झटपट भाजी रेसिपी Zatpat Bhaji Recipe in Marathi

Zatpat Bhaji Recipe in Marathi झटपट भाजी रेसिपी रोज आपण जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू खातो कारण जेवणामध्ये चपाती सोबत किंवा भाकरी सोबत भाजी असल्याशिवाय आपले जेवण पूर्ण होत नाही आणि भाजीशिवाय ताट देखील रिकामे वाटते म्हणून स्त्रियांना प्रश्न पडतो की रोजच्या जेवणासाठी कोणती भाजी बनवावी त्यासाठी आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी सोप्या आणि कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी रेसिपी पाहणारा आहोत. चला तर मग आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कश्या बनवायच्या ते पाहूयात.

zatpat bhaji recipe in marathi language
zatpat bhaji recipe in marathi language
अनुक्रमणिका hide
1 झटपट भाजी रेसिपी – Zatpat Bhaji Recipe in Marathi

झटपट भाजी रेसिपी – Zatpat Bhaji Recipe in Marathi

झटपट भाजी रेसिपी – bhaji recipe marathi

भारतीय जेवणामध्ये जर भाजी नसेल तर ते जेवण पूर्ण होत नाही कारण भारतीय लोकांच्या रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. चला तर आता आपण भाज्यांच्या काही झटपट रेसिपी पाहूयात.

बटाट्याची पिवळी भाजी रेसिपी – batata bhaji 

बटाट्याची पिवळी भाजी हि हळद आणि हिरवी मिरचीची फोडणी देवून बनवली जाते. आता आपण हिरवी मिरची वापरून बटाट्याची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १२ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे

पिवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients 

बटाट्याची पिवळी भाजी बनवण्यासाठी बटाटे आणि हिरव्या मिरच्या हे महत्वाचे साहित्य आहे तसेच हि भाजी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि हि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते. चला तर आता आपण पिवळी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात.

  • ३ ते ४ बटाटे
  • ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
  • १ चमचा मोहरी.
  • १/२ चमचा जिरे.
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • ७ ते ८ कडीपत्ता पाने.
  • १/४ चमच्या हिंग.
  • हळद ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
  • १ मोठा चमचा तेल.

हिरवी मिरची घालून बटाट्याची भाजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
  • कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
  • मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि कडीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा.
  • त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
  • आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका आणि मिक्स करा.
  • तुमची पुरीसोबत खाण्यासाठी भाजी तयार झाली.

मोकळा झुणका रेसिपी – zunka recipe 

मोकळा झुणका हि रेसिपी खूप लोक आवडीने खातात म्हणून आता आपण मोकळा झुणका कसा बनवायचा ते पाहूयात. हा पदार्थ खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनतो.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५  मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे

मोकळा झुणका बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make zunka recipe 

मोकळा झुणका बनवण्यासाठी बेसन, तेल, लाल मिरची पावडर हे मुख्य साहित्य लागते आणि ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तसेच मोकळा झुणका बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य देखील घरामध्ये उपलब्ध असते.

  • १ वाटी बेसन पीठ.
  • २ ते ३ मोठा चमचा तेल.
  • ८ ते ९ लसून पाकळ्या ( चेचलेल्या ).
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • दिड वाटी पाणी.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर किंवा १ चमचा टेचलेली हिरवी मिरची.
  • १/२ चमचा मोहरी.
  • एक चिमुटभर हिंग.
  • साखर ( चवीनुसार )
  • मीठ ( चवीनुसार ).
  • कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार ).

मोकळा झुणका बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make zunka recipe 

  • सर्वप्रथम एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये २ मोठे चमचे तेल घाला आणि तेल गरम होऊ द्या.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाका आणि ती चांगली तडतडू द्या आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच कडीपत्ता आणि लसून घाला आणि तो चांगला भाजून घ्या.
  • लसून चांगला भाजला की त्यामध्ये हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि आता त्यामध्ये पाणी घाला आणि ते उकळेपर्यंत वाट पहा. ( टीप : हि प्रक्रिया थोडी गडबडीने करा नाही तर लसून किंवा चटणी करपण्याची शक्यता असते )
  • त्या फोडणीच्या पाण्यामध्ये थोडी साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि ते चांगले एकत्र करून फोडणीच्या पाण्याला उकळी येवू द्या.
  • पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये एक हाताने पीठ टाका आणि एका हाताने ते चांगले मिक्स करा. पीठ टाकते वेळी पिठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. पीठ चांगले हलवून ते गुसळून घ्या आणि ते जोपर्यंत हलवा की त्याचा गोळा चांगला एकत्र होणार नाही. पिठाचा गोळा झाला कि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला एक वाफ येवू द्या.
  • चांगली वाफ आली कि गॅस बंद करा आणि तो चमच्याने सुट्टा करून घ्या आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करा आणि भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.

मटकी उसळ रेसिपी 

मटकी हा कडधाण्यापासून बनवला जाणारा एक उसळ म्हणजेच भाजीच प्रकार आहे जो कित्येक लोक आवडीने खातात आणि हा भाजीचा प्रकार बनवण्यसाठी खूप सोपा आहे. मटकी पासून आपण उसळ तसेच मिसळ मध्ये देखील मोड आलेली मटकी वापरली जाते. मटकी हे कडधाण्य खूप पौष्टिक असते.

त्यामुळे काही ठिकाणी भारतीय स्वयंपाक घरांमध्ये मटकीचे उसळ वारंवार बनवले जाते आणि हे लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्यासाठी एक उत्तम भाजी आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतो. चला तर मग पाहूयात मटकी उसळ कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे

मटकी उसळ रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make matki usal recipe

मटकी उसळ बनवताना विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून लगेच उपलब्ध करून घेवू शकतो. मटकी उसळ बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही म्हणजेच हि रेसिपी बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर आता आपण मटकी उसळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी मटकी.
  • १ मध्यम अकराचा कांदा.
  • १ छोटासा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • १ मोठा चमचा खवलेले ओले खोबरे.
  • २ ते ३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • १/४ चमचा हळद.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • मोहरी ( फोडणीसाठी ).
  • हिंग ( फोडणीसाठी ).
  • १ चमचा गुळ.
  • ४ ते ५ कडीपत्ता पाने.
  • ३ ते ४ चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).

मटकी उसळ बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make matki usal recipe 

मटकी उसळ हे बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि झटापट बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मटकीचे उसळ कसे बनवायचे ते पाहूयात.

  • मटकीचे उसळ बनवताना सर्वप्रथम बाजारातून आणलेली मटकी स्वच्छ निवडून घ्या.
  • आता ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ते पाणी काढून टाका आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून त्यावर झाकण लावून ती मटकी ८ ते ९ तास भिजू द्या. मटकी ८ ते ९ तास भिजल्यामुळे ती थोडी मऊ होईल आणि आणि ती चांगली शिजण्यास मदत होईल.
  • मग हि ८ ते ९ तास पाण्यामध्ये भिजवलेली मटकी मधील सर्व पाणी गाळून घ्या आणि मग ते एका सुती कापडामध्ये घालून ते गच्च बांधा आणि मग ते एक भांड्यामध्ये दडपून ठेवून त्यावा झाकण लावा त्यामुळे मटकीला उष्ण हवा लागून मोड चांगले येतील. मटकी सुती कापडामध्ये १० ते ११ तास बांधून ठेवावी.
  • १० ते ११ तासांनी मटकीला मोड चांगले येतात.
  • आता त्यामधील वाटीभर मोड घ्या आणि ते पाण्यामध्ये परत धुवून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये ३ ते ४ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये कडीपत्ता आणि कांदा घाला आणि तो थोडा लालसर रंग येईपर्यंत भाजा.
  • आता त्यामध्ये टोमॅटो घाला आणि तो देखील तेलामध्ये चांगला परतून घ्या आणि तो तेलामध्ये तसाच तेल वेगळे होईपर्यंत चांगले शिजवा.
  • आता यामध्ये हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते मिक्स करा मग लगेच त्यामध्ये मोड आलेली मटकी घाला आणि ती थोडा वेळ भाजा. मटकी धुवून घेतल्यामुळे ती थोडी ओलसर असेल त्यामुळे त्यामध्ये ती शिजवण्यासाठी पाणी घालू नका तर मटकी थोडी भाजल्यानंतर त्यावर झाकण लावून ती मंद आचेवर ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या.
  • आता यामध्ये चवीपुरते मीठ, गुळ, ओले खवलेले खोबरे आणि कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करा आणि २ मिनिटे वाफवून घ्या.
  • मग गॅस बंद करा.
  • तुमचे मटकीचे उसळे तयार झाले.

अख्खा मसूर रेसिपी – akkha masoor recipe 

अख्खा मसूर हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी महाराष्ट्रामध्ये अनेक स्वयंपाक घरामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ढाब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते. अख्खा मसूर हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग पाहूयात अख्खा मसूर कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे

अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make akkha masoor 

अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे घरामध्ये उपलब्ध असते आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. चला तर मग अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी मसूर.
  • १ मोठा कांदा बारीक चिरलेला.
  • ७ ते ८ पाकळ्या लसून ( ठेचलेला ).
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा गरम मसाला.
  • १/२ चमचा मोहरी.
  • दीड मोठे चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).

अख्खा मसूर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make akkha masoor 

  • सर्वप्रथम मसूर चांगले निवडून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि मग ते कोमट पाण्यामध्ये ३ ते ४ तास भिजत घाला आणि मग ते मसूर कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून कुकरला झाकण लावून ते गॅसवर ठेवा आणि त्याला ३ ते ४ शिट्या येवू द्या आणि ३ ते चार शिट्या दिल्यामुळे मसूर चांगले शिजतील. मग गॅस बंद करा आणि कुकर थंड होईपर्यंत वाट पहा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि ती गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि तेलामध्ये मोहरी टाका आणि ती तडतडली कि त्यामध्ये लसून आणि कांदा घाला आणि कांद्याला लालसर रंग येईपर्यंत तो चांगला भाजून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घाला आणि तो मिक्स करून तो तेलामध्ये ४ ते ५ मिनिटे शिजवा.
  • मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा आणि थोडा वेळ भाजा. आता यामध्ये आपण शिजवलेला मसूरा घाला चवीनुसार मीठ घाला आणि थोड्या पाण्याची गरज असेल तर थोडे पाणी घाला आणि ते मिक्स करा ( टीप : अख्खा मसूर आपल्याला जास्त पातळ बनवायचा नसतो तो रबरबित बनवायचा असतो ) त्यामुळे त्यामध्ये पाणी हे आवश्यकतेनुसार घाला.
  • अख्खा मसूर थोडा वेळ शिजू द्या आणि शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि गरमागर सर्व्ह करा.

बटाट्याची लाल भाजी कशी बनवावी – how to make potato sabji recipe

लाल बटाट्याची भाजी हि मसाल्याची लाल चटणी वापरून बनवलेली असते आणि हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. आता आपण लाल मिरची पावडर वापरून मसालेदार आणि चमचमीत भाजी कशी बनवायची ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे

बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

लाल बटाट्याची भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते घरामध्ये आधीपासून उपलब्ध असू शकते आणि ते जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारामधून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर मग लाल बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ ते ४ बटाटे
  • १ चमचा मोहरी.
  • १/२ चमचा जिरे.
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • १/४ चमच्या हिंग.
  • हळद ( आवश्यकतेनुसार ).
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा गरम मसाला.
  • अर्धी छोटी वाटी वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • १ मोठा चमचा तेल.

बटाट्याची भाजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल.
  • कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
  • मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, आलं लसून पेस्ट, हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घालून ते चांगले एकत्र करा.
  • आता त्यामध्ये उकडलेले आणि चिरलेले आणि थोडेसे पाणी घाला आणि ते मिक्स करा.
  • आता त्यामध्ये वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • आणि या भाजीच्या भांड्यावर झाकण ठेवून भाजी ५ ते ६ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा आणि मग गॅस बंद करा.
  • चपाती, रोटी किंवा पुरी सोबत खाण्यासाठी बटाट्याची लाल भाजी तयार झाली.
  • सर्व्ह करताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.

शेव भाजी रेसिपी – shev bhaji recipe 

शेव भाजी हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जाणारा पदार्थ आहे आणि तेथील लोक हा पदार्थ खूप प्रेमाने बनवतात आणि आवडीने खातात. चला तर आता आपण शेव भाजी कशी बनवायची ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे

शेव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make shev bhaji 

शेव भाजी बनवण्यासाठी शेव, मसाले आणि तिखट – मीठ हे महत्वाचे घटक आहेत तसेच भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते किंवा जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर भाजी बनवण्यासाठी जी शेव लागते ती आपण जर तुम्हाला वेळ असेल तर घरामध्ये देखील बनवू शकतो किंवा बाजारातून विकत अनु शकतो. चाल तर मग पाहूयात शेव भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • १ वाटी मोठी किंवा जाड शेव.
  • १ उभा चिरलेला कांदा.
  • १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचे आले लसून पेस्ट.
  • १ छोटी वाटी खोबरे ( खिसलेले ).
  • २ ते ३ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा धने पावडर.
  • कोथिंबीर.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
खडा मसाला 
  • १ दालचिन तुकडा.
  • १ बदाम फुल.
  • २ वेलदोडे.
  • १ मसाला वेलदोडे.
  • २ ते ३ लवंग.
  • ३ काळीमिरी.

शेव भाजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make shev bhaji recipe 

  • आता आपण वर दिलेल्या सर्व साहित्यापासून शेव भाजी कशी बनवायची याबद्दल पाहूयात.
  • सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घाला आणि मग त्या तेलामध्ये थोडा कांदा आणि टोमॅटो घाला आणि ते थोडा वेळ चांगले भाजून घ्या. मग त्यामध्ये खवलेले खोबरे घाला आणि ते देखील या मिश्रणामध्ये थोडे भाजा.
  • हे सर्व मिश्रण चांगले भाजले कि गॅस बंद करा आणि गार होईपर्यंत वाट पहा.
  • तोपर्यंत एक छोटी कोरडी कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये दालचिन, बदाम फुल, वेलदोडे, काळीमिरी, लवंग आणि मसाला वेलदोडे घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
  • आणि मग ते मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्या मसाल्यांची एकदम बारीक पावडर करून घ्या आणि तो मसाला एका वाटीमध्ये काढून ठेवा.
  • आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि खोबऱ्याचे मिश्रण काढा आणि त्याची मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्या.
  • आता आपण जाऊयात मुख्य रेसिपीकडे.
  • आता पुन्हा कढई गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि ती गरम झाली कि त्यामध्ये तेल ( साधारण अर्धी वाटी ) घाला.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये शिल्लक राहिलेला कांदा घाला आणि थोडा वेळ भाजा. मग त्यामध्ये आले लसून पेस्ट घालून ती तेला मध्ये चांगली मिक्स करा आणि कांद्याला लालसर रंग येई पर्यंत भाजा.
  • आता यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून ते चांगले भाजा आणि मग त्यामध्ये धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि आपण तयार करून ठेवलेला मसाला घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा.
  • मग त्यामध्ये लगेच थोडे पाणी ( आवश्यकतेनुसार ) आणि मीठ ( चवीनुसार ) घालून चांगल्र ढवळा आणि त्याला एक चांगली उकळी आणा आणि गॅस बंद करा.
  • आता त्यामध्ये शेव घाला आणि सर्व्ह करा.

भिंडी मसाला रेसिपी – bhindi masala recipe

भिंडी मसाला रेसिपी हि एक भारतीय डिश आहे आणि हि डिश आपण गडबडीच्या वेळी बनवून चपाती किंवा रोटी सोबत खावू शकतो. भिंडी मसाला हि रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये अगदी उत्तम बनू शकते. अनेक

तयारीसाठी लागणारा वेळ५ ते ६ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते २६ मिनिटे
पाककलाभारतीय

भिंडी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make bhindi masala recipe 

आता आपण भिंडी मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २५० ग्रॅम ताजी भेंडी.
  • २ मोठे आणि लाल ताजे टोमॅटो ( उभे चिरलेले ).
  • १ मोठा कांदा ( उभा चिरलेला ).
  • ३ चमचे आले लसून पेस्ट.
  • २ ते ३ पाने तमाल पत्री पाने.
  • १ बदाम फुल.
  • १ तुकडा दालचिन.
  • १ वाटी फेटलेले दही.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १/४ चमचा हळद.
  • १ चमचा गरम मसाला.
  • २ मोठे चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( भेंडी तळण्यासाठी ).

भिंडी मसाला बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make bhindi masala 

  • सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि मग त्याच्या दोन्ही बाजू काढून टाका आणि भेंडीचे चार भाग करा ( आपण भरलेल्या वांगे चिरतो तशी भेंडी उभी चिरून त्याच्या चार भाग करा ) आणि ते बाजूला ठेवा.
  • आता कढई मध्ये भेंडी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल मध्यम आचेवर गरम करा.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये चिरलेल्या भेंड्या तेलामध्ये टाकून त्या कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या भाजून घ्या अश्या प्रकारे सर्व भेंड्या तळून घ्या आणि ह्या भेंड्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • आता त्या कढईतील तेल हळूवार दुसऱ्या भांड्यामध्ये काढून कढई परत गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये २ चमचे तेल घाला आणि मग त्यामध्ये बदाम फुल, दालचिन, तमाल पत्रीची पाने, कांदा आणि टोमॅटो घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून ते चांगले भाजून घ्या आणि भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि ते मिश्रण थोडा वेळ गार होऊ द्या.
  • आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्याची बारीक पेस्ट करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण थोडे पातळ करा.
  • त्यानंतर गॅसवर ग्रेवी पॅन गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये २ मोठे चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ते काही सेकंद भाजा आणि आणि मग त्यामध्ये आपण बनलेली कांदा टोमॅटो पेस्ट घाला आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालून मिक्स करून त्यामधील पाणी आटेपर्यंत भाजून घ्या मग त्यामध्ये दही आणि मीठ घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव करा आणि मग त्यामध्ये शेवटी आपण तळून ठेवलेल्या भेंड्या घाला आणि ते मिक्स करा.
  • आणि यावर झाकण लावून ते ५ ते १० मिनिटे वाफवून घ्या आणि गॅस बंद करा आणि आपण बनवलेला भिंडी मसाला सर्विंग बाऊल मध्ये काढा आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाका आणि सर्व्ह करा.

आम्ही दिलेल्या Zatpat Bhaji Recipe in Marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झटपट भाजी रेसिपी माहिती मराठी bhaji recipe marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या zatpat recipe for dinner in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maharashtrian recipes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये veg recipes of india in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!