कायदा माहिती Act Meaning in Marathi

Act Meaning in Marathi कायदा माहिती आज आपण या लेखामध्ये कायदा या विषयावर माहिती घेणार आहोत. या लेखामध्ये कायदा म्हणजेच काय वेगवेगळे कायदे कोणते आहेत आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती घेणार आहोत. कायदा हे एक असे नियम आहेत हे समाज्यामधील अन्याया विरुध्द लढा देतात किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला झाला असेल तर या अनेक प्रकारच्या कायद्यांचा वापर करून न्याय मिळवता येतो किंवा अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देता येते. त्याच बरोबर कोणी कोणाची फसवणूक करू नये म्हणून देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत.

कायदे हे वेगवेगळे प्रकारचे आहेत आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्यासाठी किंवा कोणी कोणाची फसवणूक करणार नाही किंवा तसेच अनेक वेगवेगळ्या गोष्टी ह्या नियमांच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी कायदे तयार केले जातात. यामध्ये कोणाच्याही मालकी हक्काला, मुलभूत अधिकारांच्यावर, उत्पन्नावर इजा होऊ नये तसेच सर्वांना अधिकार, हक्क, वापर आणि संरक्षण मिळावे यासाठी कोणीही कायद्याचा वापर करू शकतो आणि आल्यालासाठी संरक्षण, अधिकार, हक्क लागू करून शकतो परंतु तो व्यक्ती त्या संरक्षनासाठी अधिकारासाठी आणि हक्कासाठी पात्र असला पाहिजे.

शासनाने अनेक गोष्टी आणि वादविवाद कायद्याच्या चौकटीमध्ये ठेवण्यासाठी अनेक कायदे अंमलात आणले आणि लागू केले जसे कि कौटुंबिक हिंसाचार कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अॅट्रॉसिटी कायदा, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा, हिंदू विवाह कायदा, माहिती अधिकार कायदा आणि शिक्षण अधिकार कायदा अशा प्रकारचे अनेक कायदे आहेत आणि आपण या जेवढे कायदे सांगू तितके कमीच पडतील. चला तर आता आपण वेगवेगळ्या काही कायद्यांच्या विषयी खाली थोडक्यात माहिती घेवूया.

act meaning in marathi
act meaning in marathi

कायदा माहिती – Act Meaning in Marathi

कायदा म्हणजे काय ?

कायदा हे एक असे नियम आहेत हे सामाज्यामधील अन्याया विरुध्द लढा देतात किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला झाला असेल तर या अनेक प्रकारच्या कायद्यांचा वापर करून न्याय मिळवता येतो किंवा अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देता येते. यामध्ये कोणाच्याही मालकी हक्काला, मुलभूत अधिकारांच्यावर, उत्पन्नावर इजा होऊ नये तसेच सर्वांना अधिकार, हक्क, वापर आणि संरक्षण मिळावे यासाठी कोणीही कायद्याचा वापर करू शकतो आणि आपल्यासाठी संरक्षण, अधिकार, हक्क लागू करून शकतो परंतु तो व्यक्ती त्या संरक्षनासाठी अधिकारासाठी आणि हक्कासाठी पात्र असला पाहिजे.

वेगवेगळे कायदे – acts 

कौटुंबिक हिंसाचार कायदा – domestic violence act 

कौटुंबिक हिंसाचार कायदा या कायद्यामुळे महिलांना खूप संरक्षण मिळाले आहे म्हणजेच या कायद्यामुळे पिडीत व्यक्ती शारीरिक, लैंगिक, शाब्दिक आणि भावनिक अत्याचार किंवा भावनिक अत्याचार या ओअसून आपले संरक्षण मिळवू शकते कारण हा कायदा पहिल्यांदाच महिलांच्यासाठी हिंसामुक्त घराचा हक्क मान्य करतो. तसेच या कायद्यामुळे वैवाहिक घरामध्ये राहणाऱ्या किंवा सामायिक कुटुंबामध्ये राहणाऱ्या अधिकार हा भारतातील महिलांच्या हक्कामध्ये एक मोठी प्रगती म्हणून या कायद्याकडे पहिले जाते.

वैवाहिक घरामध्ये राहणाऱ्या किंवा सामायिक कुटुंबामध्ये राहणाऱ्या महिलेवर अन्यान केला किंवा तिला त्रास दिला किंवा तिला घरातून बाहेर काढले तर ती महिला या कायद्याचा वापर तिला न्याय मिळवून घेण्यासाठी ती या कायद्याचा वापर करू शकते किंवा तत्काळ मदत घेवू शकते. या कायद्यासाठी सर्व स्त्रिया ज्या बहिणी, विधवा, माता, अविवाहित महिला आहेत किंवा अत्याचार करणार्‍या व्यक्तीसोबत इतर कोणत्याही नातेसंबंधात राहात आहेत त्यांना या कायद्यानुसार कायदेशीर संरक्षण मिळण्यास पात्र आहे. हा कायदा सध्या म्हणजेच २३ ऑक्टोबर २००६ मध्ये सुरु करण्यात आला होता किंवा देशभरामध्ये अंमलात आणला होता.

वैशिष्ठ्ये 

 • भगिनी, विधवा, माता, अविवाहित महिला किंवा अत्याचार करणाऱ्यांसोबत राहणाऱ्या महिलांनाही प्रस्तावित कायद्यानुसार संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.
 • भगिनी, विधवा, माता, अविवाहित महिला किंवा अत्याचार करणाऱ्यांसोबत राहणाऱ्या महिलांनाही प्रस्तावित कायद्यानुसार संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.
 • पीडित महिलेला संरक्षण आदेश, निवास आदेश, आर्थिक मदत, ताब्यात घेण्याचे आदेश आणि नुकसान भरपाई आदेश यांचा समावेश या कायद्यामध्ये आहे.
 • हा कायदा पीडित महिलेला सामायिक कुटुंबात राहण्याचा अधिकार प्रदान करते.

हिंदू विवाह कायदा – hindu marriage act 

हिंदू विवाह कायदा हा हिंदू कोड बिल मार्फत इ.स १९५५ मध्ये अंमलात आणला गेला. हिंदू विवाह कायदा सुरु करण्याचा उद्देश हा समाजातील लग्न व्यवस्था, हिंदू लोकांच्या वैयक्तिक आयुष्य, अवैद्याता अटी आणि कायदेशीर वैधता या सारख्या विवाहाबद्दलच्या अनेक गोष्टींना नियमांच्या चौकटीत बसवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता.

वैशिष्ठ्ये 

 • समाजातील लग्न व्यवस्था, हिंदू लोकांच्या वैयक्तिक आयुष्य, अवैद्याता अटी आणि कायदेशीर वैधता या सारख्या विवाहाबद्दलच्या अनेक गोष्टींना नियम घालणे.
 • तसेच या कायद्यामध्ये विवाह बद्दलच्या अनेक तरतुदी आहेत.

लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा – Pocso 

मुलांचे लैंगिक शोषण आणि लैंगिक शोषण या वाईट गोष्टींना प्रभावीपणे संबोधित करण्याच्या हेतूने, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO)  २०१२ मध्ये संसदेने मंजूर केला. ४ नोव्हेंबर २०१२ पासून अंमलात आला. हा कायदा लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी यांसारख्या अनेक लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने लागू केलेला सर्वसमावेशक कायदा आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर बालकांच्या हिताचे रक्षण करून अहवाल देण्यासाठी बाल-अनुकूल यंत्रणा सुरू केली आहे.

जेव्हा १८ वर्षाखालील मुलांवरील लैंगिक अत्याचाराची किमान शिक्षा १० वरून २० वर्षांपर्यंत वाढवली गेली आणि जन्मठेप किंवा मृत्यूपर्यंत वाढवली जाऊ शकते.

वैशिष्ठ्ये 

 • लहान मुलाविरुद्ध लैंगिक गुन्हा केल्याचा संशय असलेल्या किंवा माहिती असलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्थानिक पोलिस किंवा विशेष जुवेनाईल पोलिस युनिटकडे तक्रार करणे आवश्यक आहे. हा कायदा केवळ लैंगिक शोषण करणार्‍यालाच शिक्षा देत नाही तर ज्यांनी गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यास अयशस्वी ठरला आहे त्यांना एकतर तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावतो.
 • कायद्याच्या कलम ४५ अन्वये नियम बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे.
 • पिडीत व्यक्ती कधीही गुन्ह्याची तक्रार नोंदवू शकते, शोषण झाल्यानंतर अनेक वर्षांनी देखील.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ – Disaster management act 2005 

ज्यावेळी २००४ मध्ये देशामध्ये सुनामीचे सावट आले होते त्यावेळी त्या सुनामिमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले होते तसेच देशातील अनेक भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी याचा विचार करून २६ डिसेंबर २००५ या दिवशी संपूर्ण देश्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हा कायदा लागू केला. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश हा आपत्तीचे व्यवस्थापन करणे, शमन धोरणे तयार करणे तसेच लोकांची क्षमता वाढवणे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी लोकांना तयार केले जाते.

वैशिष्ठ्ये 

 • कोणत्याही ठिकाणच्या आपत्ती परिस्थितीला लगेच प्रतिसाद देणे.
 • तसेच कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्याची तयारीची भावना लोकांच्या मनामध्ये वाढवणे तसेच लोकांची क्षमता वाढवणे.
 • तसेच कोणत्याही आपत्तीचा धोखा, तीव्रता आणि परिणाम कमी होण्यासाठी काही उपाय योजना शोधणे आणि त्या लागू करणे.

आम्ही दिलेल्या act meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या act in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!