Vidnyan Ani Tantradnyan in Marathi Essay – Science And Technology Essay In Marathi विज्ञान आणि तंत्रज्ञान निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर निबंध लिहिणार आहोत. पूर्वीच्या काळी जरी विज्ञान आणि तंत्रज्ञान याला महत्व नसले तरी सध्याच्या आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञाला खूप महत्व आहे. सध्या सर लोक हे विज्ञान आणि तंत्रज्ञावर आधारित आहेत आणि लोकांचे जगणे विज्ञान आणि तंत्रज्ञाना शिवाय अवघड झाले आहे, म्हणजेच लोकांना वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत आहेत.
जगामध्ये रोज काही ना काही वेगवेगळ्या तंत्रज्ञाचा शोध लागतो म्हणजेच रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा शोध लागतो. दिवसेंदिवस हे जग आधुनिक होते चालले आहे आणि जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागल्यामुळे लोकांचे अनेक कामे सोपी झाली आणि लोकांची कामे खूप कमी वेळेमध्ये होत आहेत आणि त्यामुळे लोकांचा खूप वेळ वाचत आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान निबंध मराठी – Vidnyan Ani Tantradnyan in Marathi Essay
Vidnyan Ani Tantradnyan in Marathi Nibandh
भारतामध्ये सर्वप्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरू यांनी आणले तसेच भारतामध्ये देखील अनेक शोध लागले तसेच भारतामध्ये देखील विज्ञाना मध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये भर पडणारे अनेक शास्त्रज्ञ होवून गेले आणि त्यामधील काही म्हणजे ए. पी. जे अब्दुल कलाम, होमी भाभा, विक्रम साराभाई, हर गोविंद खुराना, चंद्रशेखर व्यंकट रामन, मेघनाद साहा या सारखे अनेक शास्त्रज्ञ होवून गेले आणि त्यांनी भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये तर भर पाडलीच परंतु त्यांनी भारताचे नाव जगामध्ये देखील उंचवण्यासाठी मदत केली.
जगामध्ये असे अनेक शास्त्रज्ञ होवून गेले ज्यांनी जगाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञाना मध्ये मोलाची भर पडली आणि लोकांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसन हे नाव कोणाला माहित नाही तर हे नाव सर्वांना माहित आहे. कारण यांनी बल्बचा शोध लावला आणि त्यामुळेचा आता आपण रात्रीच्या वेळी घरामध्ये आपल्याला पुरेसा प्रकाश पडू शकतो.
तसेच आयझॅक न्यूटन हे नाव घेताच त्यांनी लावलेला शोध सर्वांना आठवतो आणि या शास्त्रज्ञा बद्दल कोणाला माहित नाही असे नाही या शास्त्रज्ञा बद्दल सर्वांना माहित आहे आणि यांच्या शोधाबद्दल देखील माहित आहे तरीही मला सांगावेसे वाटते कि आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण याचा शोध लावला. ज्यावेळी ते एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते त्यावेळी एक सफरचंद खाली पडले आणि मग त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला कि सफरचंद खालीच कसे पडले ते वर का गेले नाही आणि त्या गोष्टीपासून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला.
तसेच अल्बर्ट आईनस्टाईन यांनी e= mc2 म्हणजेच त्यांनी उर्जा आणि वस्तुमान या बद्दल शोध लावला तसेच त्यांनी फ्रीजचा देखील शोध लावला. टेलिफोनचा शोध हा ग्रॅहमबेल यांनी लावला आणि त्यामुळे लोकांना आपल्यापासून दूर असणाऱ्या लोकांच्यासोबत बोलता आले. टेलिफोन नंतर विकसित करण्यात आला आणि आता सर्वजन अँड्रॉईड मोबाईल वापरतात आणि सध्या लोकांना मोबईलची इतकी सवय झाली आहे कि कित्येक वेळी वाटते कि लोक मोबाईलशिवाय जगूच शकणार नाहीत. अशा प्रकारे जगातील शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून लोकांचे जीवन खूप सुलभ आणि सोपे बनवले तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञाना मध्ये भर पाडली.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची इतकी सवय झाली आहे कि लोकांनाच एक दिवस देखील तंत्रज्ञांचा उपयोग केल्याशिवाय जात नाही. आपण जे रोजच्या जीवनामध्ये वापरतो जसे कि फ्रीज, टी व्ही, ओव्हन, मोबाईल, संगणक, टॅब, वॉशिंग मशीन, फॅन, कुलर, हिटर यासारख्या अनेक वस्तू आपण अगदी सहजपणे वापरतो आणि त्यामुळे आपली कामे सोपे होतात तसेच खूप कमी वेळेमध्ये काम होते आणि हे सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भेट आपल्याला मिळाली आहे.
