थाळी फेक माहिती मराठी Thali Fek Information in Marathi

thali fek information in marathi थाळी फेक माहिती मराठी, सध्या ऑलम्पिक खेळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सांघिक आणि वैयक्तिक खेळ खेळले जातात आणि त्यामधील जसे कि गोळा फेक, भाला फेक, उंच उडी, लांब उडी, टेबल टेनिस आणि इतर अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात आणि थाळी फेक हा देखील एक त्यामधील खेळला प्रकार आहे आणि आज आपण या लेखामध्ये थाळी फेक या खेळाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. थाळी फेक हा खेळ वैयक्तिक खेळ आहे. प्रकारातील खेळ आहे.

हा खेळ जो ऑलम्पिक मध्ये खेळला जातो आणि या खेळला इंग्रजीमध्ये (डिस्क थ्रो) disk throw या नावाने ओळखले जाते. १८९६ मध्ये अथेन्स या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुषांची थाळी फेक स्पर्धा ऑलम्पिक स्पर्धेचा भाग बनली.

थाळी हि एक जड वजनाची आणि चपटी असते आणि या थाळीचे वजन हे पुरुषांच्यासाठी वेगळे आणि स्त्रीयांच्यासाठी वेगळे वजन असते.

थाळी फेक हा खेळ पुरुष आणि महिला दोघेही खेळू शकतात आणि हा खेळ वैयक्तिक रित्या खेळला जातो. हा खेळ आशियाई देशांच्यामध्ये म्हणजेच भारत, जपान, चीन, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया मध्ये खेळला जातो.

thali fek information in marathi
thali fek information in marathi

थाळी फेक माहिती मराठी – Thali Fek Information in Marathi

खेळाचे नावथाळी फेक
प्रकारवैयक्तिक खेळ
खेळाचा उगमप्राचीन ग्रीकमध्ये
सुरुवात१८९६
थाळीचे वजनपुरुषांच्यासाठी २ किलो आणि महिलांच्यासाठी १ किलो
थाळीचा व्यास  पुरुषांच्यासाठी २२ सेमी आणि महिलांच्यासाठी १८ सेमी

थाळी फेक म्हणजे काय ?

थाळी फेक हा एक ट्रॅक आणि फिल्ड प्रकारातील स्पोर्टिंग खेळ आहे ज्यामध्ये स्पर्धक अॅथलिट जड थाळी फेकतो आणि या खेळामध्ये शक्य तितके दूर फेकणे हा खेळाचा मुख्य उद्देश आहे.

थाळी फेक खेळाचा इतिहास – thali fek history in marathi

थाळी फेक हा खेळ प्राचीन ग्रीस मध्ये सुरु झाला असे मातले जाते. १८७० च्या दशकात ख्रिश्चन जॉर्ज कोहलरॉश आणि विद्यार्थ्यांनी नंतर शिस्त पुन्हा शोधली. १८९६ मध्ये अथेन्स या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुषांची थाळी फेक स्पर्धा ऑलम्पिक स्पर्धेचा भाग बनली.

संपूर्ण शहरीर फिरवत थाळी फेकणारा पहिला आधुनिक अॅथलीट हे बोहेमिया फ्रांतीसेक जांडा सुक हे होते आणि हे तंत्र विकसित झाल्यानंतर एक वर्षांने त्याने १९०० च्या ऑलम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले. महिलांची स्पर्धा २० व्या शतकामध्ये सुरुवातीला सुरु झाली आणि नंतर १९२८ च्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये महिलांचा देखील थाळी फेक खेळासाठी समावेश करण्यात आला.

थाळीचे वजन किती असते ?

स्पर्धेमध्ये थाळी फेकणे ही स्पर्धकांच्या वजनावर अवलंबून असते. पुरुष आणि स्त्रिया ह्या वेगवेगळ्या आकाराच्या, वजनाच्या आणि वेगवेगळ्या थाळी फेकतात.

या खेळामध्ये वापरली जाणाऱ्या थाळीचे वजन हे पुरुषांच्यासाठी आणि स्त्रीयांच्यासाठी वेगळे असते म्हणजेच पुरुषांच्यासाठी हे वजन २ किलो इतके असते आणि महिलांच्यासाठी १ किलो इतके वजन असते आणि या थाळीचा व्यास हा २.५ मीटर इतके असते.

थाळी फेक खेळाचे नियम – thali fek rules in marathi

कोणताही खेळ खेळण्यासाठी काही नियम असतात ते नियम वापरूनच आपल्याला खेळ खेळता येतो तसेच थाळी फेक खेळताना आपल्याला काही नियम वापरून खेळ खेळावे लागतात आणि ते नियम कोणते आहेत ते पाहूया.

  • पुरुषांच्यासाठी वापरली जाणारी थाळी हि २ किलो वजनाची असते आणि आणि त्याचा व्यास २२ सेमी इतका असतो आणि महिलांच्यासाठी वापरली जाणारी थाळी हि १ किलो वजनाची असते आणि या थाळीचा व्यास १८ सेमी असतो.
  • या खेळामध्ये वापरली जाणारी जाळीचा आकार यु (U) सारखा असावा आणि हे अशा प्रकारे तयार केले पाहिजे कि ते सुमारे २५ मीटर / से वेगाने उडणाऱ्या २ किलो वजनाच्या थाळीचे उड्डाण रोखू शकेल.
  • जाळीच्या यु आकाराची रुंदी ६ मीटर आणि समोरून सुमारे ७ मीटर असावी आणि जाळीच्या पॅनल्सची उंची ४ मीटर असावी.
  • अॅथलीट हा २.५ मीटर व्यासाच्या वर्तुळात उभा राहिल्यानंतरच थाळी फेकू शकतात आणि थाळी फेकत असताना खेळाडू रीमाला स्पर्श करू शकत नाही.
  • अॅथलीटला परवानगी असलेल्या वर्तुळाच्या बाहेर जमिनीला स्पर्श करण्याची परवानगी नाही.
  • जर थाळी हि लँडिंग क्षेत्राच्या बाहेर पडली तर ते वैध मानले जात नाही.
  • प्रत्येक स्पर्धक हा बाद फेरीमध्ये असताना तीन वेळा थाळी फेकू शकतो.
  • जोपर्यंत थाळी जमिनीशी संपर्क साधत नाही तोपर्यंत खेळाडूने वर्तुळातच राहिले पाहिजे अन्यथा तो फॉल मानला जावू शकतो.
  • जर खेळाडू वळताना थाळी पडल्यास त्याचा परिणाम हा अयशस्वी मानला जातो.

थाळी फेक हा खेळ कसा खेळावा

थाळी फेक खेळ खेळताना खेळाडूला योग्य आणि पुरेसे वळण घेण्यासाठी खेळाडूने स्वताचा अक्ष दीड वेळा चालू केला पाहिजे. त्यानंतर त्याने थाळी उजव्या हातामध्ये घेवून हाताची हालचाल करणे आवश्यक आहे आणि मग त्यानंतर हात वेगवान हालचाल करून पूर्णपणे पसरलेला असला पाहिजे.

आणि तीन वेळा हाताची हालचाल करून मग नंतर थाळी जितक्या लांब टाकता येईल फेकता येईल तितक्या लांब फेकली पाहिजे पण ती लँडिंग क्षेत्रामध्ये पडली पाहिजे. स्पर्धकाला खेळ खेळताना तीन वेळा थाळी फेकता येते.

थाळी फेक खेळाविषयी कहि मनोरंजक तथ्ये – facts

  • थाळी फेक हि स्पर्धा उन्हाळी ऑलम्पिकमध्ये समाविष्ट केलेली आहे.
  • थाळीमध्ये सामान्यता गुळगुळीत धातूची रिम आणि थाळीला वजन देण्यासाठी मेटल कोर असतो आणि बाहेरील बाजूंनी वापरलेली सामग्री प्लास्टिक, धातू, लाकूड, फायबरग्लास किंवा इतर सामग्रीपासून बनवली जाते.
  • हा खेळ आशियाई देशांच्यामध्ये म्हणजेच भारत, जपान, चीन, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया मध्ये खेळला जातो.
  • थाळी जमिनीवर पडू पर्यंत अॅथलीटला वर्तुळ सोडण्याची परवानगी नाही.
  • महिलांची स्पर्धा २० व्या शतकामध्ये सुरुवातीला सुरु झाली आणि नंतर १९२८ च्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये महिलांचा देखील थाळी फेक खेळासाठी समावेश केला.
  • या खेळला इंग्रजीमध्ये (डिस्क थ्रो) disk throw या नावाने ओळखले जाते.
  • जड वजनाची थाळी हि शक्य तितक्या लांब फेकणे हे या खेळाचे मुख्य उदिष्ट आहे.
  • धावपटू सामान्यता फेकण्याच्या वर्तुळात थाळी फेकण्यापूर्वी थाळीला गती देण्यासाठी फिरतो.

आम्ही दिलेल्या thali fek information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर थाळी फेक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या thali fek information in marathi language या thali fek wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about thali fek in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Thali fek information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!