कलारीपयट्टू खेळाची माहिती Kalaripayattu Game Information in Marathi

Kalaripayattu Game Information in Marathi कलारीपयट्टू या खेळाविषयी माहिती पूर्वीच्या काळी लोकांच्यामध्ये किंवा राज्यांच्या मध्ये सत्तेसाठी मोठ्या प्रमाणात युध्द होत होती आणि या युद्धा मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचा वापर केला जात होता जसे कि धनुष्यबाण आणि तलवारबाजी आणि या सारखा युद्धा मध्ये वापरला जाणारा आणखीन एक खेळ म्हणजे कलारीपयट्टू. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात वैज्ञानिक मार्शल आर्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलारीपयट्टू या खेळाची सुरुवात भारतामधील केरळ या राज्यामध्ये झाली आणि या खेळाला केरळची शान म्हणून ओळख आहे.

कलारीपयट्टू हा खेळ खेळण्या पाठीमागील प्रमुख उदिष्ट म्हणजे मन आणि शरीर यांच्यातील अंतिम समन्वय साधने. हा खेळ खेळण्याच्या पूर्वी संपूर्ण शरीराला चपळ आणि लवचिक होईपर्यंत तेल लावले जाते. त्याचबरोबर या खेळामध्ये चॅटम (उडी मारणे), ओट्टम (धावणे) या सारखे प्रकार देखील घेतले जातात.

या खेळाची च्या सर्व हालचाली ह्या सिंह आणि वाघ यांसारख्या वन्य प्राण्यांच्या पासून प्रेरित होवून रचल्या आहेत. हा खेळ पूर्वीच्या काळी स्वसंरक्षणासाठी खेळला जात होता परंतु हा खेळ सध्या एक खेळ प्रकार किंवा मनोरंजनासाठी खेळला जातो.  

kalaripayattu game information in marathi
kalaripayattu game information in marathi

कलारीपयट्टू खेळाची माहिती – Kalaripayattu Game Information in Marathi

कलारी म्हणजे काय?

मुठीच्या फटीपासून तलवारीच्या झुलापर्यंतची प्रत्येक हालचाल ही जाणीवपूर्वक केलेली ध्यान क्रिया आहे आणि ही क्रिया केरळचे योध्ये पारंपारिक लढाई मध्ये वापरत होते तसेच विवाद मिटवण्यासाठी आणि युद्ध पध्दत म्हणून वापरली जात होती.

इतिहास – History of Kalaripayattu Game In Marathi

कलारीपयट्टू ही २००० वर्षे जुनी मार्शल आर्ट आहे. जी स्वसंरक्षणासाठी वापरली जात होती आणि या खेळाची च्या सर्व हालचाली ह्या सिंह आणि वाघ यांसारख्या वन्य प्राण्यांच्या पासून प्रेरित होवून रचल्या आहेत. कलारीपयट्टू ही सर्व मार्शल आर्ट्सची जननी आहे असे अनेक इतिहासकारांचे मत आहे.

हजारो वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खू असलेल्या बोधिधर्माने ही कला भारतात आत्मसात केली. ११ व्या ते १६ व्या शतकादरम्यान कलारीपयट्टू हा केरळ समाजाचा अविभाज्य भाग होता आणि केरळमधील ७ वर्षापेक्षा मोठी मुलांना कलारीपयट्टू प्रशिक्षण दिले जात होते.

यामध्ये त्यांना सर्वप्रथम उडी मारणे, झेप घेणे, पाळणे या सारख्या कला शिकवल्या जात होत्या त्यानंतर त्यांना लाकडापासून बनवलेल्या शस्त्रास्त्रांनी खेळायला शिकवण्यात आले आणि मग पुढच्या टप्प्यात त्यांना तलवारीसारखी धातूची शस्त्रे वापरायला शिकवण्यात आली.

कलारीपयट्टू खेळाच्या उत्पत्ती संबधित कथा 

केरळमधील कलारीपायट्टूच्या उत्पत्तीशी संबंधित एक कथा सांगितली जाते आणि त्या कथे अधे असे सांगितले जाते कि भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती हे दोघेही एका घनदाट जंगलात त्यांच्या मुक्कामादरम्यान असताना त्यांनी सिंह आणि एक अवाढव्य हत्ती यांच्यातील लढा पाहिला. त्यांनी या लढ्याचे बारकाईने निरीक्षण केले आणि दोन्ही प्राण्यांनी अवलंबलेल्या अनेक स्वसंरक्षण तंत्र शिकले.

कलारीपयट्टू हा खेळ खेळल्यामुळे होणारे फायदे – benefits 

 • कलारीपयट्टू हा खेळ खेळल्यामुळे तुम्ही तज्ञ तर बनताच पण त्याचबरोबर तुमची बुद्धिमत्ता देखील सुधारण्यास मदत होते. या मार्शल आर्ट तंत्रात तुम्हाला बचाव आणि आक्रमणाची अनेक तंत्रे शिकवली जातात आणि त्यामुळे बुध्दीमत्ता देखील वाढते.
 • जोपर्यंत तुम्ही आंतरिकरित्या तंदुरुस्त आणि निरोगी नसाल, तोपर्यंत तुम्ही स्वतःला कधीही बलवान म्हणू शकत नाही परंतु कलारीपयट्टू हा खेळ खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते.
 • या कलेमध्ये आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर वेगवान गतीने हल्ला करावा लागत असल्यामुळे याचा उपयोग तुमची चपळता वाढण्यासाठी होऊ शकतो.
 • इतर मार्शल आर्ट्सप्रमाणे कलारीपयट्टू हा प्रकार देखील शरीराची लवचिकता वाढवण्यास मदत करते.

कलरीपयट्टू या खेळाविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about kalaripayattu game

 • कथकली सारख्या नृत्य प्रकारातही आपण कलरीपयट्टूचा प्रभाव पाहू शकतो.
 • कलारीपयट्टू या खेळाचा एक विशेष अर्थ आहे तो म्हणजे ‘कलारी’ म्हणजे शाळा आणि ‘पायट्टू’ म्हणजे प्रशिक्षण.
 • १८ व्या शतकामध्ये पझहस्सीच्या बंडांच्या परिणामकारकतेमुळे ब्रिटिशांना योद्धांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांनी कलरीपयट्टूच्या सरावावर बंदी घालण्यात आली होती.
 • आज केरळमध्ये कलारीपयट्टू या खेळाचे फक्त दोन प्रकार शिल्लक आहेत ते म्हणजे वडाक्केन (उत्तरी) कलारी आणि टेक्कन (दक्षिण) कलारी.
 • या खेळाची च्या सर्व हालचाली ह्या सिंह आणि वाघ यांसारख्या वन्य प्राण्यांच्या पासून प्रेरित होवून रचल्या आहेत.
 • ११ व्या ते १६ व्या शतकादरम्यान कलारीपयट्टू हा केरळ समाजाचा अविभाज्य भाग होता आणि केरळमधील ७ वर्षापेक्षा मोठी मुलांना कलारीपयट्टू प्रशिक्षण दिले जात होते.
 • कलारीपयट्टू ही केरळमधील एक मार्शल आर्ट आहे, जी जगातील सर्वात जुनी लोकप्रिय आणि वैज्ञानिक कला आहे.
 • कलारीपयट्टू या कलेच्या माध्यमातून कुंग-फूच्या या चीनी कलेचा विकास झाला आहे.
 • मुळात केरळच्या मध्य आणि उत्तरेकडील भाग, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या लगतच्या भागांमध्ये हे जास्त प्रमाणात आढळते.
 • भारतीय परंपरेनुसार आणि लोकप्रिय मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्ण हे या ज्ञानाचे खरे जनक होते कारण त्यांनी या विद्येचा वापर करून चाणूर, मुष्टिक आदी मल्लांचा वध केला होता तसेच या ज्ञानाने त्याने कालिया नागाचाही वध केला.
 • कलारीपयट्टू या कलेला मार्शल आर्टची जननी मानले जाते.
 • कलारीपयट्टू हा खेळ पूर्वीच्या काळी स्वसंरक्षणासाठी वापरला जात होता.

आम्ही दिलेल्या kalaripayattu game information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कलारीपयट्टू खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kalaripayattu game information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि History of Kalaripayattu Game In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये some interesting facts about kalaripayattu game Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!