वन्यजीव संरक्षण कायदा माहिती Wildlife Protection Act 1972 in Marathi pdf

wildlife protection act 1972 in marathi pdf वन्यजीव संरक्षण कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा ( wildlife protection act ) या विषयी म्हणजेच हा कायदा काय आहे आणि हा कशा प्रकारे काम करतो या बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. वन्यजीव संरक्षण कायदा (wildlife protection act) हा कायदा १९७२ मध्ये देशामध्ये असणाऱ्या वन्यप्राण्यांचे संरक्षण प्रधान करतो म्हणजेच हा कायदा आपल्या देशातील पर्यावरणामध्ये राहणारे प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांचे संरक्षण केले जाते म्हणजेच एकूणच या कायद्यामुळे पर्यावरणा मध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे संरक्षण हे सुनिश्चित झाले आहे.

भारतीय राज्याघातानेच्या कलम ४८ ए मध्ये वन्यजीवांचे रक्षण, जंगलाचे रक्षण आणि एकूणच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काही तरतुदी दिल्या आहेत आणि हे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत आणि जर एखाद्या व्यक्तीने यामधील कोणताही नियम मोडला आणि वन्यजीवांना हानी पोहचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

कलम ५१ ए मध्ये भारतामधील लोकांच्यासाठी काही मुलभूत कर्तव्ये लादली आहेत ती म्हणजे तलाव, नद्या, जंगले, पर्यावरण आणि वन्यजीवांचे रक्षण करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे हे देशामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचे कर्तव्य आहे. वन्यप्राण्यांचे आणि जंगलाचे रक्षण करण्यासाठी यापूर्वी ३ वेळा कायदे तयार करण्यात आणि लागू करण्यात आले होते आणि याचा काळ हा वेगवेगळा होता.

वन्यजीव संरक्षण कायदा (wildlife protection act) हा कायदा जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये लागू आहे आणि ह्या कायदा लागू होण्यापूर्वी भारतामध्ये फक्त ५ राष्ट्रीय उद्याने होती आणि सध्या १०० पेक्षा अधिक उद्याने भारतामध्ये आहेत. चला तर खाली आपण या कायद्याबद्दल आणखीन माहिती घेवूया.

wildlife protection act 1972 in marathi pdf
wildlife protection act 1972 in marathi pdf

वन्यजीव संरक्षण कायदा माहिती – Wildlife Protection Act 1972 in Marathi pdf

कायद्याचे नाववन्यजीव संरक्षण कायदा (wildlife protection act)
कोणी लागू केलाभारत सरकारने
केंव्हा लागू केलाहा कायदा १९७२ मध्ये लागू केला
कायद्याचा उद्देशवन्यजीवांचे आणि जंगलांचे संरक्षण करणे

वन्यजीव संरक्षण कायदा म्हणजे काय – wildlife protection act 1972 in marathi

वन्यजीव संरक्षण कायदा (wildlife protection act) हा कायदा वन्यजीवांचे, जंगलाचे आणि एकूणच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने हा कायदा १९७२ मध्ये हा कायदा लागू केला.

वन्यजीव संरक्षण कायद्याचा इतिहास – history of wildlife protection act 

वन्यप्राण्यांचे आणि जंगलाचे रक्षण करण्यासाठी यापूर्वी ३ वेळा कायदे तयार करण्यात आणि लागू करण्यात आले होते आणि याचा काळ हा वेगवेगळा होता. ब्रिटीश राजवटीमध्ये म्हणजेच भारतामध्ये ब्रिटीशांचे राज्य भारतामध्ये होते त्यावेळी म्हणजेच १८८७ मध्ये वन्य पक्षी संरक्षण कायदा म्हणून लागू केला त्यानंतर १९१२ मध्ये वन्य पक्षी आणि प्राणी संरक्षण कायदा म्हणून दुसरा कायदा लागू झाला आणि मग शेवटी १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा म्हणून लागू करण्यात आला.

वन्यजीव संरक्षण कायद्याची वैशिष्ठ्ये – features of wildlife protection act 

  • वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाल्यानंतर सर्वप्रथम देशामध्ये धोक्यात आलेल्या वन्यजीवांची यादी तयार करण्यात आली आणि मग सरकारने या कायद्यानुसार धोक्यात असणाऱ्या प्राण्यांची शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली.
  • कायद्यातील तरतुदी नुसार अनुसूचित जनावरांची खरेदी विक्री करण्यास मनाई आहे.
  • तसेच या कायद्यामध्ये वन्यप्राणी, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने स्थापन करण्याबद्दलच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
  • वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये वन्यजीव रक्षक, वन्यजीव सल्लागार मंडळे, त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये ठरवण्यासाठी तरतुदी आहेत.
  • वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये काही वन्यजीव प्रजातींची विक्री करणे आणि ताब्यात घेण्यसाठी परवान्याची तरतूद आहे.
  • वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्याची तरतूद देखली आहे.
  • या कायद्यानुसार जंगलामधील झाडे तोडण्यास मनाई केली आहे किंवा प्रतिबंध घातला आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये येणारे प्राणी

वन्यजीव संरक्षण कायदा हा वन्यजीवांचे किंवा वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी लागू केलेला कायदा आहे. ह्या कायद्यानुसार धोक्यात असलेल्या प्राण्यांच्याविषयी विशेष तरतुदी आहेत आणि खाली आपण कोणकोणते प्राणी या कायद्यातर्गत येणारे प्राणी पाहूया.

कायद्यातर्गत स्थापन केलेल्या संस्था

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने अनेक संस्था स्थापन केल्या या मधील काही आपण खाली पाहूया.

  • नॅशनल बोर्ड फॉर वाईल्डलाइफ 

नॅशनल बोर्ड फॉर वाईल्डलाइफ चे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि हि संस्था वन्यजीवा आणि जंगलाच्या संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देते. हि संस्था सर्व वन्यजीव संबधित बाबींच्या पुनारावालोकानासाठी आणि राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यासाठी काम करतात.

  • केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण 

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे अध्यक्ष हे पर्यावरण मंत्री असतात आणि यामध्ये अध्यक्ष आणि इतर सदस्य मिळून एकूण १० जणांचा गट असतो. याचे काम प्राधिकरण प्राणिसंग्रहालयांना मान्यता प्रधान करते आणि देशभरातील प्राणिसंग्रहालयांचे नियमन करणे हे या संस्थेचे कार्य आहे.

  • वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो 

देशातील वन्यजीव गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. या संस्थेचे काम संघटीत वन्यजीव गुन्हेगारी संबधित गुप्तचर माहिती गोळा करणे तसेच वन्यजीव गुन्ह्यांशी संबधित खटल्यांमध्ये राज्य सरकारला मदत करणे.

  • राज्य वन्यजीव मंडळ 

केंद्रशासित किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष असतात आणि हि संस्था वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक धोरणे तयार करतात तसेच संरक्षित क्षेत्रे म्हणून घोषित करावयाच्या क्षेत्रांची निवड आणि व्यवस्थापन करण्याचे काम हि संस्था करते.

  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण 

केंद्रीय पर्यावरण मंत्री हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात आणि राज्याचे पर्यावरण मंत्री हे उपाध्यक्ष असतात. भारतातील ५० हून अधिक वन्यजीव अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्प म्हणून नाव देण्यात आले आहे.

आम्ही दिलेल्या wildlife protection act 1972 in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वन्यजीव संरक्षण कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wildlife protection act 1972 in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि wildlife protection act 1972 pdf in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!