देवगड किल्ला माहिती Devgad Fort Information in Marathi

devgad fort information in Marathi देवगड किल्ला माहिती, महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत ज्यांना अनेक वेगवेगळे ऐतिहासिक वारसे लाभले आहेत आणि देवगड हा देखील महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि आज आपण या लेखामध्ये देवगड किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रत्नागिरीपासून १०० किलो मीटर अंतरावर असणारा हा देवगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या ठिकाणी वसलेला आहे आणि हा किल्ला खाडीच्या आणि अरबी समुद्राचा ज्या ठिकाणी संगम झालेला आहे.

त्या ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. देवगड हा किल्ला १७०५ मध्ये बांधलेला आहे आणि हा किल्ला १२० एकर परिसरामध्ये पसलेला आहे. हा किल्ला ज्यावेळी इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळी म्हणजेच १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळी इंग्रजांनी या किल्ल्याची काही प्रमाणात नासधूस केली होती परंतु सध्या देखील या किल्ल्याची काही वास्तू आणि तटबंदी चांगल्या स्थितीमध्ये आहे.

ज्यावेळी हा किल्ला बांधला होता त्यावेळी या किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्राचे पाणी होते आणि म्हणून या किल्ल्याला जंजिरे देवगड असे म्हणून देखील ओळखले जात होते. किल्ल्यामध्ये आपल्याला तटबंदीच्या काही भाग दिसतो तसेच या किल्ल्यामध्ये आपल्याला १९१५ मध्ये बांधलेला एक दीपगृह आहे जो आज देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि तसेच या ठिकाणी एक गणेश मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी काही जुन्या तोफा देखील आहेत.

devgad fort information in marathi
devgad fort information in marathi

देवगड किल्ला माहिती – Devgad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावदेवगड किल्ला, जंजिरे देवगड
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या ठिकाणी वसला आहे
निर्मिती१७०५
निर्माताकान्होजी अंग्रे
क्षेत्रफळ१२० एकर

देवगड किल्ल्याचा इतिहास – devgad fort history in marathi

पूर्वीच्या काळी समुद्र किनाऱ्यावरून परकीय आक्रमणे होत होती आणि हि परकीय आक्रमणांच्यापासून समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी समुद्र किनारपट्टीवर अनेक किल्ले बांधले आणि त्यामधील एक म्हणजे देवगड किल्ला.

अरबी समुद्रामध्ये जाणाऱ्या जमिनीच्या एका अरुंद पट्ट्यावर सामरिकदृष्ट्या असलेल्या देवगड हा किल्ला कोकण किनारपट्टी एक शूर वीर योध्ये कान्होजी आंग्रे यांनी १७०५ मध्ये बांधला आहे आणि या किल्ल्याचा वापर हा पाहणी क्षेत्र म्हणून केला जात होता. ज्यावेळी १८१८ मध्ये कमांडर वॉल्टर ब्राऊन यांच्या ब्रिटीश नौदल संघाने या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यांनी देवगड हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

किल्ल्यामध्ये आज देखील आपण एक दीपगृह चांगल्या स्थितीमध्ये असलेले आपण पाहतो ते १९१५ मध्ये बंदर आणि समुद्र किनाऱ्यासाठी बांधण्यात आले होते. किल्ल्यामध्ये आपल्याला तटबंदीच्या काही भाग दिसतो तसेच या किल्ल्यामध्ये आपल्याला १९१५ मध्ये बांधलेला एक दीपगृह

देवगड किल्ल्याविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

  • देवगड या शहराचे नाव हे या पौराणिक किल्ल्यावरून पडले आहे.
  • देवगड हे हापूस आंब्यांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी भारतामध्ये तर प्रसिध्द आहेच परंतु हे ठिकाण जगामध्ये देखील हापूस आंब्यासाठी प्रसिध्द आहे कारण येथील हापूस अंबा वेगवेगळ्या देशांच्यामध्ये देखील निर्यात केला जातो.
  • देवगड या किल्ल्यावरून आपल्याला मोहक अशी सूर्यास्ताची दृष्ये पाहायला मिळतात.
  • देवगड हा किल्ला १७०५ मध्ये कान्होजी अंग्रे यांनी बांधला आहे आणि हा किल्ला एका खाडीवर बांधला आहे.
  • या किल्ल्याची निर्मिती समुद्रामधून होणाऱ्या परकीय आक्रमणांच्यापासून किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी झाली आहे.
  • इ.स १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  • देवगड या किल्ल्यामध्ये आपल्याला गणेश मंदिर, जुन्या तोफा आणि दीपगृह पाहायला मिळते.

टिप्स

  • देवगड या किल्ल्यावर राहण्याची सोय नाही परंतु तुम्हाला देवगड या शहरामध्ये राहण्यासाठी सोय होऊ शकते.
  • या किल्ल्याला भेट देण्यसाठी आपल्याला रस्त्याने सरळ जाता येते आणि किल्ल्याजवळ आपल्याल खाजगी वाहने देखील घेऊन जाता येतात तसेच त्या ठिकाणी जाण्यासाठी बस देखील उपलब्ध आहेत.
  • देवगड या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही आहे त्यामुळे आपण या किल्ल्यावर जाताना पिण्याच्या पाणी घेऊन जा तसेच या किल्ल्यावर खाण्याची देखील कोनतीही सोय नाही त्यामुळे आपण आपल्या सोबत काही स्नॅक्स देखील घेऊन गेले तरी चालते.
  • देवगड हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क आकारला जात नाही कारण हा किल्ला पर्यटकांच्यासाठी पाहण्यासाठी निशुल्क आहे.

कसे पोहचायचे ( how to reach )

देवगड हे शहर भारतातील एक लोकप्रिय शहर आहे आणि या शहरामध्ये अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे या शहराला चांगल्या रस्त्याने आणि वाहतुकीने जोडलेले आहे. आपण हा किल्ला पाहण्यासाठी आपण बसने किंवा ट्रेनने जाऊ शकतो. किल्ल्याजवळ आपल्याल खाजगी वाहने देखील घेऊन जाता येतात तसेच त्या ठिकाणी जाण्यासाठी बस देखील उपलब्ध आहेत.

  • ट्रेन : या किल्ल्याला जाण्यासाठी आपण ट्रेनने जाऊ शकतो आणि या किल्ल्याजवळ असलेले जवळचे रेल्वे स्टेशन हे कणकवली या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही मुख्य शहरातून ट्रेनने कणकवलीला या आणि त्यानंतर तुम्ही तेथून बसने देवगड किल्ला पाहण्यासाठी जावू शकता.
  • बस : मुंबई आणि पुणे या शहरातून आपल्याला देवगड या शहरामध्ये जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत आणि मुंबई पासून देवगड हे शहर ५०० किलो मीटर अंतरावर आहे. मुंबई किंवा पुणे या शहरातून आपण देवगडला बसने जाऊ शकतो आणि तेथून किल्ल्यापर्यंत टॅक्सीने जाऊ शकतो.

आम्ही दिलेल्या devgad fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर देवगड किल्ला माहिती मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या devgad killa information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about devgad fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये devgad fort history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!