बार्टी योजना माहिती Barti Information in Marathi

barti information in marathi बार्टी योजना माहिती, आपल्या सर्वांना माहित आहे कि पुणे हे शहर शिक्षणाचे माहेर घर आहे आणि या ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था, नामांकित शाळा आणि कॉलेजीस आहेत आणि तसेच बार्टी (barti) हि देखील पुण्यातील एक शैक्षणिक संस्था आहे आणि आज आपण या लेखामध्ये बार्टी विषयी माहिती घेणार आहोत. बार्टी याचे पूर्ण स्वरूप बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे ज्या संस्थेचे नाव पूर्वी बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठ असे आहे.

आणि या संस्थेचे स्थापन १९७८ मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती परंतु नंतर हि संस्था पुणे शहरामध्ये स्थलांतरित करण्यात आली. या संस्थेच्या मार्फत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात.

जसे कि विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणे, लोक प्रतिनिधी प्रशिक्षण आणि अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण या सारखे अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेची स्थापन समानतेचा विचार हा जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी केला होता. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था हि नागरी सेवा (UPSC) परीक्षेसाठी पुणे आणि नागपूर येथे अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी निवासी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी बार्टी युपीएससी आरसी सीइटी परीक्षा आयोजित करते.

barti information in marathi
barti information in marathi

बार्टी योजना माहिती – Barti Information in Marathi

संस्थेचे नावबार्टी
मराठी पूर्ण स्वरूपबाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था
इंग्रजी पूर्ण स्वरूपbabasaheb ambedkar research and training institute
स्थापना१९७८
संस्थापकबाबासाहेब आंबेडकर

बार्टी चे पूर्ण स्वरूप – barti full form

बार्टीचे पूर्ण स्वरूप बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असे आहे आणि याला इंग्रजीमध्ये babasaheb ambedkar research and training institute असे आहे.

बार्टी विषयी काही महत्वाची माहिती – barti pune information in marathi

बार्टी हि संथा एम. फील ( M.Phil ) पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्याकडून अर्ज मागवते आणि पीएच. डी फेलोशिप दरवर्षी देण्यात येणाऱ्या फेलोशिपची संख्या २५ इतकी असते. यापैकी १३ अनुसूचित जाती महिला उमेदवारांसाठी आणि १ अपंग व्यक्तीसाठी राखीव असते.

फेलोशिप योजना हि बार्टीद्वारे तयार केली जाते आणि निधी पुरवला जातो. या संस्थेमार्फत दिली जाणारी फेलोशिप हि अनुसूचित जाती उमेदवारांच्यासाठी खुली आहे ज्यांना नियमित आणि पूर्ण वेळ एम फील आणि पीएच. डी भारतात विज्ञान, सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील पदवी आहेत.

बार्टी विषयी काही विशेष तथ्ये – facts

  • बार्टी मार्फत विशेष अशी परीक्षा घेतली जाते आणि ३०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि त्यांना युपीएससी (UPSC) परीक्षेसाठी तयार केले जाते किंवा त्यांना युपीएससीसाठी प्रशिक्षण दिले जाते.
  • ज्यावेळी लॉकडाऊन कालावधी होता त्या काळामध्ये देखील या संस्थेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले होते.
  • २०२० या वर्षामध्ये बार्टीचे एकूण ९ विद्यार्थी आणि २०२१ मध्ये बार्टीचे एकूण ७ विद्यार्थ्यांना युपीएससी (UPSC) परीक्षेमध्ये उतीर्ण होण्यास यश मिळाले होते.
  • बार्टी या संस्थेची स्थापना सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठ या नावाने करण्यात आली होती आणि नंतर त्याचे नाव बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असे ठेवण्यात आले होते.
  • बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ३० केंद्रे आहेत आणि या केंद्रांच्या मार्फत पात्र विद्यार्थ्यांना पोलीस भरती, बँकिंग, रेल्वे, एलआयसी आणि काही इतर स्पर्धा परीक्षा विषयी प्रशिक्षण देते तसेच स्कॉलरशीप आणि काही त्या संबधित स्टडी मटेरीयल पुरवते.
  • कर एखाद्या पात्र विद्यार्थ्याला बार्टी या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन मोडद्वारे अर्ज करावा लागतो.
  • बार्टीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक प्रशिक्षन कार्यक्रम घेतले जातात आणि अश्या प्रकारे बार्टीने १८ हजार विद्यार्थ्यांना या संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण दिली आहे आणि त्यांना स्टडी मटेरीयल देखील पुरवले आहे. त्याचबरोबर बार्टी हि संस्था विद्यार्थ्याना सहा हजार पर्यंत शिष्यवृत्ती देते.
  • बार्टी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पहिल्यांदा मुंबई या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती आणि त्यानंतर हि संस्था पुणे या ठिकाणी हलवण्यात आली.
  • समाजातील उपेक्षित आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण तसेच धोरण शिफारस, सल्ला आणि प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे समानता आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात योगदान देणे आणि शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी उपायांचे आणि प्रकल्पाचे मूल्यमापन करणे या सारखे अनेक प्रकारचे कार्य हि संस्था करत असते.

बार्टी मध्ये प्रवेश करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

जर एखाद्या विद्यार्थ्याला कोणत्याही संस्थेमध्ये काम करायचे असल्यास त्या संबधित विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात तसेच बार्टी या संस्थेमध्ये देखील काम करण्यासाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहे ते खाली पाहूया.

  • तो संबधीत विद्यार्थी महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे.
  • महाराष्ट्र राज्यातील अनुसुचीत जाती उमेदवार जो युपीएससी (UPSC) स्पर्धा परीक्षेस पात्र असेल.
  • त्याने बार्टीची देखील प्रवेश परीक्षा पात्र झालेली असावी.

बार्टी संस्थेची मुख्य उदिष्ठ्ये – objectives

  • महाराष्ट्र राज्यामधील अनुसूचित जातीमधील जे तरुण बेरोजगार आहेत अश्या तरुणांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
  • त्याचबरोबर अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे.
  • समानतेचा विचार हा जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवने.

आम्ही दिलेल्या barti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बार्टी योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या barti pune information in marathi या barti course information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि barti maharashtra माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये babasaheb ambedkar research and training institute Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!