बाबासाहेब पुरंदरे यांची माहिती Babasaheb Purandare Information in Marathi

Babasaheb Purandare Information in Marathi बाबासाहेब पुरंदरे यांची माहिती बळवंत मोरेश्वर पुरंदरे शिवआराधक शिवचरणी लीन!! आज संपूर्ण भारत दुःखाच्या दरीत कोसळलं आहे त्याचं कारण म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एक असं व्यक्तिमत्व होते ज्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा श्वास होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहचवनं हा त्यांचा ध्यास होता. आपल्या ओजस्वी वाणीने त्यांनी प्रत्येक वयोगटातील लोकांना आपलंसं केलं त्यांच्या या कार्यामुळेच प्रत्येक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी अधिक जोडला गेला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना स्मरणार्थ ठेवून आपण आजच्या लेखामध्ये त्यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

 babasaheb purandare information in marathi

babasaheb purandare information in marathi

बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांची माहिती – Babasaheb Purandare Information in Marathi

पूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे
जन्म२९ जुलै १९२२
जन्म गावपुण्यातल्या सासवड
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख इतिहास संशोधक व साहित्यिक
मृत्यू१५ नोव्हेंबर २०२१
टोपणनावबाबासाहेब पुरंदरे

जन्म

पुण्यातल्या सासवड येथे २९ जुलै १९२२ साली बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म झाला. बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे टोपणनाव असून बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे त्यांचं मूळ नाव आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर म्हणून संबोधलं जायचं. त्यांची शिवभक्ती अपरंपार होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खडान खडा माहिती होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच संपूर्ण आयुष्य शिवचरणी वाहील.

इतिहास संशोधक व साहित्यिक

इतिहासाचा गाढा अभ्यास असलेले बाळासाहेब पुरंदरे हे कवी, नाटककार, दिग्दर्शक, लेखक, इतिहास संशोधक व मराठी साहित्यिक होते. मराठी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासावर लेखन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णकाळ बाबासाहेब पुरंदरे यांनी खूप जवळून अनुभवला आहे.

प्रत्येक किल्ल्याला भेट देऊन, प्रत्येक तपशील, आराखडे, ऐतिहासिक वास्तू म्हणा या सगळ्या ऐतिहासिक गोष्टींचा बाबासाहेब पुरंदरे यांनी खूप मन लावून अभ्यास केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ऐतिहासिक प्रसंगाशी असलेली त्यांची ओढ बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या वर्णनात्मक लेखनामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित केली.

या भारताला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या थोर व्यक्तिमत्व लाभलं हे आपलं भलं मोठं भाग्यच आहे परंतु बाबासाहेब पुरंदरे यांनी ते व्यक्तिमत्त्व घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज इतिहासाशी अधिक जोडले गेले. पुण्यातच बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म झाला आणि तिथेच त्यांनी आपला संसार उभा केला.

भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेद्वारे बाबासाहेब पुरंदरे यांनी आपली वाटचाल सुरू केली आणि खरे यांच्यासारखे इतिहास संशोधक यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास संशोधक म्हणून कार्य सुरू केलं. आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रांमधून बाबासाहेब पुरंदरे लेखन करायचे.

वेगवेगळ्या गड-किल्ल्यांना भेट देणे, प्रत्येक ऐतिहासिक ऐवजांच निरक्षण करणं, ऐतिहासिक गोष्टींचा सखोल अभ्यास करण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास करणं हे सगळे बाबासाहेब पुरंदरे यांचे छंद होते. कादंबरीकार व जेष्ठ इतिहासकारक गो नी दांडेकर यांच्यासोबत बाबासाहेब पुरंदरे वेगवेगळ्या गड-किल्ल्यांवर भटकंतीसाठी जायचे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रा विषयी ची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखन या साधनाचा वापर केला. पुरंदरऱ्याचीं दौलत, पुरंदरऱ्यांची नौबत, गडसंच, शेलारखिंड, राजा शिवछत्रपती हे बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रकाशित केलेली साहित्य आहेत.

“जाणता राजा” हे नाटक संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या नाटकाचे १२५० नाट्य प्रयोग झाले आहेत या नाटकाचं लेखन व दिग्दर्शन बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं होतं. नाटककार, कवी, लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच परंतु त्यांच्यामध्ये एक कलाकार देखील दडला होता. एकदा जाणता राजा या नाटकाच्या एका प्रयोगात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारा एक कलाकार उपस्थित नव्हता.

