Varandha Ghat Information in Marathi वरंधा घाटाची माहिती वरंधा घाट म्हटले की डोळ्यासमोर येते ती त्या घाटातील खोल दरी वाघजाई माता मंदिर सगळीकडे पसरलेली हिरवळ आणि अप्रतिम सौंदर्याने नटलेला निसर्ग. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या महामार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाट पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. महाड पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. हा घाट 20 किलोमीटर अंतराच्या डोंगरी रस्त्याचा घाट आहे. हा घाट रस्ता वळणावळणाचा आहे. हा घाट रस्ता सह्याद्रीच्या उभ्या धारावर असलेल्या कावळे किल्ल्याला दुभांगुन कोकणात उतरतो.
सगळीकडे हिरवळ, उंचच उंच डोंगर, डोंगर कड्यावरून फेसाळत येणारे धबधबे आणि दऱ्या पाहून मन आनंदीत होऊन जाते. पावसाळ्यामध्ये घाटाचे विलोभनीय दर्शन होते. वरंधा घाटातील घाटवाट ही ब्रिटिशांनी अठराशे सत्तावन मध्ये सव्वा लाख रुपये खर्च करून पक्की करून घेतली. सुरवातीच्या काळामध्ये वरंधा घाटातील रस्ता बैलगाडी जाता येईल एवढाच होता. आता त्या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता व्यवस्थित केलेले आहे. आता त्या रस्त्यावरून टुविलर,फोर व्हिलर वगैरे वाहनांची ये-जा असते.
वरंधा घाट माहिती मराठी – Varandha Ghat Information in Marathi
वरंधा घाट | माहिती |
श्रेणी | पश्चिम घाट |
लांबी | वरंधा घाट पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. |
कोठे आहे | महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात येतो |
पाहण्यासारखी ठिकाणे | वाघजाई माता मंदिर, कावळा किल्ला |
रस्ता | पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या महामार्गावर वरंधा घाट आहे |
निसर्गप्रेमी नेहमीच वरंधा घाटाचे सौंदर्य पाहून या घाटाकडे आकर्षिले जातात. या घाटाच्या उतारा मध्ये माजेरी, वरंध आणि शेवटी बिरवाडी ही गावे लागतात. या घाटाच्या एक बाजूला उंच उंच डोंगर आहे,तर दुसर्या बाजूला कठडा तयार केलेला आहे. या कठड्यावर खूप माकडे बसलेली असतात. घाटातून प्रवास करताना असे वाटते, जणू तेथील डोंगराने धुक्याची शाल पांघरून घेतली आहे.जणू तेथील डोंगर त्या धुक्यामध्ये लपंडाव खेळत आहेत असा भास होतो.
- नक्की वाचा: आंबा घाटाची माहिती
घाटात असलेल्या दऱ्या ह्या धुक्यामुळे अस्पष्ट दिसतात. पावसाळ्यामध्ये तर त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. रस्त्याच्या बाजूने हिरवगार गवत पाहून असे वाटते,जसे निसर्गाने सर्वत्र हिरवी शाल पांघरून घेतली आहे. वरंधा घाटात अतिशय सुंदर निसर्ग आणि अप्रतिम नैसर्गिक रचना केलेली आहे. वरंधा घाटाचा परिसर अतिशय मनमोहक आहे.
विरंगुळ्याचे ठिकाण, अप्रतिम सादरीकरण, इतिहास डोकावून एक वेगळी वाट पाहण्याचा आनंद वरंधा घाटात आपल्याला अनुभवायला मिळतो. वरंधा घाट पाहिल्यानंतर असं वाटते की, घाटात घाट वरंधाघाट बाकी सब घाटिया. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून खळखळ आवाज करत बाहेर येणारे धबधबे, दरीतले हिरवे रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठ मोठ्या दगडावर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी असे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फिटते. वरंधा घाट पाहिल्यानंतर असे वाटते की आपल्या गाडीची चाके पुन्हा पुन्हा या घाटाकडे वळवावीत.
वाघजाई माता मंदिर :
वरंधा घाटात वाघजाई माता मंदिर आहे. मंदिर खुप सुंदर आहे. मंदिरात वाघजाई मातीची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूला एक शिवलिंग आहे. दर्शन घेवून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. तसेच या घाटात वाघजाई माता मंदिराचे आणखी एक जुने मंदिर आहे. वाघजाई माता मंदिरापासून थोडे पुढे गेल्यानंतर एक पायवाट लागते. ती पायवाट चढून वरती गेल्यानंतर जुने वाघजाई माता मंदिर आहे.
- नक्की वाचा: कुंभार्ली घाटाची माहिती
या पायवाटेवरुन थोडं वरती गेल्यानंतर पांडवकालीन पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. काळ्याशार पाषाणात या पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. वरंधा घाटातील महाड रस्ता हा खूप पूर्वी तयार केलेला आहे. हा रस्ता इंग्रजानी तयार केला पण त्याचा खरा वापर पुरातन काळापासून आहे. जुन्या काळात समुद्रमार्गे येणारा माल हा वरंधा घाटाच्या या पायाथ्यापर्यंत आणला जायचा, तेथून मजुरांच्या मदतीने वरती चढवला जायचा आणी तिथून पुढे बैलगाडीमार्फत भोरमार्गे माल वाहतूक व्हायची.
त्यासाठी त्यांना पाण्याची सुविधा व्हावी म्हणून या सात पाण्याच्या टाक्या टाक्या खणलेल्या आहेत. या टाक्यांचा वापर पाणी पिण्यासाठी केला जात होता. या पाण्याच्या टाक्या पाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला जुने वाघजाई माता मंदिर पाहायला मिळते. वाघजाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते. या मंदिराच्या आजुबाजूला चहा वडापाव कांदे भजी याच्या टपऱ्या आहेत वरंधा घाटाला भेट देण्यासाठी आलेले पर्यटक येथील टपऱ्यांवर वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी थांबतात.
- नक्की वाचा: भोर घाटाची माहिती
कावळ्या किल्ला:
कावळा किल्ला खूप मोठा आहे. कावळा किल्ला फोडूनच वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. वाघजाई मातेच्या मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर दोन डोंगर दिसतात ते म्हणजे मन मोहन गड म्हणजेच कावळेकिल्ला. पुणे आणि रायगड जिल्ह्याची सीमा जिथे संपते तिथे हा किल्ला आहे. या गडावर जाण्यासाठी एक पायवाट आहे. सुरुवातीलाच काही पायऱ्या लागतात.
या बांधीव पायऱ्या पार करून अरुंद वाटेने कारवीच्या झाडातून जाताना हृदयात धडधड व्हायला लागते. वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरुन जाताना डावीकडे खाली वरंधा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो. डोंगर धारेच्या कड्यावरुन जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. तशी सपाटी अरुंदच तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडे बाजूला करत करत शेवटी एका टेकड्यांची उतरण उतरण शेवटी अखेरची चढाई समोर येते.
तिथून वरंधा घाटात मस्त दर्शन घडतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि डान्स घेऊन आलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात. इतिहासामध्ये कावळ्या गडाबद्दल तेवढी माहिती नाहीये आणि हा गड तेवढा प्रचलितही नाही. या गडावरून वरंधा घाटाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. या घाटाच्या मध्यभागी एक छोटा उतार आहे. तिथे समर्थ रामदास स्वामींचे शिवथर घळ आहे. तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे. वरंधा घाटाच्या कुशीत हिरवळ गर्द झाडी आहे तिथे संत रामदास स्वामींचे शिवथरघळ आहे.
- नक्की वाचा: खंडाळा घाटाची माहिती
वरंधा घाट फोटो:
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, वरंधा घाट varandha ghat information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about varandha ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही वरंधा घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या varandha ghat nature information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही information of varandha ghat in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट