टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS Information in Marathi

tcs information in marathi – tcs meaning in marathi टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस माहिती मराठी, भारतामध्ये अश्या अनेक नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि त्यामधील एक प्रसिध्द कंपनी म्हणजे टीसीएस कंपनी आणि आज आपण या लेखामध्ये टीसीएस कंपनी विषयी माहिती घेणार आहोत. टीसीएस चे पूर्ण स्वरूप टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लीमिटेड असे आहे आणि या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये जे. आर. डी. टाटा आणि फक्वीर चांद कोहली यांनी केली. टीसीएस हि कंपनी सर्वात मोठी बहुराष्ट्रीय आयटी सेवा आणि सल्लागार कंपन्यांपैकी एक आहे.

या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये आहे. टीसीएस कंपनी हि टाटा सन्सची एक उपकंपनी आहे आणि हि एक प्रमुख भारतीय होल्डिंग कंपनी आहे आणि या कंपनीचे अनेक मोठ्या कंपन्यांच्यामध्ये शेअर्स आहेत.

टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस लिमिटेड हि कंपनी एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे आणि हि कंपनी गैर सरकारी आहे आणि ती रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई येथे नोंदणीकृत आहेत.

tcs information in marathi
tcs information in marathi

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस – TCS Information in Marathi

टीसीएस कंपनीचा इतिहास – tcs company information in marathi

टीसीएस या कामापानीची स्थापना १९६८ मध्ये झाली आणि या कंपनीला भारतातील पहिली भारतीय आयटी (IT) कंपनी म्हणून मान मिळाला आहे आणि या कंपनीचे ग्राहक हे अनेक बँका होत्या. मग त्यानंतर २००४ पासून टीसीएस हि कंपनी सार्वजनिकपणे काम करणारी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यावेळी पासून टीसीएस हि कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात फायदेशीर कंपनी म्हणून उदयास आली.   

टीसीएस कंपनीमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा – services

  • नेट्वर्किंग, टीसीएस व्यवसाय प्रक्रिया सेवा आणि व्यवस्थापित सेवा या सारख्या आयटी ( IT ) सेवा पुरवते.
  • हेत्याचबरोबर हि कंपनी बँकिंग, भांडवली बाजार, लेखा आणि विमा या सारख्या आर्थिक सेवा देखील पुरवते.
  • फार्मास्यूटीकल्स आणि क्लिनिकल चाचण्या आणि व्यवस्थापन या सारख्या वैद्यकीय सेवा देखील पुरवते.
  • एचआर (HR), वेतनपट, पोर्टफोलीओ व्यवस्थापन आणि किरकोळ व्यवस्थापन या सारख्या व्यवस्थापन मधील सेवा पुरवतात.

टीसीएस कंपनी विषयी काही मनोरंजक तथ्ये – facts

  • टीसीएस या कंपनीमध्ये ओला (Ola), अर्बन क्लॅप (Urban clap), अब्रा (Abra), पेटीएम (PAYtm) आणि झीवामी (Zivami) या सारख्या स्टार्टअप कंपनीमध्ये गुंतवणूक केली जाते.
  • टीसीएस या कंपनीने गेल्या सात वर्षामध्ये सातत्याने सरासरी ३४ टक्के आणि ४० टक्के महिला नोकरदार घेतले आहेत.
  • टीसीएस कंपनीचे ९२.९ टक्के कर्मचारी हे भारतीय आहेत.  
  • टीसीएस कंपनी हि जगातील सर्वात १० मोठ्या कंपन्यांच्यापैकी एक आहे.
  • टीसीएस या कंपनीने छत्राखाली कंपनीच्या उपकंपन्यांना एकत्रीकरण केले आहे आणि कॉम्प्यूटेशनल रिसर्च लॅबोरेटरीज, टीसीएस, ई सर्व्हे आणि रिटेल फुल सर्व्ह आणि रिटेल फुल सर्व्ह सारख्या कंपन्या आता टीसीएसचा एकत्रित भाग आहे.
  • टीसीएस हि कंपनी त्यांच्या स्थापनेच्या काही वर्षातच प्रगती करत होती आणि वाढत होती आणि नंतर त्यांच्या स्थापनेच्या ७ वर्षानंतर टीसीएस ने निर्यात महसूलमध्ये डॉलर एक दशलक्षाचा टप्पा ओलांडला होता.
  • भारतामध्ये अनेक ठिकाणी सध्या टीसीएस कंपनीच्या शाखा आहेत आणि या कंपनीमध्ये अनेक इच्छुक लोक नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. या कंपनीच्या शाखा पुणे, मुंबई, नाशिक, बंगलोर, अहमदाबाद आणि दिल्ली या ठिकाणी आहेत.
  • टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी कंपनीचे मुख्य कार्यालय हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये आहे.
  • टीसीएस कंपनी मध्ये कोणताही विद्यार्थी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि ऑनलाईन प्रकारे मुलाखत देखील देवू शकतो त्याला मुलाखत देण्यासाठी कंपनीच्या ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही

टीसीएस कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही कंपनीमध्ये जॉब मिळवायचा असल्यास त्या व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच जर एखाद्या विद्यार्थ्याला टीसीएस या नामांकित कंपनीमध्ये जॉब करायचा असल्यास त्या व्यक्तीला काही पात्रता निकष पार पडावे लागता ते कोणकोणते आहेत ते पाहूया.

  • जर एखाद्या विद्यार्थ्याला टीसीएस कंपनीमध्ये काम करायचे असल्यास त्या विद्यार्थ्याला ७० ते ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे.
  • तसेच त्या संबधित विद्यार्थ्याने बी.ई (B.E), बी टेक (B.Tech), बीएस्सी (BSc) आणि एमबीए (MBA) या सारखे उच्च पदवीचे शिक्षण घेतले असले तर त्यांना चांगले जॉब मिळू शकतात.
  • पदवीचे शिक्षण पूर्ण होवून त्या संबधित विद्यार्थ्याचा कालावधी २ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • त्या संबधित विद्यार्थ्याचे वय हे कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त २८ पर्यंत असावे.

टीसीएस कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा – how to apply

  • जर तुम्हाला जॉबसाठी टीसीएस कंपनीमध्ये आरजे करायचा असल्यास तुम्हाला सर्वप्रथम टीसीएस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • आता स्क्रीनवर टीसीएस कंपनीची वेबसाईट उघडेल आता त्यावर करिअर पर्याय निवडून त्यामधील तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज करणार आहात तो पर्याय निवडा आणि जॉब साठी आरजे करा.
  • तुम्हाला अर्ज करताना तुमचे वैयक्तिक आणि शैक्षणिक प्रोफाईल त्यांना द्वावे लागत.
  • त्यांनतर तुमची परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते आणि मग तुमची जॉबसाठी निवड केली जाते.

आम्ही दिलेल्या tcs information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tcs meaning in marathi या tcs company information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about TCS in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!