स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय Concentration Tips in Marathi

concentration tips in marathi स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये एकाग्रता (concentration) सुधारण्यासाठी कोणकोणते टिप्स फॉलो करू शकतो या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. एकाग्रता हि खूप महत्वाची असते कारण आपण एखादे काम करत असेन तर त्या कामामध्ये आपले पूर्ण मन लावून म्हणजेच एकाग्रतेने काम केले तरच ते चांगले होऊ शकते त्यामुळे आपण कोणतेही काम असुदे ते एकाग्रतेने केले कि त्या कामामध्ये काहीही गडबड होत नाही तसेच आपल्याला त्या कामाबद्दल पटकन समजते आणि त्या पाठीमागचा हेतू किंवा संकल्पना काय आहे ते देखील समजते.

आता सध्या या दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जे लोक ऑफिस मध्ये काम करत होते ते सध्या घरी बसून काम करतात (work from home) आणि त्याची एकाग्रता हि ऑफिस सारखी घरामध्ये लागत नाही म्हणजेच घरामध्ये काम करत असताना त्यांचे मन सतत विचलित होत असते. अश्या प्रकारे आपण कोणतेही काम करत असताना अनेक वेळा आपले मन एकाग्र चित्ताने काम करत नाही ते सतत भिरकटत असते म्हणून अशा लोकांनी आपले मन एकाग्र करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत किंवा काही आयडिया वापरल्या पाहिजेत.

ज्या लोकांचे कोणतेही काम करताना एकाग्रता लागत नाही किंवा त्यांचे त्या कामातून मन विचलित होते अशा लोकांनी आपले मन एकाग्र करण्यासाठी ध्यान, योगा आणि या सारखे अनेक उपाय केले पाहिजेत ज्यामुळे त्यांची एकाग्र क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होईल. चला तर आता आपण आपले मन एकाग्र करण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहूया.

concentration tips in marathi
concentration tips in marathi

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय – Concentration Tips in Marathi

एकाग्रता म्हणजे काय ?  what is mean by concentration 

एकाग्रता म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्याही कामावर, विषयावर किंवा वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याची आणि त्याच वेळी मनातून सर्व असम्बाधित विचार, भावना, संवेदना आणि कलपना काढून टाकण्याची क्षमता किंवा शक्ती म्हणजे एकाग्रता.

एकाग्रतेवर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात

एकाग्रता हि कोणत्याही कामामध्ये खूप महत्वाची असते परंतु काही वेळा आपल्या एकाग्रतेवर अनेक गोष्टी किंवा घटक परिणाम करतात आणि त्यामुळे आपले कामातून मन विचलित होते. खाली आपण एकाग्रतेवर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात ते पाहणार आहोत.

 • तुमचे कामामधून मन विचलित होण्याच्या कारण म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असता त्या ठिकाणी खूप गोंगाट असेल किंवा आजूबाजूला कसलातरी आवाज असेल तर तुमचे मन विचलित होते आणि त्यामुळे तुमचे मन एकाग्र होत नाही.
 • जर तुमची दिवसामध्ये शारीरिक हालचाल हि खूप कमी होत असेल तर या मुळे देखील तुमचे मन कोणत्याही कामामध्ये विचलित होऊ शकते.
 • जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुमचे मन विचलित होण्याची शक्यता असते.
 • जर एखाद्या व्यक्तीची झोप चांगल्या प्रकारे झाली नसेल तर ते तुमच्या एकाग्रतेवर परिणाम करू शकते.
 • पर्यावरण किंवा आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावर देखील आपली कामामध्ये किती एकाग्रता लागते हे परिणाम करू शकते.

एकाग्रता यावर टिप्स – study concentration tips in marathi

काही वेळा अनेक लोक एकाग्र चित्ताने आपले काम करू शकतात पण काही वेळा त्यांचे मन विचलित होऊ शकते पण कोणतेही काम करताना आपले मन हे एकाग्र असणे खूप गरजेचे असते म्हणून आज आपण या लेखामध्ये कोणत्याही कामामध्ये एकाग्रता कशी राखावी या बद्दल टिप्स पाहणार आहोत.

 • अनेक लोक आहे जे आपल्या अनेक समस्येसाठी ध्यान साधना याचा सराव करतात यामुळे आपले मन खूप फ्रेश आणि प्रसन्न होते. जर आपल्याला एकाग्रतेची क्षमता वाढवायची असेल तर तुम्ही देखील कमीत कमी अर्धा तास तरी ध्यान केले पाहिजे ज्यामुळे तुमची एकाग्रता क्षमता वाढू शकते. तसेच तुम्ही साधने सोबत अनेक योगासने देखील केले पाहिजेचे तसेच श्वासाचे व्यायाम देखील केले पाहिजेत.
 • तुमचे एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील बदल केला पाहिजे म्हणजे तुम्ही तेलकट, जंक फूड किंवा फास्ट फूड या सारखे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही पौष्टिक जसे कि फळे, सुका मेवा, पालेभाज्या आणि कडधान्य या सारखे अन्न खा. यामुळे देखील तुमची एकाग्रता वाढेल.
 • सध्या एका वेळी अनेक किंवा २ ते ३ कामे करण्याची क्रेझ आली आहे ज्याला आपण मल्टीटास्किंग (multitasking) म्हणतात. ज्यावेळी आपण मल्टीटास्किंग (multitasking) करत असतो म्हणजेच एका वेळी २ ते ३ कामे करत असतो त्यावेळी आपली एकाग्रता एका कामामध्ये राहत नाही तर त्याचे विभाजन केले जाते आणि त्यामुळे आपल्या एकाग्रतेचे विभाजन होते आणि म्हणून तुम्ही मल्टीटास्किंग (multitasking) करू नका एका वेळी एकाच काम एकाग्रतेने करा.
 • जर तुम्ही एके ठिकाणी बसून दिवसभर काम करत असाल तर त्यामुळे आपल्याला कंटाळा जाणवू शकतो आणि आपले कामामधून लक्ष देखील विचलित होऊ शकते त्यामुळे आपण थोड्या थोड्या वेळाने ५ ते १० मिनिटाची विश्रांती घेवून जर परत कामाला सुरुवात केली तर आपल्या कामावरची एकाग्रता वाढते आणि आपले काम लवकर होण्यास मदत होते.
 • जर तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवायची असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठा आणि फिरायला जा तसेच तुम्ही सकाळी व्यायाम देखील करा यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल आणि तुमचे काम देखील चांगल्या प्रकारे होईल.
 • आपण जर कंटाळा आल्यानंतर गाणी ऐकली तर आपले मन थोडे प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या कामामधील एकाग्रता वाढते आणि त्यामुळे आपले कामे जोमाने होण्यास मदत होते.
 • तुम्ही तुमच्या दिनचर्येचे वेळापत्रक ठरवा त्यामुळे तुमची कामे हि वेळोवेळी मन लाऊन करतात येतील.
 • तुम्हाला जर तुमचे काम हे एकाग्र चित्ताने करायचे असेल तर तुम्ही तुमचे कोणतेही काम करत असताना एका विशिष्ठ वेळेचा टायमर (timer) लावा आणि त्या वेळा मध्ये तुमचे एकाग्र चीत्ताने काम करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमची कामामधील एकाग्रता वाढण्यास मदत होईल.
 • काही वेळा असे देखील होते कि आपल्याला दिवसभरामध्ये अशी अनेक कामे असतात ज्या कामाच्या तणावा मुळे देखील आपले कामावरची लक्ष विचलित होते त्यामुळे तुम्ही दिवसातील महत्वाची कामे हि सर्वप्रथम करून घ्या आणि मग जी कमी महत्वाची कामे आहेत ती नंतर करा किंवा ती कामे स्वीच करा.
 • असे म्हणतात कि एकाद्या व्यक्तीची झोप जर चांगल्या प्रकारे झाली नाही तरी देखील त्या व्यक्तीला एकाग्र चित्ताने काम करता येत नाही त्यामुळे तुम्हाला एकाग्र चित्ताने काम करायचे असेल तर तुम्ही ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे.
 • तुम्हाला जर एकाग्र चित्ताने काम करायचे असेल तर तुम्हाला तणाव मुक्त राहणे देखील खूप गरजेचे असते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या concentration tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या study concentration tips in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!