डॉक्टर विक्रम साराभाई यांची माहिती Dr Vikram Sarabhai Information in Marathi

Dr Vikram Sarabhai Information in Marathi डॉक्टर विक्रम साराभाई यांची माहिती विक्रम साराभाई “भारतीय अंतरिक्ष प्रोग्राम” चे “जनक” म्हणून ओळखले जातात. भौतिक शास्त्र व खगोल शास्त्र या क्षेत्रांमध्ये विक्रम साराभाई यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह व भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार अशी विशेष ओळख डॉ. विक्रम साराभाई यांची आहे. त्याशिवाय इस्रो ही भारताची अवकाश संशोधनावर आधारित प्रमुख संस्था स्थापन करण्यामागे डॉ. विक्रम साराभाई यांचा हातभार होता. यशाच्या पाटीवर भारताचं नाव कोरणारे विक्रम साराभाई यांच्या जीवना बद्दल व त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण आजच्या लेखामध्ये माहिती घेणार आहोत.

dr vikram sarabhai information in marathi
dr vikram sarabhai information in marathi

डॉक्टर विक्रम साराभाई यांची माहिती – Dr Vikram Sarabhai Information in Marathi

पूर्ण नाव विक्रम साराभाई
जन्म१२ ऑगस्ट १९१९
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलअंबालाल साराभाई
ओळख “भारतीय अंतरिक्ष प्रोग्राम” चे “जनक”
जन्मगावगुजरात मधील अहमदाबाद
मृत्यू३० डिसेंबर १९७१

जन्म

गुजरात मधील अहमदाबाद येथे १२ ऑगस्ट १९१९ रोजी डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म झाला. विक्रम साराभाई यांचा जन्म एका परिपूर्ण कुटुंबात झाला होता. साराभाई यांना कुठल्याच गोष्टीची कमी न्हवती. त्यांच्या वडिलांचा व्यापार होता, त्यामुळे घरामध्ये पैशाची कधीच अडचण भासली नाही.

वडील अंबालाल एक यशस्वी उद्योगपती होते. गुजरात मध्ये त्यांच्या स्वतःच्या अनेक मिल्स होत्या. विक्रम साराभाई यांना सात भावंडं होती. विक्रम यांचे वडील मोठे उद्योजक होते. त्याशिवाय त्यांचा परिवार स्वातंत्र्य कार्यामध्ये सहभागी होता, त्यामुळे अनेक मोठमोठे माणसांची विक्रम साराभाई यांच्या घरी ये-जा असायची.

त्यातीलच काही मोठ मोठी नावं-  महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू. यांसारखे मोठे व्यक्तिमत्व साराभाई यांना लाभले साराभाई यांच्या मनावर या मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव झाला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्या मध्ये भर पडली.

शिक्षण

विक्रम साराभाई यांना शिक्षणाची लहानपणापासूनच फार आवड होती. लहानपणापासूनच विक्रम साराभाई यांच्या मनावर मोठ मोठ्या स्वातंत्र्य विरांचा आणि नेत्यांचा प्रभाव पडला होता. चांगलं शिक्षण घेऊन समाजामध्ये प्रबोधन घडवून आणणे फार गरजेचं असतं. विक्रम साराभाई यांना गणित आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांची आवड होती.

विक्रम साराभाई यांचे घराण श्रीमंत असल्याने लहानपणी विक्रम साराभाई यांना शिकवण्यासाठी युरोपातून शिक्षक यायचे. विक्रम साराभाई यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण ते रहात असलेल्या ठिकाणी पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण प्राप्त करण्यासाठी विक्रम साराभाई अहमदाबाद मधील गुजराती महाविद्यालयात जायचे.

आता उच्चशिक्षण मिळवण्यासाठी विक्रम साराभाई इंग्लंडमध्ये पोहचले. इंग्लंड मधील प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठांमधून विक्रम साराभाई यांनी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांवर शिक्षण घेतल. सेंट जॉन्स कॉलेजमधून रसायनशास्त्र व भौतिकी या विषयांच्या ट्रायपास परीक्षांमध्ये विक्रम साराभाई उत्तीर्ण जाहले.

इसवी सन १९४० मध्ये विक्रम साराभाई यांनी बी.ए व इसवी सन १९४२ मध्ये एम.ए या दोन पदव्या मिळवल्या. इसवी सन १९४२ मध्ये विक्रम साराभाई विवाहबंधनात अडकले. विक्रम साराभाई यांची पत्नी मृणालिनी साराभाई या सांस्कृतिक नृत्य कलेमध्ये पारंगत होत्या. या दाम्पत्यांना पुढे कार्तिकेय आणि मल्लिका अशी दोन अपत्ये झाली.

कारकीर्द

विक्रम साराभाई यांनी भारताच्या स्पेस क्षेत्रांमध्ये आपली उत्तम कामगिरी बजावली. त्यामुळे भारताच्या स्पेस क्षेत्रात प्रगती जाणवून आली. आणि ज्यामुळे आपल्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलं. विक्रम साराभाई आपले उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी ब्रिटनला पोहोचले होते परंतु दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि त्यामुळे ते आपल्या मायदेशी परतले.

भारतात परतल्यावर विक्रम साराभाई यांच्या आयुष्यामध्ये सुवर्ण संधी साधून आली. ज्येष्ठ व नोबेल पुरस्कार मानकरी शास्त्रज्ञ सी व्ही रमण. यांच्या सहवासात मार्गदर्शनाखाली विक्रम साराभाई यांना वैश्विक किरण वर संशोधन करण्याची संधी साधून आली. भारतात परत आल्यावर विक्रम साराभाई यांनी भारतामध्ये स्वतःचं नाव बनवण्यास सुरुवात केली.

दुसरे महायुद्ध संपताच इसवी सन १९४५ मध्ये साराभाई पुन्हा ब्रिटनला गेले. इसवी सन १९४७ मध्ये विक्रम साराभाई भारतामध्ये पुन्हा परतले. परंतु, भारतामध्ये पुन्हा परतायच्या आधी “कॉस्मिक रे इन्वेस्टीगेशन इन ट्रॉपिकल लॅटीट्यूड्स” वर संशोधन केलं आणि “डॉक्टरेट” ही पदवी मिळवली.

आपल्या ज्ञानाचा योग्यरीत्या वापर व्हावा म्हणून विक्रम साराभाई यांनी ११ नोव्हेंबर १९४७ मध्ये अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा स्थापन केली. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. विक्रम साराभाई यांच्या भौतिक शास्त्र व खगोल शास्त्र या क्षेत्रातील या कामगिरीमुळे भारताला खूपच फायदा झाला.

भारताच्या आर्थिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती दिसून आली. आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवण हे त्यांचं लहानपणापासूनच स्वप्न होतं.

आणि ते स्वप्न त्यांनी ही कार्यशाळा स्थापन करून सत्यात उतरवलं. अहमदाबाद येथील “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट” ही संस्था स्थापन करण्यामध्ये विक्रम साराभाई यांचा मोठा सहभाग होता. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे १९७५ मध्ये भारताने पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडला.

त्याला महान खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचं नाव देण्यात आलं आहे. “आर्यभट्ट” या उपग्रहाची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये झाली होती. आज भारताने अवकाश क्षेत्रांमध्ये भरपूर प्रगती करून ठेवली आहे. आणि त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांना देखील जात.

त्यांनी घेतलेले अपार कष्ट, महिनत त्याशिवाय त्यांची तल्लख बुद्धी या सगळ्याच्या जोरावर आज भारताने आर्यभट्ट या उपग्रहा नंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडले. विक्रम साराभाई यांची ख्याती जगभर पसरली आहे. पुढे‌ विक्रम साराभाई यांनी अनेक संशोधन संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आज “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट” ही भारतातील सगळ्यात उत्तम संस्था विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली आहे.

“राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा” ही भौतिक शास्त्राच्या संशोधनासाठी सर्वात प्रसिद्ध प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेची स्थापना विक्रम साराभाई यांच्या हस्तेच करण्यात आली आहे. “अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्रीयल रीसर्च असोसिएशन” ही संस्था देखील विक्रम साराभाई यांनी सुरू केली.

“सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी” ही पर्यावरण क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेली संस्था डॉक्टर विक्रम साराभाई यांनी सभी केली आहे. सन १९६५ मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांनी “नेहरू विकास संस्था” स्थापन केली. आपलं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं असं विक्रम साराभाई यांचं मत होतं.

आपल्या भारतातील प्रत्येकाने गणित व विज्ञान या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करून भारताचे नाव तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये मोठं करावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी विक्रम साराभाई यांनी १९६० मध्ये “विक्रम ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर” ही संस्था स्थापन केली. इसवी सन १९७० मध्ये “भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था” म्हणजेच “इस्रो” स्थापन करण्यात विक्रम साराभाई यांचे खूप मोठं श्रेय आहे.

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असलेला विक्रम साराभाई यांचा दृष्टिकोण आज देशाच्या कामी आला आहे. देशाने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करावी म्हणून विक्रम साराभाई यांनी अथक प्रयत्न केले. त्यासाठी साराभाई यांनी अनेक प्रयोग शाळा सुरू केल्या. वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या. भारताच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र कोठे आहे

तिरुवनंतपुरम येथे स्थापित विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र हे इस्रोचे मुख्य केंद्र आहे. या केंद्रांमध्ये रॉकेट, प्रक्षेपण आणि कृत्रिम ग्रहांचा निर्माण आणि त्या संबंधित त्यांचा विकास केला जातो.

मृत्यू

३० डिसेंबर १९७१ रोजी भारताचे महान खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन झालं. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. कोवलम तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी डॉक्टर विक्रम साराभाई यांच निधन झालं.

इतर माहिती

डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांनी खगोलशास्त्र या क्षेत्रांमध्ये दाखवलेल्या कामगिरीसाठी भारत सरकार कडून त्यांना सन्मानित करण्यात आलं. इसवी सन १९६२ मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारत सरकारद्वारे “शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार” देण्यात आला. इसवी सन १९६६ मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांना “पद्मविभूषण” देऊन सन्मानित करण्यात आलं. इसवी सन १९७२ मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई “पद्मा विभूषण मरणोत्तर” या पुरस्काराचे मानकरी ठरले.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये dr vikram sarabhai information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information of vikram sarabhai in marathi म्हणजेच “डॉक्टर विक्रम साराभाई यांची माहिती” doctor vikram sarabhai marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about dr vikram sarabhai in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!