त्यावेळी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती आश्चर्याची बाब म्हणजे ऐन वेळेस कुठल्याही प्रकारचा सराव न करता त्यांनी ही भूमिका साकारली आणि ती उत्तमरित्या पार देखील पाडली

यावरून बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी बारीक बारीक गोष्टींचा किती सखोल अभ्यास केला आहे याचा प्रत्यय येतो. हे नाटक इतक गाजलं कि या नाटकाचे इंग्रजी आणि हिंदी या भाषां व्यतिरिक्त इतर पाच भाषांमध्ये देखील भाषांतर केलं गेलं. “शिवचरित्र” या ग्रंथाचे लेखन बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आहे.

या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत आणि जवळपास पाच लाखांहून अधिक घरांमध्ये हे शिवचरित्र पोहोचलं आहे. शिवभक्त, ऐतिहासिक संशोधनाचा ध्यास, तल्लख बुद्धी, लेखणी कौशल्य, सामाजिक बांधिलकी या सर्व बाबींचा समूह म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्यक्तिमत्व होयं.

सरस लेखन ठेवणारे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहलेली काही ऐतिहासिक साहित्य पुढील प्रमाणे – आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदरऱ्याचा सरकारवाडा, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजराऱ्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लाल महाल, शिलंगणाचे सोने, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड.

या सगळ्या साहित्य लेखनावरून समजून येते की बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास बद्दल किती माहिती होती. ते मुख्यतः ऐतिहासिक लेखन करायचे. त्यांच्या या कार्यामधून ऐतिहासिक लेखणी मधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतातील प्रत्येक घराघरांमध्ये पोचवला ज्यामुळे आपल्या सर्वांना इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळाली. 

हा वारसा असाच पुढे ठेवण्यासाठी पुढच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी एक नवीन प्रेरणा दिली त्यांच्या या कार्यामध्ये अनेक तरुण अनेक दिग्गज त्यांच्यासोबत नेहमीच होते.

पुरस्कार

बेलभंडारा चे बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनाची माहिती देणारा प्रसिद्ध जीवन चरित्र डॉक्टर सागर देशपांडे या लेखकाने प्रसिद्ध केला आहे. १९ ऑगस्ट २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना “महाराष्ट्रभूषण” पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१९ मध्ये भारतात सर्वोच्च मानला जाणारा “पद्मभूषण” हा नागरी पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला.

जरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे थोर राजे पुन्हा पृथ्वीतलावर जन्म घेणे शक्य नसले तरी बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख इतिहासाचे वेड असणारे इतिहास संशोधक नक्की जन्माला यावे. आज जरी बाबासाहेब पुरंदरे आपल्यासोबत नसले तरी त्यांचं ऐतिहासिक साहित्य लेखन आणि त्यांचं कार्य नेहमीच अजरामर राहिली.

पुस्तके – Babasaheb Purandare Books in Marathi

मृत्यू

२९ जुलै २०१९ रोजी नुकतच बाबासाहेब पुरंदरे यांनी ९९ वी पार केली आणि शंभर वर्षांमध्ये पदार्पण केलं म्हणून त्यांचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये बर्‍याच मान्यवरांनी त्यांचं भरपूर कौतुक केलं त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. परंतु २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी बाबासाहेब पुरंदरे यांचा तोल जाऊन त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

ज्यामुळे त्यांना त्वरित दीनानाथ रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यांच्या प्रकृती मध्ये काही फरक दिसून येत नव्हता आणि कालांतराने असं समोर आलं की त्यांना निमोनिया झाला आहे. त्यामुळे बराच वेळ त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि शेवटी आज १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी हा शिवरायांचा मावळा हरपला.

त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच सर्व शिवप्रेमी व त्यांच्या चाहत्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांचं दुःख व्यक्त केलं आहे. पुण्यातल्या दीनानाथ वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच वैकुंठ स्मशानभूमीत चाहत्यांचा अथांग जनसागर लोटला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तोफांची सलामी देत तिरंग्यात गुंडाळून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेब पुरंदरे यांचा निधन म्हणजे हे शब्दांच्या पलीकडच दुःख आहे असं पंतप्रधान मोदी यांचे मत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे. असा अलौकिक शिवआराधक पुन्हा होणे शक्य नाही. उपचारादरम्यान बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या साथीदारांना सांगत होते मी शिवचरित्रावर अधिक संशोधन केलं आहे.

मला लहान लहान मुलांपर्यंत शिवचरित्र पोहोचवायच आहे मला अजून सहा महिने मिळाले तरी खूप झालं. हे त्यांचे शेवटचे बोल होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या ध्यानी मनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या कार्यातून त्यांनी अनेक तरुणांना प्रेरित केलं.

आम्ही दिलेल्या babasaheb purandare information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shivcharitra by babasaheb purandare in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about babasaheb purandare in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये babasaheb purandare wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!