तसेच संगणकाचा वापर हा देखील आजच्या आधुनिक जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. संगणक हा बहुतेक सर्व क्षेत्रामध्ये वापरला जातो जसे कि विज्ञान क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रांमध्ये, आयटी क्षेत्रामध्ये अश्या प्रकारे संगणकाचे अनेक उपयोग आहेत तसेच आपण संगणकावर घराच्या घरी काम करू शकतो आणि हे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्या जातात आणि त्यामध्ये वैद्यकीय मशीन असो किंवा मग औषधे हि विज्ञानाचीच देणगी आहे तसेच कपडे बनवण्याच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये, फूड उत्पादन क्षेत्रामध्ये, वस्तू उत्पादन क्षेत्रामध्ये अश्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या तसेच छोट्या मशिनरी वापरल्या जातात त्या सर्व आपल्याला तंत्रज्ञानापासून मिळाले आहे आणि जगामध्ये एका तंत्रज्ञाना पासून दुसरे तंत्रज्ञान निर्माण झाले आहे.
सायकल पासून दुचाकी गाडीचा शोध, दुचाकी गाडी पासून चार चाकी गाडीचा शोध हा विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळेच लागला तसेच विमानाचा शोध देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लागले आणि विमानाचा शोध लागल्यामुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे खूप सोपे, सुलभ आणि कमी वेळेमध्ये झाले म्हणजेच गाडीने लोकांना एका ठिकाणी जाण्यासाठी ७ ते ८ तास लागत होते ते विमानामुळे १ तासामध्ये शक्य झाले.
तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे रेल्वेचा देखील शोध लागला अश्या प्रकारे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयी जितके सांगू तितके कमीच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे असे छोटे मोठे शोध तर लागलेच परंतु विज्ञानाने आणि तंत्रज्ञानामध्ये अवकाश विषयक शोध देखील लावले. भारताने मंगळ या ग्रहावर पाहणी करण्यासाठी तसेच त्या ग्रहाबद्दल अभ्यास करण्यासाठी मंगळावर गेल्या काही काळामध्ये अवकाश यान सोडले आहे.
तसेच भारताने चंद्रावर देखील अवकाश यान सोडले आहे आणि इतर देशांनी देखील चंद्रावर तसेच इतर ग्रहांच्यावर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी यान सोडले आहे आणि या वरून आपल्याला असे समजते कि जगातील विज्ञान आणि तंत्रज्ञान हे किती सुधारित आहे आणि कोणत्या उंचीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करू शकते.
आजच्या आधुनिक जगामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो ती विज्ञानाची आणि तंत्रज्ञांची देणगी आहे, आपण आजारी असल्यावर जी ट्रीटमेंट घेतो किंवा जी औषधे घेतो हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे अश्या प्रकारे आपण सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या मध्ये पूर्णपणे अडकलो आहोत आणि आपल्याला आता विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून जन्माला आलेल्या गोष्टींच्यामध्ये पूर्णपणे गुंतलो आहोत तसेच तंत्रज्ञानापासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत जसे कि टी.व्ही, मोबाईल, संगणक या वापरल्याशिवाय आपला दिवसच जात नाही म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवाच्या जीवनातील एक महत्वाचा भाग बनले आहे.
आम्ही दिलेल्या vidnyan ani tantradnyan in marathi essay माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर विज्ञान आणि तंत्रज्ञान निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vidnyan ani tantradnyan in marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट