विश्वास नांगरे पाटील यांची माहिती IPS Vishwas Nangare Patil Information in Marathi

IPS Vishwas Nangare Patil Information in Marathi विश्वास नांगरे पाटील यांची माहिती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणं गरजेचं असतं आणि असं व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्राला लाभल आहे हे आपले भाग्यच आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजेच विश्वास नांगरे पाटील. अत्यंत हुशार आणि प्रामाणिक असं व्यक्तिमत्व. विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलिस अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत फार उत्तम कामगिरी करून दाखवली आहे आणि ते बरऱ्याच तरुण-तरुणींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहेत. आजच्या लेखामध्ये आपण विश्वास नांगरे पाटील यांच्या कारकीर्द विषयी व त्यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

vishwas nangare patil information in marathi
vishwas nangare patil information in marathi

विश्वास नांगरे पाटील यांची माहिती – IPS Vishwas Nangare Patil Information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

१ जून इसवी सन १९७३ मध्ये सांगलीच्या रांगड्या मातीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म झाला. सांगली मधील शिराळा येथील कोकरूड या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नारायण नांगरे पाटील हे गावचे सरपंच होते. त्यांच्या वडिलांना नेहमी वाटायचं की विश्वास यांनी पैलवान बनावं. विश्वास यांचे बालपणीचे आयुष्य अगदी सुखात गेलं.

विश्वास नांगरे पाटील यांचे शालेय शिक्षण तालुक्यातील शाळे मधूनच पूर्ण झालं. आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर विद्यापीठामध्ये दाखला नोंदवला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून विश्वास यांनी इतिहासात बी. ए. ची पदवी मिळवली. या विषयात त्यांना सुवर्णपदक मिळालं. विश्वास हे लहानपणापासूनच हुशार होते शाळेय‌ जीवनात देखील त्यांचा प्रथम क्रमांक कधीच सुटला नाही.

दहावी मध्ये असताना संपूर्ण तालुक्यामधून त्यांचा पहिला क्रमांक आला होता. असं म्हणतात विश्वास नांगरे पाटील पहाटे साडेतीन ते सकाळी साडेआठ पर्यंत अभ्यास करायचे. त्यानंतर दुपारी चार तास, संध्याकाळी चार तास असा त्यांचा दिवसाचा दिनक्रम ठरलेला असायचा. तल्लख बुद्धी, प्रामाणिकपणा, रुबाबदार असा विश्वास नांगरे पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आहे. पुढे विश्वास नांगरे पाटील यांनी उस्मानाबाद विद्यापीठातून एम. बी. ए ची पदवी घेतली. महाविद्यालयामध्ये त्यांना उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार जाहीर झाला होता.

आयपीएस विश्वास नांगरे पाटील

विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बण्या पर्यंतचा प्रवास अतिशय खडतर व त्यासोबतच प्रेरणादायी राहिला आहे. उस्मानाबाद विद्यापीठातून एम. बी. ए ची पदवी उत्तीर्ण झाल्यावर विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासकीय अभ्यास सुरू केला. ते लहानपणापासुनच अतिशय हुशार होते. त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळायचे त्यांच्या तल्लख बुद्धीचा वापर करून ते कुठल्याही इतर क्षेत्रांमध्ये जाऊ शकत होते. परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांना पोलिस अधिकारी व्हायचं होतं जनतेची सेवा करायची होती.

जनतेचे रक्षण करायचं होतं आणि ते आपल्या ध्येयावर टिकून राहिले. आज विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये अधिकारी आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे पोलीस महानिरीक्षक पदावर ते काम करत आहेत. विश्वास नांगरे पाटील यांनी आज पर्यंत आपल्या पदाचा योग्य तो वापर करून सतर्क राहून जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला.‌

विश्वास नांगरे पाटील यांनी शौर्याचं एक पाऊल पुढे ठेवत ध्येय दाखवून खूप महान कारकीर्द केली आहे. त्यातीलच एक म्हणजे पुणे रेव पार्टी प्रकरण. ज्यावेळी विश्वास नांगरे पाटील पुण्यामध्ये जिल्हा ग्रामीण भागामध्ये अधीक्षक होते त्यावेळी रेव पार्टी प्रकरण घडलं तर झालं असं की, पुण्याच्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोनजे गावातील शेतामध्ये तरुण आणि तरुणींची पार्टी सुरू होती.

त्या वेळी विश्वास नांगरे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजेच पुणे ग्रामीण जिल्हा मधील पोलीस अधिकाऱ्यांनी ४ मार्च २००७ रोजी या ठिकाणी छापा टाकून जवळपास २७८ तरुण व तरुणींना अटक केलं. पुढे या तरूण व तरुणींचे ब्लड टेस्टचे सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आणि त्यातून असं जाहीर झालं की २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केलं होतं.

या प्रकरणानंतर विश्वास नांगरे पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. ते एक अत्यंत हुशार व प्रामाणिक अधिकारी आहेत. हे यातून सिद्ध झालं. मुंबईत झालेल २६/११ हल्ला प्रकरण हे तर सर्वांनाच माहित आहे. तर झालं असं मुंबईतील ताज हॉटेल हे मुंबईचं मुख्य आकर्षण आहे. जिथे पर्यटकांची फारच गर्दी पाहायला मिळते.

हेच मुख्य आकर्षण दहशतवाद्यांचं मुख्य ध्येय बनलं आणि २६ नोव्हेंबर २००८ मध्ये ताजमहाल हॉटेल येथे दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यामध्ये बरेचसे निष्पाप जीव मारले गेले, प्रचंड प्रमाणावर जैविक नुकसान व मालमत्तेचे नुकसान झाले. अशा प्रसंगांमध्ये तिकडच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन विश्वास नांगरे पाटील यांनी अतिशय धैर्याने ताजमहाल हॉटेलच्या आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला.

हॉटेलमध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. हॉटेल मध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता. अशा परिस्थितीमध्ये विश्वास नांगरे पाटील दोन कॉन्स्टेबल सोबत अंगावर कुठल्याही प्रकारचं सुरक्षा कवच न घालता गोळीबार सुरू असलेल्या भागांमध्ये पोहोचले. समोरून दहशतवाद्यांच्या होणाऱ्या गोळीबाराला प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी त्यांच्या सोबत ९ एमएम ही पिस्तूल सोबत ठेवली होती.

दहशतवादाचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्या पर्यंत पोहोचले. दहशतवाद्यांना त्यांनी ताज हॉटेल च्या नवीन इमारतीमध्ये जाऊन देण्यापासून रोखून ठेवलं. ताज हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम होतं. विश्वास नांगरे पाटील कंट्रोल रूममध्ये पोहोचले आणि तिथून त्यांनी झी टीव्ही च्या मार्फत दहशतवाद्यांवर लक्ष ठेवलं आणि त्यांच्या हालचाली चा रिपोर्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत राहिले.

विश्वास नागरे पाटील यांची ही लढाई सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. सकाळी सात वाजल्यानंतर एनएसजी चे कमांडो यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. हे कमांडो येईपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांनी आपल काम अत्यंत जबाबदारीने पार पाडलं. विश्वास नागरे पाटील यांनी करून दाखवलेली हि एक प्रसिद्ध कामगिरी आहे. विश्वास नांगरे पाटील एक उत्तम आणि प्रेरणादायी वक्ते आहेत.

ते बऱ्याच विद्यार्थ्यांना यूपीएससीचे मार्गदर्शन करतात. यासाठी ते राज्याबाहेर देखील जातात. आज पोलीस क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छा बाळगणार्‍या बरऱ्याच तरुण व तरुणींचे रोल मॉडेल आहेत विश्वास नांगरे पाटील. एक पोलीस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील त्यांचे काम अत्यंत जबाबदारीने व निष्ठेने पार पाडत आहेत.

जनतेबद्दल असणारी त्यांची काळजी व जनतेची सेवा करण्याची इच्छा असणार त्यांच स्वप्न ते त्यांच्या कार्यातून सत्यात उतरवत आहेत. विश्वास नांगरे पाटील यांच्या कारकिर्दीची सुरुवात अहमदनगर येथून झाली. अहमदनगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा दिली. पुढे‌ २००५ ते २००८ पर्यंत पुणे इथे ते जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होते.

२००८ पासून ते २०१० पर्यंत विश्वास नांगरे पाटील मुंबई पोलीस उपायुक्त मध्ये सेवा देत आहेत. नंतर ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी बराच वेळ सेवा दिली. २०१६ पासून विश्वास नांगरे पाटील कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक म्हणून २०१९ पर्यंत सेवा देत होते. मुंबईच्या दक्षिण विभागांमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्य केलं.

नाशिक पोलीस आयुक्त म्हणून देखील त्यांनी सेवा दिली आहे. आणि सध्या ते मुंबईमध्ये पोलीस सहआयुक्त आहेत.‌ विश्वास नागरे पाटील यांना त्यांनी केलेल्या अवल्लनीय कार्याबद्दल २०१३ मध्ये त्यांना राष्ट्रपती शौर्यपदक हा पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना गौरविण्यात आलं. आज विश्वास नांगरे पाटील खुप मोठं व्यक्तीमत्व बनले आहेत महाराष्ट्राची शान आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता जिद्द आणि कष्ट ह्या दोन गोष्टींवर आज ते इथपर्यंत पोहोचले आहेत. लहानपणी त्यांनी अभ्यास एके अभ्यास ‌हे वाक्य मनात घट्ट करून ठेवलं ज्यामुळे ते आज उच्च पदावर आहेत. आज त्यांना प्राप्त झालेले यश हे त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची, मेहनतीची कष्टाची पोचपावती आहे. सोशल मीडियावर विश्वास नांगरे पाटील यांचे बरेसचे चाहते आहेत.

आज प्रत्येक तरुणाला विश्वास नांगरे पाटील यांच्या सारखं व्यक्तिमत्त्व व्हावं असं वाटतं. सोशल मीडियावर देखील ते त्यांच्या पोस्ट मधून त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा देत असतात, प्रेरणादायी संदेश देत असतात. विश्वास नांगरे पाटील यांचे व्यक्तिमत्व इतकं सुरेख आहे अगदी लहानांपासून ते जेष्ठ वर्गापर्यंत ते सर्वांचे लाडके व आदर्शनीय असे पोलिस ऑफिसर आहेत.

आम्ही दिलेल्या ips vishwas nangare patil information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विश्वास नांगरे पाटील यांची माहिती information of vishwas nangare patil in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yoga information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about vishwas nangare patil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vishwas nangare patil all information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!