Undhiyu Recipe in Marathi उंधियू रेसिपी मराठी उंधियु हा पदार्थ अनेक लोकांच्या साठी नवीन आहे कारण हा पदार्थ कित्येक लोकांना माहित नाही आहे. पण हा एक गुजराती पारंपारिक पदार्थ आहे. जो पदार्थ मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये बनवला जातो आणि मुख्यता हा पदार्थ गुजरातमध्ये संक्रांतीच्या वेळी किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळी बनवला जातो. या पदार्थामध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि काही इतर साहित्य वापरून उंधियु रेसिपी बनवली जाते आणि हे रेसिपी वेगवेगळ्या भाज्या वापरून बनवल्यामुळे त्याची टेस्ट अतिशय सुंदर बनते. उंधियु हि रेसिपी जर आपण घरामध्ये बनवली तर हि आपल्या घरातील लोकांच्यासाठी एक पौष्टिक रेसिपी बनू शकते करा त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या असतात आणि या भाज्यांमध्ये वेगवेगळे पौष्टिक घटक असतात.
त्यामुळे उंधियु हा पदार्थ लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. उंधियु हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे परंतु हि रेसिपी बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि जास्त साहित्य देखील लागते. चला तर मग आता आपण उंधियु हि रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
उंधियू रेसिपी मराठी – Undhiyu Recipe in Marathi
- वांगी : उंधियु बनवण्यासाठी वांगी हा घटक एक महत्वाचा घटक आहे. वांगी अधिक चिन्हामध्ये चिरली जातात आणि त्यामध्ये सारण घालून त्याला इतर भाज्यांच्या सोबत फोडणी दिली जाते.
- बटाटा : उंधियु हा पदार्थ बनवताना बटाटा देखील वापरला जातो आणि याची साल काढून तो देखील अधिक चिन्हामध्ये चिरून घ्यायचे आणि त्यामध्ये देखील सारण भरून घ्या.
- कांदा : कांदा देखी या रेसिपी मध्ये असाच वापरला जातो जसे आपण बटाटा आणि वांगी वापरतो.
उंधियु रेसिपी – undhiyu recipe
उंधियु हि एक गुजराती रेसिपी आहे जी भारतामधील इतर भागामध्ये देखील बनवली जाते. हि रेसिपी गुजरात मध्ये संक्रांतीच्या वेळी किंवा दिवाळीच्या वेळी बनवला जाते. उंधियु हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे परंतु हि रेसिपी बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि जास्त साहित्य देखील लागते. चला तर मग उंधियु रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
उंधियु रेसिपी बनवण्यासाठी भरपूर साहित्य लागते आणि ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असेलच असे नाही ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण उंधियु रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ४ छोटी वांगी.
- ३ छोटे बटाटे.
- ३ छोटे कांदा.
- १ छोटी वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी.
- अर्धा मोठा चमचा मटार
सारण साठी लागणारे साहित्य
- १ छोटी वाटी ओले खोबरे ( खिसलेले ).
- १ छोटी वाटी शेंगदाण्याचा कुट.
- १ मोठा चमचा तीळ कुट.
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
- २ चमचे लाल तिखट.
- १/२ चमचा हळद.
- दीड चमचा गरम मसाला.
- २ चमचे तेल.
फोडणीसाठी लागणारे साहित्य
- १ मोठा चमचा तेल.
- १/३ चमचा जिरे.
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- मीठ ( चवीनुसार ).
उंधियु रेसिपी घरी बनवणे खूप सोपी आहे. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून उंधियु रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
- उंधियु बनवताना सर्वप्रथम वांग्याचा देठ काढून अधिक चिन्हामध्ये चिरून घ्या तसेच बटाट्याची साल काढून ते देखील अधिक चिन्हामध्ये चिरून घ्या आणि कांदा देखील त्याची साल काढून अधिक चिन्हामध्ये चिरून घ्या आणि या सर्व भाज्या थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवा.
- आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये छोटी वाटी ओले खोबरे ( खिसलेले ), १ छोटी वाटी शेंगदाण्याचा कुट, १ मोठा चमचा तीळ कुट, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद, दीड चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि २ चमचे तेल घाला आणि ते चांगले मिक्स करा मिक्स करा आणि त्याचे सारण बनवून घ्या.
- आता आपण अधिक चिन्हामध्ये चिरलेले बटाटे, कांदे आणि वांगी पाण्यातून बाहेर काढून ती कापडाने कोरडी करून घ्या.
- आणि त्यामध्ये आपण बनवलेले सारण भरा आणि ह्या भाज्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि राहिलेल्या सारणामध्ये पाणी घालून ते बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि मग त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि जिरे घाला आणि लगेचच त्यामध्ये कांदा घाला आणि थोडा वेळ भाजा. कांदा लालसर झाला कि त्यामध्ये मटार आणि मेथीची भाजी घाला आणि ती देखील एक मिनिट भाजा आणि मग त्यामध्ये सारण भरलेल्या भाज्या घाला.
- आणि ह्या भाज्या तेलामध्ये ५ मिनिटे भाजा आणि मग त्यात पाणी घातलेला मसाला आणि थोडे पाणी घाला आणि मिक्स करा. ( सारण मध्ये मीठ घातले आहे त्यामुळे परत मीठ घालण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही भाजी टेस्ट करून बघितली असेल आणि त्यामध्ये मीठ घालायची गरज असेल तरच मीठ घाला )
- आणि ह्या भाज्या मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे चांगल्या शिजवून भाजी घट्ट बनवून घ्या.
- उंधियु हा पदार्थ गरमागरम चपाती सोबत सर्व्ह करा.
आम्ही दिलेल्या undhiyu recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर उंधियू रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gujarati undhiyu recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि surti undhiyu recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये undhiyu bhaji recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट