दाल पालक रेसिपी Dal Palak Recipe in Marathi

Dal Palak Recipe in Marathi दाल पालक रेसिपी डाळ पालक हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक घरांमध्ये बनवली जाते आणि हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. या पदार्थाला पौष्टिक म्हणायचे कारण या पदार्थामध्ये पालक वापरलेला असतो आणि पालक मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. पालक पासून अनेक वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात जसे कि पालक पनीर, पालक भजी, पालक पुरी आणि आणखीन एक पालक वापरून केलेला पदार्थ म्हणजे डाळ पालक. डाळ पालक हि रेसिपी बनवताना सर्वप्रथम डाळ कुकरमध्ये शिजवली जाते आणि मग दुसरीकडे एका कढई मध्ये आले लसून पेस्ट, कांदा, लाल मिरची पावडर आणि हळद घालून फोडणी दिली जाते.

आणि त्यामध्ये पालक भाजला जातो आणि मग शिजवलेली डाळ त्यामध्ये मिक्स करून मग त्याला वरून मोहरी, लसून आणि लाल तिखट याची फोडणी दिली जाते. डाळ पालक हि डिश आपल्याला धाब्यावर देखील मिळते आणि काही लोक धाब्यावर देखील हि रेसिपी ऑर्डर करून खातात पण आपण धाब्यासारखी रेसिपी घरी देखील बनवू शकतो.

डाळ पालक हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेत म्हणजेच ३० ते ३५ मिनिटामध्ये कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर आता आपण डाळ पालक रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

dal palak recipe in marathi
dal palak recipe in marathi

दाल पालक रेसिपी – Dal Palak Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

डाळ पालक म्हणजे काय ? 

डाळ पालक हि रेसिपी बनवताना सर्वप्रथम डाळ कुकरमध्ये शिजवली जाते आणि मग दुसरीकडे एका कढई मध्ये आले लसून पेस्ट, कांदा, लाल मिरची पावडर आणि हळद घालून फोडणी दिली जाते आणि त्यामध्ये पालक भाजला जातो आणि मग शिजवलेली डाळ त्यामध्ये मिक्स करून मग त्याला वरून मोहरी, लसून आणि लाल तिखट याची फोडणी दिली जाते.

डाळ पालक रेसिपी – How to make dal palak recipe 

डाळ पालक रेसिपी हि भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवली जाणारी डीश आहे आणि हि डिश एक साईड डिश म्हणून बनवली जाते आणि रोटी किंवा चपाती सोबत सर्व्ह केली जाते. डाळ पालक हि रेसिपी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने म्हणजेच थोड्या फरकाने बनवली जाते आणि हि रेसिपी घरी बनवण्यास खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये तयार होते. चला तर आता आपण डाळ पालक रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

डाळ पालक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dal palak recipe 

डाळ पालक बनवण्यासाठी लागणारे बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते पण आपल्या डाळ पालक बनवण्यासाठी जो पालक लागतो तो ताजा असावा. त्याचबरोबर डाळ पालक बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य घरामध्ये उपलब्ध नसेल. तर ते आपण बाजारातून विकत आणावे लागते.

  • १ वाटी तुरीची डाळ.
  • १ वाटी बारीक चिरलेला पालक .
  • २ चमचे आले लसून पेस्ट.
  • १ कांदा ( बारीक चिरलेला )
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • ५ ते ६ लसून पाकळ्या ( ठेचलेल्या ).
  • १ चमचा हिरवी मिरची पेस्ट.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • अर्धा चमचा हळद.
  • १/२ चमचा मोहरी ( राई ).
  • १/२ चमचा जिरे.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार )

डाळ पालक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dal palak recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून धाब्यासारखी स्वादिष्ट डाळ पालक रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • डाळ पालक बनवताना सर्वप्रथम १ वाटी तुरीची डाळ घ्या आणि मग ती स्वच्छ निवडून पाण्याने स्वच्छ धुवून ती पाण्यामध्ये डाळ बुडेल असे पाणी घालून ती भिजवण्यासाठी ठेवा. हि डाळ किमान १० ते १५ मिनिटे भिजू द्या.
  • आता हि डाळ पाण्यासोबत कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये आणखीन पाणी घालण्याची गरज असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि कुकरला झाकण लावून गॅसवर मोठ्या आचेवर २ ते ३ शिट्या येवू द्या म्हणजेच डाळ चांगली शिजेल. २ ते ३ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा आणि कुकर थंड होऊ द्या.
  • कुरकार ठाण होई पर्यंत कांदा आणि पालक चिरून घ्या .
  • मग गॅसवर मध्य आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा.
  • आता कुकर गार झाला कि त्याचे झाकण उघडा आणि त्यामधील डाळ थोडी रवीने गुसळून घ्या म्हणजेच डाळ एकजीव होईल. ( टीप : हे डाळीचे मिश्रण जास्त पातळ आणि जास्त घट्ट करायचे नाही ते सरसरीत असावे त्यामुळे कुकरमध्ये डाळ शिजायला घालताना त्यामध्ये पाणी काळजी पूर्वक घालावे).
  • आता गॅसवर गरम करायला ठेवलेल्या कढई मध्ये २ ते ३ चमचे तेल घालावे आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट आणि आले लसून पेस्ट घालून ते थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यावे म्हणजेच कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजावा.
  • आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हळद घालावी आणि ते मिक्स करावे आणि लगेच त्यामध्ये चिरलेला पालक टाकावा आणि तो पालक ६ ते ७ मिनिटे भाजून घ्यावा.
  • मग या मिश्रणामध्ये आपण शिजवलेली डाळ घालावी आणि ती चांगली मिक्स करावी आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करावे .
  • दुसरीकडे फोडणीची छोटी कढई मध्यम आचेवर गरम करावी आणि त्यामध्ये २ चमचे तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाकावी. मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये जिरे टाकावेत आणि जिरे फुलले कि लगेच त्यामध्ये लसून आणि कडीपत्ता घाला आणि लसून थोडा वेळ भाजू द्या.
  • मग त्यामध्ये १/२ चमचा लाल मिरची पावडर आणि हळद घाला आणि मिक्स करून लगेच हि फोडणी डाळ पालकवर घाला.
  • आता या डाळ पालकला एक उकळी आल्यावर गॅस बंद करा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.

डाळ पालक कश्यासोबत खातात – serving suggestion 

डाळ पालक आपण रोटी, चपाती, नान, पुलके, जीरा राईस किंवा पांढऱ्या भातासोबत देखील खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • जर आपल्याला जास्त तिखट आवडत नसेल तर आपण डाळ पालक मध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घातली नाही तरी चालेल.
  • यामध्ये ज्यावेळी आपण मीठ घालतो त्यावेळी गोडसर चवीसाठी थोडीशी साखर देखील घातली तरी चालते.

आम्ही दिलेल्या dal palak recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दाल पालक रेसिपी माहिती मराठी palak gargatta recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dal palak khichdi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tur dal palak recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chana dal palak recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!