भद्रासन मराठी माहिती Bhadrasana Information in Marathi

bhadrasana information in marathi भद्रासन मराठी माहिती, आरोग्य म्हटले कि आपल्याला चांगले ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाय करावे लागतात जसे कि आपल्या आहाराचे नियमन करावे लागते, योग्य ती झोप घ्यावी लागते त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि योगासने करावी लागतात आणि तसेच सध्या जगातील वातावरण हे खूप दुषित झाले आहे आणि अनेकांना अनेक वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि जर अश्या या दुषित वातावरणामध्ये आणि दगदगीच्या आयुष्यामध्ये आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवायचे असल्या आपल्याला रोजचे व्यायाम आणि योगासन करणे आवश्यक आहे.

योगासनाचे महत्व हे अनेकांना जरी माहित नसले तरी हे खूप फायद्याचे आहे कारण नियमित योगासनामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो त्याचबरोबर योगाची नियमितता आत्म-जागरूकता निर्माण करते आणि एखाद्याला शिस्तबद्ध बनवते. योग ही एक जुनी कला आहे.

ज्यामध्ये शरीर मनाशी जोडलेले असते आणि आपण ह्याला एक प्रकारचा व्यायाम देखील म्हणू शकतो  ज्याद्वारे शरीरातील सर्व घटक ध्यान आणि विश्रांतीच्या मदतीने मनाशी जोडले जातात. हे नकारात्मक विचार टाळण्यास आणि नकारात्मकतेचे घटक समाप्त करण्यास मदत करते.

योगाचे पद्मासन, मयुरासन, सवासन, प्राणायाम आणि इतर अनेक प्रकार आहेत परंतु आज आपण या लेखामध्ये भद्रासन या योग प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत. चला तर खाली आपण भद्रासन हा योगप्रकार काय आहे, तो कसा केला जातो, त्याचे फायदे काय आहेत आणि हे आसन करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी सविस्तर माहिती घेवूया.

bhadrasana information in marathi
bhadrasana information in marathi

भद्रासन मराठी माहिती – Bhadrasana Information in Marathi

प्रकारयोगासन
नावभद्रासन
प्रक्रियासोपी
इंग्रजी नावGracious Pose
फायदेमन शांत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी

भद्रासन विषयी महत्वाची माहिती – Information about bhadrasana in Marathi

भद्रासन हा एक योगासनाचा प्रकार आहे आणि हा प्रकार योगासनामधील एक सोपा प्रकार असून आणि हा आसनाचा प्रकार नवशिक्यांच्यासाठी खूपच सोपा आहे आणि हा आसन प्रकार ध्यानासाठी एक उत्तम प्रकार मानला जातो. अनेक लोक हे मन शांत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळे योगप्रकार हे नियमित करत असतात आणि भद्रासन देखील त्या प्रकारातील आसन आहे.

कारण ह्या आसनाच्या नियमित सरावाने मन शांत होण्यास मदत होते त्याचबरोबर हे आसन आपल्याला अधिक सक्रीय बनवण्यासाठी देखील मदत करू शकते आणि हे आसन खूप आरामदायी असल्यामुळे आपण हे दीर्घकाळ ठेऊ देखील शकता.

भद्रासनाला कृपा आसन म्हणून देखील ओळखले जाते आणि याला इंग्रजीमध्ये gracious pose या नावाने ओळखले जाते आणि हि एक बसण्याची मुद्रा असते ज्यामध्ये एखादा व्यक्ती दीर्घकाळ बसून ध्यानधारणा करू शकतो.

भद्रासन कसे केले जाते – process

भद्रासन हा एक ध्यान करण्यासाठी चांगला प्रकार आहे आणि हा योगप्रकार करण्यासाठी देखील खूप सोपा आहे आणि म्हणून आपण खाली भद्रासन कसे करायचे याची प्रक्रिया पाहणार आहोत. आपण भद्रासन हे दोन प्रकारे करू शकतो म्हणजेच वज्रासन मध्ये बसून आणि दंडासणामध्ये बसून करू शकतो.

प्रकार पहिला

 • प्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
 • त्यानंतर वज्रासन मध्ये बसा आणि तुमचे गुढगे शक्य तितके वेगळे करण्याचा किंवा पसरवण्याचा प्रयत्न करा.
 • तुमच्या पायाच्या दोन्ही टाचा ह्या एकत्र ठेवल्या पाहिजेत आणि टाचांच्या मागील बाजू नितंबाच्या खाली ठेवाव्या.
 • आता तुम्ही तुमचे शरीर स्थिर करण्यासाठी तुमच्या पायाची बोटे धरा.
 • मग डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
 • आता या स्थितीमध्ये तुम्ही ४ ते ५ वेळा खोल श्वास घ्या आणि तुम्हाला जोपर्यंत आराम वाटेल तोपर्यंत तुम्ही त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.

दुसरा प्रकार

 • प्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
 • त्यानंतर दंडासना मध्ये बसा मग तुमचे पायाचे तळवे हे एकमेकांना स्पर्श करतील असे तुमचे दोन्ही पाय दुमडून तुमचे पाय एकत्र आणा.
 • मग तुमच्या हातांनी तुमच्या पायाची बोटे धरून ठेवा आणि पाय थोडे आत खेचा.
 • आता तुमचे डोके आणि पाठीचा कणा ताठ करा आणि खांदा थोडा मागे खेचा.
 • त्यांनतर या स्थिमध्ये खोलवर श्वास घ्या आणि तुम्हाला जोपर्यंत अराम वाटेल तोपर्यंत या स्थितीमध्ये डोळे मिटून बसण्याचा प्रयत्न करा.

भद्रासनाचे फायदे – bhadrasana benefits in Marathi

कोणताही योगप्रकार हा नियमित केल्यामुळे त्या संबधित व्यक्तीला कोणता ना कोणता तरी आरोग्य फायदा होतोच आणि तसेच जर भद्रासन केल्यावर देखील कोणता ना कोणता तरी आरोग्य फायदा हा होतोच आणि म्हणूनच खाली आपण भद्रासन नियमित केल्याने कोणते फायदे होतात ते पाहणार आहोत.

 • जर एखाद्या व्यक्तीने भद्रासन हे आसन नियमितपणे केले तर त्या व्यक्तीला मन शांत ठेवण्यासाठी मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी मदत होते.
 • या आसनाच्या नियमित सरावाने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूची शक्ती वाढण्यास किंवा विकसित होण्यास मदत होते.
 • भद्रासन हे आसन गर्भवती स्त्रीयांच्यासाठी देखील खूप उपयोगी ठरू शकते म्हणजेच हे आसन सामान्य बाळाचा जन्म चांगला होण्यासाठी किंवा प्रसूतीमध्ये मदत होते.
 • भद्रासन या आसनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा, मांड्या आणि नितंब मजबूत होण्यास मदत होते.
 • मांड्या, घोटे आणि पाय यांची लवचिकता वाढण्यास मदत होते.
 • त्याचबरोबर पचन सुधारण्यास मदत होते आणि या आसनाच्या सरावाने थकवा देखील कमी होतो.

आम्ही दिलेल्या bhadrasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भद्रासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhadrasana yoga information in marathi या bhadrasana benefits in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bhadrasana yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!