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुले असतात.
 • राणी बाग हि मोठ्या परिसरामध्ये पसरलेली आहे आणि या ठिकाणी ६० पेक्षा अधिक अंतर्गत बागा आहेत.
 • या उद्यानामध्ये अलीकडच्या काळामध्ये हरणे, वाघ आणि हायनास हे प्राणी अनण्यात आले आहेत.
 • आठवड्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणाजवळील स्थानिक लोक कुटुंबांसोबत किंवा मित्रांच्यासोबत वेळ घालवू शकतात.
 • राणीचे बाग हे उद्यान प्रथम वनस्पती उद्यान म्हणून कार्यरत होते परंतु ३० वर्षानंतर या उद्यानामध्ये प्राणीसंग्रहालय देखील सुरु झाले.

उद्यानातील आणि प्राणीसंग्रहालयातील नियम आणि टिप्स  – do’s and dont’s

कोणत्याही प्रनिसंग्रहालयामध्ये गेल्यानंतर काही नियम पाळावे लागतात किंवा काही गोष्टी करण्यापासून टाळावे लागते तसेच राणीच्या उद्यानांत व प्राणीसंग्रहालयामध्ये गेल्यानंतर देखील काही नियम पाळावे लागतात आणि ते काय आहेत ते खाली पाहूया.

 • राणीच्या बागेमध्ये पिण्यायोग्य स्वच्छ पाणी नाही त्यामुळे तुम्ही प्राणीसंग्रहालयामध्ये जाताना पिण्याचे पाणी सोबत घेवून जा.
 • तसेच राणीच्या बागेच्या प्रनिसंग्रहालयामध्ये जाताना तुम्ही तुमच्या सोबत खाण्यायोग्य कोणत्याही वस्तू घेऊन जाऊ नका कारण त्यामुळे काही प्राण्याचा तुम्हाला धोका असू शकतो.
 • तसेच प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना कोणत्याही प्रकारचे खायला देऊ नका.
 • प्राण्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन प्राण्यांना पहा.
 • प्राणी संग्रहालयामध्ये जास्त चालावे लागते त्यामुळे तुम्ही पायामध्ये आरामदायक चप्पल किंवा शूज वापरा.
 • राणीची बाग आणि प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी प्रत्यक व्यक्तीला कमीत कमी ३ तास ते जास्तीत जास्त ४ तास लागतात.

राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क – entry fee

 • राणीच्या बाग पाहण्यासाठी मुलांच्यासाठी या ठिकाणी प्रवेश शुल्क २५ रुपये इतका आहे.
 • त्याचबरोबर प्रौढ लोकांच्यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
 • राणीची बाग बघायला येणाऱ्या परदेशी लोकांच्यासाठी ४०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
 • जर काही पर्यटकांना फोटो आणि व्हिडीओ करायचे असतील तर कॅमेरा वापरण्यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क द्यावा लागतो.

आम्ही दिलेल्या ranichi baug information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राणीची बाग मुंबई माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ranichi baug mumbai information in marathi या Ranichi baug information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ranichi baug in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!