भरत आंधळे यांची माहिती Bharat Andhale Biography in Marathi

Bharat Andhale Biography in Marathi – Bharat Andhale Information in Marathi भरत आंधळे यांची माहिती मित्रांनो जर करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. सातत्य व कठोर परिश्रमाच्या बळावर सर्वसाधारण माणसांमध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची ताकद असते. आपण नेहमी म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे परंतु सिन्नरच्या भरत आंधळे यांच्या आयुष्यामध्ये मात्र ही म्हण खोटी ठरली. अपयशाचा अख्खा डोंगर चढल्यावर त्यांनी आयुष्यामध्ये यशाच उंच शिखर गाठलं. भरत आंधळे यांचा प्रेरणादायी प्रवास अत्यंत संघर्षमय ठरला आहे आणि आजच्या लेखामध्ये आपण भरत आंधळे यांची तरुणांना प्रेरणा देणारी जीवन कथा जाणून घेणार आहोत.

Bharat Andhale Biography in Marathi
Bharat Andhale Biography in Marathi

भरत आंधळे यांची माहिती – Bharat Andhale Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)भरत आंधळे
जन्म (Birthday)१ सप्टेंबर १९७७
जन्म गाव (Birth Place)नाशिक मधील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या गावात
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आयआर‌एस

जन्म

१ सप्टेंबर १९७७ रोजी भरत आंधळे यांचा जन्म नाशिक मधील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या गावात झाला. भरत आंधळे यांचे कुटुंब गरीब होतं घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य होतं शिवाय शिक्षण घेणारे भरत आंधळे हे त्यांच्या घरातील एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या वडिलांचं दुसरी इयत्ते पर्यंतच शिक्षण झालं होतं. छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर शेती करून भरत आंधळे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता.

भरत आंधळे यांचे प्राथमिक शिक्षण ते राहत असलेल्या गावातील शाळेतूनच झालं परंतु ते अशा शाळेतून शिक्षण घेत होते जिथे वर्ग शिक्षिका फक्त हजेरी लावायची. त्यामुळे भरत आंधळे यांना शिक्षणाची फारशी आवड नव्हती. भारत आंधळे यांच पुढील शिक्षण रयत शिक्षण संस्था या शाळे मधून पूर्ण झालं. दहावीमध्ये भरत आंधळे यांना ५४.४२ टक्के गुण मिळाले आणि ते दहावीची परीक्षा पास झाले.

हे भरत आंधळे यांच्या आयुष्यातील सर्वाधिक गुण होते. भरत आंधळे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव शिक्षित व्यक्ती होते त्यामुळे दहावीनंतर पुढे त्यांनी घरच्यांना आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी म्हणून नाशिक मधून आयटीआयचा कोर्स केला आणि बारावीपर्यंतची परीक्षा एक्स्टर्णल म्हणून दिली.या मधल्या काळामध्ये त्यांनी नाशिक येथील हिंदुस्तान फास्टनर या कंपनीमध्ये कामगार म्हणून नोकरी केली. इसवी सन १९९९ मध्ये त्यांनी बी.ए च‌ शिक्षण पूर्ण केल.

आयआर‌एस भरत आंधळे सर

१९९९ मध्ये ५०.८३ टक्क्यांनी बीएची पदवी मिळवली. भरत आंधळे यांनी त्यांच ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण स्वतःच्या पायावर केलं. ते नाशिकच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत होते. ग्रॅज्युएशन झाल्यावर काय करायचं याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता परंतु कंपनीत काम करणाऱ्या मित्राच्या भावाकडून भरत आंधळे यांना पीएसआय परीक्षे बद्दल माहिती मिळाली.

हे पद खूप मोठं असतं हे भरत आंधळे यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मनात ठरवलं की त्यांना पीएसआय बनायचं आहे. प्रशासकीय परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी नाशिकची नोकरी सोडून भरत आंधळे यांनी पुणे गाठलं. भरत आंधळे हे छोट्याशा गावातील ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य तरुण होते त्यांच्या घरच्यांना प्रशासकीय परीक्षा काय असतात याची कल्पना देखील नव्हती.

त्यांच्या तालुक्यातून प्रशासकीय परीक्षांची तयारी करणारे साधारणता ते पहिले होते. घरच्यांना जेव्हा त्यांनी ते प्रशासकीय परीक्षेची तयारी करत आहेत याची कल्पना दिली तेव्हा घरच्यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की तू कुठेही जा काहीही कर पण आमच्या कडे काही पैसे मागू नकोस.

परंतु भरत आंधळे यांनी ठरवलं होतं की ते पुणे विद्यापीठात जाऊन आयपीएसची तयारी करणार ४ ऑगस्ट २००० रोजी त्यांनी पुण्याची गाडी पकडली. ते त्यांच्या ध्येयावर ठाम होते पुन्हा काहीतरी मोठं बनवून दाखवायचं होतं. पुणे विद्यापीठात गेल्यावर त्यांनी एम.ए या पदवीसाठी अर्ज भरला परंतु त्यावेळी त्यांना लक्षात आलं की पुणे विद्यापीठामध्ये होस्टेलमध्ये राहायचं असेल तर त्यासाठी डिस्टिंक्शन लागत.

जे भरत आंधळे यांच्याकडे नव्हतं भरत आंधळे एक सर्वसाधारण विद्यार्थी होते त्यांना शाळेमध्ये असताना देखील दोन तीन विषयांत खाली लाल रेषा असायची. तसेच कॉलेजमध्ये असताना देखील त्यांना दोन-तीन विषयांमध्ये केटी देखील लागली होती. अशामध्ये डिस्टिंक्शन तर खूपच लांब राहिलं त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्‍न निर्माण झाला सुरुवातीला ते दिवसभर युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करायचे आणि नंतर संध्याकाळ झाली की पुण्याच्या शिवाजी बस स्थानकावर जाऊन झोपी जायचे.

सुरुवातीचा काळ त्यांनी बसस्थानकावर झोपूनच घालवला नंतर विद्यापीठातील त्यांच्या एका गावाकडच्या मित्राने त्यांना वस्तीगृहात राहण्यास परवानगी दिली आणि त्या वस्तीगृहातल्या खोलीतून भरत आंधळे यांच्या जीवनाचा खडतर प्रवास सुरू झाला. भरत आंधळे यांनी मनात ठरवलं होतं की त्यांना आयपीएस बनायचं आहे कारण त्यांच्यासाठी ती पोस्ट खूप मोठी होती.

कमवा व शिका या योजनेअंतर्गत त्यांनी विद्यापीठातील सकाळी साडेचार ते साडेआठ वाजेपर्यंत झाडांना पाणी घालने, झाडलोट करणे अशी कामे केली आणि त्यानंतरचा पूर्ण वेळ त्यांनी विद्यापीठातील लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यात घालवला. २००१ मध्ये भरत आंधळे यांनी पीएसआय या परीक्षेची पूर्व परीक्षा व मेन्स दिली.

२००३ मध्ये या परीक्षेचा निकाल लागला आणि भरत आंधळे यांच सिलेक्शन झालं. भरत आंधळे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न होतं पीएसआय बनायचं त्यासाठी त्यांनी जीव तोडून अभ्यास केला होता. परंतु नेमकी त्याच वेळी त्यांच्या खोलीमध्ये राहणारा अजित जोशी नावाचा तरुण त्याच वर्षी यूपीएससीची परीक्षा पास झाला होता त्यावेळी सहज उत्सुकतेने भरत आंधळे यांनी त्या मुलाला युपीएससी आणि एमपीएससी या दोन परीक्षां मधला फरक विचारला आणि त्या वेळी भरत आंधळे यांच्या लक्षात आलं की युपीएससी ही परीक्षा एमपीएससी या परीक्षे पेक्षाही खूप मोठी असते आणि जर या परीक्षेत आपण पास झालो तर आपलं नाव अजून मोठं होऊ शकत.

भरत आंधळे यांना आयुष्यामध्ये खूप मोठ व्हायचं होतं. आणि त्यासाठी त्यांना मोठ्या ध्येयाची गरज होती आणि ते ध्येय त्यांनी ठरवलं त्यांनी आता यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आता यूपीएससीची तयारी करणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं कोचिंग क्लासेसची गरज होती परंतु भरत आंधळे यांनी यूपीएससीची परीक्षा पास होईपर्यंत कुठलेही कोचिंग क्लासेस लावले नाहीत.

त्यांनी स्वबळावर ही परीक्षा दिली. मुंबईतील राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा त्यांना आधार मिळाला. २००४ च्या यूपीएस परीक्षेसाठी त्यांनी तयारी सुरू केली मे महिन्यामध्ये यूपीएससीची परीक्षा होती. भरत आंधळे यांनी मे २००४ मध्ये युपीएससीची पूर्व पूर्वपरीक्षा दिली. ऑगस्ट मध्ये परीक्षेचा निकाल देखील जाहीर झाला आणि या वेळी भरत आंधळे अपयशी ठरले परंतु त्यांनी पुन्हा २००५ मध्ये यूपीएससीची पूर्वपरीक्षा दिली यावेळी पुन्हा त्यांना अपयश आलं.

दोन वेळा अपयश येऊन सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा तिसर्यांदा प्रयत्न करायच ठरवलं परंतु यावेळी अभ्यासावर आणखीन जास्त लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आणि २००६ च्या युपीएससीच्या परीक्षेसाठी ते पुन्हा सज्ज झाले. २००६ मध्ये पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व परीक्षा केंद्र सुरू झालं होतं आणि या वेळी भरत आंधळे यांनी खूप जास्त अभ्यास करून यूपीएससीची पूर्वपरीक्षा पास झाले‌. त्यांना इंग्रजी माध्यमाची भीती वाटायची म्हणून त्यांनी यूपीएससीची एक्झाम मराठी माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला.

परंतु यावेळी ते अपयशी ठरले परंतु हार न मानता त्यांनी पुन्हा एकदा २००७ मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी तयारी केली परंतु यावेळी त्यांनी पुन्हा तीच चूक केली. त्यांनी युपीएससीची परीक्षा मराठीतून दिली आणि पास होण्यासाठी त्यांना सात मार्क कमी पडले आणि पुन्हा यावेळी ते अपयशी ठरले.

२००८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली परंतु यावेळी त्यांनी इंग्रजी माध्यमातून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पूर्व परीक्षा झाली मग मुख्य परीक्षा झाली दोघांचा निकाल पास आल्या नंतर त्यांनी यूपीएससीच्या इंटरव्यू साठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे त्यांचा इंटरव्यू देखील झाला परंतु यावेळी देखील त्यांच्या पदरामध्ये अपयश आलं.

परंतु आता २००९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षेचा अंतिम प्रयत्न करून बघण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी गेल्या वेळेपेक्षा जास्त अभ्यास केला. यूपीएससीची पूर्वपरीक्षा दिली त्यामध्ये ते पास झाले यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली त्यामध्ये देखील ते पास झाले. पुन्हा एकदा त्यांनी युपीएससीच्या इंटरव्यू साठी दिल्ली गाठली. ६ एप्रिल २०१० मध्ये त्यांचा यूपीएससीचा इंटरव्यू होता. मे च्या पहिल्या हप्त्यामध्ये यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल लागणार होता.

निकाल लागला आणि भरत आंधळे युपीएससीची परीक्षा पास झाले होते त्यांचे सिलेक्शन झालं होतं. ट्रेनिंगला जायच्या आधी त्यांनी १०० हून अधिक लेक्चर घेतले. गेली दहा वर्षे ते प्रशासकीय परीक्षेची तयारी करत होते आणि अखेर अतिशय कठोर परिश्रमानंतर त्यांना यश प्राप्त झालं. त्यांचं स्वप्न होतं सनदी अधिकारी होण्याचं आणि दहा वर्षाच्या सतत प्रयत्नानंतर त्यांनी ते सत्यात उतरवलं.

आम्ही दिलेल्या bharat andhale biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भरत आंधळे यांची माहिती या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bharat andhale information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of bharat andhale in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bharat andhale irs wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!