मयूरासन माहिती मराठी Mayurasana Information in Marathi

mayurasana information in marathi मयूरासन माहिती मराठी, सध्याच्या या दगदगीच्या आणि प्रदूषणाच्या काळामध्ये व्यायामाचे आणि योगासनाचे महत्व खूप वाढले आहे आणि असे अनेक लोक आहेत जे स्वताची तब्येत आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा आणि व्यायाम करत असतात. योग ही निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान आहे आणि ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते. योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो.

नियमितपणे योगाचा अभ्यास करणे म्हणजे आपल्या निरीगी आरोग्याकडे वाटचाल करणे आणि म्हणून सध्या रोजच्या रोज योग करणे म्हणजे काळजी गरज झाली आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत जसे कि प्राणायाम, अन्लोम विन्लोम, भ्रस्त्रिका, पद्मासन, चक्रासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार आणि मयुरासन. आज आपण या लेखामध्ये मयुरासन या आसनाविषयी माहिती घेणार आहोत. मयुरासन हि एक खूप जुने आणि उपयोगी आसन आहे आणि आता आपण या असणाबद्दल सविस्तर माहिती घेवूया.

mayurasana information in marathi
mayurasana information in marathi

मयूरासन माहिती मराठी – Mayurasana Information in Marathi

मुद्रेचे नावमयुरासन
इंग्रजी नावपिकॉक पोझ (peocock pose)
पातळीअवघड किंवा कठीण

मयुरासनविषयी माहिती – ardha pincha mayurasana information in marathi

मयुरासन हे एक योगामधील आसन आहे आणि हे अनेक लोकांच्या मार्फत केले जाते. मयुरासन हे अमृत सिध्दीमध्ये समाविष्ट केलेल्या प्राचीन न बसलेल्या योग असणापैकी एक आहे आणि हे आसन कमीत कमी पाच हजार वर्षापूर्वी प्रचलित झालेले असं आहे. मयूर म्हणजे मोर आणि म्हणून या आसनाला इंग्रजीमध्ये पिकॉक पोझ (peocock pose) असे नाव पडले आहे आणि हे योगासन मोराच्या मुद्रेसारखे दिसते आणि म्हणूनच याला असे नाव दिले असावे.

यामध्ये हाताची स्थिती हि मोराच्या पायासारखी असते आणि आपल्या पायाची स्थिती हि मोराच्या शेपटीसारखी असते. मयुरासन या शब्दाचा अर्थ असा होतो कि मयूर म्हणजे मोर आणि आसन म्हणजे मुद्रा. मयुरासन या असणामध्ये आपल्या दोन्ही तळहातांनी जमीवर बॅलन्स केला जातो आणि आपले शरीर आडवे सरळ रेषेमध्ये उचलले जाते.

मयुरासन हे असे आसन आहे ज्याच्या रोजच्या सरावाने अनेक समस्या दूर होतात जसे कि मधुमेह आणि मुळव्याधच्या समस्या दूर होतात तसेच तणाव किंवा थकवा कमी होते आणि एकाग्रहता वाढण्यास मदत होते आणि असे अनेक फायदे हे आसन केल्यानंतर होतात.

मयुरासन म्हणजे काय ?

मयुरासन हा योगाचा प्रकार मोराच्या मुद्रेसारखा दिसतो म्हणून याला मयुरासन म्हणतात आणि यामध्ये ची स्थिती हि मोराच्या पायासारखी आणि पायाची स्थिती हि मोराच्या शेपटीसारखी असते.

मयुरासन कसे करावे – steps 

  • मयुरासन करताना सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना आठरून घ्या.
  • त्यानंतर आता तुमच्या दोन्ही गुढघ्यावर बसा आणि दोन्ही गूढघ्यांच्या मध्ये अंतर ठेवा आणि मग पुढे थोडे झुका आणि तुमचे दोन्ही तळहात जमिनीला टेकवा.
  • तुमचे तळहात जमिनीवर असे टेकवा कि तुमच्या हाताची बोटे हि गुढघ्याच्या दिशेला जातील आणि मग दोन्ही हाताचे खोपर हे नाभीच्या थोडे खाली पोटाला स्पर्श होऊ द्या मग शरीराचा संपूर्ण भार हा पुढच्या दिशेला टाका त्यामुळे तुम्हाला पाय उचलण्यास मदत होईल.
  • आता तुमचे पाय लाब करा आणि ते जमिनीला समांतर राहतील असे वर उचला आणि आपण आपले संपूर्ण शरीर वर उचलत असताना आपला श्वास रोखून धरा आणि या असणामध्ये एक सेकंद तरी राहण्याचा प्रयत्न करा.

