बैल पोळा निबंध मराठी Bail Pola Nibandh in Marathi

Bail Pola Nibandh in Marathi – Bail Pola Essay in Marathi बैल पोळा निबंध मराठी एकदा का श्रावण महिना सुरू झाला की आपले सगळे मराठी सण एकामागोमाग एक यायला सुरू होतात. त्यामुळे, लहान मुलांपासून ते घरातील म्हाताऱ्या माणसांपर्यंत अगदी सगळयांना श्रावण महिन्याची खूप उत्सुकता असते. खरंतर, सण-उत्सव आले की घरातील स्त्रिया गोडधोड पदार्थ तसेच, विविध फराळ खूप आवडीने बनवतात. याशिवाय मित्रहो, कोणताही सण आला की घरातील वातावरण पवित्र, मंगलमय आणि प्रसन्न होतं. त्यामुळे, श्रावण महिन्यात सुरू होणाऱ्या सणांची रेलचेल सगळ्यांनाच आवडते.

याखेरीज, या महिन्यात पावसाचे दिवस सुरू होतात, त्यामुळे संपूर्ण सृष्टी अगोदरच हिरवाईचा रेखीव असा जरतारीचा गडद शालु नेसुन अनेक बहुमोल अलंकारांनी नटलेली असते. शिवाय, आपल्या सभोवतालच्या संपुर्ण वातावरणामध्ये चहूबाजूंनी थंडगार गारवा पसरल्याने, आपले मानवी मन देखील त्या शीतल वाऱ्यासारखे ताजेतवाने बनते.

bail pola nibandh in marathi
bail pola nibandh in marathi

बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi

Bail Pola Essay in Marathi

अशा प्रकारे, अनोख्या सौंदर्याने सजलेल्या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे विविध सण साजरे करतो. परंतू, या श्रावण महिन्याची सांगता होते ती बैलपोळा या सणानेचं! शिवाय, श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला ग्रामीण भागांतील अनेक शेतकरी बांधव आपल्या लाडक्या सर्जा राजाचा अर्थात बैलाचा हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसून येतात.

परंतू, पुणे अथवा मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये या सणाविषयी पुरेशी माहिती नाही, त्यामुळे कदाचीत ही शहरं आजदेखील बैलपोळा या पवित्र  सणासंदर्भात अनभिज्ञ असावीत. शिवाय, आजकाल या मेट्रो शहरांची धावपळ इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की बैलपोळा यांसारखे सण साजरे करायला त्यांना अजिबात वेळ भेटतं नाही.

परंतू मित्रहो, असे असले तरी या शहरांना लागून असलेली आजूबाजूची गावं मात्र हा उत्सव मोठ्याने साजरा करतात. शिवाय, आपल्या संपुर्ण महाराष्ट्रात बळीराजा  देखील आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण  अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या पारंपारीक पध्दतीने आजही आवडीने साजरा करतो.

मनोरंजनाची बाब म्हणजे ग्रामीण भागांतील अनेक शेतकरी “आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या!” असं आमंत्रण आदल्या दिवशी आपल्या बैलांना देतात. शिवाय, दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सगळे शेतकरी आपल्या बैलांना गावाजवळच्या नदीवर किंवा तलावाच्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्यांना मनसोक्तपणे स्वच्छ अंघोळ घालतात.

नंतर, घरी आल्यावर बैलांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके काढले  जातात आणि त्यांच्या शिंगांना बेगड लावली जाते. शिवाय, त्यांच्या डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि पायामध्ये घुंगरांच्या माळा देखील घातल्या जातात. तसेच, काही ठिकाणी यादिवशी बैलांच्या पायांमध्ये खासकरून चांदीचे अथवा करदोडयाचे तोडे घातले जातात.

त्याचबरोबर, त्यांच्या तोंडाला नवीन वेसण आणि गळ्यामध्ये नवाकोरा कासरा घातल्यानंतर, त्यांच्या पांढऱ्या शुभ्र अंगावर रेखीव पद्धतीची रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जाते. दुसरीकडे मात्र घरातील स्त्रिया यादिवशी बैलांचा गोठा पाण्याने स्वच्छ धुवून, धुपाचा दिवा एका कोपऱ्यात लावतात.

अशी सगळी कामं आटोपल्यावर घरातील सुवासिनी स्त्रिया बैलांची विधीवत पद्धतीने पुजा करतात. मित्रहो, विशेष म्हणजे बैलांना पोळयाच्या दिवशी कोणतेही काम लावले जात नाही, शिवाय त्यांना शेतात पण नेले जात नाहीत. एकंदरीत, पोळ्याचा हा दिवस बैलांसाठी एक प्रकारे सुट्टीचा दिवस असतो.

खासकरून त्याच्यासाठी बनवलेला गोडाधोडाचा पुरणपोळीचा घास त्याला प्रेमाने भरवला जातो. घरातील ज्येष्ठ लोक त्यांच्या बैलाची अगदी  नियमितपणे निगा राखणाऱ्या गडयाला नवीन कपडे भेट म्हणून देतात. यादिवशी सर्वप्रथम बैलांना चविष्ट  तसेच, गोडधोड जेवण दिले जाते आणि त्यांच्यानंतर घरातील सगळी मंडळी जेवण करतात.

शिवाय, सायंकाळच्या वेळेला बैलांना गावाबाहेरच्या विशेषतः महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी नेले जाते. यावेळी सर्व शेतकरी आपापल्या बैलांच्या जोडया घेऊन मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एका ठिकाणी जमा होतात.

अशा प्रकारे, जेंव्हा गावातील सर्व शेतकरी आपापल्या बैलांना घेऊन येतात, तेंव्हा महादेवाच्या मंदिराला आंब्याच्या पानांचे सुंदर असे तोरण बांधुन, शेवटी बैलांना एकत्रितरित्या रांगेत उभे करण्यात येते. त्याचबरोबर, ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागतही  केले जाते. खरंतर, गावातील स्त्रिया या कार्यक्रमाला झडत्या म्हणजेच पोळयाची गीते सादर करतात.

यादिवशी, अनेक ठिकाणी बैलांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात आणि या शर्यतीत ज्याच्या बैलांच्या जोडीला सर्वात चांगले तयार केलेले असेल, त्या जोडीला योग्य ते पारितोषीक दिले जाते. मित्रहो, अशा पद्धतीने प्रत्येक शेतकरी आपापल्या गावातील परंपरेनुसार, प्रथेनुसार अथवा पूर्वीपासून चालत आलेल्या रीतिरिवाजांनुसार बैलपोळा हा उत्सव साजरा करतो.

शिवाय, महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपल्या घरी परत निघताना, बैलांना प्रत्येकाच्या दारोदारी नेले जाते, कारण यादिवशी गावातील आयाबायांना बैलांची मनापासून पुजा करायची असते.

यांखेरीज, बैल नेणाऱ्या व्यक्तीस ’बोजारा’ देण्यात येतो. मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बोजारा म्हणजे काय? तर मित्रांनो, याठिकाणी बोजारा म्हणजे धन किंवा पैसे होय! मित्रहो, आपल्या हिंदू  संस्कृतीमध्ये वृक्षांप्रमाणेच पाळीव प्राण्यांना देखील पुजनीय मानले जाते. शिवाय, श्रावण महिन्यातील अनेक सणांमध्ये त्यांची पूजाअर्चा केली जाते आणि यासोबतच त्यांना खायला देखील गोडधोड दिले जाते.

याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे बैलपोळा हा सण होय. संपूर्ण वर्षभर न चुकता आपल्या मालकासोबत अर्थात शेतकऱ्यासमवेत शेतामध्ये अगदी बरोबरीने राबणाऱ्या सगळ्या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन बैलपोळा या सणाकडे विशेषतः खूप उत्सुकतेने पाहिले जाते.

मित्रांनो, बैलपोळा अथवा पोळा हा सण श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला त्या त्या प्रदेशांनुसार अगदी कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करण्यात येणारा बैलांचा विशेष असा सण आहे.

यादिवशी, शेतकरी वर्ग बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, असा हा मराठी सण विशेषतः विदर्भामध्ये भव्य पातळीवर साजरा केला जातो, शिवाय विदर्भातील सीमेवरती असलेल्या मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमाभागांत देखील हा सण खूप मोठ्याने साजरा होतो.

शिवाय, ज्यांच्याकडे बैलांची जोडी नसते असे अनेक लोक बैलपोळा हा सण आपल्या घरी मातीपासून बनवलेल्या बैलांच्या मूर्ती आणून त्यांची पूजा करतात आणि त्यांना नैवैद्य दाखवतात. काही भागांत अशी समजूत आहे की या सणामुळे घरामध्ये धनधान्याची आणि गोधनाची समृद्धि होते.

खरंतर, पशुपुजा ही संकल्पना मूलतः मानवाने ज्या काळामध्ये पशुपालनास आरंभ केला होता, त्या प्राचीन काळामध्येच रुजू झाली असावी, असे काही व्यक्तींचे म्हणणे आहे. खरंतर, या सणाला दक्षिण महाराष्ट्रामध्ये ‘बेंदूर’ असेही म्हटले जाते. अशा प्रकारे, अगदी पारंपारिक पध्दतीने आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याच्या जिव्हाळ्याचा बैलपोळा हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या bail pola nibandh in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बैल पोळा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bail pola essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bail pola festival essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bail pola in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!