विप्रो कंपनीची माहिती Wipro Company Information in Marathi

wipro company information in marathi विप्रो कंपनीची माहिती, भारतामध्ये अनेक अनेक अश्या प्रसिध्द माहिती तंत्रज्ञान विषयक कंपन्या आहेत जसे कि इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस अश्या अनेक कंपन्या आहेत आणि आज आपण या लेखामध्ये विप्रो कंपनी विषयी माहिती पाहणार आहोत. विप्रो हि कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि जी माहिती तंत्रज्ञान विषयक काम करते आणि या कंपनीची स्थापाना २९ डिसेंबर १९४५ मध्ये मोहम्मद प्रेमजी यांनी केली आणि या कंपनीचे मुख्यालय कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरामध्ये आहे.

विप्रो हि कंपनी विश्लेषण सेवा, मोबिलिटी, कस्टम अॅप्लिकेशन, री इंजिनिअरिंग, संशोधन आणि विकास, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाईन या सारख्या अनेक सेवा पुरवते. या कंपनीला तिच्या विविध सेवांच्यासाठी जागतिक ओळख मिळाली आहे.

आणि जगभरामध्ये ६ खंडामधील ग्राहकांना सेवा पुरवते म्हणजेच हि कंपनी भारत, अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि आशिया पॅसिफिक ग्राहकांना सेवा पुरवते.

विप्रो कंपनीची स्थापना जरी मोहम्मद प्रेमजी यांनी केली असली तरी त्या कंपनीला जगभरामध्ये अझीम प्रेमजी यांनी ओळख दिली म्हणजे यांनीच या कंपनीला मोठे केले. मोहम्मद प्रेमजी यांच्या निधनानंतर कंपनीचा भार हा अझीम प्रेमजी यांच्यावर आला आणि त्यावेळी त्यांचे वय फक्त २१ वर्ष इतके होते.

wipro company information in marathi
wipro company information in marathi

विप्रो कंपनीची माहिती Wipro Company Information in Marathi

कंपनीचे नावविप्रो कंपनी
स्थापना२९ डिसेंबर १९४५
संस्थापकमोहम्मद प्रेमजी
मुख्यालयबेंगलोर (कर्नाटका)

विप्रो कंपनीचे खरे संस्थापक

वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रॉडक्ट लिमिटेड म्हणून या कंपनीची सुरुवात मोहम्मद प्रेमजी यांनी केली होती त्यानंतर त्यांच्या निधनानंतर ह्या कंपनीचा सर्व भार हा अझीम प्रेमजी यांच्यावर पडला आणि मग त्यांनी १९८१ मध्ये आणखीन एक व्यवसाय सुरु केला तो म्हणजे संगणक व्यवसाय आणि त्यामध्ये पूर्ण लक्ष घातले.

सुरुवातीला त्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही वर लक्ष घातले नंतर त्यांनी फक्त सॉफ्टवेअरवर लक्ष घातले आणि ती सध्या भारतातील मोठ्या आयटी (IT) कंपन्यांच्यापैकी एक आहे.

अझीम प्रेमाज यांच्याविषयी माहिती – wipro meaning in marathi

अझीम प्रेमजी यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामधील एक गुजराती मुस्लीम कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद प्रेमजी असे होते. अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून विज्ञान श्खेची पदवी मिळवली.

अझीम प्रमाजी यांच्या पत्नीचे नाव यास्मिन असे आहे आणि त्यांना दोन मुले आहेत ते म्हणजे तारिक प्रेमजी आणि रीशाद प्रेमजी आणि सध्या विप्रो कंपनीचे अध्यक्ष म्हणून रीशाद प्रेमजी हे काम पाहतात.

विप्रो कंपनी काय करते ?

विप्रो कंपनी हि माहिती तंत्रज्ञान (IT), सल्ला आणि व्यवसाय प्रक्रिया या सारख्या सेवा म्हणून काम करते आणि या कंपनीची स्थापना मोहम्मद प्रेमजी यांनी २९ डिसेंबर १९४५ मध्ये झाली.

विप्रोचे चे पूर्ण स्वरूप – WIPRO full form in marathi

विप्रो हि कंपनी माहिती तंत्रज्ञान विषयक काम करते आणि याचे पूर्ण स्वरूप वेस्टर्न इंडिया पाम रीफइंड ऑइल लिमिटेड (western india palm refind oil) असे आहे.

विप्रो कंपनीचा इतिहास – wipro history in marathi

विप्रो हि कंपनी सध्या जगातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडपैकी एक आहे आणि या कंपनीची स्थापना २९ डिसेंबर १९४५ मध्ये महाराष्ट्रातील अमळनेर या ठिकाणी वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रॉडक्ट लिमिटेड म्हणून करण्यात आली होती.

त्यानंतर या कंपनीने ३५ वर्षांनी म्हणजेच १९८१ मध्ये या कंपनीने नवीन आयटी उद्योगामध्ये प्रवेश केला आणि मग त्यानंतर १९८३ मध्ये सॉफ्टवेअर उत्पादने आणि निर्यात उपकंपनी, विप्रो सिस्टीम कंपनीची स्थापना केली आणि १९९० च्या दशकात आयटी (IT) सेवांच्यामध्ये प्रवेश केला.

विप्रो २००० या वर्षामध्ये एनवायएसइ (NYSE) मध्ये सूचीबध्द करण्यात आली. या कंपनीने २००२ मध्ये बिपीओ मध्ये आणि २००८ मध्ये इको एनर्जी व्यवसायात प्रवेश केला.  

विप्रो कंपनी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • विप्रो कंपनी हि भारतातील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि हि एक  सॉफ्टवेअर कंपनी आहे.
  • विप्रो कंपनीची स्थापना १९४५ मध्ये मोहम्मद प्रेमजी यांनी लावली आणि नंतर त्यांच्या निधनानंतर हि कंपनी अझीम प्रेमजी यांनी सांभाळली आणि त्यांनी १९८१ मध्ये संगणक व्यवसायाची स्थापना किंवा सुरुवात केली.
  • पूर्वी हि कंपनी म्हणून वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रॉडक्ट लिमिटेड कंपनी म्हणून उदयास आली होती आणि नंतर १९८१ मध्ये या कंपनीने संगणक व्यवसाय सुरु केला आणि मग त्या कंपनीचे आयटी विश्वामध्ये पदार्पण झाले.
  • सुरुवातीच्या काळामध्ये हि कंपनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वर काम करत होती परंतु नंतर या कंपनीने सॉफ्टवेअर कामावर जास्त लक्ष घातले आणि सध्या ती भारतातील तिसऱ्या क्रमांकावरील आयटी कंपनी आहे.
  • विप्रो कामापानी आजही ग्राहक बाजारपेठेमध्ये एक आघाडीवर आहे म्हणजेच निरमा आणि डाबर या उत्पादनांच्या नंतर संतूर आणि सुर्यफुल हि उत्पादने त्यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये आघाडीची उत्पादने आहेत.
  • हि कंपनी पूर्वी वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रॉडक्ट लिमिटेड म्हणून ओळखली जात होती आणि नंतर या कंपनीचे नाव विप्रो असे ठेवण्यात आले.
  • सिक्स सिग्मा लागू करणारी विप्रो हि कंपनी भारतातील पहिली कंपनी आहे. कंपनीच्या गुणवत्ता आणि प्रक्रीयेबद्दल खूप विशिष्ट आहे. या अंमलबजावणी मुले हि कंपनी जगातील प्रक्रिया आधारित कंपन्यांपैकी एक बनली आहे.

आम्ही दिलेल्या wipro company information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राणी दुर्गावती यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wipro meaning in marathi या Wipro company information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about wipro in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!