मयुरासन करताना घ्यावी लागणारी काळजी

  • मयुरासन हे योगासनातील एक प्रकार आहे आणि हे आसन करण्यासाठी तुम्ही शक्यतो सकाळची वेळ निवडा.
  • मयुरासन हे कधीही भरलेल्या पोटावर करू नये म्हणजेच हे असं जेवल्यानंतर वगैरे करू नये तर हे आसन तुम्ही रिकाम्या पोटावर करा आणि पोट रिकामे हे सकाळीच असते त्यामुळे हे आसन सकाळी करणे कधीही चांगले.
  • किंवा मग तुम्ही तुमचे जेवण झाल्यानंतर ५ ते ६ तासंच्यानंतर हे आसन करू शकता.

मायुरासनाचे फायदे – mayurasana benefits in marathi

  • मयुरासन हे आसन नियमितपणे केले तर यामुळे हात, कोपर, पाय, पाठ, धड आणि मनगटाचे सांधे हे मजबूत आणि घट्ट होण्यास मदत होते.
  • मयुरासनामुळे पोट, आतडे, यकृत, स्वादुपिंड आणि मूत्रपिंड याबरोबर अनेक अवयवांना बळकट बनवते तसेच उर्जा देते. त्याचबरोबर ह्या आसनाच्या नियमित सरावाने फुफ्फुसांना देखील उत्तेजन मिळते आणि फुफ्फुसांचे देखील कार्य चांगल्या प्रकारे चालते.
  • या प्रकारचे आसन नियमितपणे केल्यामुळे आपल्या हाताचे स्नायू मजबूत होतात.
  • या आसनामुळे मन शांत होण्यास मदत होते त्यामुळे ज्या लोकांना खूप तणाव आहे किंवा सतत चिंताग्रस्त असतात अश्या लोकांच्यासाठी मयुरासन हा चांगला उपयोग आहे.
  • मयुरासणाच्या नियमित सरावाने पचनशक्ती देखील सुधारण्यास मदत होते.
  • मयुरासन हा एक सर्वोत्तम असनापैकी एक आहे जे एकाग्रता वाढवण्यास आणि सुधारण्यास मदत करते.
  • मयुरासन केल्यामुळे मुळव्याध आणि मधुमेह यांच्यावर चांगला उपाय आहे. जर या आसनाचा नियमित सराव केला तर मधुमेह आणि मुळव्याध या समस्या दूर होतात.
  • काही स्त्रियांना मासिक पाळीच्या अनेक संशय उद्भवत असतात अश्यांनी जर मयुरासन हे नियमितपणे केले तर त्यांच्या मासिक पाळीच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

मयुरासन कोणी करू नये

मयुरासन हे तसे आरोग्य फायद्यासाठी आणि आणि आरोग्य समस्या दूर करण्यासाठी उपयोगी असले तरी हे काही लोकांनी करू नये ज्यांना काही कायमच्या आरोग्य समस्या आहेत. चला तर आपण खाली पाहूया हे आसन कोणी करू नये.

  • ज्या व्यक्तीला खांदा, कोपर आणि मनगट या अवयवांना दुखापत झाली असेल तर अश्या व्यक्तींनी हे आसन करू नये.
  • ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबधित समस्या आहेत अश्या व्यक्तींनी देखील हे आसन करू नये.
  • हर्नियाचा त्रास असणारे व्यक्तींनी देखील हे आसन करू नये.
  • त्याचबरोबर मासिक पाळीच्या काळामध्ये देखील स्त्रियांनी हे आसन करू नये.
  • गर्भवती स्त्रियांनी देखील हे आसन करू नये.

आम्ही दिलेल्या mayurasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मयूरासन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ardha pincha mayurasana information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mayurasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mayurasana information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!