सुधा मूर्ती यांची माहिती Sudha Murthy Biography in Marathi

Sudha Murthy Biography in Marathi – Sudha Murthy Information in Marathi सुधा मूर्ती यांची माहिती मुलगी शिकली प्रगती झाली. जेव्हा एक स्त्री शिक्षण घेते तेव्हा ते शिक्षण फक्त तिच्या पुरतीच मर्यादित न राहता ते शिक्षण तिच्या घरच्यांच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी व उज्वल भवितव्यासाठी असतं. आज काळ बदलला आहे अगदी स्त्रिया फक्त चूल मुल यासाठी मर्यादित असतात पासून ते आता त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील काम करू शकतात इतपर्यंत समाज बदलला आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका कर्तृत्ववान स्त्री विषयी माहिती घेणार आहोत जिने स्व:बळावर उल्लेखनीय कारकीर्द उभारली आहे. या लेखामध्ये आपण सुधा मूर्ती यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

sudha murthy biography in marathi
sudha murthy biography in marathi

सुधा मूर्ती यांची माहिती – Sudha Murthy Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)सुधा मूर्ती
जन्म (Birthday)१९ ऑगस्ट १९५०
जन्म गाव (Birth Place)कर्नाटकातील हावेरी येथील शीगगाव
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय

Sudha Murthy Information in Marathi

जन्म

कर्नाटकातील हावेरी येथील शीगगाव येथे सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी झाला. वडील डॉक्टर आर.एच कुलकर्णी एक सर्जन होते. आणि आई विमला कुलकर्णी. लहानपणापासून सुधा मूर्ती यांना त्यांच्या आईने प्रोत्साहित केलं. ब्राह्मण कुटुंबामध्ये सुधा मूर्ती यांचे संगोपन झालं. सुधा मूर्ती यांचे बालपण अतिशय चांगलं गेलं त्यांचे संगोपन त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या आजी आजोबांच्या घरी झाल.

आजी आजोबांकडून त्यांना भरपूर प्रेम मिळालं. बी. वि. बी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून सुधा मूर्ती यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये बी.इ ची पदवी संपादन केली. सुधा मूर्ती हुशार होत्या आणि त्यामुळे त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांना सुवर्णपदक जाहीर झाला. पुढे सुधा मूर्ती यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सुधा मूर्ती यांचं कुटुंब सुशिक्षित होतं त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना काहीतरी विलक्षण करायचं होतं.

वैयक्तिक आयुष्य

सुधा मूर्ती ज्यावेळी पुण्यातील TELCO कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून रुजू झाल्या होत्या त्यावेळी त्यांचा विवाह नारायण मूर्ती यांच्याशी झाला. आज या दाम्पत्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

कारकीर्द

सुधा मूर्ती या एक भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका व कन्नड आणि इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध भारतीय लेखिका आहेत. सुधा मूर्ती यांचे शिक्षण त्यांना एक यशस्वी लेखिका बनवण्यात यशस्वी ठरलं. त्यांची व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात एक संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून झाली. बघता बघता त्या इन्फोसिस फाउंडेशन च्या अध्यक्ष बनल्या. सुधा मूर्ती गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्यसेवा उपक्रमांच्या सदस्य आहेत.

अनेक आश्रमांची स्थापना करण्यामध्ये सुधा मूर्ती यांचा हातभार आहे. सुधा मूर्ती या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत त्यांनी ग्रामीण विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी स्वतः उच्च शिक्षण घेऊन स्वतःच, समाजाचे व देशाचे हित जाणलं आणि प्रत्येकाला शिक्षण मिळावं या इच्छेने त्यांनी कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून दिल्या.

आजच्या युगामध्ये संगणकाला फार महत्त्व आहे आणि म्हणूनच कोणीही संगणकाच्या ज्ञानापासून वंचित न राहता सगळ्यांना संगणकाचे शिक्षण मिळायला हवं या हेतूने त्यांनी कर्नाटकातील बऱ्याच शाळांमध्ये संगणक सुविधा सुरु करून देण्याचा एक धाडसी पाऊल उचललं आहे. सुधा मूर्ती इथवरच थांबल्या नाहीत तर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया ची स्थापना केली आहे.

सुधा मूर्ती ह्या भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी TELCO म्हणजेच टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव कंपनी मध्ये टाटा मोटर्सने नियुक्त केलेल्या पहिल्या महिला अभियंता आहेत. सुधा मूर्ती या नेहमीच महिलांच्या हक्कासाठी लढणे आणि शिक्षणाचा प्रसार व विकास करण्यात अग्रगण्य राहिल्या आहेत. सुधा मूर्ती यांनी पुणे-मुंबई, जमशेदपूर अशा विविध ठिकाणी अभियंता म्हणून काम केले आहे.

सुधा मूर्ती यांनी पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज येथे वरिष्ठ प्रणाली विश्लेषक म्हणून कार्य केलं आहे. त्या एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी टाटा मोटर्स मध्ये काम करताना केवळ पुरुषांसाठीच या धोरणांबद्दल लिहले आहे. यासाठी त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं नंतर त्या भारतातील अभियंता म्हणून नोकरी करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव सांगितले आहेत.

तसेच त्या तरूण व वृद्धांना वाचनाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. सुरुवातीला त्यांनी कन्नड भाषेमध्ये लिहायला सुरुवात केली परंतु कालांतराने त्याने इंग्रजी भाषेत पुस्तक लिहायला सुरुवात केली. त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने कौटुंबिक, विवाह, सामाजिक समस्या इत्यादीं बद्दल लिहिलेलं असतं. सुधा मूर्ती यांनी शिक्षण आणि समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत त्यांनी सुरू केलेली इन्फोसिस फाउंडेशन या माध्यमातून त्या शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, दारिद्र्य निर्मूलन इत्यादींबद्दल जागृकता पसरवत आहेत. सुधा मूर्ती गेट्स फाउंडेशनच्या सक्रिय सदस्य आहेत.

भारतातील शिक्षण व्यवस्था मध्ये बदल व क्रांती घडवून आणण्यासाठी सुधा मूर्ती यांनी कठोर प्रयत्न केले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कार्यातून अनेक स्त्रियांना प्रोत्साहित करत आहेत. अनेक स्त्रीयांसाठी त्या आदर्श बनल्या आहेत. सुधा मूर्ती इन्फोसिस फाऊन्डेशनच्या अध्यक्ष आणि ट्रस्टीज देखील आहेत. ज्यावेळी सुधा मूर्ती यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथून आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं त्या नंतर १९९६ मध्ये त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली.

ही फाउंडेशन समाज कार्य करते. त्या एक समाज कार्यकर्त्या आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्त भागांमध्ये आज वर दोन हजार तीनशे घरे बांधली आहेत. या फाउंडेशन मध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कला, संस्कृती आणि गरिबी निर्मूलनाचा देखील समावेश आहे. सुधा मूर्ती यांनी बर्‍याच शाळांमध्ये सात हजारहून अधिक ग्रंथालय बांधून दिली आहेत व सोळा हजाराहून अधिक शौचालय बांधून दिली आहेत.

एक सुप्रसिद्ध लेखिका म्हणून सुधा मूर्ती यांच्या काही लोकप्रिय पुस्तकांमध्ये द मदर आय नेवर नो, थ्री थाउजंड स्टिचेस, द मॅन फ्रॉम द ऍग आणि मॅजिक ऑफ लॉस्ट टेम्पल यांचा समावेश आहे. आज स्त्रियांनी संपूर्ण विश्वामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केलं आहे आणि एक स्त्री म्हणून स्त्रिया काही करू शकतात याला मर्यादा नसते हे सिद्ध करून दाखवलं आहेत त्यातीलच एक उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती होय. सुधा मूर्ती यांच्यासारख्या यशस्वी व कर्तृत्वान स्त्रिया इतर महिला वर्गासाठी आदर्श व प्रेरणा स्त्रोत्र बनल्या आहेत.

पुरस्कार

सुधा मूर्ती यांनी शिक्षण त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ कार्य केल आहे आणि त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टते साठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले २०१९ मध्ये आयआयटी कानपूर तर्फे सुधा मूर्ती यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. सुधा मूर्ती यांना साहित्यामधील त्यांच्या योगदानाबद्दल आर.के. नारायण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सुधा मूर्ती यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक महान पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यातीलच एक म्हणजे सन २००६ मध्ये सुधा मूर्ती यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कढून त्यांना सुवर्णपदक मिळाल आहे. SSLC मध्ये सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल त्यांना रोख पुरस्कार जाहीर करण्यात आला.

बी. इ मध्ये राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांना कर्नाटकाचे मुख्यमंत्री श्री देवराज उर्स यांच्याकडून सुवर्णपदक मिळालं. कर्नाटक विद्यापीठांमध्ये प्रथम आल्यामुळे त्यांना सीएस देसाई पारितोषिक मिळालं.

रोटरी क्लब ऑफ कर्नाटक तर्फे १९९५ मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. सन २००० मध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी ओजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतामध्ये औपचारीक शिक्षण आणि शिक्षण वृत्तीला प्रोत्साहन देण्यातील त्यांच्या योगदानाबद्दल सुधा मूर्ती यांना मानद एल.एल. डी. क्रॉसवर्ड रेमंड बुक अवॉर्ड्समध्ये लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड. दूरचित्रवाणीचा हेम्याकन्नडिगा अवॉर्ड. सन दोन हजार अठरा मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला.

आम्ही दिलेल्या Sudha Murthy Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सुधा मूर्ती यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Sudha Murthy information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Sudha Murthy in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sudha murthy and chi mahiti Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “सुधा मूर्ती यांची माहिती Sudha Murthy Biography in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!