गुरूर्ब्रह्मा,गुरूर्विष्णुः,गुरूर्देवो महेश्वरः
गुरूर्साक्षात् परब्रह्म् तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुर ब्रह्मा : गुरु ब्रह्मा (निर्माता) सारखा आहे.
गुरूर विष्णु : गुरु विष्णू (संरक्षक) सारखा आहे.
गुरूर देवो महेश्वरा : गुरु हा भगवान महेश्वर (विध्वंसक) सारखा आहे.
गुरु: साक्षात् : खरा गुरू, डोळ्यांसमोर आहे.
परब्रह्म : सर्वोच्च ब्राह्मण.
गुरुवे नम : त्या एकालाच: मी त्या खर्या गुरुला.
Guru Purnima Speech in Marathi गुरुपौर्णिमा भाषण अर्थातच याचा अर्थ असा होतो की, गुरूंना ब्रह्मासारखे (निर्माता) मानले जाते. कारण, त्याने तुमच्यात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केली आणि तुम्हाला योग्य दिशेने नेले. जगातील नकारात्मक प्रभावापासून गुरु तुमचे रक्षण करतो आणि तुमच्या प्रगतीस मदत करतो, म्हणून गुरु विष्णू (रक्षक) मानला जातो. गुरूंना शिव (विध्वंसक) मानले जाते. कारण, त्याने आपल्या दुःखाचा नाश केला आणि तिथूनच कर्मबंध हटविण्याचा मार्ग सुद्धा मोकळा केला. वास्तविक पाहता, आत्मा म्हणून गुरू हा परमब्रह्मांचा अवतार आहे.
गुरुपौर्णिमा भाषण – Guru Purnima Speech in Marathi
Guru Purnima Speech in Marathi for Students
मित्रांनो, कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देवून त्यापासून सुंदर मडकी घडवतात, त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख असा आकार देवून त्यांना यशस्वी बनवण्याचे महान कार्य आपले शिक्षक करत असतात. आई ही प्रत्येकाचा पहिला गुरु असते. पण, त्यानंतर मात्र प्रत्येक पाल्याला घडवण्याचे काम शिक्षकच करतात.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच या तिथीला आपण सर्वजण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलमय दिवस आहे.
त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली भारतीयांची श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.
ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनी सुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली होती. त्यामुळे, व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा आपल्या भारतामध्ये प्रघात आहे म्हणजेच परंपरा आहे.
आपल्या भारत देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. मित्रांनो, अशा या गुरूंना मान देणे, आदराने त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
- नक्की वाचा: शिक्षक दिनाचे भाषण
महर्षी व्यासांपासून ही प्रथा रूढ झाली आहे, ती आजमितीपर्यंत चालू आहे. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत आपल्याला एक कृतज्ञता वाटते. याशिवाय, भारतीय गुरुपरंपरेत अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जसे की जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे.
मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी तर आपल्या गुरूच्या घरी लाकडे देखील वाहिली होती.
संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव हे साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. अशा थोर नामदेव महाराजांचे गुरु होते ते म्हणजे विसोबा खेचर. खरतरगावाला मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते.
पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात आणि हा ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे, आपण सर्वांनी गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यादिवशी गुरूची प्रार्थना करावयाची असते. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय आपल्याला पाणी मिळू शकत नाही.
त्याप्रमाणे, गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे!
“गुरू महंत वधुनी राज्य करणे।
त्या परिस लौकिकी भिक्षा आचरणे।
उपा तरी सुखाकारणे।
ते रूधीर भोग जाणावे।।
भगवान श्रीराम, तसेच भगवान श्रीकृष्ण हे देवावतार असूनसुद्धा गुरुअंकित आहेत. अंधकाराचा नाश करून जो आपल्या शिष्याला ज्ञानाचा प्रकाश देतो तो खऱ्या अर्थाने गुरू असतो. जो सकल जिवास चांगले शिकवितो, सुसंस्कार देतो तो म्हणजे गुरू. सत् म्हणजे सत्य, तसेच परमात्म्याची भेट घालून देणारा गुरू, ज्याला सद्गुरू असे म्हटले जाते.
