उपवासाची रेसिपी मराठी Upvas Recipe in Marathi

Upvas Recipe in Marathi उपवासाची रेसिपी मराठी उपवास म्हंटल कि साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, राताळाची खिचडी, शेंगदाण्याच्या कुटाचा लाडू, बटाट्याचा चिवडा यासारखे अनेक पदार्थ आठवतात आणि हे उपवासाचे पदार्थ घरी बनवण्यासाठी देखील खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच झटपट बनतात. आज आपण या लेखामध्ये वेगवेगळे उपवासाचे पदार्थ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. भारतीय संस्कृती हि वेगवेगळ्या प्रकारे जपली जाते आणि भारतीय संस्कृती मध्ये उपवासाला एक वेगळेच महत्व आहे. भारतामध्ये कित्येक ठिकाणी वेगवेगळे उपवास केले जातात आणि त्या उपवासाला वेगवेगळे पदार्थ आणि फळे खाल्ली जातात.

जसे की शाबु, चिप्स, रताळाची खिचडी, साबूदाणा वडे, उपवासाची बटाटा भाजी, बटाटे चिवडा, शाबु चिवडा यासारखे वेगवेगळे पदार्थ उपवासाला बनवले जातात. उपवासाच्या काही रेसिपी ह्या लोकांच्या खूप लोकप्रिय आहेत जसे कि बटाटे चिवडा, साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी इत्यादी. चला तर मग पाहूयात उपवासाचे वेगवेगळे पदार्थ.

upvas recipe in marathi
upvas recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 उपवासाची रेसिपी मराठी – Upvas Recipe in Marathi

उपवासाची रेसिपी मराठी – Upvas Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

उपवासाचे पदार्थ दाखवा – upvasache padarth list in marathi

आठवड्यामध्ये भारतीय कुटुंबामध्ये एकाचा तरी कोणता न कोणता तरी उपवास असतो तसेच महिन्यातून संकष्टी चतुर्थी आणि एकादशी येतेच त्यावेळी एकाचा प्रकारचा उपवासाचा पदार्थ कावून कंटाळा येतो त्यावेळी आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. चला तर आता आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते पाहूयात

साबुदाणा वडा रेसिपी 

उपवासाचा शाबु वडा हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडतो आणि सर्व लोक हा खावू शकतात. साबुदाणा वडा बनवण्यासाठी खूप सोपे असतात आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनतात. आता आपण पाहूयात शाबुचे वडे कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

शाबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shabu vada 

शाबु वडा बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य वडे बनवण्यासाठी लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते. आता आपण पाहू वडे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • ३ वाटी भिजवलेली शाबु.
  • २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे.
  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा २ चमचे लाल तिखट.
  • १/२ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर.
  • १ चमचा मोठे मोठे वाटलेले जिरे.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

शाबूदाणा वडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make sabudana vada recipe 

  • आता आपण शाबूदाणा वडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती पाहूयात.
  • शाबूदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला वडा बनवण्याच्या आधल्या दिवशी शाबु भिजत घालावी लागते ज्यामुळे शाबु चांगली भिजून मऊ होईल.
  • आता बटाटे स्वच्छ धुवून ते एका कुकरमध्ये पाण्यामध्ये घालून ते कुकरला २ ते ३ शिट्या देवून चांगले शिजवून घ्या आणि कुकर गार झाला कि त्यामधील बटाटे काढून त्याची साल काढा आणि ते चांगले कुसकरून घ्या.
  • मग एक परात घ्या आणि त्या परातीमध्ये भिजवलेली शाबु, कुसकरलेला बटाट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, चवीनुसार मीठ आणि साखर ( चवीनुसार ) घालून हे सर्व मिश्रण एकत्र करून ते चांगले मळून घ्या.
  • आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोल आणि चपटे वडे बनवून ( सर्व मिश्रणाचे वडे बनवून घ्या ).
  • मग कढई गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये वडे तळण्यासाठी तेल घाला आणि तेला गरम झाले कि त्या तेलामध्ये एक एक करून तेलामध्ये जितके वडे मावतील तितके वडे घाला आणि ते चांगले लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • अश्या प्रकारे सर्व वडे तळून घ्या, तुमचे उपवासाचे शाबुचे वडे तयार झाले.

रताळाची खिचडी रेसिपी – ratalachi khichdi recipe 

आपण उपवासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनावती आणि त्यामधी हा एक स्वादिष्ट आणि सोपा पदार्थ. रताळाची खिचडी हि रताळा पासून बनवले जाते आणि हे एक कंद मूळ आहे जे थंडीच्या सीजन मध्ये मिळतात आणि हि गोड असतात. रताळाची खिचडी बनवताना त्याची साल काढून ती खिसली जातात आणि मग त्याची खिचडी बनवली जाते. चला तर आता आपण रताळाची खिचडी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी
वाढणी२ ते ३ व्यक्ती

रताळाची खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make ratalachi khichdi recipe 

रताळाची खिचडी बनवण्यासाठी रताळ हे मुख्य साहित्य लागते त्याचबरोबर खिचडी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि ते घरामध्ये उपलब्ध असू शकतो. पण रताळ हे आपल्याला बाजारामध्ये रताळाच्या सिजनमध्येच मिळते त्यामुळे आपण रताळी खिचडी सिजनमध्ये बनवू शकतो. चला तर मग पाहूयात रताळाची खिचडी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • २ वाटी रताळाचा खीस ( साल काढून खिसलेला ).
  • अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या.
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • १/४ चमचा जिरे.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • १ ते २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • ३ ते ४ चमचे तूप.

रताळाची खिचडी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make ratalachi khichdi 

आता आपण वरील साहित्य वापरून रताळाची खिचडी कशी बनवायची ते पाहूयात,

  • सर्वप्रथम रताळ स्वच्छ धुवून त्याची साल काढून ते खिसून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये ३ ते ४ चमचा तूप गरम करा तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका आणि मग ते चांगले फुलले कि त्यामध्ये कडीपत्ता आणि शेंगदाणे टाका आणि ते तुपामध्ये थोडा वेळ परता आणि मग त्यामध्ये रताळाचा खीस घाला आणि तो खीस चांगला भाजा आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते मिक्स करा आणि ४ ते ५ मिनिटे भाजा.
  • आता या वर थोडे पाणी शिंपडा आणि मग त्यावर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटे मध्यम आचेवर वाफवा.
  • मग त्या,मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करा.
  • तुमची उपवासाची रताळाची खिचडी तयार झाली.

साबुदाणा खिचडी रेसिपी 

महाराष्ट्रा बरोबर भारतामध्ये इतर ठिकाणी देखील आवडीने बनवली जाणारी आणि खाल्ली जाणारी उपवासाची खिचडी हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि छान देखील लागते. आपण हि खिचडी उपवासाला तसेच आपण कधीही खावू वाटल्यास बनवू शकतो. साबुदाणा खिचडी हि खूप सोपी आणि कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनणारी डिश आहे. चला तर मग साबुदाणा खिचडी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
पाककलाभारतीय ( महाराष्ट्रीयन )
बनवण्याची पध्दतसोपी

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make sabudana khichdi recipe 

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही तसेच मोजकेच साहित्य लागते आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये आधीपासूनच उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. चला तर मग साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात

  • १ वाटी साबुदाणा.
  • १ वाटीला थोडासा कमी शेंगदाण्याचा कुट ( भाजलेल्या शेंगदाण्याचा ).
  • ३ ते ४ चमचे खवलेले ओले खोबरे.
  • २ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • १/२ चमचा जिरे.
  • ३ ते ४ चमचे तेल.
  • ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • ५ ते ६ पाने कडीपत्ता.
  • १ बटाटा ( पातळ काप केलेला ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make sabudana khichdi recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून एकदम सोपी पण चविष्ट असणारी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

  • साबुदाणा खिचडी बनवताना सर्वप्रथम आपल्याला शाबु स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामधील शाबु धुतलेले पाणी काढा आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून ते भिजवण्यासाठी ठेवा. शाबु कमीतकमी ५ ते ६ तास भिजवा किंवा जास्तीत जास्त रात्रभर भिजत ठेवा.
  • शाबु रात्रभर भिजत ठेवली तर ती चांगली भिजेल आणि फुगेल त्यामुळे शाबु रात्रभर भिजवलेली चांगली.
  • आता त्या भिजवलेल्या शाबुमध्ये पाणी असेल तर पाणी काढून टाका. शक्यतो भिजवलेल्या शाबुमध्ये पाणी राहत नाही कारण शाबु पाणी शोषून घेते.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये ३ ते ४ चमचा तेल गरम करा तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका आणि जिरे छान फुलले कि त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता पाने टाका आणि ते काही सेकंद भाजा.
  • मग त्यामध्ये पातळ काप केलेला बटाटा घाला आणि थोडा वेळ भाजा आता त्यामध्ये भिजवलेली शाबु घाला आणि ती चांगली तेलामध्ये मिक्स करा.
  • आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये लगेच ओले खोबरे आणि कोथिंबीर घाला आणि ते एकत्र करू खिचडीला एक चांगली वाफ येवू द्या.
  • तुमची गरमागरम उपवासाची साबुदाणा खिचडी तयार झाली.

बटाटा चिवडा रेसिपी – batata chiwda recipe 

उपवासाच्या दिवशी आपण काहीना काही स्नॅक्स देखील खातो जसे कि बटाटा चिप्स,  शाबु चिवडा किंवा मग बटाट्याचा चिवडा. आता आपण अगदी सोप्या पध्दतीने बटाटा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा आणि हा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

बटाटा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make batat chiwda 

बटाटा चिवडा बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून बिकट आणावे लागते. चला तर मग चिवडा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ मोठे बटाटे.
  • ८ ते ९ कडीपत्ता पाने.
  • अर्धी वाटी शेंगदाणे.
  • २ हिरव्या मिरच्या ( मोठ्या मोठ्या चिरलेल्या ).
  • २ चमचे पिठी साखर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार )

बटाटा चिवडा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make batata chiwda 

बटाट चिवडा हि उपवासाची रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण वरील साहित्य वापरून बटाटा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आता त्यामध्ये बटाट्याचा खीस तळण्यासाठी तेल घाला आणि ते गरम होऊ द्या.
  • ते गरम होईपर्यंत तुम्ही बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून घ्या.
  • आता तेल गरम झाले कि त्यामध्येच बटाटा खिसा आणि मग तो खीस चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तेलामध्ये जितका खीस मावेल तितकाच पाडून तो तळून घ्या. अश्या प्रकारे दोन्हीही बटाटे खिसुन ते तेलामध्ये तळून घ्या.
  • आता हा तळलेला खीस एका टिश्यू पेपरवर काढा.
  • त्याचबरोबर त्या कढई मध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि मग ते तळलेल्या बटाट्याच्या खीस मध्ये काढा तसेच हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता देखील तळून घ्या आणि तो देखील तळलेल्या बटाट्याच्या खीस मध्ये काढा. आता गॅस बंद करा आणि मग बटाट्याच्या खीस मध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालून ते चांगले मिक्स करा. ( टीप : आपण चिवड्यामध्ये बेदाणे देखील तळून टाकू शकतो ).
  • तुमचा उपवासाचा बटाट्याचा चिवडा तयार झाला.
  • बटाटा चिवडा १५ ते २० दिवस आपण साठवून ठेवू शकतो.

टिप्स (Tips) 

  • साबुदाणा वडा आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत खावू शकतो तसेच हा वडा आपण हिरवी मिरची वापरून किंवा लाल तिखट वापरून अश्या दोन्ही प्रकारे बनवू शकतो.
  • बटाटा चिवड्यामध्ये आपण आवडीचे ड्राय फ्रुट्स घालू शकतो जसे कि बेदाणे, काजू. त्याचबरोबर बटाटा चिवड्यामध्ये आपण शेंगदाणे अक्खे टाकण्याऐवजी शेंगदाण्याच्या पाकळ्या टाकल्या तरी चालतात.
  • साबुदाणा खिचडी आपण दह्यासोबत खावू शकतो तसेच साबुदाणा खिचडी आपण लाल तिखट घालून देखील बनवू शकतो.
  • जर तुम्हाला लगेच खिचडी बनवायची असेल आणि तुम्ही जर रात्री शाबु भिजत घातली नसेल तर शाबु गरम पाण्यामध्ये एक तास भिजवा त्यामुळे शाबु थोडे मऊ होतील.
  • रताळाच्या खिचडी मध्ये आपण ओले खोबरे देखील घालू शकतो.

आम्ही दिलेल्या easy upvas recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर उपवासाची रेसिपी मराठी माहिती maharashtrian upvas recipes in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या instant upvas recipes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि upvasache padarth list in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये upvas food list in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!