सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI Information in Marathi

sebi information in marathi सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, आज आपण या लेखामध्ये स्वायत संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेबी (sebi) या संस्थेविषयी माहिती घेणार आहोत. सेबी हि एक स्वायत संस्था आहे आणि त्याचे पूर्ण स्वरूप सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (security and exchange board of India) असे आहे. सेबी हि संस्था केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या एकूण प्रशासकीय देखरेखीखाली काम करते आणि संसदेला उत्तरदायी असते.

सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ मध्ये सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ कायदा १९९२ च्या अंतर्गत झाली आणि या संस्थेचो स्थापना हि गुंतवणूक दारांच्या हितसंबधांचे संरक्षण करण्यासाठी आणि सेक्युरिटी मार्केटला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नियमन करण्यासाठी करण्यात आली.

सेबीची १९८८ मध्ये स्थापना केली होती परंतु ती अवैद्य ठरली आणि नंतर मग १२ एप्रिल १९९२ मध्ये वैद्यरित्या सेबी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय हे मुंबई मध्ये आहे तर दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई आणि अहमदाबाद या ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत. चला तर आता आपण सेबी या संस्थेविषयी सविस्तर माहिती खाली घेवूया.

sebi information in marathi
sebi information in marathi

सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – SEBI Information in Marathi

संस्थेचे नावसेबी
पूर्ण स्वरूपसेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (security and exchange board of India)
स्थापन१२ एप्रिल १९९२
मुख्यालयमुंबई

सेबी म्हणजे काय ?

सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी हि भारतातील सेक्युरिटी मार्केटचे नियमन करण्यासाठी आणि सेक्युरिटीज मधील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक नियामक संस्था आहे.

सेबीची स्थापना केंव्हा झाली ?

देशाच्या संसदेने सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा कायदा मंजूर केल्यानंतर एप्रिल १९९२ मध्ये भारतीय सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली

सेबी संस्था स्थापन करण्याचा उद्देश – purpose

  • सेबी या संस्थेची स्थापना हि गुंतवणुकीमध्ये होणाऱ्या अन्यायकारक आणि गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी झाली आहे तसेच गैरप्रकारातून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी केली आहे.
  • तसेच सेबी हि संस्था मध्यस्थी लोकांना व्यावसायिक आणि स्पर्धात्मक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम करते.
  • वैधानिक नियम आणि स्व नियमन यांच्यामध्ये समतोल राखून फसव्या पद्धतींना आळा घालणे.
  • त्याचबरोबर हि संस्था गुंतवणूकदारांना अचूक माहितीचे संरक्षण आणि पुरवठा करते.
  • अवलंब करण्यासाठी आणि लवचिक दृष्टीकोन ठेवून स्टॉक एक्सचेंजच्या क्रीयाकलापांना चालना देणे हे त्याचे उदिष्ट आहे.
  • सेबी हि संस्था गुंतवणूकदारांना बाजारपेठ उपलब्ध करून देते ज्या ठिकाण गुंतवणूकदार कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणे त्यांचा निधी उभारू शकतात.
  • स्टॉक एक्सचेंजच्या क्रीयाकलापांच्यावर लक्ष केंद्रित करणे. 

सेबी या संस्थेचे अधिकार – powers

सेबी हि संस्था गुंतवणुकीमध्ये होणाऱ्या अन्यायकारक आणि गैर प्रकारावर नियंत्रण ठेवते, तसेच गैरप्रकारातून गुंतवणूकदारांचे संरक्षण करते आणि या संस्थेकडे काही अधिकार देखील असतात आणि ते काय आहेत ते आपण खाली पाहूया.

  • सेबी हि संस्था सुरक्षा बाजारपेठेमध्ये न्याय आचार संहितेला प्रोत्साहन देते.
  • सेबी हि संस्था त्यांच्या संरक्षणात्मक कार्याचा एक भाग म्हणून काम करत असलेली एक संस्था आहे.
  • हि संस्था किंमतीतील फेरफार तपासते आणि तसेच हे इनसायडर ट्रेडिंग वर बंदी घालते.
  • गुंतवणुकीच्या पर्यायांचे अधिक चांगले मुल्यांकन करण्याच्या पद्धतीबाबत गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागते.
  • गुंतवणूक दारांना संरक्षणासाठी सेबी ला सामान्य लोकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कायदेशीर नियम तयार करण्याचा अधिकार आहे.
  • सेबी हि संस्था कंपनींच्या टेकओव्हर देखील नियंत्रण ठेवतात आणि हे शेअर ट्रान्सफार एजंट, स्टॉक ब्रोकर्स, ट्रस्टी, मर्चंट बँकर्स आणि स्टॉक एक्सचेंजशी जोडलेल्या इतरांच्या कामकाजाचे नियमन आणि नोंदणी करते.
  • दलाल, अंडररायटर आणि इतर मध्यस्थांचे नियमन करण्यासाठी आचारसंहीता नियम तयार करणे.
  • म्युचल फंडाचे नियमन आणि नोंदणी करणे तसेच स्टॉक एक्सचेंज चे ऑडीट आणि चौकशी करते. 
  • जेंव्हा कंपन्यांच्या उपचारांचा विचार केला जातो त्यावेळी देशातील कोणत्याही स्टॉक एक्सचेंजमधून कंपन्याना सूचीबद्ध आणि डी लिस्ट करण्याचा अधिकार आहे.
  • गुंतवणूकदारांच्यासाठी फायदेशीर ठरेल असे वाटल्यास ते कंपन्यांना त्यांचे समभाग एकापेक्षा जास्त स्टॉक एक्सचेंज मधून सुचीबध्द करू शकतात.

सेबी संस्थेची रचना – structure

सेबी हि संस्था गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे आणि हि संस्था वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये काम करते. या संस्थाचे सर्व कामकाज पाहण्यासाठी एक मंडळ बनवलेले असते आणि या मंडळामध्ये एकूण ९ सदस्य असतात.

  • सेबी या संस्थेचा एक अध्यक्ष नेमलेला असतो आणि या अध्यक्षाची निवड हि भारताच्या केंद्र सरकार मार्फत केली जाते.
  • एक बोर्ड सदस्य देखील असतो आणि हा सध्या सेन्ट्रल बँक म्हणजेच आरबीआय (RBI) मार्फत नेमलेला असतो.
  • तसेच या मंडळातील पाच सदस्य हे भारताच्या केंद्र सरकारद्वारे नेमलेले असतात आणि दोन सदस्य हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाद्वारे निवडलेले असतात.

सेबी संस्थेविषयी महत्वाची माहिती – information about sebi in marathi

  • सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ मध्ये सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ कायदा १९९२ च्या अंतर्गत झाली.
  • सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेच्या मंडळामध्ये एकूण ९ सदस्या असतात.
  • सेबी हि भारतातील सेक्युरिटी मार्केटचे नियमन करण्यासाठी आणि सेक्युरिटीज मधील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण तयार झालीली संस्था आहे.
  • या संस्थेचे मुख्यालय हे मुंबई मध्ये आहे तर दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई आणि अहमदाबाद या ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत.

आम्ही दिलेल्या sebi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया माहिती मराठी Sebi information in marathi ppt बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sebi information in marathi wikipedia या www sebi gov in information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sebi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sebi full form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!