डोहाळे जेवणाविषयी माहिती Dohale Jevan Information in Marathi

Dohale Jevan Information in Marathi – Baby Shower in Marathi डोहाळ जेवणाविषयी माहिती डोहाळ जेवण हे गर्भवती स्त्रीचे केले जातात आणि कोणत्याही स्त्रीचा गर्भधारणा हा क्षण तिच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. ज्यावेळी बालक स्त्रीच्या पोटामध्ये असतो त्यावेळी चौथ्या महिन्यामध्ये बालकामध्ये हृदयाचा प्रवेश होते आणि त्या हृदयामधून अनेक इच्छा बाहेर येत असतात आणि त्या इच्छांनाच डोहाळे असे म्हणतात. गर्भस्थ बाळ आपल्या या सर्व इच्छा आपल्या आईद्वारे पूर्ण करून घेत असते म्हणून ज्यावेळी गर्भवती स्त्रीला डोहाळे लागतात त्यावेळी तिचे डोहाळे पूर्ण केले जातात.

तसेच तिचे डोहाळे पूर्ण करण्यासाठी पाचव्या किंवा सातव्या महिन्यामध्ये ‘डोहाळ जेवण’ केले जाते आणि या डोहाळ जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात तसेच तिला हिरवी साडी, हिरव्या बांगड्या घालून तिची ओटी भरणी केली जाते. हे ओटीभरण प्रत्येकाच्या परंपरेनुसार आणि रीतीनुसार वेगवेगळ्या पध्दतीने केले जाते.

dohale jevan information in marathi
dohale jevan information in marathi

डोहाळ जेवणाविषयी माहिती – Dohale Jevan Information in Marathi

डोहाळे म्हणजे काय ?

ज्या वेळी गर्भस्त बालकात हृदयाच प्रवेश होतो आणि त्याची स्पंदने त्या गर्भवती स्त्रीला जाणवू लागतात आणि गर्भस्थ बालकाच्या काही इच्छा त्या बालकाच्या हृदयातून येत असतात म्हणजेच त्या डोहाळ्याच्या रूपाने येत असतात आणि म्हणूनच गर्भवती स्त्रीला डोहाळे लागले असे म्हंटले जाते.

डोहाळ जेवण म्हणजे काय ? 

डोहाळ जेवण म्हणजे गर्भवती महिलेच पाचव्या महिन्यामध्ये किंवा सातव्या महिन्यामध्ये ओटीभरणी करणे. हि ओटीभरणी प्रत्येकाच्या परंपरेनुसार आणि रीतीनुसार वेगवेगळ्या पध्दतीने केले जाते.

डोहाळ जेवण कसे केले जाते 

dohale jevan vidhi डोहाळ जेवण म्हणजे गर्भवती महिलेच्या पाचव्या महिन्यामध्ये किंवा सातव्या महिन्यामध्ये ओटीभरणी करणे. डोहाळ जेवण हे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी केले जाते आणि ज्या ठिकाणी डोहाळ जेवण करायचे आहे त्या ठिकाणी फुलांची सजावट केली जाते. डोहाळ जेवणामध्ये गर्भवती स्त्रीची ओटी भरली जाते त्या ओटीमध्ये हिरवी साडी, फुलांचा गजरा, हिरव्या बांगड्या आणि पाच फळे दिली जातात.

हिरवी साडी, फुलांचा गजरा, हिरव्या बांगड्या आणि पाच फळे हि ओटी फक्त तिच्या सासूने भरावी आणि त्यानंतर तेथे जमलेल्या स्त्रिया आणि दुसरी फळे तिच्या ओटी मध्ये घालू शकतात. डोहाळ जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात.

या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, पंचपक्वान, गर्भवती स्त्रीला खावेसे वाटणारे पदार्थ, काही गोड पदार्थ, आंबट पदार्थ, तिखट पदार्थ, लाडू – चिवडा या सारखे अनेक पदार्थ बनवलेले असतात. डोहाळ जेवणामध्ये दोन वाटीमध्ये पेढा आणि बर्फी ठेवलेली असते आणि त्या वर प्लेट झाकलेली असते आणि ते तिला उघडायला लावतात. हि ओटीभरणी प्रत्येकाच्या परंपरेनुसार आणि रीतीनुसार वेगवेगळ्या पध्दतीने केले जाते.

गर्भवती स्त्रीला ओटीमध्ये दिले जाणारे साहित्य 

dohale jevan oti samandohale jevan material list गर्भवती स्त्रीची पाचव्या किंवा सातव्या महिण्यामध्ये ओटी भरली जाते आणि त्या ओटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाच फळे, हिरवी साडी, हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस, मोगऱ्याच्या फुलाचा गजरा, तांदूळ किंवा गहू, नारळ, सुपारी, हळकुंड, खारीक आणि बदाम हे साहित्य लागते.

