डिजिटल इंडिया निबंध मराठी Digital India Essay in Marathi

Digital India Essay in Marathi डिजिटल इंडिया निबंध मराठी आज संपूर्ण विश्व इंटरनेटने व्यापल आहे. इंटरनेटचा वापर व त्याचे फायदे मानवी आयुष्य अजूनच सुखद बनवत आहेत आणि म्हणूनच प्रत्येक देश आता डिजिटल व्यवहार करत आहे. तसेच इंडियाने देखील डिजिटलायझेशन चा मार्ग निवडला आहे. आता भारत देखील डिजिटल इंडियाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपल्या भारताची लोकसंख्या अफाट आहे आणि आपल्या प्रत्येक भारतीयांपर्यंत सरकारच्या सोयीसुविधा, धोरण पोहोचवणं हे थोडं अवघड आहे म्हणूनच या सोयीसुविधा इंटरनेटच्या माध्यमातून पोचवणं अधिक योग्य ठरेल.

डिजिटलायझेशन म्हणजे इंटरनेटचा वापर करून सगळे व्यवहार कागदावर नव्हे तर संगणकामध्ये नोंद करून ठेवणे किंवा प्रत्येक सुविधा ऑनलाईन करणे म्हणजेच जर एखाद्याला आपल्या खात्यातून पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी बँकेत जायची गरज लागणार नाही घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने ते पैसे आपण ट्रान्सफर करू शकतो.

तसेच बँक मध्ये खाते उघडणे किंवा ऑनलाईन शिक्षण सुविधा, ऑनलाईन आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आता जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही. घर बसल्या अगदी सगळी कामे इंटरनेटच्या मदतीने डिजिटली करू शकतो.‌‌ आत्ताच जग हे इंटरनेटच जग आहे आणि आपल्या भारतातील अगदी दुर्गम भागातील किंवा ग्रामीण भागातील लोकांना अद्यापही इंटरनेटचे ज्ञान व त्याचे फायदे याची कल्पना नाही आहे. म्हणूनच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचाव्यात म्हणून भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेला प्रकल्प म्हणजेच डिजिटल इंडिया प्रकल्प.

digital india essay in marathi
digital india essay in marathi

डिजिटल इंडिया निबंध मराठी – Digital India Essay in Marathi

Essay on Digital India in Marathi

डिजिटल इंडिया हा प्रकल्प भारताला तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अधिक मजबूत बनवण्यासाठी व भारताच्या भविष्याचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी राबविण्यात आला आहे. भारतीय जनतेला डिजिटल विश्व म्हणजे काय याची माहिती मिळावी व त्यांना डिजिटल विश्वाशी जोडण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. तसेच आपल्या भारताचा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक उत्तम विकास व्हावा या हेतूने देखील ही मोहीम भारत सरकार द्वारे राबवण्यात आली आहे.

डिजिटल इंडिया या प्रकल्पाची सुरुवात दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम मधून १ जुलै २०१५ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. या प्रकल्पाचा मुख्य हेतू म्हणजे भारतातील प्रत्येक शहर प्रत्येक गावात प्रत्येक भाग इंटरनेटशी कनेक्ट व्हावा तसेच सरकारी कामे, सरकारी धोरण, सरकारी सुविधा इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपामध्ये इंटरनेटशी कनेक्ट करणे आणि व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे जेणेकरून देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल.

देशाची इंटरनेट क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील प्रत्येक शहर प्रत्येक गाव इंटरनेटशी जोडलं जाणार आहे. शिवाय २०१९ पर्यंत संपूर्ण भारतामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच ध्येय या मोहिमेच होतं. सरकारी कामासाठी भल्यामोठ्या रांगा लावाव्या लागतात परंतु डिजिटल कामाच्या माध्यमातून सर्व सरकारी कामे डिजिटली पार पाडली जातील आणि जेणेकरून लोकांचा वेळ वाचेल आणि कामही भराभर होईल.

या मोहिमेअंतर्गत देशातील प्रत्येक माहिती इंटरनेटवर डेटाच्या माध्यमातून साठवली जाईल आणि जेणेकरून कामांमध्ये पारदर्शकता, सुलभता येईल आणि कामाचा वेग वाढेल. ही मोहीम देशाला तंत्रज्ञान क्रांतीच्या एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाईल अशी आशा सरकारला होती आणि आज संपूर्ण भारतामध्ये इंटरनेट पोहोचलं आहे. आज भारतातील प्रत्येक कामे डिजिटली होऊ लागली आहेत. या प्रकल्पाने भारताला एक वेगळे रूप दिलं आहे.

आधी दिवसेंदिवस लागणारऱ्या कामासाठी आता क्षणभराचा वेळ देखील पुरेसा आहे आणि हे सगळं डिजिटल इंडिया या मोहिमेअंतर्गतच शक्य झाल आहे. देशातील जवळपास अडीच लाख पंचायतींमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवल्या जातील. बऱ्याच गावांमध्ये राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर द्वारे नेटवर्कला पोहोचवण्यात आलं ज्यामुळे बरेच गाव इंटरनेट द्वारे डिजिटल इंडियाशी जोडले गेले याचा बराच फायदा आता कोविड काळामध्ये देखील झाला.

कोविड काळामध्ये शालेय शिक्षण ऑनलाइन करण्यात आलं होतं‌‌. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावांमध्ये इंटरनेट पोहोचलं आणि त्यामुळे गावा खेड्यातील पोर देखील शाळेय शिक्षण पूर्ण करू शकली. डिजिटल इंडिया मुळे लोकांच व्यवहारिक ज्ञान अधिक वाढलंय. डिजिटल इंडिया मुळे लोकांना ऑनलाइन बँकिंग सेवाई सेवा यांच्या बद्दल माहिती मिळाली व लोक इंटरनेटचा योग्य तो वापर करायला शिकली.

डिजिटल इंडिया मुळे ई सेवा म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, पोस्टकार्ड या सोबतच विविध शासकीय सोयी सवलती पुरवल्या जातात ज्यामुळे जी कागदपत्र गोळा करायला आधी दोन दोन महिने जायचे ती कागदपत्र आता ऑनलाइन पद्धतीने कमी वेळात व कमी पैशांमध्ये त्वरित उपलब्ध होत आहेत. या मोहिमेअंतर्गत डिजिटल पेमेंट सेवादेखील पुरवण्यात आल्या.

या मोहिमेमध्ये भारत सरकारने ११ तांत्रिक उपकरणे हाती घेतली आणि ज्या मध्ये गुगल पे यासारखी मोठी कल्पना डिजिटल इंडिया या मोहिमेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली. डिजिटल इंडिया मुळे सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दल माहिती देणे शक्य झाले शिवाय ग्रामीण भागातील लोकांना देखील त्यांच्या जीवनाशी निगडित सोयीसुविधा किंवा काही प्रकल्प यांची माहिती त्यांना घरबसल्या मिळू लागली.

कृषी क्षेत्रात देखील डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अधिक प्रगती जाणवून आली शेतकऱ्याला ऑनलाइन व्यापार कसा करायचा याची शिकवण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. सरकारच्या कृषी क्षेत्रातील योजनांबद्दल शेतकऱ्याला घरबसल्या माहिती मिळवणं शक्य झालं.

डिजिटल इंडिया मुळे देशातील काळा पैसा कमी होऊ लागला व भ्रष्टाचार बाहेर येऊ लागला. डिजिटल  इंडिया मुळे आता सगळे व्यवहार ऑनलाईन नोंद केले जातात. विद्यार्थ्यांना घर बसल्या शाळेचे वेळापत्रक परीक्षेचे वेळापत्रक शाळेचा अभ्यास माहित करून घेणे शक्य झालं. पालकांना मुलांच्या फिज भरण्यासाठी शाळेत जायची आता गरज भासत नाही डिजिटल इंडिया मुळे घरबसल्या फोन पे यासारखं प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल आहे.

डिजिटल इंडिया या मोहिमेचा लोकांवर अतिशय चांगला उत्कृष्ट व सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आहे. लोकांपर्यंत तांत्रिक ज्ञान पोहोचलं. लोकांना ऑनलाईन साक्षरता म्हणजे काय याची माहिती मिळाली व भारताच तांत्रिक व वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये एक पाऊल उंचावलं. डिजिटल इंडिया या मोहिमेमुळे लोकांची कामे जलद होऊ लागली व लोकांनी डिजिटल इंडिया हे नवीन धोरण खुप लवकरच आत्मसात केलं आणि जनतेकडून खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद येण्यास सुरुवात झाली.

साक्षरतेचे प्रमाण तर वाढलच परंतु असे काही दुर्गम भाग आहेत तिथपर्यंत अजून इंटरनेट किंवा डिजिटल इंडिया या दोन्ही गोष्टी पोहोचल्या नाही आहेत या मोहिमेचा फायदा सुशिक्षित लोकांना अधिक झाला. या प्रकल्पामुळे भारत हा देश डिजिटल दृष्टीने शक्तिशाली होत चालला आहे. पूर्वी कागदांचा भरपूर वापर व्हायचा कागदी काम जास्त असायचं आणि कागद पत्रांची योग्य रित्या काळजी घेणे अवघड जायचं बहुतांश वेळी आपल्या कडून आपले महत्त्वाचे कागदपत्र गहाळ होतात परंतु डिजिटल इंडिया मुळे आपण आपले कागदपत्र ऑनलाइन साठवून ठेवू शकतो.

या मोहिमे अंतर्गत कागदपत्रांच काम कमी आणि नागरिकांना इलेक्ट्रॉनिक सेवा प्रदान करणे यावर जास्त भर देण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत तंत्रज्ञानावर आधारित देशाला एक सशक्त अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला आहे. या मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या योजना राबविल्या गेल्या आहेत यामध्ये डिजिटल लॉकर, ई-एज्युकेशन, इं हेल्थ, ई-साईन, आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यांसारख्या एक लाख कोटींहून अधिक रुपयांच्या किमतीच्या योजनांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत चार लाख सार्वजनिक इंटरनेट केंद्र उभारण्याचा आवाहन भारत केंद्रासमोर होतं. शिवाय अडीच लाख शाळांमध्ये वाय-फाय, हॉटस्पॉट सुविधा पुरवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल इंडिया ही मोहीम डिजिटल तंत्रज्ञान म्हणून एक महत्वपूर्ण घटक बनली आहे.

देशातील माहिती, बाजारपेठ आणि सार्वजनिक सेवांमध्ये सर्वांना प्रवेश वाढवून सामाजिक आणि आर्थिक समानतेला चालना देण्यासाठी भारताच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. आणि देशाच्या विकासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण मोहीम ठरली. तसेच या मोहिमेने देशातील पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढली आहे. भारत हा जगातील सर्वात वेगवान डिजिटायझेशन राष्ट्रांपैकी एक आहे.

आम्ही दिलेल्या yoga information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डिजिटल इंडिया निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या digital india essay in marathi 1500 words या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि digital india essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये digital india essay in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!