पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध Importance of Books Essay in Marathi

Importance of Books Essay in Marathi पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये पुस्तकांचे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. वेगवेगळ्या पुस्तकांचे महत्व हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान तसेच माहिती मिळते त्याचबरोबर पुस्तके ही आपली मार्गदर्शक असतात म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिशा दाखवायची शक्ती हि पुस्तकांच्या मध्ये असते. पुस्तकातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान मिळते तसेच माहिती मिळते त्यामुळे आपण पुस्तकांना गुरु मानले तर काहीच हरकत नाही.

कारण जसे शिक्षण आणि आपल्याला माहिती देणारी किंवा आपल्यावर संस्कार करणारी आई देखील आपली गुरु असते तसेच पुस्तके देखील आपले गुरूच असतात. कोणत्याही पुस्तकामध्ये मिळालेली माहिती हि बरोबरच असते त्यामध्ये काहीच चुकीचे नसते त्यामुळे पुस्तकांच्या मार्फत जी माहिती मिळते त्यामध्ये काहीच चुकीचे नसते त्यामुळे आपल्याला पुस्तकांच्या मार्फत जे मार्गदर्शन मिळते ते चुकीचे नसते त्यामुळे अनेक जन त्यांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा वापर करतात.

आपण आपल्या शालेय अभ्यासामध्ये किंवा कोणत्याही डिग्रीचा अभ्यास करताना देखील वेगवेगळ्या पुस्तकांचा वापर करतो आणि त्यामुळे पुस्तकामध्ये आपल्याला जी माहिती हवी आहे त्याबद्दल सर्व काही असल्यामुळे आपल्यला अभ्यास करणे सोपे जायचे. पूर्वी घडलेल्या सत्य घटना, महान व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या कविता, ग्रंथ हे सर्व आपल्याला पुस्तकाच्या स्वरूपामध्ये अनुभवायला मिळते.

importance of books essay in marathi
importance of books essay in marathi

पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध – Importance of Books Essay in Marathi

Essay on Importance of Books in Marathi

पूर्वीच्या काळी अनेक संतांनी, कवींनी, लेखकांनी आपल्या लेखनाच्या आणि शब्दांची रचना करण्याची कला लक्षात घेवून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली जसे कि कविता संग्रह, वेगवेगळे नाटक, वेगवेगळे पौराणिक ग्रंथ, वेगवेगळ्या भूतकाळामध्ये होणाऱ्या सर्व घटना ह्या आपल्याला समजल्या त्या फक्त पुस्तकांच्यामुळेच.

पुस्तके हि वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात जसे कि शिक्षणासाठी जी पुस्तके लागतात ती वेगळ्या प्रकारची असतात तसेच देव धर्म करण्यासाठी जी पुस्तके असतात ती वेगळी असतात ( उदा : भगवद्गीता ), तसेच पूर्वी घडलेल्या गोष्टींची आणि कथांची पुस्तके हि वेगळी असतात ( उदा : महाभारत, रामायण ), तसेच आपल्याला ध्येर्य देणारी पुस्तके असतात तसेच काही लोकांच्या आयुष्यावर देखील पुस्तके असतात ज्याला आपण जीवनचरित्र असे म्हणतो, तसेच लहान मुलांच्यासाठी गोष्टींची पुस्तके असतात.

तसेच काल्पनिक गोष्टींची पुस्तके असतात, वेगवेगळे कविता संग्रह असतात अश्या प्रकारे पुस्तकाचे भांडार हे खूप मोठे आहे आणि यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचल्यामुळे आपल्या ज्ञानात तर भर पाडतेच परंतु पुस्तक हि अशी एक गोष्ट आहे जे आपले शब्दसंग्रह, संप्रेषण कौश्यल्य, वाचनाची एकाग्रहता या सर्व गोष्टी सुधारतात. आपण जर वेगवेगळ्या पुस्तके वाचली तर त्या पुस्तकांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चांगले विचार असतात आणि त्या विचारांचा आपल्यावर देखील परिणाम होतो आणि त्यामुळे आपण देखील आपल्या व्यक्तीमत्वामध्ये चांगले बदल घडवून अनु शकतो.

ज्या लोकांना वाचनाची आवड असते ते सतत कोणते ना कोणते तरी पुस्तक वाचत असतात आणि ते पूर्वीच्या काळातील कथा सांगणारे असो किंवा मनोरंजक गोष्टी सांगणारे असो किंवा कोणत्याही साहित्य रचना असो. वाचनाची आवड असणारे लोक सतत [उस्तक वाचत असतात आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके असतातच परंतु कोणत्याही व्यक्तीचे एक आवडते पुस्तक असतेच आणि त्या व्यक्तीला ते वेळा जरी वाचले तरी ते वाचायला कंटाळा येत नाही.

प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये रस असतो आणि ते लोक ज्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात त्या विषयांच्यावर पुस्तक वाचतात. जर तुम्हाला तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याबद्दल अनेक पुस्तके असतात त्यामधून आपल्याला जुन्या तसेच नव्या तंत्रज्ञानाविषयो देखील माहिती मिळते. तसेच जर तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये रस असेल तर आपल्याला या विषयावर देखील अनेक पुस्तके मिळतात आणि त्यामधून आपल्या वेगवेगळ्या प्रकारची राजकीय माहिती मिळते ( उदा : चाण्यक्य नीती ) तसेच जर आपल्याला भारताच्या इतिहासाबद्दल माहित हवी असल्यास बाजारामध्ये अनेक भारताचा इतिहास सांगणारी पुस्तके आहेत.

जर तुम्हाला आयुर्वेद विषयी माहिती हवी असेल तर भारतामध्ये आयुर्वेदाविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. अश्या वेगवेगळ्या प्रकारे आपण पुस्तकातून माहिती घेवू शकतो. तसेच आपल्या भारतामध्ये अनेक महान संतांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहून ठेवले आणि त्यामधून आपल्या अनमोल असे माहितीचे भांडार तसेच शब्दांचे भांडार देखील मिळते आणि आपल्या भारतामध्ये ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ खूप लोकप्रिय आहे आणि हा लोकांना वाचायला खूप आवडतो.

भारताच्या भूतकाळामध्ये अनेक घटना होवून गेल्या त्यामधील काही प्रसिध्द झाल्या आणि त्या म्हणजे रामायण आणि महाभारत. रामायण आणि महाभारत कसे घडले हे कोणाला महित नाही तर हे सर्वांना माहित आहे आणि हे फक्त पुस्तकांच्या मुले शक्य झाले आहे. रामायणामध्ये प्रभू श्री रामांना त्यांच्या पत्नीसह म्हणजेच ( देवी सीता ) आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांच्या सोबत वनवासाला जावे लागले आणि त्यांना १४ वर्षाचा वनवास भोगावा लागला होता.

तसेच रावणाने सीतेचे अपहरण देखील केल होते आणि प्रभू श्री राम आणि रावण यांच्यामध्ये युध्द देखील झाले होते आणि प्रभू श्री रामांनी वाईटावर सत्याचा विजय मिळवला होता. तसेच महाभारतामध्ये देखील ज्यावेळी पांडवांच्या कडून राज्य गेले होते त्यावेळी श्री कृष्ण यांनी अर्जुनाला समजावून राज्य परत मिळवण्यासाठी कौरवांच्याबरोबर युध्द करण्यासाठी सांगितले आणि त्यांच्यामध्ये युद्ध झाले होते आणि या सर्व घटना पुस्तकामध्ये लिहून ठेवल्या होत्या आणि या घटना पुस्तकामध्ये लिहून ठेवल्या होत्या म्हणून त्या आपल्याला समजू शकल्या.

पुस्तक हे विद्यार्थी जीवनामध्ये देखील खूप महत्वाचे असते कारण शाळेमध्ये कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी पुस्तकाची गरज असतेच जसे कि आपण शाळेमध्ये असताना आपल्याला मराठी, समाज शास्त्र, विज्ञान, गणित यासारखी पुस्तके अभ्यास करण्यासाठी लागतात तसेच आपल्याला कॉलेज मध्ये गेल्यानात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके लागतात जसे कि अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणारी पुस्तके लागतात.

तसेच व्यापार आणि व्यावास्थापन विषयक शिक्षण घेण्यासाठी व्यापार आणि व्यावास्थापन विषयक पुस्तके लागतात तसेच कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी कायद्याविषयक माहिती देणारी पुस्तके आपल्याला महत्वाची असतात आणि अश्या प्रकारे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वेगवेगळे शिक्षण घेण्यासाठी वापरतात. अश्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक पुस्तकाला महत्व आहे आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत ज्यामुळे आपल्याला वेगेगल्या प्रकारची माहिती मिळते तसेच आपले माहितीचे आणि शब्दाचे भांडार वाढते.

आम्ही दिलेल्या importance of books essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on importance of books in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि importance of reading books essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!