डोहाळ जेवणामध्ये केले बनवले पदार्थ 

डोहाळ जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेवण केले जाते तसेच लाडू, चिवडा, करंज्या, चकल्या या सारखे फराळाचे पदार्थ बनवले जातात, पंचपक्वान, गर्भवती स्त्रीला खावेसे वाटणारे पदार्थ, काही गोड पदार्थ, आंबट पदार्थ, तिखट पदार्थ असे अनेक पदार्थ बनवलेले असतात.

ओटी भरणीचे प्रकार 

 • झोपाळ्यावरील ओटी भरणी.
 • चांदण्यातील ओटी भरणी.
 • बागेमध्ये केले जाणारी ओटी भरणी.
 • मंदिरातील ओटी भरणी.
 • धनुष्यबाणाची ओटी भरणी.
 • बोटी मधील ओटी भरणी.
 • कोवळ्या उन्हामध्ये केले जाणारी ओटी भरणी.
 • हरणीच्या अखारातील ओटी भरणी.

सध्याच्या काळातील डोहाळ जेवण – modern dohale jewan 

dohale jevan importance in marathi पूर्वीच्या काळी दिहाल जेवण हे घराच्या घरी केले जात होते पण सध्या केल्या जाणाऱ्या डोहाळ जेवणाला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणजेच डोहाळ जेवणाला खूप लोप बोलवले जातात तसेच डोहाळ जेवण करण्यासाठी एक हॉल घेतला जातो आणि त्या हॉलमध्ये फुलांची आणि इतर काही सजावट केलेई जाते आणि तेथे झोपाळा किंवा चंद्र सजवलेला दिसू शकतो.

तसेच लोकांच्या साठी वेगवेगळ्या प्रकारचे जेवण केलेले असते आणि तेथे जमलेल्या सर्व महिला त्या गर्भवती स्त्रीची ओटी भरतात आणि तिला आशीर्वाद देतात. सध्या केले जाणारे डोहाळ जेवण हे आपल्या हौसे प्रमाणे झोपाळ्यावरील ओटी भरणी, चांदण्यातील ओटी भरणी, बागेमध्ये केले जाणारी ओटी भरणी, मंदिरातील ओटी भरणी, धनुष्यबाणाची ओटी भरणी, बोटी मधील ओटी भरणी, कोवळ्या उन्हामध्ये केले जाणारी ओटी भरणी, हरणीच्या अखारातील ओटी भरणी या प्रकारचे असू शकते.

तसेच सध्या डोहाळ जेवणामध्ये येणाऱ्या महिलांना return gift देखील दिले जाते आणि गर्भवती स्त्रीचे हिरवी साडी आणि फ्लॉवर ज्वेलरी घालून फोटोशूट देखील केले जाते.

डोहाळ जेवणाला केली जाणारी सजावट 

सध्या डोहाळ जेवणाला देखील एक इव्हेंटचे स्वरूप आल्यामुळे आज डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला देखील मोठ्या प्रमाणात सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते. हि सजावट फुलांच्या आणि पानांच्या पासून केली जाऊ शकते आणि त्याला आपण इको फ्रेंडली सजावट देखी म्हणू शकतो. तसेच या कार्यक्रमाला आर्टीफिशियल फुला पानाची देखील सजावट करतात.

झोपळा ठेवून देखील सजावट केली जाते तसेच बोट / नाव ठेऊन केलेली सजावट, चंद्राची सजावट. झोपाळ्याची आणि चंद्राची सजावट हि एक खूप साधारण सजावट आहे कारण या प्रकारची सजावट आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळते. तसेच आपण आर्टीफिशियल फुले आणि फुगे वापरून देखील सजवत करू शकतो आणि या मुळे आपली सजावट रंगीबेरंगी दिसू शकते.

सजावटीची पारंपारिक पध्दत म्हणजे झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची सजावट जी खूप चांगली दिसते आणि पारंपारिक देखील वाटते आणि हि इको फ्रेंडली सजावट देखील होऊ शकते. त्याचबरोबर काही ठिकाणी डोहाळ जेवण कार्यक्रमासाठी प्रकाशमय सजावट देखील केली जाते यामध्ये वेगवेगळे लाईट आणि वेगवेगळ्या रंगाचे फोकस वापरले जातात.

 • फुलांची आणि पानांची सजावट.
 • आर्टीफिशियल फुला पानाची सजावट.
 • झोपाळ्याची सजावट.
 • झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची पारंपारिक सजावट.
 • फुगे वापरून केलेली सजावट.
 • प्रकाशमय सजावट.

आम्ही दिलेल्या dohale jevan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डोहाळे जेवणाविषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dohale jevan marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dohale jevan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of dohale jevan information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “डोहाळे जेवणाविषयी माहिती Dohale Jevan Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!