Chicken Rassa Recipe in Marathi चिकन रस्सा रेसिपी भारतामध्ये चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात आणि चिकन प्रेमी त्या आवडीने खातात यामधील काही लोकप्रिय चिकन रेसिपीज म्हणजे चिकन मसाला, चिकन टिक्का, चिकन सुक्का या सारख्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात आणि चिकन सुक्क्या बरोबर हमखास बनवली जाणारी रेसिपी म्हणजे चिकन रस्सा. चिकन रस्सा हा पदार्थ नॉनव्हेजीटेरीयन लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि हा पदार्थ ताटा मध्ये वाढला. असेल तर हा पदार्थ पहिल्यांदा संपतो आणि हा लोक जेवते वेळी वारंवार मागून पिला जातो.
चिकन रस्सा हि जरी महाराष्ट्रीयन डिश असली तरी हि रेसिपी भारतामधील बहुतेक भागामध्ये बनवली जाते आणि आवडीने या रेसिपीचा आस्वाद घेतला जातो. चिकन रस्सा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनते आणि हे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर आता आपण चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात.
चिकन रस्सा रेसिपी – Chicken Rassa Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( भारतीय ) |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चिकन रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम वळलेले खोबरे, कोथिंबीर, काही मसाले घालून त्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली जाते आणि मग चिकनला फोडणी दिली जाते आणि फोडणीमध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर, कांदा आणि टोमॅटो घाला आणि मग त्यामध्ये चिकन चांगले भाजा आणि मग त्यामध्ये पेस्ट घाला आणि पेस्ट चांगली मिक्स करून त्यामध्ये रस्सा बनवण्यासाठी पाणी आणि मीठ घालून रस्सा बनवा आणि १० ते १५ मिनिटे चिकन त्यामध्ये चांगले मऊ शिजू द्या.
- चिकन : चिकन रस्सा बनवण्यासाठी चिकन हे मुख्य साहित्य आहे. ज्यामध्ये इतर साहित्य घालून त्याचा रस्सा बनवला जातो.
- खोबरे : चिकन रस्स्यामध्ये बारीक वाटलेले खोबरे घातल्यामुळे रस्सा थोडा घट्ट होतो आणि टेस्ट देखील चांगली येते.
- गरम मसाला : रस्स्यामध्ये गरम मसाला वापरल्यामुळे रस्सा मसालेदार आणि स्वादिष्ट होतो.
चिकन रस्सा रेसिपी – chicken curry recipe in marathi
चिकन रस्सा हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक स्वयंपाक घरांमध्ये वारंवार बनवली जाणारी रेसिपी आहे कारण काही घरांमध्ये आठवड्यातून एक दिवस चिकन बनवण्याचा बेत असतो आणि त्यावेळी चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवले जाते आणि हे शक्यतो भाकरी सोबत सर्व्ह केली जाते.
चिकन रस्सा हा पदार्थ नॉनव्हेजीटेरीयन लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि चिकन रस्सा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनते आणि हे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर आता आपण चिकन रस्सा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन (भारतीय) |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चिकन रस्सा बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते, तर काही काही साहित्य आपल्या बाजारातून विकत आणावे लागते जसे कि चिकन, गरम मसाला आणि काही इतर साहित्य आणि हे आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर आता आपण चिकन रस्सा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- अर्धा किलो चिकन ( छोटे छोटे तुकडे ).
- १ वाटी खोबरे ( खिसलेले ).
- २ चमचे लसून पाकळ्या.
- १ चमचा अल्ल्याचे तुकडे.
- २ चमचे कोथिंबीर.
- १ चमचा गरम मसाला.
- २ ते ३ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- अर्धा मोठा चमचा तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
चिकन रस्सा हा घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी खूप स्वादिष्ट लागते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात.
- चिकन रस्सा बनवताना सर्वप्रथम चिकन स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्याला थोडीसी हळद आणि मीठ लावून ते २० मिनिटे मॅरीनेट करा.
- आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आले, लसून, खोबरे आणि खोबरे घाला आणि ते मिक्सरवर फिरवून त्याची बारीक पेस्ट करा. मिक्सरवर हे मिश्रण बारीक करताना त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि त्याची एकदम बारीक पेस्ट करा आणि ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल घाला आणि तेल गरम कि त्यामध्ये कांदा घाला आणि कांदा थोडा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या मग त्यामध्ये टोमॅटो घाला आणि टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्या.
- आता यामध्ये चिकन घाला आणि चिकन फोडणीमध्ये मिक्स करून ते ९ ते १० मिनिटे त्याचा खमंग वास येईपर्यंत भाजा.
- मग यामध्ये लाल चटणी, हळद आणि गरम मसाला घाला आणि ते मिक्स करा मग त्यामध्ये बनवून ठेवलेली पेस्ट घाला आणि ती मिक्स करून ४ ते ५ मिनिटे सतत हलवत राहून भाजून घ्या.
- आता यामध्ये तुम्हाला जितका पातळ रस्सा हवा आहे त्या हिशोबाने त्यामध्ये गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून रस्सा परत १० ते १५ मिनिटे किंवा चिकन मऊ होईपर्यंत शिजू द्या.
- चिकन चांगले शिजले कि गॅस बंद करा. चिकन रस्सा सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
चिकन रस्सा कश्यासोबत खाल्ला जातो – serving suggestions
- चिकन रस्सा आपण तसाच गरमागरम पिऊ शकतो किंवा मग पांढऱ्या भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपाती सोबत खावू शकतो.
आम्ही दिलेल्या chicken rassa recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चिकन रस्सा रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kolhapuri chicken rassa recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken pandhra rassa recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kolhapuri chicken tambda rassa recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट