bajaj finance information in marathi बजाज फायनान्स लोन माहिती मराठी, सध्या अनेक कर्ज आणि गुंतवणूक सुविधा देणाऱ्या शाखा आहेत आणि त्यामधील एक जी कर्ज आणि गुंतवणूक सुविधा देणारी शाखा म्हणजे बजाज फायनान्स आणि आज आपण या लेखामध्ये बजाज फायनान्स विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. बजाज फायनान्स हि कर्ज आणि गुंतवणुकीसाठी लोकांना मदत करणारी शाखा आहे आणि हि शाखा देशभरातील ३८ दशलक्षहून अधिक लोकांना सुविधा पुरवते.
बजाज फायनान्स या शाखेचे अध्यक्ष हे संजीव बजाज हे आहेत आणि संदीप जैन हे या शाखेचे मुख्य वित्त अधिकारी आहेत. हि भारतातील नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणून काम करते आणि हि संस्था जीवनशैली, दुचाकी, तीन चाकी वाहने, डिजिटल उत्पादन, तीन चाकी वाहने, विक्रेता प्रकाश अभियांत्रिकी, वित्तीय संस्था, डिजिटल उत्पादन, विशेष रसायने, कार्पोरेट आणि वेअरहाऊस फायनान्स सेवा पुरवते.
तसेच हि संस्था बचत ठेव योजाना, मुदत ठेवा योजना आणि म्युच्युअल फंड योजना या सारख्या ठेव योजना या सारख्या गुंतवणूक योजना देखील पुरवते. बजाज फायनान्स या कंपनीची स्थापना मे २००७ मध्ये झाली आणि या शाखेचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे.
बजाज फायनान्स लोन माहिती मराठी – Bajaj Finance Information in Marathi
शाखेचे नाव | बजाज फायनान्स किंवा बजाज फिनसर्व्ह |
स्थापना | मे २००७ |
मुख्यालय | पुणे (महाराष्ट्र) |
अध्यक्ष | संजीव बजाज |
मुख्य वित्त अधिकारी | संदीप जैन |
सुविधा | कर्ज, गुंतवणूक आणि ठेव योजना, क्रेडीट कार्ड आणि मोबाईल बँकिंग इत्यादी |
बजाज फायनान्स कडून मिळणाऱ्या सुविधा – facilities
बजाज फायनान्स हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सुविधा पुरवते आणि त्या कोणकोणत्या आहेत ते आता आपण खाली पाहणार आहोत.
बजाज फायनान्स हे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज पुरवते जसे कि वैयक्तिक कर्ज, मालमत्तेवर कर्ज, गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, सुवर्ण कर्ज इत्यादी.
- कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कर्ज या शाखेकडू हवे असेल तर त्या व्यक्तीला वैयक्तिक कर्ज हे त्वरित मंजूर होऊ शकते आणि त्या संबधित व्यक्तीने आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर त्याला २५ लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते.
- गृहकर्ज कर्ज हे सर्वात कमी व्याजदरामध्ये दिले जाते आणि ३.५ कोटी पर्यंतचे गृहकर्ज बजाज फायनान्स देते.
- अनेकांना आपला स्वताचा व्यवसाय करायचा असतो आणि अश्या लोकांना हि शाखा व्यवसाय कर्ज देते. लहान व्यवसायांना कमी व्याजदरामध्ये ३० लाख पर्यंत कर्ज मिळू शकते.
- या शाखेकडून लोकांना सुवर्ण कर्ज योजना देखील पुरवली जाते आणि यामध्ये २० लाख पर्यंत कर्ज दिले जाते आणि यामध्ये आकर्षक व्याजदर देखील असतात.
बजाज फायनान्स हे अनेक प्रकारच्या गुंतवणूक सुविधा देखील पुरवते जसे कि मुदत ठेव, बचत ठेव आणि व्यवसाय ठेव अश्या अनेक सुविधा पुरवते. जर तुम्हाला मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला कमीत कमी २५००० हजारची गुंतवणूक करणे आवश्यक असते.
बजाज फायनान्स किंवा बजाज फिनसर्व्ह हे मोबईल बँकिंग सेवा देखिल पुरवतात आणि हे बजाज फिनसर्व्ह अॅप हे बजाज फायनान्स किंवा बजाज फिनसर्व्हद्वारे प्रदान केलेले अॅप आहे जे सर्व पोस्ट कर्ज किंवा गुंतवणूक सेवांच्यासाठी एक स्टॉप उपाय आहे परंतु हे अॅप आपल्याला प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करावे लागते.
हि शाखा क्रेडीट कार्डची सुविधा देखील पुरवते आणि हे कार्ड अनेक फायदे प्रधान करतात जसे कि मनोरंजन, जेवण, प्रवास इत्यादी.
बजाज फायनान्स हे सर्व घटना किंवा दुर्देवी घटना कव्हर करण्यासाठी स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींच्यासाठी आणि कर्ज घेणाऱ्या कंपन्यांसाठी विमा योजनांचा विस्तृत पर्याय ऑफर करते.
बजाज फायनान्स हि कोणकोणत्या प्रकारचे कर्ज पुरवते – consumer finance
बजाज फायनान्स हि शाखा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज पुरवते आणि ते प्रकार कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत.
- वैयक्तिक कर्ज (personal loan).
- जीवनशैली कर्ज.
- सुवर्ण कर्ज (Gold loan).
- गृह कर्ज (home loan).
- इएमआय कार्ड (EMI card).
- किरकोळ विक्रेता कर्ज (retailer finance).
- को ब्रँडेड क्रेडीट कार्ड.
- व्यवसाय कर्ज (business loan).
बजाज फायनान्स कडून कर्ज घेण्याचे फायदे – benefits
- जर आपल्या कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज हवे असल्यास आपण २५००० पर्यंतचे कर्ज घेऊ शकतो.
- आपण ज्यावेळी कर्ज घेतो त्यावेळी हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला एक विशिष्ठ कालावधी दिला जातो आणि तसेचा बजाज फायनान्स देखील कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला भरपूर काळ मिळतो आणि हि शाखा एक वर्ष ते पाच वर्षाचा कालावधी दिला जातो.
- जर आपण कर्ज घेताना बजाज फायनान्सने ठरवलेले सर्व पात्रता निकष पूर्ण केले तर आपल्याला ५ मिनिटामध्ये कर्जाची मंजुरी मिळते आणि आणि मंजुरी मिळाल्यानंतर २४ तासाच्या आतमध्ये आपल्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली जाते.
- बजाज फायनान्स मधून आपण कर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकतो.
बजाज फायनान्स कडून कर्ज घेण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
कोणत्याही शाखेतून कर्ज घेण्यासाठी आपल्याला त्या शाखेने ठरवलेले पात्रता निकष पार पडावे लागतात आणि तसेच बजाज फायनान्स कडून देखील कर्ज घेण्यासाठी आपल्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते आपण खाली पाहूया.
- जर एखाद्या व्यक्तीला बजाज फायनान्स कडून कर्जे घ्यायचे असल्यास त्या संबधीत व्यक्तीचे वय हे २१ ते ६५ पर्यंत असले पाहिजे किंवा हे कर्जाच्या प्रकारानुसार वयाची अट बदलू शकते.
- कर्ज घेणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
- बजाज फायनान्स हि शाखा सरकारी किंवा खाजगी संस्थांच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना कर्ज देतात.
बजाज फायनान्स कडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – documents
- बजाज फायनान्स कडून कर्ज घेण्यासाठी त्या संबधीत व्यक्तीला काही कागदपत्रे जमा करावी लागतात आणि ती कोणकोणती आहेत ते पाहूया.
- जर तुम्ही एकाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला तुमची कर्मचारी म्हणून ओळख पटणारा पुरावा पुरवला पाहिजे.
- त्या व्यक्तीला त्याचा उत्पन्नाचा दाखला किंवा पुरावा दिला जातो.
- तसेच जर तुमचा व्यवसाय असेल आणि त्यावर तुम्ही कर्ज घेत असाल तर तुम्हाला व्यवसायाची कागदपत्रे दिली जातात.
- तसेच बँक खात्याची संपूर्ण माहिती दिली जाते.
आम्ही दिलेल्या bajaj finance information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बजाज फायनान्स लोन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bajaj finance card information in marathi या bajaj finance personal loan information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bajaj finance in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bajaj finance wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट