अशोक झाडाची माहिती Ashoka Tree Information in Marathi

Ashoka Tree Information in Marathi अशोका झाडांची माहिती प्राचीन काळापासून प्रसिद्ध असणारा अशोका या वृक्षामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. पूर्व आणि दक्षिण भारतात अशोकाचे झाड आढळून येते. अशोकाची झाडे गर्द, पानझडी, सदाहरित जंगलात आढळतात. तसेच सीतेच्या सानिध्याने पुनीत झालेला म्हणून हिंदू धर्मामध्ये या वृक्षास पवित्र मानले जाते. याचा संबंध कामदेवाशी सुद्धा येतो. एका आख्यायिकेनुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म याच वृक्षाखाली झाला असे मानले जाते. “आमुलतो विद्रुमरागताम्रं सपल्लवं पुष्यचयं दधानः” (सुरवातीपासून पोवळ्यासारखा लाल रंग असणारे फुलांचे झुपके असणारा भरपूर पानांचा वृक्ष.) असे अशोकाचे वर्णन कालिदासांनी ऋतूसंहार या काव्यातील पंक्तीत केले आहे.

 ashoka tree information in marathi

ashoka tree information in marathi

अशोक झाडाची माहिती मराठी – Ashoka Tree Information in Marathi

नावअशोका – ashoka tree in marathi
वैज्ञानिक नावSaraca asoca plant, saraca indica, jonesia asoca
इतर नावेजासुन्दी, सीता अशोक
उंचीसाधारणतः ६ ते १० मीटर

अशोकाच्या झाडाचे वर्णन

अशोक हि एक मुळची भारतात उगवणारी सदाहरित म्हणून गणली जाणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. अशोक हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा बारा महिने सरळ उंच वाढणारा हिरवागार असणारा आकाराने डेरेदार असा वृक्ष आहे. याचे खोड धुरकट तपकिरी रंगाचे असते. याचे साल बाहेरून खडबडीत आणि आतून लाल असते. याची पाने जाडसर आणि ७ ते २५ सेंटीमीटर लांब असतात. पर्णदलाच्या चार ते सहा जोड्या असतात.

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात या झाडाला गर्द नारिंगी आणि लाल रंगाची झुपक्याझुपक्याच्या फुलांचा बहार येतो. या फुलांना खूप सुंदर सुवास असतो. याची फळे १५ ते २५ सेंटीमीटर लांब व सपाट असतात. या प्रत्येक फळात ४ ते ८ बिया असतात. याच्या बिया रुजायला वेळ लागतो. अनेक बिया पेरल्यानंतर त्यातली एखादी बी रुजते. ४-५ वर्षांनी याचा वृक्ष तयार होतो.

भारतामध्ये अशोकाला वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. यामध्ये साधा अशोक, पानांचा अशोक, फुलांचा अशोक आणि लाल नारिंगी फुलांचा अशोक. असेच फुले देणाऱ्या अशोकाला वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते ते म्हणजे सीतेचा अशोक, सुवर्नाशोक, रक्तपल्लव, रक्ताशोक, ताम्रपल्लव.

रस्त्याच्या दुतर्फा, उद्यानात सीता अशोकाची झाडे शोभेसाठी लावली जातात. व्यापारी तत्वावरदेखील या वृक्षाची लागवड केली जाते. अशोक या नावाने लाल अशोक आणि हिरवा अशोक या दोन भिन्न वनस्पती ओळखल्या जातात.

लाल अशोक

fabaci कुलातील ‘सीतेचा अशोक’ (Saraca asoca) म्हणून सामान्यतः ओळखला जाणारा हा सुंदर सदापर्णी वृक्ष श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, बांग्लादेश, भारत इ. प्रदेशांतील सदापर्णी जंगलात तुरळकपणे आढळतो. तसेच शोभेसाठी तो अनेक उद्यानामध्ये, कार्यालयांसमोर लावला जातो. याला लाल रंगाची फुले येतात. हा वृक्ष ९ मीटर पर्यंत उंच वाढत असून त्याचा विस्तार अनेक शाखात झालेला असतो. ताप, त्वचेचा दाह, पुटकुळ्या इत्यादीवर या वृक्षाची साल उगाळून लावतात.

हिरवा अशोक

अॅनोनेसी कुलातील हिरवा अशोक ज्याचे शास्त्रीय नाव polyalthia longifolia आहे. हा वृक्ष मुळचा भारताच्या दक्षिण भागातील व श्रीलंकेतील आहे. भारतात सर्वत्र हा वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा व बागेत शोभेकरिता लावला जातो. फेब्रुवारी ते मे महिन्यात या वृक्षाला हिरव्या-पिवळ्या रंगाची फुले गुच्छामध्ये येतात. याची उंची साधारणतः ९ मीटर उंचीपर्यंत वाढतो. आयुर्वेदात सांगितले आहे कि याची साल कठीण, शीतल व कडू असून ताप, त्वचेचे रोग, मधुमेह इत्यादींवर गुणकारी ठरते.

अशोकाच्या झाडाची लागवड कशी करावी?

  • अशोकाच्या झाडे लावण्यासाठी लागणारी जमीन हि पाण्याचा निचरा होणारी, मध्यम काळी, हलकी अशी असावी.खडकाळ जमिनीत किवा डोंगरउतारावर हा वृक्ष वाढत नाही.
  • अशोकाच्या झाडाच्या बिया जमिनीत रुजवून किंवा कलमापासून रोपे तयार केली जातात. याची रोपे ४-६ महिन्यानंतर तयार होतात. नंतर हि रोपे जिथे लावायची असतील त्या जमिनीत ५*५ मीटर अंतरावर ३०*३०*४५ सेंमी चे खड्डे करावेत. त्यामध्ये पोयटा माती आणि शेणखत मिसळून भरावे.
  • रोप लागवड केल्यानंतर त्याभोवती आळे करावे. या वनस्पतीचे पहिले ३ वर्षे तणांपासून आणि उष्ण हवेपासून संरक्षण करणे गरजेचे असते. या झाडाची वाढ हि हळूवार होते.  
  • साल काढणी मध्ये अशोकाचे झाड साधारणपणे १० ते १२ वर्षांनी साल काढण्यास तयार होते. साल काढताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. झाडाच्या वयानुसार अंदाजे एका झाडाचे १०-१२ किलो साल मिळते.
  • नक्की वाचा: वडाच्या झाडाची माहिती 

अशोक झाडाचे उपयोग

  • अशोक हा मधुर, सुगंधी, रक्तदोषनाशक वनस्पती आहे. अशोकाच्या झाडाच्या वाळलेल्या सालीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.
  • अशोकाचे लाकूड हलके पण मजबूत असल्याने पेन्सिली, पिपे आणि ढोलकी बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
  • या झाडाच्या सालीपासून चांगला धागा मिळतो.
  • अशोकाच्या झाडाच्या लाकडापासून घरगुती सामान बनवले जाते.
  • चीनमध्ये अशोकाच्या लाकडाचा उपयोग आग- काड्यांकरिता करतात.
  • अशोकाच्या फुलांचे चूर्ण रक्तस्रावांवर व रक्ती आमाशांवर देतात.
  • याच्या सालींच्या अर्कामध्ये कँन्सरला प्रतिकार करण्याची शक्ती आहे.
  • अशोकाच्या झाडाच्या सालीचा उपयोग पोटदुखी, स्त्रीरोग, अतिसार, कृमी, सूज, जळजळ, अस्थिव्यंग, मूत्रविकार यावर केला जातो.
  • नक्की वाचा: नारळाच्या झाडाची माहिती 

अशोक झाडाचे फायदे – Ashoka Tree Benefits 

अशोकाच्या झाडाच्या सालीचा, पानांचा, फुलांचा, बियांचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. याच्यापासून अनेक औषधे तयार केली जातात.

  • अशोकाचे झाड महिलांना शारीरिक आणि मानसिक उर्जा देण्यास यशस्वी ठरतो.
  • स्त्रियांच्या समस्या दूर करण्यास उपयुक्त:

गर्भाशयाला सूज आल्यास अशोकाच्या सालीचे चूर्ण घेऊन ते १२५ gm दुध आणि १२५ gm पाण्यामध्ये घालून ते आटेपर्यंत उकळावे. ते गाळून घेऊन चवीपुरती साखर घालून तयार झालेले अशोकारिष्ट दिवसातून ३ वेळा घ्यावे. यामुळे रक्तप्रदर तसेच गर्भाशयाची सूज उतरण्यास मदत होते.

  • अशोकाच्या झाडाची साल हे मुळव्याध, मूत्राशय, वातविकार यावर गुणकारी मानली जाते.
  • त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी:

अशोकाच्या झाडाची पाने आणि फुले बारीक करून त्याची पेस्ट त्वचेच्या ऍलर्जीवर, त्वचेवर जलन होत असेल त्या भागावर लावाल्याने या समस्यांचे निवारण होण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास देखील मदत होते.

  • संधिवात आणि हाडांसाठी उपयुक्त:

जर एखादे हाड फ्रॅक्चर झाले असेल तर अशोकाच्या झाडाच्या सालांची भुकटी करून दिवसातून २ वेळा दुधातून घेतली असल्यास तुटलेली हाडे लवकर जोडण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.

तसेच अशोकाचे झाड संधीवातापासून आराम देण्यास मदत करते. सांधेदुखीसाठी अशोकच्या सालापासून बनवलेली पेस्ट लावल्यास मदत होते.

  • रक्तरंजित पेचीश

हि एक अतिशय गंभीर समस्या आहे. यावर अशोकाची फुले उपयुक्त ठरतात. अशोकाची फुले बारीक करून ३-४ gm पाण्यातून घेतली असता त्यातून आराम मिळतो.

  • पोटदुखी:

अशोकाच्या झाडाची साल पाण्यात उकळून काढा बनवून दिवसातून २ वेळा प्यायल्यास पोट दुखीपासून आराम मिळतो.

  • कर्करोगाविरूद्ध अशोकाच्या झाडाच्या अॅन्टीऑक्सिडंट कृतीमुळे ते कर्करोगावरील संभाव्य औषध बनवते, जे अॅप्पोपोसिस किंवा प्रोग्राम सेलच्या मृत्यूमुळे कार्य करते.
  • तापाच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी अशोक वृक्ष उपयुक्त ठरतो.
  • मधुमेहासाठी अशोकाच्या झाडाचे अर्क मधुमेहावरील मोतीबिंदूपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत.
  • नक्की वाचा: आंबा झाडाची माहिती 

अशोक झाडाचे fact

  • अशोक या नावाने भारतात लाल अशोक आणि हिरवा अशोक अशा दोन वेगवेगळ्या वनस्पती ओळखल्या जातात.
  • अशोक हा मोठा सदापर्णी वृक्ष मुलाचा भारताच्या दक्षिण भागातील व श्रीलंकेतील आहे.
  • ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी या वृक्षाची मदत होते.
  • अशोकाचे शास्त्रीय नाव सराका इंडिका आहे.
  • अशोकाला सीतेचा अशोक असेही म्हंटले जाते.
  • अशोकाला सदाहरित वृक्षांमध्ये गणले जाते.
  • हिंदु आणि बौद्ध धर्मात या वृक्षास पवित्र मानले जाते.
  • अनेक औषधांकरिता अशोक हा वृक्ष प्रसिद्ध आहे.
  • अशोकाच्या झाडापासून अशोकारिष्ट, अशोकघृत, देवदाव्यारीष्ट, महामरीच्यादी तेल हि ओषधे तयार केली जातात.
  • अशोकाच्या सालीमध्ये टॅनिन(६%), कॅटेचोल हे सुगंधी तेल, हॅमॅटोकझीलीन, सॅपोनीन सेंद्रिय कलश व लोह असतात.

आम्ही दिलेल्या ashoka tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “अशोका झाडांची” अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ashoka tree in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर ashoka tree information in marathi wikipedia असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!