संत एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र, तंत्र, उपदेश देणारे भरपूर गुरू भेटतील. पण, आपल्या शिष्यास सद्वस्तूची ओळख करून देणाराच सद्गुरू होऊ शकतो. सद्गुरूपेक्षाही मोठा श्रीगुरू असतो. आपल्या ज्ञानोबा माउलींना संत एकनाथ महाराज हे श्रीगुरू म्हणूनच संबोधतात.
“एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले।
श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वर।।
मित्रांनो, श्रीगुरू या गुरुपेक्षा सर्वांत उच्च अशी गुरूची अजुनही पुढे गुरूची एक पायरी असते. ती म्हणजे जगद्गुरू. आद्य शंकराचार्य, संत तुकोबा महाराज आणि श्रीकृष्ण परमात्मा यांना जगद्गुरू ही उपाधी प्राप्त झाली आहे. कारण ते सगळ्या जगाचे गुरू मानले जातात.
असा जगद्गुरू परमात्मा साक्षात भगवंत श्रीकृष्ण हा अर्जुनाजवळ होता आणि गंमत अशी की, अर्जुन मात्र महाभारतात युद्ध चालू असताना; वेड्यासारखे श्रीकृष्ण परमात्म्यालाच प्रश्न करत होता. कारण मित्रांनो, अर्जुनाकडे त्याचा अहंकार उरला होता आणि त्याचा हा उरलेला अहंकारच त्याच्या मुखातून देवाला ज्ञान शिकवू पाहत होता.
- नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज भाषण
वास्तविक पाहता, भगवान श्रीकृष्णाने धर्म, न्याय, नीती, नियम यांचा वस्तुपाठ अगदी लहान वयातच जगताला दाखवून दिला होता. देवकी आणि वासूदेवासाठी श्रीकृष्ण हा बाळकृष्ण झाला होता तर, कुमारींकांसाठी श्रीकृष्ण गोकुळी देखील गेला होता. शिवाय, जेंव्हा श्रीकृष्ण खूप लहान होते तेंव्हाच त्यांनी पुतनेचा वध देखील केला होता.
श्रीकृष्णांनीच गर्वाने फुगलेल्या इंद्रदेवाचा गोवर्धन उचलून अहंकार घालविला होता. याशिवाय, लेकीबाळींना, मुलंमाणसांना त्रास देणारा कालिया साप गोकुळामध्ये स्वतःचे राज्य चालवत होता, तेंव्हा श्रीकृष्णांनीच त्याच्या डोक्यावर थयथय नाचून, आपल्या लहानपणीच त्याला यमसदनास पाठवले होते.
गोकूळ नगरीवर आलेले संकट घालविण्यासाठी बारा गाव अग्नी प्राशन करणारे श्रीकृष्णच होते. बह्मदेवास वेड लावण्यासाठी गोमातेचं वासरू बनवणारे, अत्यंत लहान वयात कंस मामासारख्या अनेक राक्षसांना यमसदनास पाठवणारे, साक्षात जगद्गुरू हे श्रीकृष्णच होते. याच श्रीकृष्णांनी गोकूळनगरीत समाजकारण केले.
शिवाय, श्रीकृष्णांनी मथुरेला जाऊन जे पक्के राजकारण केले ते फक्त समाजहितासाठी होते. द्वारकेत मात्र त्यांनी पूर्णपणे धर्मकारण केले होते. कारण, तिथे तो धर्माचा राजा होता व राजाचा धर्म पाळणारा म्हणूनच तो द्वारकाधीश झाला होता.
हे सगळं अर्जुनाला माहीत होतं. खरंतर, श्रीकृष्ण हे बालपणापासूनच अर्जुनाचे जिवलग मित्र होते. श्रीकृष्ण देवतेला युक्तीच्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. खरंतर मित्रांनो, अर्जुनाने महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले. कारण, युद्धामुळे होणारा संहार त्याला माहीत होता. तो संहार टाळावा यासाठी तो प्रयत्नशील होता.
हे युद्ध आप्तइष्टातच होऊन दोन्हीही बाजूंचे नुकसान होणार होते. या सर्व गोष्टींचा अनुभव श्रीकृष्णाला देखील होता. पण तरीदेखील, श्रीकृष्ण देवाला काहीच कसे कळत नाही? असे अर्जुनाला वाटतं होते. श्रीकृष्ण मला माझ्याच गुरूंच्या विरूद्ध लढायला भाग पाडतो आहे असे विचार अर्जुनाच्या मनात येत होते.
वरील सद्गुरू, गुरू, श्रीगुरू, जगद्गुरू या संज्ञेमध्ये गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे कुठेच कसे काय बसत नाहीत? केवळ एक क्रूर, अनीतीची पाठराखण नाइलाजास्तव का होईना त्यांना करावी लागते, म्हणून तर ते सर्व गुरू अर्जुनासारखा उत्तम शिष्य त्यांच्याजवळ असूनही त्यालाच मारण्यासाठी शत्रूच्या पक्षात उभे राहतात.
खरंतर, अर्जुनाला माहीत होते की ही धर्मनीती नाही! पण जे आपले गुरू आहेत, ज्यांच्याकडून अर्जुनाने विद्या घेतली, त्यांच्या वधास कारणीभूत होणे हे योग्य नाही तसेच, त्यांना मारून राज्य मिळविणे देखील व्यर्थ आहे असे अर्जुनाला त्यावेळी वाटू लागले होते. त्यापेक्षा, मी दयेचीच भिक्षा मागणे योग्य होईल, ते माझ्या नशिबाचे, रक्ताचे भोग समजून सहन करणे योग्य होईल असे विचार अर्जुनाच्या मनात घोळत होते.
पण गुरुवधाच्या पापात पडणे योग्य होणार नाही अशी धारणा अर्जुनाची होती. तसं पाहिलं तर गुरूंचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरू हा संतकुळीचा राजा आहे. तो माय, बाप, बंधू, भगिनी, मित्र, सगा, सोरा अशा सगळ्या नात्यांचा सूत्रधार आहे. तो ब्रह्मनंद देणारा, परमसुखद आहे. प्रत्येक गुरू हा ज्ञानपूर्ती आहे.
- नक्की वाचा: स्वातंत्र्य दिनाचे भाषण
त्यामुळे, द्वंद्व असण्याचं काहीच कारण नाही. कारण गुरू हा त्याच्याही पुढे आहे. गुरू हा ज्ञानमूर्ती असल्याने त्याचे ज्ञान हे गगनासारखे विस्तीर्ण आहे. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या देखील तो पलीकडे आहे.
मित्रांनो, गुरु पौर्णिमाचा हा उत्सव गुरुला आदर आणि समर्पण करण्याचा उत्सव आहे. असे मानले जाते की, यादिवशी गुरूंच्या हृदयाच्या उपासनेला सुरुवात करण्याने आपल्यावर गुरूची कृपा होते. यादिवशी बरेच लोक त्यांच्या गुरुसाठी उपवास देखील करीत असतात.
असे मानले जाते की, जेंव्हा प्राचीन भारताच्या काळात प्राचीन काळापासून विद्वानांनी आपल्या गुरुकडून संपूर्ण शिक्षण घेतले, तेंव्हा गुरू पौर्णिमेच्या या उत्सवाच्या वेळी त्यांनी आपल्या उपासनेत गुरू दक्षिणा देऊन आपल्या गुरुची उपासना केली.
आश्रमात उपासनेची व सेवेची विशेष अशी सेवा वापरली जात असे आणि अनेकजण गुरुदक्षिणा देण्यासाठी अनेक गोष्टी या दान देण्याकरिता वापरत असत. मित्रांनो, शिष्यांच्या जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला त्यांना शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु होय.
दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा आपल्या भारतभर खूप उत्साहाने साजरी केली जाते. मानवी जीवनात गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनन्यसाधारण महत्व दिले आहे आणि जनतेला देखील त्यांनी अनेक दृष्यांतातून सांगितले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान हे अतिउच्च आहे.
मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये जरी बालकाच्या आई-वडिलांना पहिला गुरु असे म्हटले जात असले, तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले गुरूच नेहमी प्रयत्न करत असतात. देशाचा चांगला नागरिक घडवण्यासाठी, बालकाच्या बालमनावर गुरूच खऱ्या अर्थाने प्रभाव टाकतात.
आपल्या जीवनात आपणाला गुरूंचे नानाविध रुप पहायला मिळत असते. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. यामुळे, आई ही आपणा सर्वांची पहिली गुरु असते. तस पाहिलं, तर निसर्गातील प्रत्येक कण हा आपला गुरु असतो, कारण, त्याच्याकडून आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सदैव शिकायला मिळतात.
जसे पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशू, पक्षी, समुद्र, नदी, त्याचबरोबर पुस्तके याशिवाय आपले नातलग, मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरूच असतात. जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. मित्रांनो, गुरुला वयाचे, जातीचे कधीही बंधन नसते. परंतू, आताचा काळ हा खूप बदललेला आहे.
त्याचबरोबर, आजची शिक्षण पद्धतीही बदललेली आहे. या बदलांमध्ये मात्र गुरु आणि शिष्य यांचे नाते बदललेले नाही. ते आजही पूर्वी मानले जायचे तितकेच पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमित प्रभाव होता. मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्या गुरूंचा ही आपल्यावर खूप प्रभाव असतो.
खरंतर, गुरुप्रमाणे शिष्य हा घडत असतो. म्हणून, आपण सर्वांनी नियमितपणे आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून गुरूचा, देशाचा, शाळेचा व आई-वडिलांचा नावलौकिक करायला हवा. कारण, आपण केलेल्या प्रगतीमध्येच आणि आपल्या यशामध्ये या सर्वांना समाधान वाटत असते.
नजरेपुढे कठोर होते, नजरे आडून पाझरते.
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते..!
मित्रांनो, गुरूपौर्णिमा हा गुरू आणि शिष्याचा सण भारतासह नेपाळ व जगभरात जिथे जिथे भारतीय राहतात तिथे तिथे साजरा केला जातो. हा अमूल्य दिवस शिष्यांसाठी गुरुबद्दल आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो हे तर आपल्याला माहीत आहेच. आषाढ पौर्णिमेचा हा दिवस महाभारताचे रचयीता महर्षी व्यास यांचा जन्म दिवस म्हणून देखील साजरा केला जातो.
प्राचीन काळात आपल्या देशात शिक्षेसाठी गुरुकुल शिक्षणपद्धती होती. या पद्धतीत आई आणि वडील आपल्या मुलाला लहान वयापासूनच गुरूच्या आश्रमात शिक्षणासाठी सोडून देत असत. यानंतर, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असत व शिक्षण पूर्ण झाल्यावरच त्यांना घरी पाठवत असत. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत मात्र प्रत्येक वसाहतीत एक नवीन विद्यालय बनलेले आहे.
मित्रांनो, वेळेच्या या बदलत्या चक्रात विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाविषयी सन्मान ठेवणे सगळ्यात आवश्यक आहे. त्याचबरोबर, शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत व विद्यार्थ्याला आपल्या पुत्राप्रमाणे किंवा पुत्रिप्रमाने वागणूक द्यायला हवी.
मित्रांनो, आजच्या या आधुनिक युगात शिक्षक व विद्यार्थ्यांत स्नेह कायम ठेवण्याची खूप आवश्यकता आहे. अनेक विद्यालयांतून, तसेच महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी हे आपापल्या गुरुजनांसमोर यादिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात आणि आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शिक्षकांचा आशीर्वाद देखील घेतात.
वेगवेगळ्या पंथोपंथांतून ईश्वर भक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक यादिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा देखील यादिवशी करतात.
- नक्की वाचा: डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण
आपल्या भारतीय संस्कृतीत देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोड अधिकच महत्त्व आहे ते गुरू आणि सद्गुरू यांचं. आपल्या मानवी जीवनातल्या जडणघडणी यामध्ये गुरूचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो, ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते, त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे!
ह्या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन खूप मनोभावे केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, खरंच किती मंगलमय असतोना! नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता.
ती त्या बालकाला चालायला शिकवते, बोलायला शिकवते आणि मातेनंतर त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता असतो. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका असतात आणि आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू असतात.
अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून आपण सर्वजण गुरुतत्व अनुभवत असतो. खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आचरण करणे होय. मित्रांनो, सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा प्रत्येक शब्द जपणे म्हणजे खऱ्या अर्थाने गुरू पूजन असते.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याकडे विशेष अशा अलौकिक नजरेने पाहिले जाते. मित्रहो, आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत तसेच सद्शिष्य देखील आहेत. अशा दोन्ही मोठ्या परंपरा आपल्या समाजाला प्राप्त झाल्या आहेत. गुरूला अनन्यभावे शरण जाणाऱ्या, गुरू महती कळलेल्या आणि अनुभवलेल्या प्रत्ययी शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..
सद्गुरू साईखा असता पाठीसारखा |
इतरांची लेखा, कोण करी ||
खरंतर, शिक्षकांच्या हातात देशाचं भविष्य असतं. कारण, शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचं नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होत असते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्याच नवनवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.
म्हणूनच, शिक्षकांना दुसरे पालक असेही म्हटले जाते. आपले विचार, मते आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे आपल्या शिक्षकांचा खूप मोठा त्यामध्ये वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्त आणि योग्य शिक्षण घेऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये येते.
त्यामुळे, शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील महत्व आपल्याला समजण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन प्रत्येक शाळेमध्ये देखील साजरा केला जातो. गुरू पौर्णिमा हा पवित्र दिवस अनेक शाळांमध्ये अनोख्या पद्धतीने दरवर्षी साजरा केला जातो.
मित्रांनो, शिक्षक म्हणजे ज्ञानाचा आणि पावित्र्याचा समुद्रच असतो. शिक्षक हा अपूर्ण गोष्टींना पुर्ण करणारा, आपल्या शब्दांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवणारा, आपल्या जगण्यातून मुलांचे जीवन घडविणारा, अनेक तत्वांतून जीवन जगताना आवश्यक असणारी मूल्ये फुलवणारा असतो. आपल्याला हा शिक्षक प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये दडलेला पाहायला मिळतो.
जिथे ध्येय दिसते, तिथे विद्यार्थ्यांना शिक्षकच नेतो. सत्य शिकवणारा, शाळेमध्ये शिकवलेले धडे विद्यार्थ्यांकडून वदवून घेणारा, ज्ञानाची ओळख करून देणारा आणि विद्यार्थ्यांना निस्वार्थ तळमळीने शिकविणारा व्यक्ती म्हणजे साक्षात शिक्षक असतो. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करतात.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे धाडस शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये उपजत असतात. याशिवाय, शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या अंगभूत गुणांचा देखील विकास होतो.
चला तर मित्रांनो, आजपासून आपण ही गुरू पौर्णिमा यादिवशी एक निश्चय करुया आणि गुरूंबद्दल मनात ऋण भाव ठेवून, त्यांना देवतेसमान पुजूया!
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या guru purnima speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “गुरुपौर्णिमा भाषण मराठी” shikshak din bhashan marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या guru purnima speech in marathi for students या guru purnima speech in marathi for teacher article मध्ये upadate करू, मित्रांनो हि guru purnima in marathi speech pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण guru purnima speech in marathi for students pdf या लेखाचा वापर असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट