SIAC प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र SIAC Mumbai Information in Marathi

siac mumbai information in marathi प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, सध्या आपण पाहतो कि अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा देतात आणि ह्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी त्यांना पूर्व तयारी करणे आवश्यक असते आणि त्यासाठी कोचिंग घेणे आवश्यक असते आणि कोचिंग घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आणि अॅकॅडमी असतात आणि तसेच हे सियाक (siac) देखील एक प्रशिक्षण (कोचिंग) केंद्र आहे जे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन देतात किंवा प्रशिक्षन देतात.

अनेक विद्यार्थी असे आहेत कि ते अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि अश्या वेळी काही विद्यार्थी प्रायव्हेट क्लास लावतात आणि त्यामुळे त्यांना संबधित परीक्षेसाठी प्रशिक्षण घेणे सोपे होते,

परंतु प्रायव्हेट क्लास लावणे सर्वांनाच परवडन्यासारखे नसते त्यावेळी प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र (सियाक) अश्या विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत करते.

siac mumbai information in marathi
siac mumbai information in marathi

SIAC प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र – SIAC Mumbai Information in Marathi

सियाक चे पूर्ण स्वरुप – SIAC full form in marathi

सियाक हे एक प्रशिक्षण केंद्र आहे आणि याला मराठीमध्ये प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र म्हणतात आणि याचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप स्टेट इंस्टीट्युट फॉर अॅडमीस्ट्रेटिव्ह करिअर्स (state institute for administrative careers)

प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या सुविधा – facilities

 • प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र हे एक प्रशिक्षण केंद्र आहे, जे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देते.
 • त्या विद्यार्थ्यांना वाचनालय, रीडिंग रूम आणि इंटरनेट सुविधा हि मोफत दिली जाते.
 • त्याचबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना मोफत राहण्याची सोय केली जाते आणि ५०० ते ६०० रुपये डीपॉझीट म्हणून ठेऊन घेतले जातात ते त्यांना शेवटी परत दिले जातात.
 • अॅप्टीट्युड आणि सामान्य अभ्यासक्रम याचे क्लास देखील मोफत घेतले जातात.
 • जे विद्यार्थी शहराच्या बाहेर असतील आणि त्यांनी मागील परीक्षेमध्ये चांगली कामगिरी केली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना २००० वेतन दिले जाते.

प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राविषयी महत्वाचे मुद्दे – important points

 • या संस्थेतील विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करणार असतील तर अश्या विद्यार्थ्यांच्या साठी सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आकाराला जातो आणि मागास वर्गातील लोकांच्यासाठी २५० रुपये अर्ज शुल्क आकारला जातो.
 • हे असे प्रशासकीय केंद्र आहे ज्यामध्ये विदयार्थ्यांना मुलाखतीसाठी तसेच लेखी परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते म्हणजे एकूणच त्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले जाते.
 • जर एखाद्या इच्छुक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेचीतयारी करण्यासाठी ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याने सियाक या केंद्राची प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते आणि या केंद्राची प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन मोडद्वारे घेतली जाते.
 • जर इच्छुक विद्यार्थ्यांना या केंद्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज करण्यासाठी www.siac.org.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते.
 • प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र हे १९५६ पासून सुरु झाली आहे.

प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रे – centers

प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि हि केंद्रे कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते खाली आपण पाहूया.

प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये किंवा प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षण संस्थेने किंवा त्या प्रशिक्षण केंद्राने ठरवलेले पात्रता निकष पार पाडावे लागतात, तसेच प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण ( सियाक ) केंद्राचे देखील काही पात्रता निकष आहेत ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • जर एखाद्या विद्यार्थ्याला या केंद्रामध्ये प्रशिक्षण घायचे असल्यास तो महाराष्ट्र राज्यातील नागरिक असला पाहिजे.
 • त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि त्याला कमीत कमी ५५ ते ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असले पाहिजेत.
 • या केंद्रामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी वयाची देखील अट घातली जाते आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी २१ ते ३२ वर्ष वयाची अट असली पाहिजे आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी २१ ते ३५ वर्ष इतके वय असले पाहिजे.

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे – How to download admit card

जर तुम्हाला परीक्षेसाठी प्रवेशपत्र (admit card) डाऊनलोड करायचे असेल तर अश्या त्यासाठी त्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे.

 • प्रथम तुम्हाला सियाक च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 • त्यानंतर तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर सियाक सीईटी (SIAC CET) परीक्षेचे अपडेट पहा.
 • तुम्ही अपडेट चेक केल्यानंतर तुम्हाला सियाक सीईटी प्रवेशपत्राचा पर्याय दिसतो.
 • आता त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक, ऑर्डर क्रमांक, जन्मतारीख या सारखी तपशील तुम्हाला त्या ठिकाणी घालावी लागेल.
 • पुढे सबमिट बटनावर क्लिक करा आणि पुढे तुमच्या समोर प्रवेश पत्र उघडेल ते डाऊनलोड करा.
 • त्यानंतर प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट घ्या जेणेकरून ते तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपयोगी ठरेल.

आम्ही दिलेल्या siac mumbai information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Siac mumbai information in marathi pdf या SIAC full form in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about siac mumbai in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!