गुरुपौर्णिमा माहिती मराठी Guru Purnima Information in Marathi

Guru Purnima Information in Marathi गुरुपौर्णिमा माहिती मराठी, असे म्हणतात की जीवनाच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला गुरूची मदत लागतेच. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण तरी एखादा गुरू असतोच जो त्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी धडपडत असतो. कोणाचे आई वडील गुरू असतात, तर कुणाचे शिक्षक च गुरू असतात. कुणाचे कोच गुरू असतात तर कुणाचे मित्र सुद्धा गुरू चे काम करतात. महाभारत मधे गुरू द्रोणाचार्य बद्दल आपण ऐकलं असेलच तशा अनेक कथा इतिहासात सापडतील. आपल्या इथे तसच गुरू ला समर्पित एक पौर्णिमा असते ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊ.

“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा

गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः”

गुरु हा सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा व्यक्ती असतो जो आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी मदत करत असतो आणि म्हणूनच असे देखील म्हटले आहे कि गुरुवीण कोण दाखवील वाट. आपले गुरु हे कोणीही असू शकता जे आपल्याला अज्ञाना कडून ज्ञानाकडे नेतात त्यांना आपण गुरु म्हणू शकतो जसे कि आपली आई, वडील, शाळेतील शिक्षक आणि इतर जे आपल्या ज्ञान संपादन करतात.

भारतामध्ये गुरूला खूप पूर्वीच्या काळापासून महत्वाचे स्थान आहे आणि पूर्वी गुरुची आज्ञा हि शेवटची आज्ञा असत होती आणि ती त्याच्या शिष्य कडून पाळली जायची. गुरु हा आपल्या अज्ञाना कडून ज्ञानाकडे नेणारा व्यक्ती आहे म्हणजे तो आपल्या शिष्याला वाट दाखवण्याचे आणि आयुष्याला आकारण देण्याचे एक महान काम करतात म्हणून त्यांचा आदर-सत्कार तसेच कृतज्ञता म्हणून गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. आज आपण या लेखामध्ये “गुरु पौर्णिमा” या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत.

guru purnima information in marathi
guru purnima information in marathi

गुरुपौर्णिमा माहिती मराठी – Guru Purnima Information in Marathi

प्रकारप्राचीन सण
गुरुपौर्णिमेचे दुसरे नावव्यासपौर्णिमा
केंव्हा साजरा केला जातोगुरु पौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या शुध्द पौर्णिमेला साजरा केला जातो

गुरु पौर्णिमा माहिती – guru purnima mahiti in marathi 

गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे एक सामान्य कारण म्हणजे ते शिष्याला आयुष्यामध्ये चांगली वाटचाल करण्यासाठी मदत करतात आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केली जाते. गुरु पौर्णिमा हा भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून साजरा केला जाणारा सण आहे आणि या सणाला व्यासपौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते कारण हा दिवस व्यासांच्या जन्मदिवस दिवशी साजरा केला जातो.

गुरु पौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या शुध्द पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या दिवशी गुरुचे पूजन केले जाते तसेच शुभेच्छा दिल्या जातात. गुरु पोर्णिमेदिवशी गुरुचे शिष्याकडून पाद्यपूजन केले जाते तसेच गुरूला फुल देवून शिष्य त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो. गुरुपौर्णिमा हि पूर्वीच्या काळी शिष्य आश्रमात आपल्या गुरुसाठी साजरी करत होते परंतु सध्या गुरु पौर्णिमा शाळेमध्ये, वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, कॉलेजमध्ये आणि काही इतर क्षेत्रामध्ये देखील साजरी केली जाते.

गुरु पौर्णिमा हा दिवस हिंदू, जैन, बौद्ध या धर्मांच्या सोबत भारतामधील अनेक लोक हा दिवस अगदी उत्साहाने साजरा करतात. गुरु पौर्णिमा हा दिवस आपण असा माणू शकतो कि हा दिवस गुरु आणि शिष्याच्या प्रेमाचा दिवस म्हणून अनेक शिष्य मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटामध्ये हा दिवस घालवला जातो.

गुरु पौर्णिमेदिवशी जरी शिष्याकडून गुरुचे पूजन जरी होत असले तरी हि खरी गुरु पौर्णिमा नव्हे तर शिष्य आपल्या गुरूच्या सर्व आज्ञांचे पालन करत असेल किंवा गुरुने दिलेल्या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर करत असेल तर ती खऱ्या अर्थाने गुरुसाठी एक चांगली पौर्णिमा असते.

गुरु पौर्णिमेचा इतिहास – history  

गुरुपौर्णिमा हि व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते कारण हा व्यास मुनींचा जन्मदिवस आहे. व्यास हि आपल्या प्राचीन भारतामधील एक प्रसिध्द गुरूंच्यापैकी एक आहेत आणि त्यांनी महाभारताचे महाकाव्य रचले आहे तसेच चार वेदांची ( ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ) रचना केली तसेच अनेक हिंदूंच्या पुरणाची रचना केली आणि अश्या प्रकारे त्यांनी भारताच्या ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर पाडली आणि म्हणून त्यांना एक प्रसिध्द गुरु मानले जाते आणि म्हणून त्यांच्या जन्मदिवसादिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते.

गुरु शिष्याचे उत्तम उदाहरण – guru purnima che mahatva in marathi

गुरु आणि शिष्य म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर येतात गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्य. गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची कथा कोणाला माहित नाही असे नाही तर हि कथा सर्वांना माहित आहे. ज्यावेळी गुरु द्रोणाचार्य पाडवांना धनुर्विद्या शिकवत होते त्यावेळी एकलव्याने हि विद्या लांबून पाहून त्याचा सराव त्यांच्या पुतळ्या समोर रोज सुरु ठेवला आणि ज्यावेळी एकलव्य या कलेमध्ये पारंगत झाला त्यावेळी त्याने आपली धनुर्विद्येची कला गुरु द्रोणाचार्यांच्या समोर सादर केली.

आणि धनुर्विद्येतील अनेक कौश्यल्य पाहून गुरु द्रोनाचार्यांनी एकलव्याला विचारले कि तुझा गुरु कोण त्यावेळी एकलव्याने द्रोनाचार्यांचे नाव सांगितले. त्यावेळी द्रोणाचार्य म्हणाले ते कसे काय, त्यावेळी एकलव्याने तुम्ही ज्यावेळी पाडवांना हि विद्या शिकवत होता त्यावेळी मी हि कला अवगत केली आहे असे सांगितले. गुरु द्रोणाचार्यांनी त्यावेळी गुरु दक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला त्यावेळी एकलव्याने गुरु दक्षिणा म्हणून आपल्या हाताचा अंगठा दिला.

खरा गुरु कोण असतो ?  

गुरु हा आपल्या अंधाराकडून प्रकाशा कडे नेणारा व्यक्ती असतो किंवा तो शिष्याला आपल्या जवळचे ज्ञान देवून त्या संबधीत शिष्याला पुढील आयुष्यासाठी वाट दाखवण्याचे काम तो करत असतो. जर एखादा शिष्य चुकत असेल तर त्याला बरोबर काय आहे किंवा खरे काय आहे हे सांगून जर त्यांच्या चांगल्या वाटेवर वाटचाल करण्यासाठी मदत करत असतो तसेच त्याला आपल्या शिष्याचे कल्याण व्हावे असे देखील वाटत असते.

गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते ?

गुरु पौर्णिमा हा सन खूप प्राचीन काळापासून साजरा केला जातो आणि हा सण गुरुसाठी एक आदर सत्कार म्हणून साजरा केला जातो तसेच या दिवशी शिष्य गुरूकडे आपली कृतज्ञता व्यक्त करतो.

गुरुपौर्णिमेला दुसरे नाव काय आहे आणि गुरु पौर्णिमा केंव्हा साजरी केली जाते ?

गुरु पौर्णिमेला व्यासपौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते कारण हा दिवस म्हणजे व्यासांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या शुध्द पौर्णिमेला साजरा केला जातो.

गुरु पौर्णिमा म्हणजे काय ?

गुरु पौर्णिमा या शब्दाला एक अर्थ आहे तो म्हणजे गुरु म्हणजे “मार्गदर्शक” आणि पौर्णिमा म्हणजे “”प्रकाश” असा होतो  

गुरुपौर्णिमा या सणाविषयी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा – guru purnima wishes in marathi

  • आधी गुरूसी वंदावे मग साधनं साधावे, गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा.
  • गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा
  • गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, गुरु पौर्णिमा निम्मित शुभेच्छा.
  • अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधारा कडून प्रकाशाकडे नेणारा म्हणजे गुरु, गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
  • गुरूने दिला ज्ञारूपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा, गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा.
सनगुरु पौर्णिमा
पाळणेत्यांच्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी हिंदू आणि बौद्धांनी साजरे केले
उत्सवगुरुची पूजा आणि मंदिर भेट
महत्त्वआध्यात्मिक शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे
तारीखसोमवार, 3 जुलै, 2023  
यांचे निरीक्षण

 

भूतान, भारत आणि नेपाळमधील जैन, हिंदू भक्त आणि बौद्ध शिष्य
वारंवारतावार्षिक

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये guru purnima information in marathi wikipedia काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर guru purnima information in marathi language म्हणजेच “गुरुपौर्णिमा माहिती मराठी “ diwali vasubaras या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या guru purnima mahiti marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि guru purnima che mahatva in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!