वसंत बापट यांची माहिती Vasant Bapat Information in Marathi

vasant bapat information in marathi वसंत बापट यांची माहिती, मराठी साहित्या मध्ये अनेक वेगवेगळ्या रचना बनवणारे कवी होऊन गेले आणि त्यामधील एक म्हणजे वसंत बापट. वसंत बापट हे मराठी कवी होते आणि त्यांनी सेतू, शींगा फुंकले राणी, शततारका, राजसी, साकीना, मानसी आणि प्रवासाची कविता या सारख्या काव्यसंग्रहाचा समावेश हा त्यांच्या नावे आहे. वसंत बापट याचा जन्म २५ जुलै १९२२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील कराड या ठिकाणी झाला आणि यांना विश्वनाथ वामन बापट या नावाने देखील ओळखले जात होते.

वसंत बापट यांच्या वडिलांचे नाव चिंतामण बापट असे होते आणि त्यांना एक भाऊ देखील होता आणि त्याचे नाव अशोक बापट असे होते. वसंत बापट यांच्यावर लहानपणी पासूनच राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या विचारांचे संस्कार झाले होते आणि ते त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रसेवा दलाशी जोडलेले होते.

बापट यांनी १९४८ मध्ये पुणे या शहरामधील एसपी ( SP ) कॉलेजमधून संस्कृत आणि मराठी साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी मराठी आणि संस्कृत साहित्यामध्ये पदवी मिळवली. त्यांनी त्यांच्या शिक्षणानंतर अनेक शैक्षणिक संस्थांच्यामध्ये प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून काम केले आणि सुरुवातीला नॅशनल कॉलेज मध्ये नोकरी केली.

बापट यांनी १९७४ या साली मुंबई विद्यापीठामध्ये गुरु रविंद्रनाथ टागोर यांच्या अध्यासनाचे प्राध्यापक झाले होते. त्यांनी अनेक कविता आणि नृत्यानाटके लिहिली परंतु त्यांची ‘केवळ माझा सह्यकडा’ हि कविता खूप लोकप्रिय झाली होती.

Vasant Bapat Information in Marathi
Vasant Bapat Information in Marathi

वसंत बापट यांची माहिती – Vasant Bapat Information in Marathi

नाववसंत बापट किंवा विश्वनाथ वामन बापट
जन्म२५ जुलै १९२२
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील कराड या गावामध्ये
मृत्यू१७ सप्टेंबर २००२

वसंत बापट यांची सुरुवातीची कामगिरी

  • वसंत बापट यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम नॅशनल कॉलेज आणि रुईया कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले.
  • त्यानंतर १९७४ ते १९८२ च्या या काळामध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये गुरु रविंद्रनाथ टागोर यांच्या अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून देखील काम केले.
  • १९६९ मध्ये वसंत बापट यांनी युगोस्लाव्हिया या ठिकाणी झालेल्या अंतरराष्ट्रीय काव्य संमेलनामध्ये भाग घेतला होता.
  • त्याचबरोबर त्यांनी सलग दहा वर्ष अंतरराष्ट्रीय काव्य संमेलन अकादमीचे नियुक्त सदस्य म्हणून आपली कामगिरी बजावली होती.
  • त्यांचा मुंबई शहरामध्ये होणाऱ्या कवी संमेलनामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असत होता.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन दिल्ली या संस्थेचे वसंत बापट हे अनेक वर्ष सदस्य देखील होते.

वसंत बापट यांची मराठी साहित्यातील कामगिरी

वसंत बापट यांनी अनेक कविता लिहिल्या त्यामधील केवळ माझा सह्यकडा’ हि कविता खूप प्रसिध्द झाली त्याचबरोबर त्यांनी अनेक वेगवेगळे काव्य संग्रह लिहिले जसे कि सेतू, शींगा फुंकले राणी, शततारका, राजसी, साकीना, मानसी, प्रवासाची कविता, अकरावी दिशा, चंगा मंगा, अबडक तबडक, बिजली, फुलराणीच्या कविता, रसिया, शूर मर्दाचा पोवाडा, परीच्या राज्यात असे अनेक काव्य संग्रह लिहिले होते.

अकरावी दिशा आणि साकीना हे त्यांच्या बिजली या काव्यसंग्रहानंतरचे लिहिलेले काव्यसंग्रह होती. चंगा मंगा, अबडक तबडक आणि परीच्या राज्यात ह्या कविता बालकविता आहेत. तसेच त्यांनी बाला नाटके देखील लिहिली होती आणि त्यामधील लोकप्रिय बालनाटक म्हणजे बाल गोविंद हे आहे. त्यांनी १९८३ ते १९८८ या काळामध्ये नियतकालिकाचे संपादक म्हणून देखील काम केले.

वसंत बापट यांनी कविते सोबत अनेक कृतींचा देखील समावेश आहे आणि त्या कृती म्हणजे जिंकुनी मरणाला, विसाजीपंतांची बखर, बारा गावचे पाणी इत्यादी. वसंत बापट हे मराठी साहित्यिक तर होतेच परंतु ते स्वातंत्र्य सैनिक देखील होते आणि त्यांनी भारत छोडो या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांना त्या साठी ३ वर्ष तुरुंगवास सुध्दा भोगला होता.

वसंत बापट यांचे काव्यसंग्रह – vasant bapat kavita

सेतूशततारका
मानसीप्रवासाची कविता
अकरावी दिशाअबडक तबडक
फुलराणीच्या कविताचंगा मंगा
रसियाशूर मर्दाचा पोवाडा
राजसीबिजली
साकीनापरीच्या राज्यात
शींगा फुंकले राणीआम्हा गरगर गिरकी

वसंत बापट यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts

  • वसंत बापट याचा जन्म २५ जुलै १९२२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील कराड या ठिकाणी झाला.
  • बापट यांनी १९४८ मध्ये पुणे या शहरामधील एसपी ( SP ) कॉलेजमधून संस्कृत आणि मराठी साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले
  • वसंत बापट यांनी १९४२ मध्ये चले जावो किंवा भारत छोडो या आंदोलनामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती आणि यामुळे त्यांना ३ वर्ष तुरुंगवास झाला होता आणि हा तुरुंगवास १९४३ ते १९४५ या कालावधी झाला होता.
  • त्यांनी शहरातील अनेक संमेलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.
  • त्यांनी मुंबई मध्ये १९७२ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये ते त्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • शूर मर्दाचा पोवाडा, महाराष्ट्राचा पोवाडा आणि उत्तुंग अमुची उत्तर सीमा इंच इंच लढऊ ह्या त्यांच्या गाजलेल्या कवितांपैकी आहेत.
  • वसंत बापट यांचा बिजली हा पहिला काव्यसंग्रह होता जो त्यांनी १९५२ मध्ये लिहिला होता आणि या काव्यसंग्रहामध्ये राष्ट्रसेवेसंबधित रचना आहे.
  • त्यांनी वाड्मय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांच्यावर महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेर अनेक व्याख्याने दिली.
  • १९६४ मध्ये त्यांनी बाल गोविंद हे नाटक लिहिले होते आणि या नाटकाला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिला होता.

आम्ही दिलेल्या vasant bapat information in marathi  माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वसंत बापट यांची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about vasant bapat in marathi language मध्ये update करू, मित्रांनो हि vasant bapat information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!