Kumbharli Ghat Information in Marathi कुंभार्ली घाट कराड मधून चिपळूणकडे जाताना सह्याद्रीच्या रांगेमध्ये कुंभार्ली घाट लागतो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्हा यांना जोडणारा दुवा आहे हा घाट. या घाटाची उंची एकवीसशे फूट आहे. हा घाट साधारण 12 ते 14 किलोमीटर इतका आहे. पाटण मधून निघाला नंतर आपण कोयना नगरला येतो आणि कोयना नगर मधून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर सुरू होतो तो कुंभार्ली घाट. हा घाट उरल्यानंतर आपण कोकणामध्ये म्हणजेच चीपळून मध्ये प्रवेश करतो. कुंभार्ली घाटाच्या सौंदर्या बद्दल बोलायचे झाले तर आपल्याला शब्दच कमी पडतील असे सौंदर्य आहे. हे निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षणच आहे.
कुंभार्ली घाटातून प्रवास करताना असे वाटते जणू तेथील डोंगराने धुक्याची शाल पांघरून घेतली आहे. जणू तेथील डोंगर त्या धुक्यामध्ये लपंडाव खेळत आहेत असा भास होतो. तेथे असलेल्या दऱ्या ह्या या धुक्यामुळे अस्पष्ट दिसतात. पावसाळ्यामध्ये तर त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवगार गवत पाहून असे वाटते जसे निसर्गाने सर्वत्र हिरवी शाल पांघरून घेतली आहे.
कुंभार्ली घाट माहिती – Kumbharli Ghat Information in Marathi
कुंभार्ली घाट | माहिती |
श्रेणी | पश्चिम घाट |
लांबी | 12 ते 14 किलोमीटर |
उंची | एकवीसशे फूट |
कोठे आहे | महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात येतो |
पाहण्यासारखी ठिकाणे | कुंभार्ली महाकाली देवी, थिबा पॅलेस, रत्नागिरी लाईट हाऊस, मारलेश्वर मंदिर |
रस्ता | रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्हा यांना जोडणारा दुवा आहे हा घाट |
घाटात सर्वत्र असलेली ती हिरवळ आणि डोंगर गडावरून खळखळत वाहणारे दुधाळ फेसाळणारे पाणी पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. असे वाटते ते सौंदर्य पाहतच राहावे,डोळ्यात भरून घ्यावे. डोंगरावरून भरून वाहत येणारे फेसाळ दुधासारखे पाणी आणि त्यात भर म्हणून पावसाची रिमझिम या दोन्हींचा आवाज कानात घुमू लागतो. तसेच या घाटामध्ये माकडाचे प्रमाणही जास्त आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या कठड्यावर अनेक माकडे आणि त्यांची पिल्ले बसलेली असतात.
- नक्की वाचा: माळशेज घाटाची माहिती
त्यांना पाहून असे वाटते की ती माकडे जणू रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या व त्यातील माणसांची चेष्टाच करत आहेत. ही माकडे तेथील सौंदर्यात आणखी भर टाकतात. शेवाळाने वेढलेली झाडे आणि त्यावरून खळखळ वाहत येणारे पाणी पाहून मन अगदी आनंदित होऊन जातं. घाटातून जाणारा रस्ता वळणावळणाचा आहे. त्या वळणावळणाच्या रस्त्यातुन जाताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. पावसाळ्यामध्ये डोंगर-दऱ्या वरून कोसळत येणाऱ्या पाण्यामुळे घाटामध्ये अनेक धबधबे निर्माण झाले आहेत.
एकाच वेळी अनेक धबधबे पाहण्याचा अनुभव आपल्याला या घाटातून मिळतो.या घाटातून प्रवास करत असताना या घाटाचे विलोभनीय सौंदर्य पाहून असे वाटते हा प्रवास कधी संपूच नये. कुंभार्ली घाटातील शाल पांघरलेले डोंगर,तेथील खोल दऱ्या आणि उंचावरून खळखळ आवाज करत दुधासारखे पांढरेशुभ्र धबधबे हे सर्व पाहून मन आनंदीत होऊन जातं.
कुंभार्ली घाट फोटो:
सातारा जिल्हा :
सातारा हा सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला निसर्गाने अगदी मनापासुन नैसर्गिक दान दिलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये निसर्गसौंदर्याने नटलेला कासपठार आपल्याला पाहायला मिळतो. साताऱ्यापासून जवळ थोड्याच अंतरावर अजिंक्यतारा किल्ला आहे. हा किल्ला सकाळच्या वेळी पाहायला गेल्यानंतर तिथे या किल्ल्यावर खूप सारे मोर दिसतात. सातारा तालुक्यात आपल्याला सज्जनगड किल्ला पाहायला मिळतो. या गडावर रामदास स्वामींची समाधी आहे.
- नक्की वाचा: आंबा घाटाची माहिती
रत्नागिरी जिल्हा :
रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच हा जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.या जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगररांगा त्यामुळे येथे पर्यटक खूप प्रमाणात असतात. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नदुर्ग, भवानीगड, पालगड, यशवंत गड असे अनेक गड किल्ले आहेत. तसेच गणपतीपुळे, गुहागर, चीपळून, मार्लेश्वर, रत्नागिरी, संगमेश्वर अशी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत.
गणपतीपुळे :
रत्नागिरी म्हटलं की येणारा प्रत्येक पर्यटक हा गणपतीपुळेच्या मंदिरात जातोच. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मंदिर खुप सुंदर आहे. मंदिराला लागूनच समुद्रकिनारा आहे.त्यामुळे येथे पर्यटकांची सतत गर्दी असते.
आरे वारे बीच :
गणपतीपुळेहुन रत्नागिरीकडे जाताना बारा किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे.समुद्रात घुसलेल्या डोंगराच्या टोकामुळे दोन जुळे समुद्रकिनारे निर्माण झाले आहेत आणि ते म्हणजे आरे आणि वारे. आरे वारे बीच या समुद्र किनार्यावर फक्त लढ म्हणा या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
- नक्की वाचा: आंबोली घाटाची माहिती
गणेश पुळे :
हा समुद्रकिनारा रत्नागिरी पासून 21 किलोमीटर अंतरावर आहे.पांढरी शुभ्र वाळू,बाजूने डोंगराळ भाग, शांतता आणि स्वच्छता यामुळे हा किनारा अतिशय विलोभनीय आहे.
रत्नदुर्ग किल्ला :
रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी पासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर आहे.हा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे. अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, तिथून दिसणार्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे हा किल्ला कायमच आकर्षक ठरतो.
मारलेश्वर मंदिर :
मार्लेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आहे.येथील एका गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.धबधबा बारमाही असला तरी पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य अतिशय सुंदर विलोभनीय असते.
रत्नागिरी लाईट हाऊस :
रत्नदुर्ग किल्ला जवळ असलेल्या रेड बुरुजवर हा लाईट हाऊस आहे.ह्या किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह आहे. या दीपगृहावरून रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे सुंदर दृश्य दिसते.
थिबा पॅलेस :
थिबा राजवाडा हा ब्रह्मदेशाच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी जिल्ह्यातील एक राजवाडा आहे. या राजवाड्यात ब्रह्मदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते.आता या राजवाड्यात प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे.हा राजवाडा बाहेरून जितका सुंदर दिसतो त्याहून अधिक सुंदर हा आतून आहे.
लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान :
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत हे टुमदार कोकणी घर असून जन्मानंतर लोकमान्य टिळकांचे या घरात दहा वर्षे वास्तव्य होते. रत्नागिरीतील टिळकजन्माची ही वास्तू महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याने जतन केली आहे.
- नक्की वाचा: ताम्हिणी घाटाची माहिती
कुंभार्ली महाकाली देवी :
कुंभार्लीच्या महाकाली देवीचे स्थान म्हणजे तेथील लोकांसाठी जणू पंढरपूरच. शिरगाव,कुंभार्ली आणि पोफळी या तीन गावचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.हिरव्यागार झाडीत आणि कौलारूच्या सुंदर वास्तूमध्ये सुकाई, वरदायिनी आणि महाकाली विराजमान झालेले आहेत. देवी महाकाली ही सुकाई आणि वरदायिनी यांची मोठी बहिण आहे.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, कुंभार्ली घाट kumbharli ghat information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about kumbharli ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कुंभार्ली घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या kumbharli ghat maharashtra information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही ratnagiri ghat त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट