पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi

Environment Essay in Marathi – Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने पर्यावरणाचा कधीतरी विचार केला का? पैशाने मालमत्ता, दागिने तसेच, बंगला घेता येतो, पण त्याच पैशाने स्वच्छ, सुंदर व शुद्ध पर्यावरण घेता येत का? नाही. कारण, पर्यावरण निर्माण करण्यासाठी फक्त पैसा उपयोगी नसतो. आता, तुम्हाला वाटेल की, पर्यावरणाशी या मानवाचा आणि पैशाचा काय संबंध आहे? तर, मानव हा पैसा मिळविण्यासाठी निसर्गातील झाडे तसेच, खनिजे, खनिज तेल यांचा अनावश्यक वापर करतो; त्यामुळे, पर्यावरणातील अनेक घटक नष्ट होतात. हा एका अर्थाने पर्यावरणाचा ऱ्हासच आहे.

हिरवे-हिरवे गार गालिचे ,

हरित तृणाच्या मखमलीचे !”

environment essay in marathi
environment essay in marathi

पर्यावरण निबंध मराठी – Environment Essay in Marathi

पर्यावरण संरक्षण निबंध मराठी

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पर्यावरण म्हणजे काय हे समजुन घेणे खूप गरजेचे आहे. तर, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या हिरव्यागार वनस्पती, स्वच्छ खडकातून वाहणारे नदी – नाले, पशु – पक्षी यांना स्वतंत्र असे असलेले आजूबाजूचे सुंदर वातावरण होय.

पण, या आधुनिक काळात पर्यावरणाला नेमके काय म्हणतात हेच माहित नाही, त्यामुळे पर्यावरणाचा विचार करणे तर दुरच पण, पर्यावरणाचा विचार न केल्यामुळे निसर्गाला नव्हे तर, मानवालाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, प्रत्येकाने पर्यावरणाचा, पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा विचार केला पाहिजेत.

आज, प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वचनबध्द होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजेत, नाहीतर भावी पिढीला अपुरी साधनसंपत्ती, प्रदुषण, लोकसंख्यावाढ व त्याच बरोबरीने येणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक तणावाला सामोरे जावे लागेल; म्हणून, ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसामुळे तरी लोकांना पर्यावरणाची गरज व महत्व समजून येईल.

घनदाट जंगल, प्रचंड जलाशय, उंच दऱ्याखोऱ्या यांनी पर्यावरण व्यापलेले आहे. पर्यावरण म्हणजे अगदी विश्वाच्या विशाल साम्राज्यात संपुर्ण सजीवसृष्टी धारण करणारा एकमेव गृह ! म्हणूनच, तर आपल्या पूर्वजांनी त्याला देवरूप मानले होते. या गृहाला घट्ट बांधणारी धरणी माता ही उदार अंत:करणाची आहे. सजीवसृष्टीच्या भरणपोषणासाठी ती अनंत हसते आणि भरभरूनही देते.

पण, अशा उदार अंत:करणाच्या मातेची आम्ही आज काय कदर करत आहोत ? उलट, तिचे पर्यावरण दुषित करत आहोत. मानवाने एक गोष्ट कधीही विसरू नये ती म्हणजे आपण जे समोरच्याला देतो, तेच आपल्याकडे परत येते. आज आपण पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आहोत.

पण मित्रांनो, निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे, हा मित्र जर मानवावर रागवला तर, आपण त्याचा राग सहजासहजी दूर करू शकत नाही. त्यासाठी, आपल्याला खुप किंमत मोजावी लागेल हे मात्र खरं. मित्रहो, निसर्गाला ही राग येतो. नेहमी आपल्याला साथ देणारा निसर्ग जर अचानक इतका संतप्त आणि संहारक झाला…

तर मानवाची अवस्था काय होईल ? मानवावर उपासमारीची वेळ येईल, हवेसाठी त्याला तडफडावे लागेल, पाण्यासाठी त्याला व्याकुळ व्हावे लागेल, अन्नाच्या शोधात भरकटावे लागेल आणि यातच माणसाचा एक दिवस विनाश होईल.

आज आपण जर पर्यावरणाकडे पाहिलं, तर लक्षात येईल की पाण्यामध्ये, जमिनीवर, आणि वातावरणात प्रदुषण नावाच्या राक्षसाने थैमान घातलेले आहे, पण याला कारणीभूत आपण आहोत. स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारल्याप्रमाणे आपण एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हे चक्रव्यूह म्हणजे प्रदूषणाचे घर आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारची प्रदुषण नांदतात ; जसे की, जलप्रदूषण, वायुप्रदूषण, भूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि आता नवीन नावारूपाला आलेलं, सगळ्या प्रदूषणांचा बाप समजण्यात आलेलं प्रदूषण म्हणजे ‘लोकसंख्या प्रदूषण’ जे सगळ्या प्रदूषणांच्या मुळाच मुख्य कारण आहे.

प्रथम पृथ्वीतलावर ती मानवी उत्क्रांती घडत गेली आणि हळूहळू ही मानवी उत्क्रांती इतकी वाढत गेली की ती आजतागायत मोजता येणार नाही. याचा परिणाम असा झाला की या वाढत्या लोकसंख्येमुळे माणसांच्या गरजाही वाढू लागल्या; त्यामुळे, कारखानदारी, औद्योगिकरण, शहरीकरण वाढत गेले.

कारखानदारीमध्ये कारखान्यातून निघणारे दुषित पाणी हे पवित्र अशा नद्यांतून सोडले जाते, जी नदी आपल्या जीवमित्रांची पाण्याची तहान भागवते, ते मित्रच त्या नदीच्या पोटात विषारी रसायने घालून तिला अपवित्र करण्याचं काम करत आहेत. शहरातील सांडपाणी या नद्यांमध्ये सोडले जाते.

पुण्यातील मुळा- मुठा, अमरावतीमधील चंद्रभागा, कोल्हापुरातील पंचगंगा या नद्या याच उत्तम उदाहरण आहेत. यामुळे, या नद्यांतील जलचर प्राणी ही तडफडून मरत आहेत आणि याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाने दिलेली जलचर संपत्ती आता धोक्यात आलेली आहे. जगात फक्त काही टक्का गोडे पाणी आहे, ते जर नष्ट झालं तर तडफडणाऱ्या माश्यांप्रमाणे आपण ही तडफडून मरु, यात शंका नाही.

कित्येक जलचर तडफडून मेले||

पाणीच आता पाणी नाही राहिले

निर्मळ निसर्गाचे नाही दिवस उरले        

प्रदूषणाचे दिवस ते आले ||

तसेच, कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत असतो, यांमधून अनेक घातकी विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्याचबरोबर, मालं वाहून नेणाऱ्या गाड्या, मोटार गाड्या, स्कूटर, कारगाड्या, आगगाडी, जेटविमाने यांसारख्या वाहतुकीच्या साधणांने वायुप्रदूषण होते. स्फोटके, फटाके, अणुबाँब, टाइमबाँब, बंदुकातील गोळ्या यांचेदेखील भयानक असे परिणाम पर्यावरणावर होत आहेत.

उदाहरणार्थ; १९४५ साली जपानमध्ये झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्यात कित्येक जीव मारले गेले होते .त्यावेळी, जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि भूप्रदूषण ही वाढले होते. अखेर हा मानव अस करतो का ? आणि कशासाठी ? पर्यावरणावर हुकूमत गाजवण्यासाठी की स्वतःच, स्वतःचा विध्वंस करण्यासाठी?

आज, ध्वनिप्रदूषण वाढताना आपण सर्रास बघतो. टेप, रेडिओ, टी.व्ही मोठमोठ्याने लावणे, मिक्सर, गाईंडर, डी. जे. अशा उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण निर्माण होत आहे, यांचा आवाज जवळजवळ चाळीस डिसिबल इतका असतो. असा आवाज सतत ऐकल्याने मानवाला बहिरेपणा येतो.

वाढत जाणाऱ्या भूप्रदूषणामुळे भूकंपाची तीव्रता वाढली आहे. तसेच, कोळसा आणि खनिज तेल यांच्या अतिरिक्त वापरामुळे गेल्या शंभर वर्षात सुमारे ३०,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ४०,००० कोटी टन कार्बन – डायऑक्साइड वायू हवेत मिसळला गेला.

गेल्या साठ वर्षांत ६६% जंगले विनाश पावली, अशा विविध प्रदूषणांमुळ पर्यावरण धोक्यात आलं आहे आणि यासाठी पर्यावरणाच्या प्रश्नावर जागतिक स्तरावर योजना राबवल्या जातात. सन २००२ साली जोहान्सबर्ग येथे जागतिक ‘शाश्वत धारणक्षम विकास परिषद’ भरली होती. या परिषदेने जगासाठी जी त्रिसूत्री दिली त्यामध्ये, ‘पर्यावरण संवर्धन’ हे महत्वाचं सूत्र होत.

शेवटी, मानवाला इतकंच सांगावस वाटत…..

ओले नाले भरुनी गेले,

महापूर तो आला ||

माणसाच्या आक्रमकतेने,

निसर्गचक्रात फेरबदल झाला ||

पर्यावरणाचा सुखी संसार

या महापूरासोबत वाहुनी गेला ||

 

      – तेजल तानाजी पाटील

            बागिलगे,चंदगड.

आम्ही दिलेल्या environment essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पर्यावरण निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paryavaran nibandh marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि paryavaran in marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण paryavaran essay in marathi या लेखाचा वापर essay on environment in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!