ग्यानी झैल सिंग यांची माहिती Giani Zail Singh Information in Marathi

Giani Zail Singh Information in Marathi ग्यानी झैल सिंग माहिती ज्ञानी जैल सिंह हे पंजाब मधील भारताचे राष्ट्रपती बनणारे पहिले व्यक्ती होते. यांचा जन्म पंजाब मध्ये ५ मे १९१६ मध्ये झाला आणि त्यांच्या आई – वडिलांचे नाव माता इंद कौर आणि भाई किशन सिंग असे होते. झैल सिंग हे पाच भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात लहान होते. झैलसिंग यांच्या लहान वयातच त्यांना त्यांच्या आईला गमवावे लागले मग त्यानंतर त्यांना त्यांच्या आईच्या बहिणीने वाढवले. ग्यानी झैल सिंग हे पंजाब मधील भारताचे राष्ट्रपती बनणारे पहिले व्यक्ती होतेच आणि हे भारतातील कमेव शीख अध्यक्ष राहिले आहेत.

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत माजी राष्ट्रपतींनी अनेक खाती सांभाळली. ऑपरेशन ब्लू स्टार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगली त्यांच्या राष्ट्रपतीपदामुळे त्यांना स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही काळोख्या क्षणांमध्ये देशाल त्यांचे धाडस पाहायला मिळाले.

ग्यानी झैल सिंग यांनी ज्यावेळी आपला देश ब्रिटीशांच्या वर्चस्वाखाली होता त्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कामगिरी केली आहे त्यांनी आपल्या वयाच्या १५ व्या वर्षी ब्रिटिशांविरुध्द केलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला.

giani zail singh information in marathi
giani zail singh information in marathi

ग्यानी झैल सिंग यांची माहिती – Giani Zail Singh Information in Marathi

नाव ग्यानी झैल सिंग
राज्य पंजान
जन्म ५ मे १९१६
ठिकाण पंजाब मधील फरीदकोटच्या संस्थानातील संधवान
वडिलांचे नाव भाई किशन सिंग
आईचे नाव माता इंद कौर

प्रारंभिक जीवन 

ग्यानी झैल सिंग यांचा जन्म ५ मे १९१६ रोजी पंजाब मधील फरीदकोटच्या संस्थानातील संधवान येथील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई – वडिलांचे नाव माता इंद कौर आणि भाई किशन सिंग असे होते. झैल सिंग हे पाच भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात लहान होते. झैलसिंग यांच्या लहान वयातच त्यांना त्यांच्या आईला गमवावे लागले मग त्यानंतर त्यांना त्यांच्या आईच्या बहिणीने वाढवले.

त्यांनी गुरु ग्रंथ साहिबसह शीख पवित्र धर्मग्रंथांवर आणि शिकवणीवर प्रभुत्व मिळवून धार्मिक विद्वत्तेमध्ये सुरुवातीपासूनच स्वतःला गुंतवले. त्यांना त्यांच्या वडिलांकडून धार्मिक कल आणि अध्यात्माचा वारसा मिळाला तसेच ग्यानी झैल सिंग हे उर्दूमध्येही पारंगत होते आणि हिंदू धर्मग्रंथ आणि पौराणिक कथांबद्दल त्यांना बरीचसी माहिती होती.

अमृतसरमधील शाहिद शीख मिशनरी कॉलेजमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी ग्यानी ही पदवी मिळवली, जी धार्मिक अभ्यासात प्रवीण व्यक्तीला दिली जाते.

राजकीय कारकीर्द 

भगतसिंगच्या फाशीमुळे प्रभावित होऊन ग्यानी झैल सिंग यांनी तरुण वयातच राजकारणात सामील झाले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यांनी इ.स १९३८ मध्ये फरीदकोटमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक युनिट स्थापन केले, ज्यामुळे त्यांना इंग्रजांनी पाच वर्षे तुरुंगात टाकले.

तिहार तुरुंगात कैदी असताना त्यांनी आपले नाव जर्नेलवरून बदलून झैल केले. १९५१ – १९५२ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, सिंह हे पतियाळा आणि पूर्व पंजाब राज्य संघ (पेप्सू ) चे कृषी मंत्री बनले. १९५५ – १९५६ पर्यंत पंजाबसह एकत्र आल्यावर त्यांनी पेप्सु प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केले.

त्यांचे राजकीय प्रयत्न आणि लोकशाही हक्कांसाठी लढण्याच्या अविचल निर्धार पाहून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली. सिंग १९५६ ते १९६२ या काळात राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

ग्यानी झैल सिंग हे पंजाब सरकारमध्ये अनेक पदांवर काम केल्यानंतर इ.स १९७२ मध्ये त्यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि ते १९८२ मध्ये भारताचे राष्ट्रपती बनले.

कामगिरी

 • त्यांनी इ. स. १९३८ मध्ये फरीदकोटमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक युनिट स्थापन केले.
 • १९५१ – १९५२ मध्ये ते पूर्व पंजाब राज्य संघ (पेप्सू) चे कृषी मंत्री बनले.
 • १९५५ – १९५६ पर्यंत पंजाबसह एकत्र आल्यावर त्यांनी पेप्सु प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केले.
 • १९६२ या काळात राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.
 • इ. स. १९७२ मध्ये त्यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली.
 • १९८२ मध्ये भारताचे राष्ट्रपती बनले.

झैल सिंग यांच्या विषयी काही अनोखी तथ्ये – facts about giani zail singh 

 • १९८२ ते १९८७ पर्यंत भारताचे सातवे राष्ट्रपती होते आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते.
 • ग्यानी झैल सिंग यांच्या आई – वडिलांचे नाव माता इंद कौर आणि भाई किशन सिंग असे होते.
 • त्यांना त्यांच्या वडिलांकडून धार्मिक कल आणि अध्यात्माचा वारसा मिळाला तसेच ग्यानी झैल सिंग हे उर्दूमध्येही पारंगत होते आणि हिंदू धर्मग्रंथ आणि पौराणिक कथांबद्दल त्यांना बरीचसी माहिती होती.
 • इ.स १९५१ – १९५२ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, सिंह हे पतियाळा आणि पूर्व पंजाब राज्य संघ (पेप्सू) चे कृषी मंत्री बनले.
 • ग्यानी झैल सिंग यांचा जन्म ५ मे १९१६ रोजी पंजाब मधील फरीदकोटच्या संस्थानातील संधवान येथील शेतकरी कुटुंबात झाला.
 • त्यांनी इ. स १९३८ मध्ये फरीदकोटमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक युनिट स्थापन केले, ज्यामुळे त्यांना इंग्रजांनी पाच वर्षे तुरुंगात टाकले.
 • त्यांनी गुरु ग्रंथ साहिबसह शीख पवित्र धर्मग्रंथांवर आणि शिकवणीवर प्रभुत्व मिळवून धार्मिक विद्वत्तेमध्ये सुरुवातीपासूनच स्वतःला गुंतवले.
 • भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्यानी झैल सिंग यांना पटीयाला आणि पूर्व पंजाबचे महसूल मात्री बनवले गेले.
 • झैल सिंग यांनी आपली राजकीय कारकीर्द भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षातून पडली होती.
 • झैल सिंग हे पाच भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात लहान होते. झैलसिंग यांच्या लहान वयातच त्यांना त्यांच्या आईला गमवावे लागले मग त्यानंतर त्यांना त्यांच्या आईच्या बहिणीने वाढवले.
 • सिंग यांचा २५ डिसेंबर १९९४ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी चंदीगड येथे कार अपघातात मृत्यू झाला.

ग्यानी झैल सिंग यांचा मृत्यू 

ग्यानी झैल सिंग यांचा मृत्यू हा एका कार अपघातामुळे झालेला आहे आणि ते त्यांच्या अपघातानंतर एक महिना जगले होते पण दुर्दवाने २५ डिसेंबर १९९४ मध्ये त्यांचा चंदीगडमध्ये मृत्यू झाला.

आम्ही दिलेल्या giani zail singh information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ग्यानी झैल सिंग यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या giani zail singh information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of zail singh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये zail singh information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!