अलिबाग माहिती मराठी Alibaug Information in Marathi

Alibag information in marathi अलिबाग माहिती मराठी, भारतामध्ये अनेक ठिकाणी तसेच वेगेवेगळ्या राज्यामध्ये सुंदर अशी लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळे आपल्या पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील अनेक लोकप्रिय आणि सुंदर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि यामधील अलिबाग हे देखील एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. ज्या ठिकाणी आपल्याला अनेक वेगवेगळी ठिकाणे पाहायला मिळतात. जसे कि किल्ले, समुद्र, बीच, धबधबे अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात आणि म्हणून आज आपण या लेखामध्ये अलिबाग विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

अलिबाग हे एक छोटेसे शहर असले तरी हे ठिकाण प्रेक्षणीय स्थळांच्यासाठी खूप लोकप्रिय आहे आणि म्हणून मी या लेखाची सुरुवार प्रेक्षणीय स्थळ या विषयावरून केली. अलिबाग हे छोटेसे शहर महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कोकण भागामध्ये वसलेले आहे आणि हे मुंबई या शहराजवळून जवळच्या अंतरावर आहे.

जरी ह्या शहराला एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून जरी ओळखले जात असले तरी या शहराला ऐतिहासिक महत्व देखील लाभले आहे म्हणजेच या शहराशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देखील जोडले जाते, कारण अलिबाग किनाऱ्याच्या नैऋत्येस १ किलो मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा हा किल्ला समुद्रामध्ये बांधला आहे.

आणि हा किल्ला बांधण्याचा त्यांचा मुख्य हेतू म्हणजे मुंबई मध्ये असणाऱ्या इंग्रजांच्यावर आपली वाच्की किंवा भीती बसवणे आणि सिद्धीसोबत लढण्यासाठी आणि त्याच्या हालचालीवर लक्ष देण्यासाठी हा किल्ला बांधला होता.

alibaug information in marathi
alibaug information in marathi

अलिबाग माहिती मराठी – Alibaug Information in Marathi

ठिकाणाचे नावअलिबाग
स्थानमहाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे छोटेसे शहर आहे.
लोकसंख्या२२ लाख पेक्षा जास्त
ओळखरायगड जिल्ह्याचे मुख्यालय, सुंदर आणि प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळ

मुंबई, पुणे आणि अलिबाग

मुंबई आणि पुणे या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना जर एक दिवसीय सहलीला जायचे असल्यास अलिबाग हे शहर त्यांच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. कारण मुंबई आणि पुणे या शहरातून अलिबागला एक दिवसामध्ये पोहचू शकतात कारण मुंबई या शहरापासून अलिबाग हे शहर ११० किलो मीटर आहे.

आणि पुणे या शहरापासून अलिबाग हे शहर १४४ किलो मीटर आहे त्यामुळे मुंबईकर आणि पुणेकर अलिबागला २ ते ३ तासामध्ये पोहचू शकतात. मुंबई शहरातून गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाहून बोटीने जर अलिबागला गेले तर फक्त १ तासामध्ये समुद्रामार्गे अलिबागला जावू शकतात.

अलिबाग शहराविषयी महत्वाची माहिती – full information about alibaug in marathi

अलिबाग हे एक छोटेसे शहर असून हे महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यामध्ये वसलेले आहे आणि या शहराला एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते तसेच अनेकजण या शहराला महाराष्ट्रातील गोवा म्हणून देखील ओळखतात. अलिबाग या शहरामध्ये २००१ मध्ये २२०७९२९ इतकी लोकसंख्या होती आणि ती पुढे वाढली.

या शहराच्या वायव्येस मुंबई बंदर, उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे शहर आणि दक्षिणेस रत्नागिरी शहर आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. अलिबाग हे कोंकण प्रदेशातील रायगड जिल्ह्यातील एक समुद्र किनारपट्टीचे शहर आहे आणि या शहराला रायगड जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून ओळखले जाते.

अलिबाग शहराचा इतिहास – alibaug history in marathi

अलिबाग या शहराचे नाव पडण्याचा इतिहास असा आहे कि एक आली नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी अनेक आंब्याची आणि नारळाची झाडे लावली आणि त्यावर त्याचे नाव आली आणि झाडांची बाग यावरून या शहराचे नाव आलिबाग असे पडले.

त्याचबरोबर अलिबाग या ठिकाणी कान्होजी आंग्रे यांनी देखील राज्य केले होते त्यावेळी त्यांनी अलिबाग रुपैया नावाच्या चांदीच्या नाण्यांच्या रुपात स्वताचे चलन जारी केले होते. त्याचबरोबर अलिबागमध्ये १९०४ मध्ये स्थापन झालेली एक चुंबकीय वेधशाळा देखील पहायला मिळते जी ऐतिहासिक आहे.

अलिबाग शहर हे कश्यासाठी ओळखले जाते ?

अरबी समुद्राने वेढलेले रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे शहर समुद्रकिनारी वसलेले आहे आणि हे शहर आकर्षक सुमुद्र किनारे, प्राचीन किल्ले आणि रोमांचकारी जलक्रीडा या साठी ओळखले जाते आणि हे एक पप्रेक्षणीय ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे.


अलिबाग पर्यटन स्थळे – tourist places

अलिबाग हे शहर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे आणि या ठिकाणी मुंबई – पुणे शहरातील लोक तर एक दिवसीय सहलीसाठी येतातच परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून लोक पर्यटनासाठी येतात. खाली आपण काही अलिबाग मधील पर्यटन स्थळे पाहणार आहोत.

अलिबाग मधील पर्यटन स्थळे

अलिबाग बीच – alibaug beaches name in marathi

अलिबाग बीच हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे म्हणजेच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते आणि जर तुम्हाला देखील बीचची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. या बीच वरून तुम्ही कुलाबा किल्ल्याचा देखील आनंद घेवू शकता आणि या ठिकाणी तुम्ही सूर्यास्ताची मनमोहक दृश्ये देखील पाहू शकता.

किहीम बीच

किहीम बीच हा आणखीन एक प्रसिध्द बीच आहे आणि तुम्हाला शांतता आणि मनमोहक निसर्गाचा आनंद घ्यायचा असल्यास तुम्ही किहीम बीचला भेट देवू शकता. जर कोणी नैसर्गिक फोटोग्राफीच्या शोधात असाल तर किहीम बीच हे सुंदर ठिकाण आहे.

कनकेश्वर जंगल

कनकेश्वर जंगल हे अलिबाग मधील प्रमुख आणि प्रसिध्द पर्यटन स्थळांच्यापैकी एक आहे आणि या पर्यटन स्थळाविषयी अनेकांना माहिती आहे. हे जंगल दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्याच्या संग्रहासह घनदाट आहे.

मांडवा बीच

अलिबाग मधील आणखीन एक प्रसिद्ध बीच म्हणजे मांडवा बीच आणि या बीचवर तुम्ही कुटुंबासोबत येवू शकता आणि समुद्र किनारी असलेल्या अनेक सुंदर पक्ष्यांचा आनंद घेवू शकता. ज्यांना पक्ष्यांची आवड आहे किंव बर्ड फोटोग्राफीच्या शोधात आहेत अश्या लोकांच्यासाठी हा बीच एक उत्तम बीच मानला जातो.

ब्रह्मा कुंड

ब्रह्मा कुंड हा अलिबाग मधील एक ऐतिहासिक कुंड आणि हा १६१२ मध्ये बांधला आहे असे इतिहासकार सांगतात. हे ठिकाण देखील अलिबाग मधील सर्वात लोकप्रिय ठीकानापैकी एक आहे.

अलिबाग जवळील किल्ले – full information about the fort of alibaug in marathi

कुलाबा किल्ला – kulaba fort

अलिबाग किनाऱ्याच्या नैऋत्येस १ किलो मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा हा किल्ला १६८० मध्ये समुद्रामध्ये बांधला आहे आणि म्हणून या शहराला ऐतिहासिक शहर म्हणून वारसा मिळाला आहे.

रायगड किल्ला – raigad fort

रायगड हा किल्ला महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यातील महाड येथे दख्खनच्या डोंगरावर विस्तारलेला आहे आणि हा किल्ला अलिबाग शहरापासून ४६ ते ४७ किलो मीटर अंतरावर आहे जो पर्यटक पाहू शकतात. या किल्ल्याची निर्मिती इ. स १०३० मध्ये चंद्रराव मोरे यांने केली होती.

त्यानंतर हा किल्ला यशवंतराव मोरे याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर अनेक महत्वाची बांधकामे करून घेतली जी आपण जास्तीत जास्त किल्ल्यावर जी बांधकाम पाहायला मिळतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत

मुरुड जंजिरा किल्ला – murud janjira fort

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले ५०० वर्षापासून अरबी समुद्राच्या लाठा झेलत असलेला एक आकर्षक आणि अजेय असा किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला.

हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड ताल्याक्यामधील राजपुरी गावाजवळून ३ ते ४ किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे आणि हा आली किल्ला अलिबाग शहरापासून देखील खूप जवळ आहे त्यामुळे अलिबाग या शहरामध्ये गेल्यानंतर तुम्ही जंजिरा किल्याला देखील भेट देऊ शकता.

आम्ही दिलेल्या alibaug information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अलिबाग माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या alibaug beach information in marathi या full information about the fort of alibaug in marathi article मध्ये alibaug wikipedia in marathi update करू, मित्रांनो हि full information about alibaug in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये alibaug beaches name in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!