जगदीश खेबुडकर यांची माहिती Jagdish Khebudkar Information in Marathi

jagdish khebudkar information in marathi जगदीश खेबुडकर यांची माहिती, मराठी चित्रपट सृष्ठीमध्ये अनेक असे गीतकार होऊन गेले आणि या त्यामधील एक म्हणजे जगदीश खेबुडकर आणि आज आपण या लेखामध्ये गीतकार, कवी म्हणून ओळखले जाणारे जगदीश खेबुडकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. जगदीश खेबुडकर हे विशेषता चित्रपटांना संगीत देण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये एकूण ३५० ते ४००० पर्यंत गाणी हि चित्रपटांच्यासाठी लिहिली आहेत तर त्यांनी चित्रपटांच्या गाण्यांच्या सोबत इतर ३००० गाणी सुध्दा लिहिली आहेत.

गाण्यांच्या सोबत त्यांना नाटक, कथा आणि कविता देखील लिहण्याच खूप आवड होती आणि त्यांनी २० हून अधिक कथा, ४ ते ५ नाटक आणि ३५०० कविता लिहिल्या आहेत. जगदीश खेबुडकर यांचा जन्म १० मे १९३२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील खेबवडे या गावामध्ये झाला होता. त्यांचे वडील हे शिक्षक होते सनी शिक्षक म्हटलं कि पूर्वी शिक्षकांच्या सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदल्या होत असतात आणि त्यामुळे यांच्या वडिलांची देखील सतत बदली होत होती.

त्यामुळे खेबुडकरांचे शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांना कविता लिहण्याची, काव्ये रचण्याची तसेच गाणी लिहिण्याची आवड हि लहान वयापासूनच असल्यामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी एक काव्य लिहिले ते म्हणजे “मानवते तू विधवा झालीस” आणि हे दीर्घ प्रकारचे काव्य खेबुडकरांनी आपले घर जळताना पाहिल्यावर लिहिले होते.

पिंजरा हा मराठी चित्रपट कोणाला माहित नाही हा चित्रपट सर्वांना माहित आहे आणि यामध्ये जी गाणी आहेत ती सर्व गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहेत. त्यांनी पिंजरा या चित्रपटासाठी १०० हून अधिक गाणी लिहिली होती त्यामधील या चित्रपटासाठी एकूण ११ गाणी निवडली होती आणि या चित्रपटातील सर्वच गाणी हि लोकप्रिय झाली होती.

jagdish khebudkar information in marathi
jagdish khebudkar information in marathi

जगदीश खेबुडकर यांची माहिती – Jagdish Khebudkar Information in Marathi

नाव

जगदीश खेबुडकर
जन्म१० मे १९३२
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील खेबवडे या गावामध्ये
ओळखगीतकार
मृत्यू

३ मे २०११

प्रारंभिक जीवन – early life 

जगदीश खेबुडकर यांचा जन्म १० मे १९३२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील खेबवडे या गावामध्ये झाला होता. त्याचे वडील शिक्षक होते आणि त्यांच्या बदल्या वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्यामुले खेबुडकर यांचे शिक्षण देखील वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांच्या १६ व्या वर्षी महात्मा गांधींची हत्या पाहिली आणि त्या हत्तेमध्ये खेबुडकरांचे घर देखील जाळण्यात आले आणि त्यावेळी त्यांनी मानवते तू विधवा झालीस हे काव्य लिहिले आणि हे काव्य ऑल इंडिया रेडीओ द्वारे प्रसारित झाले आणि येथूनच त्यांची गीतकार म्हणून कारकिर्दी सुरु झाली.

जगदीश खेबुडकर यांची गीतकार म्हणून कामगिरी

जगदीश खेबुडकर हे गीतकार होते आणि त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे अनेक गाणी आणि कविता लिहिल्या आणि हि गाणी आणि कविता लोकप्रिय देखील झाल्या आणि आजही अनेक गायक त्यांनी लिहिलेली गाणी गातात. त्यांनी चित्रपटांच्यासाठी ३५० हून अधिक गाणी लिहिली आहेत तर त्यांनी एकूण ३००० गाणी लिहिली आहेत आणि ३५०० कविता लिहिल्या आहेत. खेबुडकर यांनी बालगीतांच्या पासून लावणी गीते तसेच देशभक्ती गीते अश्या वेगवेगळ्या प्रकारातील गाणी लिहिली आहेत.

त्यांनी अभंग, भक्ती गीते, देशभक्ती गिते, लोकसंगीत, लावणी, बालगीते, पोवाडा आणि ओवी यासारख्या अनेक काव्य प्रकारांची रचना केली. त्यांनी ऐरणीच्या देवा तुला, देहाची तिजोरी, ब्रह्मा विष्णू आणि महेश तसेच विठू माऊली तू माऊली जगाची या सारखी भक्तीगीते लिहिली जी आपण अजागी गुणगुणत असतो म्हणजेच आज देखील हि भक्तिगीते लोकांच्या मनामध्ये घर करून बसली आहेत.

त्यांनी त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे पहिले काव्य लिहिले ते म्हणजे मानवते तू विधवा झालीस आणि हे दीर्घ प्रकारचे काव्य होते आणि हे काव्य त्यांनी आपले घर जळताना पाहिल्यानंतर लिहिले होते. त्यांना १९६० मध्ये चित्रपटामध्ये पहिल्यांदा लावणी लिहिण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीच सोनं बनवलं कारण त्यांनी ती संधी स्वीकारून मला हो म्हणत्यात लवंगी मिरची हि पहिली लावणी लिहिली आणि ती खूप लोकप्रिय देखील झाली. 

त्यानंतर त्यांना पिंजरा या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची देखील संधी मिळाली आणि त्यांनी त्या चित्रपटासाठी १०० पेक्षा अधिक गाणी लिहिली आणि त्यामधील ११ गाणी हि या चित्रपटासाठी निवडण्यात आली आणि त्यांची या चित्रपटासाठी दिलेली गाणी हि खूप लोकप्रिय झाली आणि गीतरसिकांच्या मनामध्ये घर केले. त्यांनी आकाशी झेप घेरे, राजा ललकारी अशी दे, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, कुण्या गावाच आलं पाखरू, कुठ कुठ जायच हनिमूनला या सारखीअनेक सुपरहिट गाणी लिहिली.

त्याचबरोबर त्यांनी अनेक भक्तिगीते देखिली लिहिली आणि त्यामधील एक लोकप्रिय झालेले गीत म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गीत लिहिले आणि या गीतामध्ये त्यांनी अष्टविनायक गणपतींचा संपूर्ण प्रवासच घडवून आणला. त्यांनी रंगल्या रात्री अश्या, माहेरची माया, घर संसार, बिजली, पिंजरा, मानाचा मुजरा आणि साधी मानस या सारख्या चित्रपटांच्यासाठी गाणी लिहिली. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली गाणी हि सुधीर फडके, राम कदम, वसंत पवार आणि इतर संगीतकारांनी गायली आहेत.

जगदीश खेबुडकर यांच्या काही कविता – jagdish khebudkar poem in marathi

जागा हो माणसा, मानवते तू विधवा झालीस, अमुचा जीवन प्याला, आज मरुनिया जीव झाला मोकळा, नको नको बनू आंधळा, काशीला श्रावण बाळ निघाला  

जगदीश खेबुडकर यांना मिळालेले पुरस्कार – awards 

जगदीश खेबुडकर यांनी संगीत क्षेत्रामध्ये अशी मोलाची कामगिरी करून ठेवली आहे कि त्यांनी लिहिलेली गाणी हि आज देखील लोकांच्या मनामध्ये घर करून बसली आहेत आणि अश्या या मोलाच्या कामगिरीसाठी गीतकार जगदीश खेबुडकर यांना राज्य शासनाने एकूण ११ पुरस्कार देऊन त्यांना गौरव सन्मान केला आहे. खाली आपण त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी पाहणार आहोत.

 • कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार.
 • शांताराम जीवनगौरव पुरस्कार.
 • मार्मिक गौरव पुरस्कार.
 • कोल्हापूर भूषण पुरस्कार.
 • लावणीरत्न पुरस्कार.
 • यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार.
 • ग.दि माडगुळकर गौरव पुरस्कार.
 • करवीर भूषण पुरस्कार.
 • केंद्र शासन पुरस्कार.
 • सूरसिंगार संसद पुरस्कार.
 • छत्रपती शाहू पुरस्कार.

आम्ही दिलेल्या jagdish khebudkar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जगदीश खेबुडकर यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jagdish khebudkar poem in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about jagdish khebudkar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!