स्ट्रॉबेरी फळाची माहिती Strawberry Information in Marathi

Strawberry information in marathi – strawberry meaning in marathi स्ट्रॉबेरी फळाची माहिती, आपण प्रत्येक फळांच्या सिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे खातो जसे कि आंबा, चिकू, पेरू, सफरचंद आणि इतर अशी अनेक फळे खातो आणि त्यामधील सर्वांना परिचयाचे असणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी आणि आज आपण या संकरीत फळाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. स्ट्रॉबेरी हे संकरीत लाल रंगाचे फळ आहे आणि त्याचा आकार हा मनुष्याच्या हृदयासारखा असतो.

स्ट्रॉबेरी या फळाची लागवड हि जरी जगभरामध्ये केली असली तरी कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स मध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि हे देश स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी आघाडीवर असणारे देश आहेत.

स्ट्रॉबेरी या फळाची झाडे हि जमिनीच्या जवळ वाढतात म्हणजेच हि झाडे खूप उंच वाढत नाहीत तर ती छोटी असतात. स्ट्रॉबेरी हे फळ रोसेसी कुटुंबातील फ्रागेरिया वंशातील आहे. व्यावसायिक स्ट्रॉबेरी हे समशीतोष्ण, भूमध्यसागरीय, उपोष्णकटिबंधीय, गवताळ प्रदेश तसेच तैगा या सारख्या प्रदेशाच्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात आणि या फळांचे उत्पादन हे एप्रिल ते जून या कालावधी मधेचे काढले जाते. परंतु अमेरिकेमधील कॅलीफोर्निया या किनारपट्टीच्या प्रदेशमध्ये थंड हवामानात तसेच उन्हाळ्यामध्ये असे वर्षभर स्ट्रॉबेरी या फळाचे उत्पादन घेतले जाते.

strawberry information in marathi
strawberry information in marathi

स्ट्रॉबेरी फळाची माहिती – Strawberry Information in Marathi

फळाचे नावस्ट्रॉबेरी (strawberry)
कुटुंबरोसेसी
वंशफ्रागेरिया
प्रकारसंकरीत
फळाचा रंगलाल
उत्पादनाचा काळएप्रिल ते जून

स्ट्रॉबेरीचे फायदे – strawberry che fayde in marathi

पोषक घटक – nutrition value

कोणतेही फळ हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते आणि आपण फळे रोज खाल्ल्यामुळे आपल्याला कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत तर उलट आपल्याला त्याचे फायदेच असतात कारण त्यामध्ये काही ना काही पोषक घटक असतात. तसेच स्ट्रॉबेरी या फळामध्ये देखील काही पोषक घातक असतात ते कोणकोणते ते आपण खाली पाहूया.

स्ट्रॉबेरी या फळामध्ये पाण्याचे प्रमाण हे ९१ टक्के असते तसेच यामध्ये ०.३ टक्के चरबी असते तसेच ०.७ टक्के प्रथिने असतात. चला खाली आपण स्ट्रॉबेरीमध्ये असणारी पोषक घातक कोणकोणती आहेत आणि त्यामध्ये त्या घटकांचे प्रमाण किती असते ते पाहूया.

पोषक घटकप्रमाण ( १०० ग्रॅम )
पाणी९१ टक्के
फायबर२ ग्रॅम
कार्बोदके७.७ ग्रॅम
कॅलरी३२
प्रथिने०.७ ग्रॅम
चरबी०.३ ग्रॅम

स्ट्रॉबेरी मधील जीवनसत्वे आणि खनिजे

  • स्ट्रॉबेरी हे फळ व्हिटामिन सीचा चांगला स्तोत्र आहे म्हणजेच हे एक अॅन्टीऑक्सिडंट आहे ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
  • स्ट्रॉबेरीमध्ये पोटॅशियम हे खनिज असते आणि हे शरीराच्या अनेक कार्यासाठी काम करतात जसे कि रक्तदाब नियंत्रण.
  • बी जीवनसत्वापैकी एक फोलेट हे सामान्य उत्तींच्या वाढीसाठी आणि पेशींच्या चांगल्या कार्यासाठी महत्वाचे आहे.
  • स्ट्रॉबेरी या फळामध्ये मॅग्नेशियम, लोह, तांबे आणि फॉस्परस हि जीवनसत्वे देखील असतात.

स्ट्रॉबेरी या फलाविषयी विशेष तथ्ये – strawberry facts

  • अमेरिकेतील प्रत्येक राज्यामध्ये आणि जगातील जवळजवळ प्रत्येक देशामध्ये स्ट्रॉबेरीचे पिक घेतली जाते.
  • आपल्या सर्वांना माहित आहे कि प्रत्येक फळामध्ये काही ना काही औषधी गुण असतात आणि तसेच स्ट्रॉबेरी या फळामध्ये देखील असतात. स्ट्रॉबेरी हे आपल्या न्रोगी आरोग्यासाठी उत्तम फळ आहे आणि हे व्हिटामिन सी चे एक चांगले स्तोत्र आहे आणि यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अॅन्टीऑक्सिडंट या प्रकारचे पोषक घटक असतात.
  • युनायटेड स्टेट्स हे स्ट्रॉबेरीचेजगातील सर्वात मोठे उत्पादक आहे. कॅलीफोर्निया, फ्लोरिडा आणि ओरेगॉन हि तीन राज्ये आहेत. कॅलीफोर्नियाने २०१३ मध्ये अंदाजे २.७ अब्ज पौड स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले, जे इतर कोणत्याही राज्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आणित्या ठिकाणी  ५०००० एकरपेक्षा जास्त जमीन हि स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी समर्पित आहे.
  • अमेरिकेमध्ये दरवर्षी सुमारे आठ पौंड स्ट्रॉबेरी खाल्ली जाते. या ठिकाणी ७५ टक्के स्ट्रॉबेरी हि ताजी वापरली जाते आणि २५ टक्के स्ट्रॉबेरी गोठवली जाते.
  • सध्या जगभरामध्ये पिक घेतली जाणारी स्ट्रॉबेरी हे फळ फ्रेगेरीया व्हर्जिनियाना आणि फ्रेगेरीया चीलोएन्सीसचा संकरित प्रकार आहे.
  • स्ट्रॉबेरी या फळाचा सामान्यता लाल रंग असतो परंतु हे फळ काही वेळा गुलाबी ते पांढऱ्या रंगामध्ये देखील येऊ शकते.
  • स्ट्रॉबेरी हे फळ रोसेसी कुटुंबातील फ्रागेरिया वंशातील आहे आणि व्यावसायिक स्ट्रॉबेरी हे समशीतोष्ण, भूमध्यसागरीय, उपोष्णकटिबंधीय, गवताळ प्रदेश तसेच तैगा या सारख्या प्रदेशाच्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात.
  • स्ट्रॉबेरी या फळाचा वापर हा अन्न पदार्थामध्ये तर करताच परंतु या फळाचा वापर हा एअर फ्रेशनर बनवण्यासाठी, कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी आणि इतर अनेक उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.
  • या फळांचे उत्पादन हे एप्रिल ते जून या कालावधी मधेचे काढले जाते परंतु अमेरिकेमधील कॅलीफोर्निया या ठिकाणी या फळाचे उत्पादन हे वर्षभर घेतले जाते.
  • स्ट्रॉबेरी हि वनस्पती फोर्ब किंवा औषधी वनस्पती म्हणून वर्गीकृत केलेली आहे. फोर्ब किंवा औषधी वनस्पती अश्या असतात ज्यामध्ये जमिनीच्या वर लक्षणीय प्रमाणात वृक्षाच्छदित उत्तक नसतात परंतु तरीही सवहनी असतात. वृक्षाच्छदित उत्तींच्या कमतरतेमुळे ते तुलनेने लहान असतात.
  • स्ट्रॉबेरी हे एकमेव फळ आहे जे त्याच्या बिया बाहेरून घालतात.
  • अमेरिकेमध्ये लोक दर वर्षीसरासरी साडेतीन पौंड ताजी स्ट्रॉबेरी खातात.
  • स्ट्रॉबेरी या फळामुळे हृदयविकार आणि काही कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते असे म्हटले जाते.
  • अमेरिकेमधील कॅलीफोर्निया या राज्यामध्ये सुमारे ८० टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते.

आम्ही दिलेल्या strawberry information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरी फळाची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या strawberry chi mahiti या strawberry che fayde in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about strawberry in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये strawberry name in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!