कलौंजी म्हणजे काय ? Kalonji in Marathi

Kalonji in Marathi – Kalonji Meaning in Marathi कलौंजी विषयी माहिती कलौंजी हि एक औषधी वनस्पती आहे. ज्याचा उपयोग अनेक आरोग्य फायद्यासाठी केला जातो. कलौंजी या वनस्पतीला फिकट जांभळ्या – पांढऱ्या रंगाची फुले लागतात आणि त्याला वरती मोठ्या प्रमाणात बिया लागतात त्या बिया काळ्या रंगाच्या असतात त्यांना कलौंजीच्या बिया किंवा काळ्या बिया म्हणतात. या बिया स्वयंपाक घरामध्ये मसाला म्हणून वापर केला जातो. कारण या बिया सुगंध युक्त असतात तसेच याचा उपयोग औषधी उपचारांच्यासाठी देखील केला जातो. आपण घरगुती स्वयंपाकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले किंवा इतर साहित्य संबधित पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरतो.

त्याच प्रकारे कलौंजीच्या बियांचा देखील वापर फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात असणाऱ्या औषधी गुणांच्यासाठी विशेषता वापरले जातात. कलौंजी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे जर हे आपण खाल्ले तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.

त्यामुळे आपला अनेक रोगांच्यापासून बचाव होतो तसेच कलौंजी मध्ये कर्करोग, हृदयरोग मधुमेह या सारख्या मोठ मोठ्या आजारांचा धोका कमी होतो तसेच यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे अनेक आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी मदत होते. परंतु जर तुम्ही कलौंजी तुमच्या आहारामध्ये वापरण्याचा विचार करत असाल.

तर ते किती प्रमाणात वापरायचे, कसे वापरायचे, कधी खायचे या सर्व प्रश्नांच्या बद्दल डॉक्टरांच्या कडून माहिती करून घ्या आणि मग आहारामध्ये वापर करा कारण याचे फायाद्यांच्या बरोबर दुष्परिणाम देखील आहेत. चला तर मग आज या लेखामध्ये कलौंजी म्हणजे काय आहे आणि या त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते पाहूयात.

Kalonji Information in Marathi
Kalonji Information in Marathi
अनुक्रमणिका hide
1 कलौंजी विषयी माहिती – Kalonji in Marathi

कलौंजी विषयी माहिती – Kalonji in Marathi

प्रकारवनस्पती
वनस्पतीचे नावकलौंजी
मुख्य भागकलौंजीच्या बिया
उंची२० ते ८० सेंटी मीटर
कुटुंबराननुकुलसी
शास्त्रीय नावनाईजेला सॅटीवा
इंग्रजीनाईजेला

कलौंजी म्हणजे काय – kalonji meaning in marathi 

कलौंजी हि एक औषधी वनस्पती आहे आणि कलौंजी या वनस्पतीला फिकट जांभळ्या – पांढऱ्या रंगाची फुले लागतात आणि त्याला वरती मोठ्या प्रमाणात बिया लागतात त्या बिया काळ्या रंगाच्या असतात त्यांना कलौंजीच्या बिया किंवा काळ्या बिया म्हणतात.

कलौंजी वनस्पती विषयी माहिती – What is Kalonji in Marathi

कलौंजी हे एक औषधी वनस्पती आहे ज्याची उंची २० ते ८० सेंटी मीटर पर्यंत वाढते आणि या वनस्पतीला फिकट जांभळ्या – पांढऱ्या रंगाची फुले लागतात आणि त्याला वरती मोठ्या प्रमाणात बिया लागतात त्या बिया काळ्या रंगाच्या असतात त्यांना कलौंजीच्या बिया किंवा काळ्या बिया म्हणतात.

कलौंजी हे राननुकुलसीच्या कुटुंबांतील आहे आणि या वनस्पतीचे शास्त्रीय नाव नाईजेला सॅटीवा असे आहे आणि याला इंग्रजीमध्ये नाईजेला असे म्हंटले जाते. कलौंजी हे दक्षिण आफ्रिका, भारत आणि दक्षिण – पश्चिम आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. कलौंजी झाड हे लांब आणि पातळ हिरव्या रंगाचे असते आणि त्याला पांढऱ्या – निळसर रंगाचे फुल असते आणि त्याला बिया लागतात ह्या बिया काळ्या रंगाच्या असतात.

प्रकारवनस्पती
वनस्पतीचे नावकलौंजी
मुख्य भागकलौंजीच्या बिया
उंची२० ते ८० सेंटी मीटर
कुटुंबराननुकुलसी
शास्त्रीय नावनाईजेला सॅटीवा
इंग्रजीनाईजेला

कलौंजीचा इतिहास – history of kalonji in marathi  

कलौंजीच्या बियांचा उपयोग पूर्वी पासून औषधी गुणांच्यासाठी केला जातो आणि या बियांना पूर्वी बहुतेक काळी बडोशेफ म्हणून ओळखली जायची मग नंतर त्याचे नाव लॅटिन शब्दावरून नाव कलौंजी असे पडले. तसेच बायबल मध्ये देखील हिब्रू या शब्दाचा अर्थ काळी बडीशेफ असा आणि आणि काळी बडीशेपला कलौंजी असे म्हणतात. कलौंजी बद्दलच्या औषधी गुणांच्या बद्दल इतिहासामध्ये काही कथा सांगितल्या आहे त्या आता आपण पाहूयात.

  1. रोम या देशामध्ये देखील कलौंजीचा वापर अनेक उपचारांच्यासाठी पूर्वीच्या काळी केला जात होता.
  2. ए. डी पहिल्या शतकामध्ये एका ग्रीक चिकित्सकाने डोकेदुखी, सर्दी, दातदुखी किंवा पोटातील रोगांच्यावर उपचार म्हणून एक  कारची काळी बडीशेफ वापरली होती आणि ती बहुतेक कलौंजी होती.
  3. गालिब बिन अबजार हे मक्का मादिनाला जात असताना त्यांची तब्बेत बघडली होती आणि ज्यावेळी मक्का मादिनाला पोहचले त्यावेळी तेथे असणारा इब्न अबी अतिक हा गालिब बिन अबजार विचारपूस करत असताना कलौंजी रसाचे थेम नाकात घालण्यास सांगितले त्यामुळे तब्बेत बरी होईल असे सांगितले.

कलौंजी हे नाव कसे पडले – what is called kalonji in marathi

कलौंजी हि एक हिरव्या रंगाची लांब आणि पातळ वनस्पती आहे ज्याला पांढऱ्या – निळसर रंगाचे फुल लागते आणि त्याला काळ्या रंगाच्या बिया लागतात आणि काळ्या रंगाला लॅटिन भाषेमध्ये निजार असे म्हणतात आणि या काळ्या रंगावरूनच याचे नाव कलौंजी असे पडलेले आहे.

कलौंजी बियांची चव कशी असते – kalonji seeds meaning in marathi

कलौंजीच्या बियां ह्या दिसायला कांद्याच्या बियांच्यासारख्या असतात परंतु या दोन्हीही बियांची चव वेगवेगळी असते. कलौंजीच्या बिया ह्या काळ्या रंगाच्या असतात थोड्या कडवट आणि याचा सुगंध थोडा तीक्ष्ण असतो. कलौंजीच्या बिया आपण भाजीमध्ये, ब्रेडमध्ये किंवा केकमध्ये देखील केला जातो.

कलौंजी मध्ये असणारे पोषक घटक – nutrition value 

कलौंजी हि एक औषधी वनस्पती आहे ज्याचा उपयोग अनेक आरोग्य फायद्यासाठी केला जातो. आपण घरगुती स्वयंपाकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले किंवा इतर साहित्य संबधित पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरतो त्याच प्रकारे कलौंजीच्या बियांचा देखील वापर फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात असणाऱ्या औषधी गुणांच्यासाठी विशेषता वापरले जातात.

कलौंजी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे जर हे आपण खाल्ले तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आपला अनेक रोगांच्यापासून बचाव होतो तसेच कलौंजी मध्ये कर्करोग, हृदयरोग मधुमेह या सारख्या मोठ मोठ्या आजारांचा धोका कमी होतो तसेच यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे अनेक आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी मदत होते.

कलौंजी मध्ये अँटीऑक्सिडंट्स, खनिजे तसेच अनेक जीवनसत्व असतात आणि याबरोबरच यामध्ये १०० हून अधिक पोषक घटक असतात त्यामुळे कलौंजीच्या सेवनामुळे अनेक मोठ्या मोठ्या रोगांच्यापासून बचाव होतो. या मध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात जसे कि प्रथिने १७ ग्रॅम, फायबर १० ग्रॅम, लोह ६६ ग्रॅम, कॅल्शियम, मॅग्नेशियम या सारखे अनेक गुणधर्म असतात ते आता आपण खाली दिलेल्या तक्त्यामध्ये सविस्तर पणे पाहूयात.

पोषक घटकप्रमाण ( प्रति १०० ग्रॅम कलौंजी )
कॅलरी३७५ किलो
प्रथिने१७ ग्रॅम
लोह६६ ग्रॅम
फायबर१० ग्रॅम
कॅल्शियम९३० मिली ग्रॅम
मॅग्नेशियम३६५ मिली ग्रॅम
सोडियम१६८ मिली ग्रॅम
फॉस्फरस४९९ ग्रॅम
जीवनसत्व अ६४ मायक्रो ग्रॅम
जीवनसत्व क५ मायक्रो ग्रॅम
जीवनसत्व इ३.३३ ग्रॅम

कलौंजी पासून होणारे फायदे – kalonji uses in marathi

कलौंजी हि एक औषधी वनस्पती आहे आणि कलौंजी या वनस्पतीला फिकट जांभळ्या – पांढऱ्या रंगाची फुले लागतात आणि त्याला वरती मोठ्या प्रमाणात बिया लागतात त्या बिया काळ्या रंगाच्या असतात त्यांना कलौंजीच्या बिया किंवा काळ्या बिया म्हणतात आणि ह्या बिया खूप औषधी असल्यामुळे त्यापासून काही आरोग्य फायदे होतात ते आपण खाली पाहूयात.

  • कर्करोगावर उपचार करण्यासाठी उपयोगी पडते 

कलौंजीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे कॅन्सरला कारणीभूत मुक्त रॅडिकल्सला प्रतिबंध करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे हानिकारक मुक्त रॅडिकल्सला निष्प्रभ करण्यास मदत करतात जे कर्क रोगासारख्या मोठ मोठ्या रोगांचा धोका कमी होतो. कलौंजीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि स्वादुपिंडाचा कर्करोग बरे होण्यास मदत होते.

कलौंजी खाल्ल्याने शरीरातील कर्करोगाच्या पेशीही मरतात तसेच कलौंजीमध्ये थायमोक्विनोन नावाचा पदार्थ असतो जो कलौंजीमध्ये आढळणारा हा मुख्य घटक आहे आणि हा पदार्थ कर्करोगविरोधी आहे. ज्या लोकांना कर्करोगासारखे मोठ मोठ आजर आहे त्यांनी कलौंजी खाल्ल्यामुळे त्यांचा रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

  • कलौंजी मधुमेहासाठी फायदेशीर 

टाईप २ मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी कलौंजी खूप उपयुक्त आहे. मधुमेही रुग्ण आकर्षक परिणामांसाठी रिकाम्या पोटी काळ्या चहासोबत कलौंजी तेल घेऊ शकतात ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तातील साखरेमुळे तहान वाढणे, वजन कमी होणे,  थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण यांसह अनेक नकारात्मक लक्षणे दिसू शकतात.

दीर्घकाळापर्यंत नियंत्रण न ठेवल्यास, उच्च रक्तातील साखरेमुळे आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात आणि म्हणूनच हे परिणाम कमी होण्यासाठी आपण कलौंजी तेलाचा वापर करावा.

  • रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते 

जर आपण एक चमचा कलौंजीचे तेल सेवन केले तर तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो तसेच ते पूर्णपणे नियंत्रित होवून त्याची पुनरावृत्ती देखील होत नाही. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी एक चमचा कलौंजीचे तेल कोमट पाण्यासोबत प्यावे त्यामुळे रक्तदान नियंत्रित राहील.

  • महिलांच्यासाठी उत्तम 

कलौंजी ही महिलांसाठी एक उत्तम गोष्ट आहे क्रम प्रसूतीनंतर त्यांना ते काकडीच्या रसासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे अशक्तपणा दूर होतो. तकेच नाही तर महिलांना पांढरे पाणी, मासिक पाळीत वेदना समस्यांना आराम मिळतो.

  • दात मजबूत करते

केवळ तुमचे दातच नाही तर हिरड्यांमधून रक्तस्त्राव आणि कमकुवत दात यासारख्या तोंडातील आरोग्यासाठी कलौंजी फायदेशीर आहे. दातदुखी दूर करण्यासाठी कलौंजी हे रामबाण औषध आहे. तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी अर्धा चमचा कलौंजी तेल एक कप दह्यात मिसळा आणि दिवसातून दोनदा हिरड्या आणि दातांवर लावा यामुळे तुमच्या दाताच्या आणि हिरड्यांच्या सर्व तक्रारी पळून जातील.

  • जळजळ कमी करते

कलौंजीच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे विविध जुनाट जळजळांवर उपचार करू शकतात तसेच सांधेदुखी देखील कमी होते. जळजळी वर उपचार म्हणून रोज जर कलौंजीच्या तेलाचे सेवन केले तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरते.

बहुतेक प्रकरणांमध्ये, जळजळ ही एक सामान्य रोगप्रतिकारक प्रतिक्रिया असते जी शरीराला इजा आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. दुसरीकडे दीर्घकाळ जळजळ कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या विविध रोगांमध्ये योगदान देते.

  • दम्यापासून आराम मिळतो

मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे दमा हा एक सामान्य आजार झाला आहे आणि हा आता खूप लोकांच्यामध्ये आहे. दमा असलेल्या लोकांसाठी कलौंजी हे एक शक्तिशाली औषध आहे. कोमट पाण्यात फक्त एका जातीची बडीशेप तेल आणि मध मिसळा आणि रोज प्या त्यामुळे दम्याचा धोका थोडा कमी होतो.

  • कोलेस्ट्रॉल कमी करते 

कोलेस्टेरॉल हा चरबीसारखा पदार्थ आहे जो तुमच्या शरीरात आढळतो. तुम्हाला काही कोलेस्टेरॉलची गरज असताना, तुमच्या रक्तात जास्त प्रमाणात जमा होऊन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कलौंजी विशेषतः प्रभावी असल्याचे मानले जाते. कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी कलौंजी वरदान ठरू शकते.

ज्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी सलग ३ महिने दररोज २ ग्रॅम कलौंजी बिया खाव्यात. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे किती समस्या येऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो, त्यामुळे कलौंजी तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

  • प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते 

कलौंजी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे जर हे आपण खाल्ले तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आपला अनेक रोगांच्यापासून बचाव होतो.

  • काळे डाग आणि मुरुमांशी लढन्यास मदत होते 

कलौंजी तेल तुमची त्वचा गुळगुळीत आणि कोमल बनवू शकते. विशेषत: हिवाळ्याच्या हंगामात जेव्हा थंड आणि कडक हवा तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज बनवते तेव्हा हे खूप प्रभावी आहे. जर आपण कलौंजी ते चेहऱ्याला लावले तर चेहऱ्यावरील काळे डाग आणि मुरूम कमी होण्यास मदत होते.

  • दृष्टी सुधारते 

कलौंजीच्या सेवनाने दृष्टीही वाढते तसेच डोळ्यांत पाणी येण्याची किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असेल किंवा मोतीबिंदू सारख्या समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

  • वजन कमी करण्यास मदत होते 

कलौंजी मध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे मच्या शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करू शकते आणि चयापचय चांगले झाल्यामुळे वजन नियंत्रित होण्यसाठी मदत होते.

  • हृदयविकारापासून दूर राहते

कलौंजी हृदयासाठी खूप प्रभावी आहे. हे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करून तुमचे हृदय निरोगी ठेवते. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही नियमितपणे दुधासोबत कलौंजी तेलाचे सेवन करावे.

  • कलौंजी केसांचे आरोग्य देखील सुधारते 

कलौंजी चे तेल केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. कलौंजीचे तेल आपण जर केसांना लावले तर आपली केस गळण्याची समस्या दूर होते आणि केस दाट येण्यास मदत होते. कलौंजीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे केस गळणे थांबवतात आणि त्यांना मजबूत करतात.

कलौंजीबद्दल सांगितलेली काही अनोखी तथ्ये – facts about kalonji 

  • सांधेदुखी, निरोगी हृदय राखण्यासाठी, श्वासोच्छवासाच्या समस्यांशी लढा देण्यासाठी आणि कर्करोगापासून बचाव करण्यासाठी कलौंजीच्या बियांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
  • कलौंजी बियांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर आणि चरबी हे घटक मोठ्या प्रमाणात असतात.
  • कोमट पाण्यात कलौंजी तेल आणि मध मिसळून हे पाणी आपण रोज पिऊ शकतो.
  • कलौंजीला इंग्रजीमध्ये नाईजेला किंवा ब्लॅक क्युमीन म्हणतात.
  • भारतात पश्चिम बंगाल, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये त्याची व्यावसायिकरित्या कलौंजीची लागवड केली जाते. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्येही अल्प प्रमाणात लागवड केली जाते.
  • कलौंजीच्या बिया बाजारामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असतात आणि हे बाजारामध्ये ९० रुपये किलोच्या दराने विकले जातात किंवा याचे दर संबधित बाजारपेठेवर अवलंबून असतात.
  • भारतामध्ये कलौंजीचा वापर डाळ फ्राय, काही तळलेल्या भाज्या, ब्रेड, समोसा, काही केकमध्ये, पापडीमध्ये आणि कचोरी यांसारख्या चवदार पदार्थांमध्ये केला जातो.
  • कलौंजी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव नाईजेला सॅटीवा असे आहे.

आम्ही दिलेल्या kalonji information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कलौंजी म्हणजे काय ? संपूर्ण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kalonji meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kalonji seeds meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kalonji in marathi meaning Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!