डॉक्टर जयंत नारळीकर माहिती Dr Jayant Narlikar Information in Marathi

Dr Jayant Narlikar Information in Marathi डॉक्टर जयंत नारळीकर माहिती मराठी डॉ. जयंत नारळीकर भारताचे सुप्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आहेत. समाजामध्ये विज्ञान हा विषय लोकप्रिय होण्यासाठी, जयंत नारळीकर यांनी विज्ञान या विषयावर मराठी, इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये अगदी सोप्या शब्दांमध्ये पुस्तकं लिहिली आहेत. खगोल भौतिकी या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळवणारे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ अशी डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख आहे. डॉ. जयंत नारळीकर यांची खगोलशास्त्रज्ञ संबंधीची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे. तसेच वाचकांना समजेल असं विज्ञान विषयी लेखन करणारे जयंत नारळीकर यांच्या जीवन चरित्र बद्दलची माहिती आज आपण या लेखामध्ये घेणार आहोत.

dr jayant narlikar information in marathi
dr jayant narlikar information in marathi

डॉक्टर जयंत नारळीकर माहिती मराठी – Dr Jayant Narlikar Information in Marathi

पूर्ण नाव डॉ‌. जयंत नारळीकर
जन्म१९ जुलै १९३८
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलविष्णू वासुदेव नारळीकर
ओळख खगोलशास्त्र
जन्मगावकोल्हापूर

जन्म

प्रसिद्ध गणितज्ञ रॅग्लर विष्णू वासुदेव नारळीकर यांच्या घरी जन्माला आलेले सुप्रसिद्ध डॉ‌. जयंत नारळीकर. विष्णू वासुदेव नारळीकर हे डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वडील आहेत. वडील विष्णू नारळीकर वाराणसी मधील बनारस हिंदू विद्यापीठ गणित या शाखेचे प्रमुख होते. डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर मध्ये १९ जुलै १९३८ रोजी झाला.

जयंत नारळीकर यांची आई सुमिती नारळीकर संस्कृत विदुषी होत्या. वडिलांकडून नारळीकर यांना शिस्त तर आईकडून प्रेम व माया मिळाली. नारळीकर यांचे वडील उच्चशिक्षित असल्यामुळे, घरांमध्ये सगळेच शिक्षणाचे महत्त्व जाणून होते.

शिक्षण व वैयक्तिक आयुष्य

ते म्हणतात ना सुशिक्षित माणूस हा उच्च विचारांचा आणि साध्या राहणीचा असतो. असेच काहीसे जयंत नारळीकर आहेत. जयंत नारळीकर यांचे व्यक्तिमत्व हुशार, कर्तुत्ववान, चतुर असं आहे. नारळीकर यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. समाजामध्ये प्रबोधन घडवून आणणारे त्यांचे विचार आहेत.

नारळीकर यांना लहानपणापासूनच शिक्षणाच महत्व माहिती होतं. जयंत नारळीकर यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात वाराणसी येथून झाली. इसवी सन १९५७ साली जयंत नारळीकर यांनी विज्ञान क्षेत्रात बीएससी ही पदवी प्राप्त केली. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक पटकावला. पुढील शिक्षण घेण्यासाठी जयंत नारळीकर ब्रिटनमध्ये पोचले.

ब्रिटन येथील केंब्रिज विद्यापीठामध्ये नारळीकर यांनी उच्च शिक्षण घेतलं. ब्रिटनमध्ये नारळीकर यांनी एम.ए, बी.ए व पीएचडी या तीन पदव्या संपादन केल्या. इतकच नव्हे तर जयंत नारळीकर यांच्याकडे रॅगलर ही पदवी देखील आहे. जयंत नारळीकर यांच्याकडे खगोलशास्त्रा मध्ये पदवी मिळवल्यावर खगोलशास्त्रज्ञचे मिळणारे टायसन मेडल देखील आहे.

जयंत नारळीकर यांना स्मित पुरस्कार देखील मिळाला आहे. मंगला सदाशिव राजवाडे ह्या एक गणिततज्ञ. १९६६ साली जयंत नारळीकर यांचा विवाह मंगला राजवाडे यांच्याशी झाला. या दाम्पत्यांना तीन मुली देखील आहेत. गीता, गिरिजा व लीलावती अशी जयंत नारळीकर यांच्या मुलींची नावे आहेत.

सिद्धांत व देशाच्या प्रगतीमध्ये हातभार

ब्रिटनमध्ये असताना जयंत नारळीकर यांची ओळख ब्रिटिश संशोधक आणि विज्ञान कादंबरीकर फ्रेड हॉइल यांच्याशी झाली. फ्रेड हॉइलयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी घेतली. अंतराळविज्ञान, विश्वविज्ञान, ज्योतीभौतिकी या सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून या दोघांच संशोधन सुरू झाला.

अखिरेस हॉइल आणि नारळीकर यांनी खगोल शास्त्र मध्ये संशोधन केलेल्या या संशोधनामध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षण या विषयावर एक सिद्धांत मांडला. या सिद्धांताला त्यांनी “हॉइल-नारळीकर सिद्धांत” असे नाव दिले. अरे हा सिद्धांत खगोलशास्त्राच्या विश्वात अजरामर झाला. या सिद्धांतामध्ये या दोघांनी त्यांचे विचार अशा प्रकारे मांडले आहेत.

वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते. बाहेर गावी जाऊन उच्च शिक्षण घेऊन आल्यावर आता आपल्या ज्ञानाचे ते भारतामध्ये वापर करून भारताचे नाव उच्च स्तरावर घेऊन जाण्याचं त्यांचे स्वप्न होतं त्यासाठी ते भारतात पुन्हा परतले. इसवी सन १९७२ मध्ये जयंत नारळीकर भारतात पुन्हा परतले.

टाटा मूलभूत संशोधन संस्था जी मुंबई मध्ये स्थापित आहे. या संस्थेतील खगोलशास्त्र खात्याचे प्रमुख पद जयंत नारळीकर यांच्याकडे आहे. पुण्यामध्ये आयुका संस्थेचे संचालक म्हणून १९८८ मध्ये जयंत नारळीकर यांची निवड झाली. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये जयंत नारळीकर हे अकरा वर्ष अध्यापन करत होते. सिद्धांतिक व ज्योतीभौतिक विभागाचे मुख्य पदाची सूत्रे जयंत नारळीकर यांच्या हाती होती.

मराठी विज्ञान साहित्यविश्वातील कार्य

जयंत नारळीकर हे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व त्यासोबतच उत्तम लेखक आहेत. त्यांच्याकडे असलेला खगोलशास्त्राविषयी व विज्ञान विषयी ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते लिखाण करतात. जयंत नारळीकर यांनी‌ लेखनाची सुरुवात विज्ञान कथा पासून सुरु केली. आणि आज ते विज्ञान कादंबरी देखील लिहतात.

विज्ञानाचं ज्ञान सगळ्यांना मिळाव व ते सगळ्यांना समजावं म्हणून जयंत नारळीकर हे अगदी सोप्या शब्दांमध्ये पुस्तके लिहितात. त्यांचं मत, विज्ञान बद्दलची जागृकता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कोणत्याही माध्यमाचा उपयोग करतात. जयंत नारळीकर यांची विज्ञानाविषयीची अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत. तेही वेगवेगळ्या भाषांमध्ये.

“यक्षांची देणगी” हे जयंत नारळीकर यांनी स्वलेखन केलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. संपूर्ण भारतातील विविध भाषांमधील गणित व विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम व्यवस्थित अर्थपूर्ण रचनेत आणण्याचं काम आज जयंत नारळीकर करत आहेत. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद जयंत नारळीकर यांच्या हाती होतं.

नारळीकर हे प्रबोधनकारक विचारांचे आहेत. समाजामध्ये नेहमी प्रबोधन घडावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे समाजातील जुनाट रूढी परंपरा यांच्यावर त्यांचा साफ नकार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत ते नेहमीच पुढे राहिले आहेत.

जयंत नारळीकर यांच्या खगोलशास्त्रज्ञ कार्य क्षेत्रांमध्ये त्यांनी करून दाखवलेले काम व मांडलेले सिद्धार्थ यांच्या जोरावर भारताने विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगतीच केली आहे. भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं करण्यात जयंत नारळीकर यांचा मोलाचा वाटा आहे.

पुरस्कार

जयंत नारळीकर यांना कोणता पुरस्कार मिळाला ?

डॉ. जयंत नारळीकर खगोलशास्त्र विश्वातील एक मोठं अजरामर नाव. सामान्य माणसापर्यंत खगोल शास्त्र पोहोचावं यासाठी जयंत नारळीकर आजही प्रयत्न करत आहेत. समाजाची प्रगती होण्यासाठी अंधश्रद्धेला व जुन्या रूढी-परंपरांना बाजूला ठेवणे गरजेचे आहे असे जयंत नारळीकर यांचं मत आहे. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकर यांना प्रसिद्धी मिळाली.

आणि त्यांची ही कीर्ती सरकार पर्यंत पोहोचली, त्यामुळे जयंत नारळीकर यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. १९६५ मध्ये जयंत नारळीकर यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर पद्मविभूषण हा पुरस्कार जयंत नारळीकर यांनी २००४ मध्ये पटकावला.

वयाच्या २७ व्या वर्षामध्ये पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी ठरणारे जयंत नारळीकर हे भारताच्या इतिहासातील पहिलेच होते. खगोल शास्त्रज्ञ या कार्यक्षेत्रातील जयंत नारळीकर यांची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. डॉक्टर भटनागर स्मृती पारितोषिक हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यासाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

इथून पुढे त्यांना एम. पी, बिरला सन्मान आणि फ्रेंच एस्ट्रोलॉजीकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सस या पुरस्कार व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. जयंत नारळीकर लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत. याच प्रमाणे डॉक्टर नारळीकर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स चे अधिछात्र आहेत.

इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी द्वारे मिळणारा इंदिरा गांधी पुरस्कार देखील नारळीकर यांनी मिळवला. वैज्ञानिक विषयांमध्ये साहित्यिक लिखाण केल्याबद्दल जयंत नारळीकर यांना १९९६ मध्ये युनिस्को द्वारे कलिंग पारितोषिक देण्यात आलं होतं.

पुस्तके – Jayant Narlikar Books in Marathi

जयंत नारळीकर यांना साहित्य लेखनाचा गाढा अनुभव आहे. विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी नारळीकर यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यातीलच काही पुस्तके खालील प्रमाणे- “वामन परत न आला”, “अंतराळातील भस्मासुर”, “कृष्णमेघ”, ” प्रेषित”, “व्हायरस”, “अभयारण्य”, “यक्षांची देणगी”, “टाइम मशीनची किमया”, ” याला जीवन ऐसे नाव”. जयंत नारळीकर यांनी लिहलेली इतर पुस्तके खालील प्रमाणे – “आकाशाशी जडले नाते”, “विज्ञानाची गरुड झेप”, “गणितातील गमती जमती”, “विश्वाची रचना”, “विज्ञानाचे रचयिते”, “नभात हसते तारे”.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये dr jayant narlikar information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information of jayant narlikar in marathi म्हणजेच “डॉक्टर जयंत नारळीकर माहिती” jayant narlikar information in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about jayant narlikar in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!